Pmpml

Pmpml

Share

Travel Lifeline of Pune & Pimpri - Chinchwad, providing safe and economical urban mobility solutions. Welcome to official page of PMPML!! (Only SMS.

Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited
Shankar Shet Road, Swargate, Pune-411037
Phone: 91-020-24447983, 24441456
Fax - 91-020-24447900
Email: [email protected]

PMPML Helpline:
To complaint via SMS : 9881495589. Do not call on this number.) To complaint via Call : 020 24545454 (6am to 10pm)

22/09/2026

पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद!

दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल १३,६०,१५७ प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या बससेवेचा लाभ घेतला! 🚌✨

हा विक्रमी प्रवासी प्रतिसाद म्हणजे पीएमपीएमएलवरील आपला विश्वास आणि सार्वजनिक वाहतुकीला दिलेले प्राधान्य याचे प्रतीक आहे. ❤️

आपल्या विश्वासामुळे पीएमपीएमएलला अधिक सक्षमपणे, सुरक्षितपणे आणि जबाबदारीने सेवा देण्याची प्रेरणा मिळते. 🌿

🙏 पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनो, आपल्या विश्वासासाठी मनःपूर्वक धन्यवाद!

💚 आपला विश्वास • आमची प्रेरणा!
🚌 पीएमपीएमएल – आपल्या प्रवासाची विश्वासू साथीदार

#पुणे #पिंपरीचिंचवड #सार्वजनिकवाहतूक #आपलाविश्वासआमचीप्रेरणा #हरितपुणे #सुरक्षितप्रवास #प्रवासीसेवा #जनसंपर्कविभाग

22/09/2026

❤️ पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांचे मनःपूर्वक आभार! ❤️

आपल्या दैनंदिन प्रवासासाठी पीएमपीएमएलच्या सार्वजनिक वाहतुकीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार! 🙏💐

आपला विश्वास, प्रतिसाद आणि सहकार्य यामुळे पीएमपीएमएल अधिक सक्षमपणे सेवा देण्यासाठी प्रेरित होत आहे.

🌱 सार्वजनिक वाहतूक स्वीकारूया…
पर्यावरण वाचवूया…
पुणे अधिक सुंदर, सुकर आणि गतिमान बनवूया!

आपली पीएमपीएमएल — आपल्या विश्वासाची, आपल्या प्रवासाची! 🚌💚

पुणेकरांच्या सेवेत… सदैव पुढे!

22/09/2026

🚌 प्रामाणिकपणाला सलाम! 🙏❤️

स्वारगेट आगारातील पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांनी जपली माणुसकीची नाळ!

दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी मार्ग क्रमांक ५/२ वरील बसमध्ये कर्तव्य बजावत असताना वाहक CR 5419 श्री. संदीप लहाने व चालक DR 5301 श्री. चव्हाण यांना प्रवाशाची बॅग आढळून आली.

या बॅगेमध्ये तब्बल रु. १.५० लाख किमतीचा लॅपटॉप व इतर मौल्यवान वस्तू होत्या. कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडवत बॅग सुरक्षित ठेवली आणि योग्य खातरजमा केल्यानंतर ती प्रवासी श्री. श्रीनिवास फलमारी यांच्याकडे सुखरूप परत केली. 👏

प्रवाशांच्या सुरक्षिततेसोबतच त्यांच्या मौल्यवान वस्तूंचीही काळजी घेणाऱ्या पीएमपीएमएलच्या सेवकांच्या प्रामाणिकपणाला मनःपूर्वक सलाम! 🌟

आपली पीएमपीएमएल — सेवा, सुरक्षितता आणि विश्वासाची! 🚌💙

#स्वारगेटआगार #प्रामाणिकपणा #कर्तव्यनिष्ठा #माणुसकी ेवा #पुणे #जनसंपर्क_विभाग

18/09/2026

आपला प्रवास सुरक्षित, शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह होण्यासाठी प्रवाशांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. 💙

बससेवेदरम्यान बसथांब्यावर बस व्यवस्थित न थांबणे, चालकाकडून मोबाईलचा वापर, निर्धारित मार्ग सोडणे, वाहकाकडून तिकीट न देणे, उद्धट वर्तन किंवा इतर कोणतीही अनियमितता निदर्शनास आल्यास तात्काळ तक्रार नोंदवा.

