BOOK SHELF
BOOK SHELF IS PROVIDING VARIOUS OFFERS. BOOK SHELF ALSO PROVIDING BOOKS TO SCHOOL,COLLEGE AND LIBRARIES.
23/04/2026
जागतिक पुस्तक दिनाच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा
25/03/2026
बुक शेल्फ (Book Shelf)
जय श्रीराम
सर्वांना राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🚩
*बंधविमोचन राम 🏹*
रवींद्र भट यांच्या ओखवत्या आणि मनाला भिडणारी अशी कादंबरी आम्ही सवलतीत उपलब्ध करून देत आहे.
मूळ किंमत ₹२५०/-
सवलतीत ₹२००/-(४० टपाल खर्च वेगळा)
बुक शेल्फ
090110 96250
03/12/2025
#9011096250
*जय श्री गुरुदेव दत्त*
दत्त जयंती ते चतुर्थी (दिनांक ४ ते ७ डिसेंबर २०२५) पर्यंत खालील तीन पुस्तकांच्या *संचावर* विशेष सवलत उपलब्ध
**१) दत्त माझा दीनानाथ दत्त संप्रदाय: आचार व तत्त्वज्ञान
२) 'अलख निरंजन शिव गोरक्ष' नाथ संप्रदाय: आचार व तत्त्वज्ञान
३) जीवाची जाण
मूळ किंमत ₹५४५/- सवलतीत ₹४३५/-( टपाल खर्च वेगळा)**
१) *दत्त माझा दीनानाथ दत्त संप्रदाय : आचार व तत्त्वज्ञान*
महाराष्ट्रात 14व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांनी दत्त संप्रदायाचे प्रवर्तन केले. त्यांना दत्त अवतार मानले जाते. त्यांची माहिती सांगणारे पुस्तक.
गुरुभक्तिप्रधान व सगुणोपासक असणार्या दत्त संप्रदायाचा संपूर्ण धांडोळा घेणारे पुस्तक.
धर्म, संस्कृती, भाषा व समाजजीवन लयाला जात असतानाच्या काळात समाजाचा आत्मविवेक जागृत करणार्या दत्त संप्रदायाच्या कामगिरीचा आढावा घेणारे पुस्तक.
व्यक्ती व समाजाचे मानसिक व आध्यात्मिक उन्नयन हा दत्त संप्रदायाचा उद्देश उलगडून सांगणारे पुस्तक.
२) *'अलख निरंजन शिव गोरक्ष’ नाथ संप्रदाय : आचार व तत्त्वज्ञान*
नाथ संप्रदायाचे महत्त्व सहज सोप्या भाषेत उलगडून सांगणारे पुस्तक.
नाथ संप्रदाय हा गुरू-शिष्य परंपरेवर आधारित आहे. नऊ नाथांची माहिती देणारे पुस्तक.नाथ संप्रदायाच्या खुणा महाराष्ट्रात जागोजागी आहेत. त्यांचे महत्त्व विशद करणारे पुस्तक.
धर्म, जात, लिंग अशा भेदभावांना थारा न देता सार्या समाजाला एकत्र आणण्याचे काम करणार्या नाथ संप्रदायातील सिद्ध गुरूंची ओळख करून देणारे पुस्तक.
मध्ययुगीन काळात अज्ञानामुळे व आचार-विचारातील भ्रष्टतेमुळे अधोगतीला लागलेल्या समाजाला ध्यान व योग साधनेच्या मार्गाने उन्नत करण्याचे कार्य केलेल्या नाथ संप्रदायाची समग्र माहिती सांगणारे पुस्तक
३) *जीवाची जाण*
आपले रोजचे जीवन सर्वतोपरी सुखाचे असावे असे प्रत्येकालाच वाटत असते; परंतु खरे सुख कोणते हे आपणास समजलेले नसते. आपल्या मन, बुद्धी, चित्ताच्या गुंतावळ्यात आपण भरकटत असतो. त्यासाठी जीवाने जाणिवेच्या स्तरावर यायला हवे. त्यासाठी करायच्या विचारांचे मंथन म्हणजे हे पुस्तक. जीवाच्या या जाणिवेतून अध्यात्माचा श्रीगणेशा सुरू होतो. अशा सर्व मुमुक्षूंना उपयुक्त ठरेल असे हे पुस्तक आहे हे निश्चित.
