Arjun Kisanrao Wagh

Arjun Kisanrao Wagh

औरंगाबाद तालुका अध्यक्ष
महाराष्ट्र र

Photos from Arjun Kisanrao Wagh's post 24/08/2021

*सर्वांना माहितीस्तव*
_आज दि 24/08/2021 रोजी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटने तर्फे मा गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती औरंगाबाद यांना आज निवेदन देण्यात आले व मागील "आवास योजना, EOL सर्व्हे, मिशन अंत्योदय व इतर सर्व्हेचे प्रलंबित मानधन लवकरात लवकर देण्यात यावे याबाबत चर्चा झाली व संघटनेचे सर्व प्रश्न लवकर मार्गी लावू असा शब्द मा गटविकास अधिकारी साहेब यांनी दिला. .

26/07/2021
24/06/2021

सण सौभाग्याचा बंद अतूट नात्याचा या मंगल दिनी पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा ....

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

#वटपौर्णिमा #मराठीसण #भारतीयसंस्कृती

27/04/2021

उद्यापासून
18 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांनी ऍप वर रजिस्ट्रेशन करून #कोविड_19_प्रतिबंधक लस घ्यावी...

#महाराष्ट्र_राज्य_संगणक_परिचालक_संघटना
#संगणकपरीचालक

Photos from Arjun Kisanrao Wagh's post 15/04/2021

आज दि 15 एप्रिल 2021 रोजी #महाराष्ट्र_राज्य_संगणक_परिचालक_संघटना औरंगाबाद यांच्या तर्फे मा गटविकास अधिकारी पंचायत समिती औरंगाबाद यांना व ब्लॉक मॅनेजर आ स से केंद्र औरंगाबाद यांना आज #संगणकपरिचालक यांच्या प्रलंबित मानधन संदर्भात निवेदन देण्यात आले त्यावेळी संघटनेचे तालूका अध्यक्ष श्री अर्जुन किसनराव वाघ व पदाधिकारी श्री विष्णू नाडे, श्री सिद्धार्थ बनसोडे आदी उपस्थित होते

Photos from Arjun Kisanrao Wagh's post 10/04/2021

आज आमचे लाडके राज्याध्यक्ष Siddheshwar Munde साहेबांनी त्यांच्या गावातील आरोग्य उपकेंद्रात कोरोना प्रतीबंधात्मक लस घेतली,यावेळी गावचे सरपंच सुंदरभाऊ,माजी सरपंच शिवाजीअण्णा,ग्रामपंचायत सदस्य बालाजी गित्ते,CHO कराड - मुंडे मॅडम,ANM पुरी मॅडम यांच्यासह आशा वर्कर,अंगणवाडी ताई उपस्थित होत्या.
ही लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.कोरोनाच्या संकट काळात फक्त लसच एक आशेचा किरण आहे. #संगणकपरिचालकांनी कोरोनाच्या संकट काळात काम केल्यामुळे प्रत्येक #संगणकपरिचालकाला हि लस मिळणार आहे,आपापल्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या सोबत संपर्क करून सर्वानी लस घ्यावी व या कठीण काळात स्वतःची काळजी घ्यावी.

