Pune Rural Police

Pune Rural Police

Share

This is the official page of Pune Rural Police. Not monitored 24/7. Monitored only between 10 am to 6 pm. For any emergency, dial 100 or 020-25657171.

The Pune Rural Police, a professional law enforcement agency, is engaged in prevention of crime, maintenance of law and order, management of traffic and in the co-ordination of various services provided by many other organizations that help in maintaining the safety and security of the citizens of Pune District. Police Department, being the most visible arm of the Government, is often the first point of contact between the citizens and the local Government. We, at Pune Rural Police, are conscious of the great responsibility bestowed on us and are fully prepared to assist you in all possible ways.

31/07/2026
17/07/2026

सायबर फसवणूक झालेले पैसे परत मिळवण्याची सोपी कायदेशीर प्रक्रिया.(MRM) पोर्टल

10/07/2026

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी पालखी मार्गावरील वाहतुकीत बदल केला आहे.
वाहन चालकांनी नमूद मार्गाचा अवलंब करावा.

10/07/2026

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी पालखी मार्गावरील वाहतुकीत बदल केला आहे.
वाहन चालकांनी नमूद मार्गाचा अवलंब करावा.

01/05/2026

सह्याद्रीच्या दरीखोऱ्यांपासून ते कोकणच्या किनाऱ्यापर्यंत प्रत्येक मैलावर ऐतिहासिक शौर्याचा पैलू जोपासत विस्तारलेले आपले महाराष्ट्र राज्य!
सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#महाराष्ट्र_दिन_२०२६

01/05/2026

माननीय सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांचे वार्षिक निरीक्षण अनुषंगाने आयोजित उत्कृष्ट पोलीस पाटील सत्कार दरम्यान पुणे ग्रामीण पोलीस दलाबद्दल पोलीस पाटील श्रीमती कल्पिता बोऱ्हाडे लाखनगाव ता आंबेगाव जि पुणे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी त्यांनी सांगितले की, पोलीस दलातील अधिकारी यांचे गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी योग्य सूचना व मार्गदर्शन सहकार्य लाभले आहे, नागरिकांच्या मालमत्तेचे होणारे नुकसान टळले आहे, त्यामुळे मी पोलीस दलाचे आभार मानत आहे.

Photos from Pune Rural Police's post 28/03/2026

*पुणे ग्रामीण पोलीस दलाला ई-गव्हर्नन्स १५० दिवस कार्यक्रमात घवघवीत यश; कोल्हापूर परिक्षेत्रात प्रथम क्रमांक*

▪️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल (IPS) यांचा गौरव

पुणे, दि.२८: महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या मूल्यमापनात पुणे ग्रामीण पोलीस दलाने एकूण २०० पैकी १४५ गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात चौथा क्रमांक पटकावला असून, कोल्हापूर परिक्षेत्रात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान पटकावला आहे.

मुंबई येथील सह्याद्री सभागृहात आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल (IPS) यांना सन्मानित करण्यात आले.

या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत पोलीस विभागातील कार्यक्षमता, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवा यांचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये डिजिटल प्रणालींचा वापर, ऑनलाइन सेवा, डेटा व्यवस्थापन, डॅशबोर्ड मॉनिटरिंग आणि तंत्रज्ञानाधारित निर्णयप्रक्रिया या घटकांवर विशेष भर देण्यात आला.

पुणे ग्रामीण पोलीस दलाने विविध डिजिटल प्रणालींची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. *CCTNS प्रणालीद्वारे* FIR नोंदणी, गुन्ह्यांची माहिती, तपास प्रगती आणि आरोपींची माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आली असून, सर्व पोलीस ठाण्यांमध्ये रिअल-टाइम डेटा शेअरिंग सुलभ झाले आहे.

*‘आपले सरकार’ पोर्टल* अंतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाने नागरिकांसाठी १७ विविध सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांना घरबसल्या अर्ज करणे, प्रमाणपत्रे मिळवणे व विविध सेवा सहजपणे घेणे शक्य झाले आहे. तसेच *‘आपले सरकार ग्रीव्हन्स’ प्रणालीद्वारे* प्राप्त होणाऱ्या तक्रारी व अर्जांचा १४ दिवसांच्या आत निपटारा करण्यात येत आहे.

*ई-ऑफिस (E-File) प्रणालीमुळे* कागदविरहित प्रशासनाला गती मिळाली असून, सर्वाधिक प्रकरणांचा जलद निपटारा करण्यात पुणे ग्रामीण पोलीस दल अग्रस्थानी राहिले आहे. यामुळे कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता व कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

*व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट प्रणालीद्वारे* नागरिकांना २४x७ तत्काळ माहिती, तक्रार नोंदणीची सुविधा आणि सेवा स्थिती तपासण्याची सोय उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे संवाद अधिक जलद व सुलभ झाला आहे.