23/11/2025
shelf
#9011096250
मूळ किंमत ₹३४०/- सवलतीत ₹२७०/- (टपाल खर्च वेगळा)
*रामाच्या पावलांवर पाऊल*
रामायणातील प्रत्येक स्थानाला भेट देत केलेला प्रवास
लेखक : विक्रांत पांडे , निलेश कुलकर्णी
अनुवाद :शुचिता नांदापूरकर-फडके
वनवासातल्या वास्तव्यादरम्यान राम ज्या ज्या मार्गावरून पुढे गेले त्या सर्व स्थानांचा शोध घेत प्रवास केला तर…? अशी विलक्षण कल्पना लेखकद्वयीला सुचली आणि लागलीच त्यांनी आखणी करायला घेतली. आणि मग सुरू झाला त्यांचा प्रवास… अयोध्या… दंडकारण्य… पंचवटी… किष्किंधा… रामेश्वरम आणि मग श्रीलंका…
या प्रवासात त्यांना स्थानिक लोक, पुजारी, महंत भेटले. सर्वांनी रामायणाशी जोडलेल्या अनेक आख्यायिका, कथा आणि कहाण्या ऐकवल्या. त्यातील अनेक कथा या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक अभ्यासपूर्ण तसंच रंजकही झालं आहे. प्रवासात लेखकद्वयीला असं लक्षात आलं की, या कथांच्या विविध आवृत्त्या असल्या, तरी त्यांना बांधून ठेवणारी नैतिकतेची चौकट एकच आहे !
पिढ्यान् पिढ्यांपासून भारतीय जनमानसात रुजलेल्या; लोकजीवन, सांस्कृतिक-सामाजिक अवकाश आणि भक्ती-परंपरा यांच्या संचिताचा अविभाज्य भाग झालेल्या रामकथेसोबत केलेला अनोखा शोधक प्रवासानुभव… रामाच्या पावलांवर पाऊल !
आजच आपली मागणी कळवावी
21/11/2025
#9011096250
मूळ किंमत ₹२३०/- सवलतीत ₹१८५/- ( टपाल खर्च वेगळा)
दहा प्रती घेतल्यास प्रत्येकी ₹१६५/- मध्ये
*ध्यास वन्दे मातरमचा [ एका राष्ट्रीय गीताच्या शोधाचा अद्भुत प्रवास ]*
राष्ट्रभक्तीने भारलेले असंख्य असतात; पण वेदमंत्राइतकेच वंदनीय असणारे ‘वन्दे मातरम्’ हे आपले राष्ट्रीय स्तोत्र, राष्ट्रीय गीत! या गीताच्या जन्माला शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचे सुमंगल लेणे लाभले असताना, या परमपवित्र राष्ट्रीय गीताचा, जन्मस्थळाचा व त्याभोवती असलेल्या काहीशा निगूढ पदरांचा वेध घ्यावासा वाटणे, हे संवेदनच विलक्षण दुर्मीळ आहे.
अमरेंद्र गाडगीळ यांनी लिहिलेल्या बंकिमचंद्रांच्या छोटेखानी चरित्र पुस्तकातून ‘वन्दे मातरम्’ या मंत्राशी मिलिंद सबनीस यांचे भावोत्कट नाते जुळले. भले हे छोटेखानी पुस्तक असेल, पण त्यामुळे एका अद्भुत यात्रेसाठी मनाने पाऊल पुढे निघण्यासाठी ते आतुर झाले. पुढे मग निमित्ते कशी येत गेली आणि ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा समग्र संदर्भाने शोध घेण्याचे पिसे लेखकाला कसे जडले, याचा प्रवास लेखकाने या पुस्तकात उलगडला आहे.
ही ध्यासयात्रा केवळ ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या जन्मस्थानाभोवती वा त्यातून प्रसरणाऱ्या मंत्रवत प्रार्थनालहरीपर्यंत न राहता, पुढे नव्या पिढीत हा राष्ट्रीय विचार रुजावा म्हणून त्यांनी अथकपणे जिवाचे जे रान केले, त्या घटनांचेही दर्शन या पुस्तकातून घडते.