Photos from Arjun Kisanrao Wagh's post 08/04/2021

सर्वांना माहितीस्तव ------
कोरोनाच्या काळात राज्यातील संगणकपरिचालकांनी पूर्वी पासून एक कोव्हीड योद्धा म्हणून काम केले आहे.त्यावेळी विमा कवच देण्यात आले परंतु प्रोत्साहनपर मानधन दिले नाही.तरीही सर्वच ठिकाणी संगणकपरिचालक स्थानिक पातळीवर मा.गटविकास अधिकारी साहेब,तहसीलदार साहेब,मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब व जिल्हाधिकारी साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार आपले काम नसताना सुद्धा काम करत होते व काम करत आहेत.
परंतु जो पर्यंत संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा मिळणार नाही तो पर्यंत प्रशासनातील कोणतेही अधिकारी संगणकपरिचालकांना नेमून दिलेल्या कामा व्यतिरिक्त इतर कामे लावू शकत नाहीत.तरीही अनेक ठिकाणी दररोज गटविकास अधिकारी साहेब,तहसीलदार साहेब तसेच ceo व collector साहेब त्यांच्या स्तरावरून जबरदस्ती आदेश देऊन जर तुम्ही हे काम नाही केले तर आम्ही या या कलमानुसार तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करू! म्हणजे संगणकपरिचालकाला समजले आहे या साहेबांनी ? कुठलेही डाटा एन्ट्रीचे काम असेल तर ग्रामपंचायतच्या संगणकपरिचालकांनी करायचे असा नियम लावला जातो तो चुकीचा आहे कारण सध्या संगणकपरिचालक हे कोणत्याही प्रकारचे कर्मचारी नाहीत फक्त आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या कामासाठी संगणकपरिचालकांची नियुक्ती आहे.त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब,bdo साहेब यांना विनंती आहे की आपण अशी जबरदस्ती करू नये आणि केली तरी आम्ही ऐकणार नाहीत.
काल एक हद्दच झाली बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील संगणकपरिचालकांनी इतर लावलेले काम करण्यास नकार दिला कारण की ते काम आपले नव्हतेच त्याचबरोबर तुटपुंजे असलेले मानधन वेळेवर मिळत नाही,दुसरीकडे कोराना काळात विमा नाही,गावावरून तालुका स्तरावर जायला व परत यायला 100 ते 200 रुपये अशा अडचणीच्या काळात खर्च होतो,काम मोफत करून घेतले जाते,गावातील ग्रामपंचायत स्तरावर असलेले काम तसेच राहते व कितीही काम केले तरी शासनाला कुणाचे काही देणे घेणे नाही त्यामुळे नकार दिला,त्यामुळे तर पाटोदा तहसील कार्यलयाचे तहसीलदार साहेब व पंचायत समितीच्या bdo साहेबांनी त्या संगणकपरिचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक साहेबाना लेखी स्वरूपात दिले,त्याची माहिती तेथील तालुकाध्यक्ष व कमिटीने माझ्याकडे दिली त्याची दखल घेत ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी नितीन पवार सर,csc spv चे प्रकल्प संचालक त्यांच्याकडे तक्रार केली व हे काम आमचे नसून आम्ही काम करणार नाहीत पण हा अन्याय होत असल्याचे सांगितले त्यावर कक्ष अधिकारी पवार साहेबानी त्यावर तात्काळ दखल घेत संबंधितांना गुन्हा दाखल न करण्याच्या सूचना केल्या व आज csc spv कंपनीच्या वतीने पत्र काडून इतर कामे लावता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्यातील सर्व संगणकपरिचालक, तालुका व जिल्हा कमिटी यांना सूचना आहे,इतर काम करायचे असेल तर तालुका व जिल्हा स्तरावर निर्णय घ्या पण त्याचा मोबदला मिळाला पाहिजे कोणी जबरदस्ती करून दबाव देऊन काम करून घेत असेल तर त्याला अजिबात जुमानू नका या इत्तर कामामुळे कोणावरही कारवाई होणार नाही,कोणी अशी कारवाई करत असेल तर संघटनेला तात्काळ माहिती द्यावी.
#संगणकपरिचालक
सिद्धेश्वर मुंडे राकेश देशमुख मयुर कांबळे
अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव
महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना

06/04/2021

आमचे सहकारी परतूर तालुक्यातील माव पाटोदा येथील #संगणकपरीचालक यांचे काल रात्री दुःखद निधन झाले
भगवंत त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो

#महाराष्ट्र_राज्य_संगणक_परिचालक_संघटना

Photos from Arjun Kisanrao Wagh's post 04/04/2021

भावपूर्ण श्रध्दांजली!
शनिवारी छत्तीसगडमधील बिजापूर येथील तारेम जवळ नक्षलवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत आपले 22 जवान शहीद झाले आहेत. गेल्या काही काळातील हा सर्वात मोठा नक्षली हल्ला समजला जात आहे. शाहीदांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याच बळ मिळो आणि शाहिद जवानांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
#शहीद
#महाराष्ट्र_राज्य_संगणक_परिचालक_संघटना

24/03/2021

महाराष्ट्र राज्याचे लाडके #ग्रामविकासमंत्री मा ना श्री Hasan Mushrif साहेब आपणास #महाराष्ट्र_राज्य_संगणक_परिचालक_संघटना व Arjun Kisanrao Wagh कडून जन्मदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा....!
#संगणकपरिचालक

Siddheshwar Munde

22/03/2021

दुःखद घटना!
ग्रामपंचायत सारोळे पठार ता.संगमनेर जि.अहमदनगर येथे कार्यरत असलेले आपले सहकारी संगणकपरिचालक बाबासाहेब अंबादास मोरे यांचे कोरोना/कोव्हीड-19 मुळे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले आहे.त्यांना महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच अर्जुन किसनराव वाघ कडून भावपुर्ण श्रद्धांजली!💐💐
हे डोंगरा एवढे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वराने त्यांच्या कुटुंबाला द्यावी हिच प्रार्थना!
#भावपुर्ण_श्रद्धांजली💐💐