*इंटिग्रेटेड डॅशबोर्ड आणि अधिकृत वेबसाईट* यांच्या माध्यमातून पुणे ग्रामीण पोलीस दलाची संपूर्ण माहिती, कामगिरी, गुन्हेगारी आकडेवारी आणि विविध सेवा नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे पारदर्शकता अधिक बळकट झाली आहे.

*GIS प्रणालीअंतर्गत* रात्रगस्त दरम्यान अधिकारी व अमलदारांचे अचूक लोकेशन ट्रॅक करणे शक्य झाले असून, नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत जवळचे पोलीस ठाणे सहज ओळखता येऊन तात्काळ मदत मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

तसेच, *Dial 112 आपत्कालीन सेवा* अंतर्गत उत्कृष्ट व भरिव कामगिरी करत कमी वेळेत नागरिकांना प्रतिसाद देण्यावर विशेष भर देण्यात आला असून, त्यामुळे आपत्कालीन सेवांची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

*कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी* विकसित करण्यात आलेल्या “पोलीस पॅड” प्रणालीद्वारे ४,००० ते १०,००० लोकसंख्या असलेल्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अचूक मनुष्यबळ नियोजन करण्यात आले. या प्रणालीमुळे योग्य ठिकाणी योग्य पोलीस कर्मचारी तैनात करणे शक्य झाले असून, भीमा-कोरेगाव तसेच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यांसारखे मोठे बंदोबस्त अत्यंत नियोजनबद्ध व यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले.

याशिवाय, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली *“60 Days” आणि “90 Days” पायलट प्रकल्प* राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा, सेवा वितरणातील गती आणि अंतर्गत समन्वय सुधारण्यात महत्त्वाची प्रगती झाली आहे.

या यशाबद्दल पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत, “तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम पोलीस प्रशासन उभारणे ही काळाची गरज असून, पुणे ग्रामीण पोलीस दल या दिशेने सातत्याने प्रयत्नशील राहील,” असे सांगितले.

ही कामगिरी संपूर्ण पुणे ग्रामीण पोलीस दलासाठी अभिमानास्पद असून, राज्यातील इतर पोलीस दलांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

Photos from Pune Rural Police's post 17/03/2026

श्री.सदानंद दाते.(भा.पो.से.)मा.पोलीस महासंचालक सो,महाराष्ट्र राज्य.मुंबई यांचे अध्यक्षतेखाली पुणे ग्रामीण घटकातील पोलीस वृंद परिषद आयोजित करण्यात आली, मा.पोलीस महासंचालक सो यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेशी संवाद साधला अडचणी समजुन घेतल्या व त्यांचे निराकरण केले. श्री.सुनिल फुलारी (भा.पो.से.)विशेष पोलीस महानिरीक्षक सो,कोल्हापूर परिक्षेत्र,कोल्हापूर यांनी मनोगतव्यक्त केले. दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.श्री.संदीपसिंह गिल(भा.पो.से.)पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी केले. मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.रमेश चोपडे सो.पुणे विभाग यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स.पो.नि.श्री.आकाश पवार सो यांनी केले.त्यावेळी मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.गणेश बिरादार सो.बारामती विभाग श्री. दिलीप शिंदे मा.पोलीस उपअधीक्षक (गृह,उपमुख्यालय),व.पो.नि श्री.अविनाश शिळीमकर रा.पो.नि.श्री.कोळी सह पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

18/02/2026

🔰 शिवभक्तांसाठी महत्त्वाची सूचना...

दिनांक १९/०२/२०२६ रोजी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवासाठी किल्ले शिवनेरी परिसरात राज्यभरातील शिवभक्त मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत.. त्यापार्श्वभुमीवर सोबतच्या व्हिडीओत दर्शविल्याप्रमाणे १८ ते १९ फेब्रुवारीला वाहतुकीत बदल केले आहेत.

✅ वाहतुकी बाबतची माहिती
🅿️ पार्किंगची व्यवस्था
🟧 इतर सोई-सुविधा

शिवभक्तांसह नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, ही विनंती.

- पुणे ग्रामीण पोलीस दल

Photos from Pune Rural Police's post 16/02/2026

शिवजयंती उत्सव निमित्त, ता. जुन्नर, जि. पुणे येथे दि.१९/०२/२०२६ रोजी शिवजयंती उत्सव निमित्त एकेरी वाहतुक करणेबाबत व सर्व प्रकारची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविणे बाबत मा. जिल्हाधिकारी सो यांचे आदेश.

Telephone

Address


Office Of Superintendent Of Police Pune Rural
Pune
411008