आजच आपली मागणी कळवावी
बुक शेल्फ ( Book Shelf)
090110 96250
20/11/2025
shelf
#9011096250
*स्वातंत्र्यलक्ष्मी की जय* असे संबोधणारे विनायक दामोदर सावरकर यांचे दुर्मिळ सावरकर विचारदर्शन ग्रंथसंचात (चार पुस्तके) नवीन रूपात उपलब्ध झाले आहेत.
- साहित्यिक सावरकर
- हिंदुत्वनिष्ठ सावरकर
- भाषाभिमानी सावरकर आणि-
- विज्ञाननिष्ठ सावरकर
संच मूळ किंमत ₹१,९९९/- सवलतीत ₹१,६००/-( टपाल खर्च वेगळा)
नोंदणी अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२५
ग्रंथ संच १५ डिसेंबर २०२५ नंतर मिळतील.
आजच आपली नोंदणी कळवावी
बुक शेल्फ 090110 96250
06/11/2025
shelf
#वंदेमातरम
*वंद्य वंदे मातरम्*
*लेखक डॉ.सच्चिदानंद शेवडे*
मूळ किंमत ₹१५०/- सवलतीत ₹१३०/- मध्ये
विशेष सवलतीत १० प्रती घेतल्यास ₹१००/(१००*१०)
9011096250
समर्थक,विरोधक व तटस्थ या साऱ्यांना "वंदे मातरम" हा मंत्र ठाऊक आहे. तसे पाहिले तर या सहा अक्षराचा अर्थ काय? मी मातेला वंदन करतो. पण हा अर्थ नुसता उच्चारणे वेगळे आणि #वंदेमातरम असा गजर करणे वेगळे! खरे वाटत नसेल तर प्रयोग करून पहा वंदे मातरम या शब्दांच्या उच्चारासरशी अंगावर रोमांच उभे राहतात. वेगळीच अनुभूती दाटून येते.
हेच मंत्राचे सामर्थ्य असते.
म्हणून मंत्राचे अर्थ सांगत बसण्याची पद्धत आपल्याकडे नाही. मंत्र हीच शक्ती असते. ते सामर्थ्य, त्याच्या अर्थात कसे असणार? हर हर महादेव, ही घोषणा ऐकली रणांगणात उतरल्यासारखे वाटते! तर हर हर गंगे, ऐकले की स्नान करीत असल्यागत वाटते.
वंदे मातरम या गीतामुळे योगी अरविंदांनी, बंकिमचंद्रांचे वर्णन #ऋषी_बंकिम असे केले. बंगालच्या फाळणीच्या काळात वंदे मातरम या शब्दांना मंत्रत्व प्राप्त झाले.
आज तिथीनुसार हे गीत १५१व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
◆मसापचा उत्कृष्ट इतिहास ग्रंथ पुरस्कार प्राप्त.
◆वंदेमातरमचा इतिहास,जन्म.
◆बंगालची फाळणी.
◆संपूर्ण जनगणमन व वंदेमातरम आणि दुर्मिळ छायाचित्रे यांचा समावेश.
(वंद्य वंदे मातरम (तिसरी आवृत्ती),
देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी काल ( २१/०९/२५) रोजी संध्याकाळी देशवासियांना बोलताना GST दर कमी झाल्या मुळे काय होईल हे सांगितले. यात ते म्हणाले की आता फिरणे/पर्यटन स्वस्त होईल, हॉटेल, लॉजचा खर्च देखील कमी होईल. आपल्या सर्वांना आता कमी खर्चात *स्व बोध स्व भ्रमण* यांचा अवश्य अनुभव घेता येईल.
त्यामुळे सांस्कृतिक वार्तापत्र निर्मित *पर्यटन पण जरा हटके* हा दिवाळी अंक आजच नोंदणी करावा आणि अवश्य नवीन स्थळांना भेट देऊन त्याचा आनंद घ्या.