Photos from Arjun Kisanrao Wagh's post 11/03/2021

सर्वांना माहितीस्तव ---(11 मार्च 2021)
आपण आपल्या न्याय हक्कासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर 22 फेब्रुवारी 2021 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते.या आंदोलनात अनेक वळणे आले.शासनाने आपले आंदोलन पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दडपण्याचा प्रयत्न केला.परंतु आपला सर्वांचा माघार न घेण्याचा निश्चय असल्यामुळे अनेक घडामोडी घडून सुद्धा आपण माघार घेतली नाही,पोलीस दररोज आपल्या संगणकपरिचालकांना ताब्यात घेत होते, 60 तास नजर कैदेत ठेवले तरीही आपण आंदोलनावर ठामच होतोत.त्यातच शासना सोबत बैठका सुरूच होत्या.14 जानेवारी 2021 रोजी जि आर काढून शासनाने पुढील 5 वर्षासाठी याच कंपनीला काम दिले होते आणि पुन्हा काहीही होणार नव्हते.त्यामुळे आपले आंदोलन मागे घेण्यात येणार नव्हते हे निश्चित होते.त्यानुसार आय टी महामंडळात घेण्याचा ठराव झाला होता पण आय टी खाते असलेले मुख्यमंत्री साहेबाना या 18 दिवसात वेळच मिळाला नाही.त्यामुळे ती प्रक्रिया होऊ शकली नाही. पण ग्रामविकास विभागाने 02 ऑगस्ट 2017 रोजी नियुक्ती केलेल्या यावलकर समितीने ग्रामपंचायतच्या सुधारित आकृतीबंधात डाटा एन्ट्री ऑपरेटर/संगणकपरिचालक या पदाची निर्मिती करण्याची शिफारस 30 मे 2018 रोजी शासनास केली होती.त्यानुसार आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील सर्व संगणकपरिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार पदनिर्मिती करण्याच्या मुद्यावर ग्रामविकासमंत्री ना.हसनजी मुश्रीफ साहेब यांनी संघटनेची बैठक घेतली व सचिव साहेबांना आदेश दिले त्यानुसार 9 मार्च 2021 रोजी ग्रामविकास विभागाने यावलकर समितीचा अहवाल स्विकारला व 9 मार्च रोजीच आपले सरकार प्रकल्पातील सर्व संगणकपरिचालकांसाठी पदनिर्मिती करून नियुक्ती देण्यासाठी फाईल तयार केली व त्यावर कक्ष अधिकारी साहेब,उपसचिव साहेब,ग्रामविकास सचिव साहेब यांची स्वाक्षरी 10 मार्च ला झाली व आज 11 मार्च रोजी ग्रामविकासमंत्री ना.हसनजी मुश्रीफ साहेबांनी आपल्या संघटनेच्या शिष्टमंडळाला बोलावून घेतले व सविस्तर चर्चा केली आणि त्यांनी सांगितले की यावेळी मी तुम्हाला न्याय देणार आहे पण सामान्य प्रशासन व अर्थ विभाग आणि उच्चस्तरीय समिती (हाय पावर कमिटी) यांची मान्यता आम्ही घेणार आहेत आणि तुम्हाला न्याय देणार आहेत.त्याचवेळी त्यांनी आमच्या समोर सुधारित आकृतीबंधानुसार संगणकपरिचालकांसाठी पदनिर्मिती करण्याच्या फाईल वर स्वाक्षरी केली व आम्हाला दाखवले व म्हणाले ग्रामविकास विभागाने या विषयाला मान्यता दिली आहे.
त्यानुसार त्यांनी एक लेखी पत्र आपल्या संघटनेला दिलेले आहे.त्यामुळे बेमुदत धरणे आंदोलन व 16 तारखेचा मोर्चा दोन्ही तात्पुरते स्थगित करण्यात येत आहेत.शासन लवकरात लवकर निर्णय घेईल व परत आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही.त्याच बरोबर पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणकपरिचालक यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया 1 महिन्याने सुरू होईल पण 2 महिने धरून चाला तसेच invoice कन्फर्मेशन करण्यासाठी otp ची अट सध्या रद्द करण्याची मागणी केली ती अट सुद्धा रद्द होऊन जाईल.
ग्रामविकासमंत्री साहेबांनी लेखी देण्यास नकार दिला होता म्हणून आपले आंदोलन सुरूच होते पण त्यांनी आज लेखी दिले संघटनेच्या वतीने सुद्धा पाठपुरावा सुरूच राहील आणि सर्वांना लवकरच न्याय मिळेल.
या लढ्यात ज्या सहकारी संगणकपरिचालक बंधू - भगिनी यांनी 22 तारखे पासून उपस्थित राहून योगदान दिले,रात्रंदिवस आंदोलनात सहभागी राहिले,शासनाने पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून कितीही आवाज दाबला तरी दबले नाहीत,त्या सर्व संगणकपरिचालकांच्या प्रयत्नाला आज खरे यश आलेले आहे.त्या सर्व प्रामाणिक संगणकपरिचालकांचे योगदान संघटना केव्हाच विसरणार नाही कारण की हा लढा ऐतिहासिक होता.परत एकदा मुंबईत येऊन आंदोलनाला ताकद देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन!
शेवटी पोलीस यंत्रणा सुद्धा आपले कर्तव्य बजावत असते त्यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य केले,त्यामुळे आपले आंदोलन आझाद मैदाना बरोबरच मुंबईत सुद्धा झाले.त्याबद्दल त्यांचे सुद्धा सत्कार करून धन्यवाद व्यक्त केले.
सोबत --
मा.ना.हसनजी मुश्रीफ साहेब,ग्रामविकासमंत्री,महाराष्ट्र राज्य यांनी दिलेले लेखी पत्र
#संगणकपरिचालक
सिद्धेश्वर मुंडे राकेश देशमुख मयुर कांबळे
अध्यक्ष सचिव सचिव
महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना

07/03/2021

आपल्या न्याय व हक्कासाठी आंदोलन करत असलेल्या संगणक परिचालकांवर झालेल्या लाठीचार्ज ची दखल घेऊन तो मुद्दा अधिवेशनात उठवल्याबद्दल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते श्री.प्रवीण भाऊ दरेकर Pravin Darekar - प्रविण दरेकर यांचे मनःपुर्वक आभार आणि धन्यवाद !!!
#संगणकपरिचालक
#धरनेआंदोलन
#तिघाडी_सरकार_मुर्दाबाद
Siddheshwar Munde

05/03/2021

स्वागत आहे सर्वांचे

Want your business to be the top-listed Government Service in Aurangabad?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Aurangabad
431007

Other Social Services in Aurangabad (show all)
Md Ehsan Md Ehsan
Nawadih Road, Jagjivan Nagar
Aurangabad, 824101

आपका अपना MD एहसान भावी प्रत्याशी- उपाध्यक्ष (vice chairman) नगर परिषद, औरंगाबाद

National Awareness Mission - राष्ट्रीय जागरूकता अभियान National Awareness Mission - राष्ट्रीय जागरूकता अभियान
Aurangabad, 431001

लोकांना कोणत्याही अडचणी संबंधित जागृ

Shrichand Jadhav Shrichand Jadhav
Raygad Nagar
Aurangabad, 431001

Kiran Patil Kiran Patil
Narayn Plaza, "A" Wing, Flat No. 05, Cidco
Aurangabad

भारतीय जनता पार्टी

Manorma Devi Manorma Devi
औरंगाबाद, भारत
Aurangabad, 824101

Janhavi Bhupesh Patil Janhavi Bhupesh Patil
Samarthnagar
Aurangabad, 431001

Political Candidate For Sambhajinagar (Aurangabad)Mauncipal Corporation Election Held In 2021 From B

Exeeracademy Exeeracademy
Near Naval Tata Stadium
Aurangabad, 431001

It is an online coaching and counseling for students... our mission statement is"To prepare student

Malik Arbaz Malik Arbaz
Aurangabad

जीवा भावाचा माणुस जीवा भावाचा माणुस
Khadiraod , Sambhajinagar
Aurangabad, 431007

आपल्या वार्डातील, शहरातील काही समस्या असल्यास आपण जरुर कळवावे.

Dr.SHIVAJI POLE FC Dr.SHIVAJI POLE FC
SFA School, Jalna Road
Aurangabad, 431001

Service to humanity is the service to the God!

Deva Kale-देवा काळे Deva Kale-देवा काळे
Autade Chowk, Near Harsul T Point
Aurangabad, 431001

देवा क्रिएशन औरंगाबाद मल्टी सर्विसेस