📱 आपली PMPML ॲपवर तक्रार नोंदवा
☎️ तक्रार निवारण क्रमांक : 020-24545454

आपली एक तक्रार म्हणजे सुरक्षित आणि शिस्तबद्ध PMPML सेवेसाठी महत्त्वाचे पाऊल!

🌿 स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध प्रवासासाठी चला, आपणही सहभागी होऊया!

#आपलीPMPML #प्रवासीसुरक्षा #तक्रारनोंदवा #सुरक्षितप्रवास #शिस्तबद्धबससेवा #पुणे #पिंपरीचिंचवड #जनजागृती #प्रवाशांचीसहभागिता

Photos from Pmpml's post 18/09/2026

प्रबोधनकार ठाकरे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल)च्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी मा. महेश आव्हाड (भा. प्र. से.), अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मा. अजय खेडेकर, नगरसेवक तथा संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.उपस्थित होते.

याप्रसंगी पीएमपीएमएलचे सर्व विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुरोगामी विचारांना आणि समाजप्रबोधनाच्या कार्याला विनम्र अभिवादन!

#प्रबोधनकारठाकरे #जयंती #अभिवादन

12/09/2026

पीएमपीएमएलच्या प्रवासी दिनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संचालक अजय खेडेकर यांनी थेट साधला प्रवाशांशी संवाद; तक्रारींचे अर्ज स्वीकारले

पुणे | दि. ११ सप्टेंबर २०२६ :

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) च्या वतीने आज प्रवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. महेश आव्हाड, भा.प्र.से. यांच्या संकल्पनेतून प्रवाशांच्या समस्या, सूचना व तक्रारी थेट जाणून घेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी प्रवासी दिन साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्याच अनुषंगाने आज मनपा भवन मुख्य बसस्थानक येथे पीएमपीएमएलचे संचालक मा. अजय खेडेकर यांनी सायंकाळी ५.०० ते ७.३० वाजेपर्यंत प्रवाशांशी थेट संवाद साधला.

यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारी जाणून घेतल्या तसेच प्रवाशांकडून लेखी तक्रारी व अर्ज स्वीकारले. प्रवाशांनी बससेवा, वेळापत्रक, मार्ग, बसथांबे, वाहतूक व्यवस्था तसेच प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सुविधांबाबत आपल्या सूचना व समस्या मांडल्या.

या वेळी आगारप्रमुख श्री. मदगे, जनसंपर्क अधिकारी नागेश गायकवाड तसेच संबंधित आगारातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रवाशांच्या समस्या थेट ऐकून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रवासी दिनाचा उपक्रम नियमितपणे राबविण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तक्रारी व सूचनांना प्राधान्य देऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याच्या तसेच प्रवासी दिनाचा सातत्याने आणि प्रभावीपणे अंमल करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

पीएमपीएमएलच्या सर्व आगारांमध्येही प्रवासी दिन उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. विविध आगारांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, सूचना व तक्रारी जाणून घेतल्या तसेच प्रवाशांकडून लेखी अर्ज व तक्रारी स्वीकारण्यात आल्या.

पीएमपीएमएलच्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या समस्या व सूचना मांडल्या. प्रवासी हा सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून, प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ, विश्वासार्ह आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी पीएमपीएमएल सातत्याने प्रयत्नशील आहे. #प्रवासीदिन #पुणे #पिंपरीचिंचवड #प्रवासीसेवा #प्रवाशांच्यासमस्या #प्रवाशांच्यातक्रारी #प्रवाशांच्यासूचना #सार्वजनिकवाहतूक #बससेवा #पुणेबस #अजयखेडेकर #महेशआव्हाड #नागरिकांचासहभाग #दर्जेदारसेवा #सुरक्षितप्रवास #सुलभप्रवास #विश्वासार्हसेवा #पुणेशहर