प्रकाशन पूर्व मूल्य ₹१५०/-
अंतिम दिनांक:-२४/०९/२५
सां. वा.प्रतिनिधी :-9011096250
03/08/2025
कै.वसंतराव देवकुळे हे पुणे व महाराष्टातील पहिल्या पिढी मधील रा. स्व.संघाचे कार्यकर्ते होते. संघाच्या स्थापनेनंतर केवळ आठ वर्षात वसंतरावांचा संघाशी संबंध आला. सन १९३३ मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी असलेले वसंतराव शाखेत जाऊ लागेल. तो त्यांच्या मृत्यू पर्यंत (१९८७). त्यांनी सन १९८३ मध्ये *संघच का?व कसा?* या नावाचे छोटेखानी पुस्तक लिहिले. तेव्हा संघात काम करताना कशा अडचणी येत होत्या,काही विशेष नोंदी, दुर्मीळ अनुभव आणि आठवणी, बरोबर दर दहा वर्षातील संघात झालेल्या घडामोडी यांची माहिती या पुस्तकात आहे. ज्या आजही आपल्याला उपयुक्त होतील. सर्व जुन्या- नव्या संघ स्वयंसेवक आणि ज्यांना नव्याने संघात यायचे आहे अशांनी हे पुस्तक अवश्य विकत घेतले पाहिजे.
आजच आपली मागणी कळवावी
बुक शेल्फ (Book Shelf)
9011096250
मूळ किंमत ₹२००/- सवलतीत ₹१७०/-(+४० टपाल खर्च वेगळा)
15/07/2025
बुक शेल्फ (Book Shelf)
9011096250
मूळ किंमत ₹६००/-सवलतीत ₹४८०/-(टपाल खर्च वेगळा)
*श्रीशिवदिग्विजय*
ही शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची *ऐतिहासिक बखर* आहे, जी मराठी साहित्यातील एक मौल्यवान ग्रंथ मानली जाते. या बखरीत महाराजांच्या लढाया, राज्याभिषेक, शौर्य, धर्मरक्षण, आणि स्वराज्य स्थापनेचा रोमांचकारी इतिहास अत्यंत ओजस्वी भाषेत मांडलेला आहे.
हे पुस्तक शिवकालीन सामाजिक, धार्मिक, आणि राजकीय परिस्थितीचे जिवंत चित्रण करते.
मराठी बखर परंपरेचा उत्कृष्ट नमुना असलेली ही रचना इतिहासप्रेमी, विद्यार्थ्यांकरिता आणि संशोधकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
मूळ किंमत ₹६००/-सवलतीत ₹४८०/-(टपाल खर्च वेगळा)
आजच आपली मागणी कळवावी
बुक शेल्फ (Book Shelf)
090110 96250
12/07/2025
दुर्गप्रेमी आणि दुर्गअभ्यासकांच्या संग्रही असावेच असे...
अनेक प्रसिद्ध व अप्रसिद्ध कागदपत्रांत विखुरलेल्या सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यांच्या ५०० वर्षांच्या संघर्षमय इतिहासात अनेक साम्राज्ये शस्त्रबळावर उदयास आली आणि लयास गेली. किल्ल्यांच्या साहाय्याने लढलेल्या मराठा साम्राज्यातील वीरांच्या पराक्रमाचा आणि शौर्याचा वारसा मिरवणाऱ्या या किल्ल्यांचा वैभवशाली इतिहास ससंदर्भ मांडणारे...
संदीप प्रभाकर परांजपे संपादित *“ऐतिहासिक नोंदी दुर्गांच्या जिल्हे सातारा आणि कोल्हापूर”* हे पुस्तक इंद्रायणी साहित्य, पुणे, प्रकाशित करीत आहे.
ऐतिहासिक नोंदी दुर्गांच्या जिल्हे सातारा आणि कोल्हापूर
संपादन - संदीप प्रभाकर परांजपे
पृष्ठ संख्या - ३१४ + दुर्मीळ रंगीत छायाचित्रे
मूळ किंमत - ४५०
सवलत मूल्य - ४००(टपालखर्चासह)
पुस्तक खरेदीसाठी आजच संपर्क साधावा
बुक शेल्फ (Book Shelf)
090110 96250
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
SNEHA BHIDE NIWARA, YASHWANT NAGAR, TALEGAON DABHADE
Pune
410507