10/09/2026

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. आयोजित प्रवासी दिन
“आपली हाक, आमची सेवा!”
प्रिय प्रवासी बांधवांनो,
आपल्या प्रवासाला अधिक सुरक्षित, सुलभ, आरामदायी आणि गुणवत्तापूर्ण बनविण्यासाठी PMPML तर्फे दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी ‘प्रवासी दिन’ आयोजित करण्यात येतो.
📅 प्रत्येक महिन्याचा दुसरा शुक्रवार
⏰ सायंकाळी ५.०० ते ७.०० वाजेपर्यंत
📍 स्थळ : PMPML चे सर्व आगार (डेपो)
प्रवासी दिनामध्ये आपण करू शकता:
✅ आपल्या तक्रारी व सूचना थेट नोंदवू शकता
💡 नवीन कल्पना व सूचना मांडू शकता
🔧 सेवेमधील उणिवा ओळखून सुधारणा सुचवू शकता
📋 आवश्यक माहिती व मार्गदर्शन मिळवू शकता
📊 PMPML च्या योजना व नवीन उपक्रमांची माहिती घेऊ शकता
आपल्या प्रत्येक सूचना आणि अभिप्रायाला आम्ही महत्त्व देतो. 🤝
चला, प्रवासी आणि PMPML यांच्यातील संवाद अधिक मजबूत करूया!
📞 संपर्क क्र.: ०२०-२४५४५४५४
📱 व्हॉट्सॲप / संदेश क्र.: ९८८१४९५५८९
📧 ई-मेल: [email protected]
🌱 पर्यावरणपूरक प्रवास | 👥 समावेशक प्रवास | 🛡️ सुरक्षित प्रवास | 😊 सर्वांगीण प्रवास
“जागृत प्रवासी – सक्षम सार्वजनिक परिवहन – प्रगत पुणे!”
#प्रवासीदिन #आपलीहाकआमचीसेवा #पुणे #सुरक्षितप्रवास

09/09/2026

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. आयोजित प्रवासी दिन

“आपली हाक, आमची सेवा!”

प्रिय प्रवासी बांधवांनो,
आपल्या प्रवासाला अधिक सुरक्षित, सुलभ, आरामदायी आणि गुणवत्तापूर्ण बनविण्यासाठी PMPML तर्फे दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी ‘प्रवासी दिन’ आयोजित करण्यात येतो.

📅 प्रत्येक महिन्याचा दुसरा शुक्रवार
⏰ सायंकाळी ५.०० ते ७.०० वाजेपर्यंत
📍 स्थळ : PMPML चे सर्व आगार (डेपो)

प्रवासी दिनामध्ये आपण करू शकता:

✅ आपल्या तक्रारी व सूचना थेट नोंदवू शकता
💡 नवीन कल्पना व सूचना मांडू शकता
🔧 सेवेमधील उणिवा ओळखून सुधारणा सुचवू शकता
📋 आवश्यक माहिती व मार्गदर्शन मिळवू शकता
📊 PMPML च्या योजना व नवीन उपक्रमांची माहिती घेऊ शकता

आपल्या प्रत्येक सूचना आणि अभिप्रायाला आम्ही महत्त्व देतो. 🤝
चला, प्रवासी आणि PMPML यांच्यातील संवाद अधिक मजबूत करूया!

📞 संपर्क क्र.: ०२०-२४५४५४५४
📱 व्हॉट्सॲप / संदेश क्र.: ९८८१४९५५८९
📧 ई-मेल: [email protected]

🌱 पर्यावरणपूरक प्रवास | 👥 समावेशक प्रवास | 🛡️ सुरक्षित प्रवास | 😊 सर्वांगीण प्रवास

“जागृत प्रवासी – सक्षम सार्वजनिक परिवहन – प्रगत पुणे!”

#प्रवासीदिन #आपलीहाकआमचीसेवा #पुणे #सुरक्षितप्रवास

Photos from Pmpml's post 07/09/2026

वीर उमाजी नाईक जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
ब्रिटिश सत्तेविरुद्ध निर्भीडपणे लढा देणारे, स्वातंत्र्याची ज्योत जनमानसात प्रज्वलित करणारे आद्य क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन! 🙏💐
त्यांचे अदम्य शौर्य, संघर्षमय जीवन आणि मातृभूमीप्रती असलेली निस्सीम निष्ठा आम्हा सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.
“शौर्य, स्वाभिमान आणि स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष यांचे प्रतीक म्हणजे वीर उमाजी नाईक!”
🌹 वीर उमाजी नाईक अमर रहे! 🌹
🚌 PMPML – प्रवाशांच्या सेवेसाठी, पुण्याच्या विकासासाठी!
जय हिंद | जय महाराष्ट्र! 🚩

#वीरउमाजीनाईक #राजेउमाजीनाईक #उमाजीनाईकजयंती #आद्यक्रांतिकारक #जयमहाराष्ट्र

Telephone

Address


Shankar Sheth Road, Swargate
Pune
411042

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:45pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm
Saturday 9:45am - 6:15pm
Sunday 9:45am - 5:45pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pmpml posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.