Nilesh Ramesh Bhise

Nilesh Ramesh Bhise

Share

रग रग शंभू मेरा परिचय 🚩

21/05/2026

शंभूचरित्रावर एक अभिनव प्रयोग...

🚩🚩🚩🚩🚩

जय श्रीराम!
लेखक, व्याख्याता
✒️ नीलेश रमेश भिसे
ंभू_मेरा_परिचय

19/05/2026

विराट हिंदू संमेलनानिमित्त 24 तारखेला डोंबिवलीत....

🚩🚩🚩🚩🚩

जय श्रीराम!
लेखक, व्याख्याता
✒️ नीलेश रमेश भिसे
ंभू_मेरा_परिचय

18/05/2026

पुण्यनगरीच्या महापौर मा. सौ. मंजुषा ताई नागपुरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🎉💐
आपल्याला उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा 🙏



🚩🚩🚩🚩🚩

जय श्रीराम!
लेखक, व्याख्याता
✒️ नीलेश रमेश भिसे
ंभू_मेरा_परिचय

Photos from Nilesh Ramesh Bhise's post 18/05/2026

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक नूतनीकरणाचा भूमिपूजन सोहळा
शुभहस्ते -
केंद्रीय मंत्री श्री मुरलीधर अण्णा मोहोळ

ऐतिहासिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. श्री शंभू चरित्राचा प्रचार प्रसार करण्यासाठी पुस्तक लेखन, व्याख्याने आणि महानाट्याची निर्मिती याबद्दल मला पुण्याच्या महापौर माननीय सौ. मंजुषा दीपक नागपुरे तसेच उपमहापौर श्री परशुराम वाडेकर आणि श्री नाना नाशिककर यांच्याकडून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अतिशय नेटके आयोजन धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय नगरसेवक श्री राघवेंद्रजी बाप्पू मानकर यांनी केले होते. या मंगलप्रसंगी उपस्थित राहण्याचा आदेश माननीय श्रीनिवासजी कुलकर्णी आणि माननीय संतोषजी रासकर यांनी दिल्याबद्दल मी त्यांच्याप्रती सदा कृतज्ञ आहे.

🚩🚩🚩🚩🚩

जय श्रीराम!
लेखक, व्याख्याता
✒️ नीलेश रमेश भिसे
ंभू_मेरा_परिचय

16/05/2026

कथा जंजिऱ्याची
कथा सेतूबंधनाची
कथा शंभूरामची

🚩🚩🚩🚩🚩

जय श्रीराम!
लेखक, व्याख्याता
✒️ नीलेश रमेश भिसे
ंभू_मेरा_परिचय

Photos from Nilesh Ramesh Bhise's post 15/05/2026

हिंदू संमेलन
चोरढे गाव मुरुड

रोहा संपल्यानंतर लगेचच येणारे मुरुड तालुक्यातील चोरढे गावात हिंदू संमेलनानिमित्त बिझनेस जिहाद या विषयावर सविस्तर मांडणी केली.
जंजिरा आणि पद्मदुर्गाकडे जाण्यासाठीची जलवाहतूक संपूर्णपणे कोळी बांधवांच्या ताब्यात पाहिजे, यासाठी *समिती करून निवेदन*
*गरज पडली तर आंदोलन* अशी भूमिका घेणे अपरिहार्य आहे असे सर्वांनी एकमताने ठरवले. संमेलन सुरू होताना अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे आयत्या वेळी स्थानात बदल करून एका मंदिरामध्ये संमेलन घेण्यात आले. मुसळधार पाऊस असून देखील अडीचशे हिंदू मंदिरामध्ये पुनश्च संमेलनासाठी एकत्र आले होते.

🚩🚩🚩🚩🚩

जय श्रीराम!
लेखक, व्याख्याता
✒️ नीलेश रमेश भिसे
ंभू_मेरा_परिचय

13/05/2026

जंजिऱ्याच्या उरावरील दुसरा जंजिरा वसविला -
कथा दुसऱ्या जंजिऱ्याची

🚩🚩🚩🚩🚩

जय श्रीराम!
लेखक, व्याख्याता
✒️ नीलेश रमेश भिसे
ंभू_मेरा_परिचय

Photos from Nilesh Ramesh Bhise's post 12/05/2026

जंजिऱ्याच्या उरावर दुसरा जंजिरा…

इतिहासातील प्रसिद्ध वाक्य आहे — “राजापुरीच्या उरावर दुसरी राजापुरी वसवली.”
ही दुसरी राजापुरी म्हणजेच सागरी किल्ला पद्मदुर्ग.

जंजिरेकर सिद्दीला शह देण्यासाठी, सिद्दी आणि ब्रिटिश यांचे संबंध तोडण्यासाठी तसेच हिंदवी स्वराज्याचा सागरी व्यापार वृद्धिंगत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७५ साली कासा खडकावर हा जलदुर्ग उभारला.

हा दुर्ग पाहण्यासाठी समुद्रकिनाऱ्यापासून साधारण पाच किलोमीटर समुद्रामध्ये जावे लागते. कोकण कडा मित्र परिवार आणि पद्मदुर्ग गडभ्रमण जागर सामाजिक संस्था या किल्ल्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात. दरवर्षी जानेवारी महिन्यात येथे दोन ते अडीच हजार लोकांच्या उपस्थितीत भव्य “पद्मदुर्ग जागर” कार्यक्रम आयोजित केला जातो.

शिवगडधारी गडसंवर्धन परिवाराकडून पद्मदुर्ग संवर्धनाचे कार्य सुरू आहे. मुरुडचे इतिहास अभ्यासक अनिकेत पाटील यांनी पद्मदुर्गावर संशोधनात्मक आणि माहितीपूर्ण पुस्तक लिहिले असून ते मुलुखगिरी प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे.

दुर्गाच्या आत कोटेश्वर देवीचे प्राचीन स्थान असून अनेक जुन्या तोफाही येथे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे, गडसंवर्धनात अग्रेसर असलेल्या सह्याद्री प्रतिष्ठानने एका तोफेसाठी लाकडी तोफगाडा तयार करून ती तोफ जंजिऱ्याकडे रोखून ठेवली आहे.

मुरुडच्या मुख्य समुद्रकिनाऱ्यावरून पद्मदुर्गासाठी बोटी उपलब्ध आहेत. जंजिऱ्यावर आपण अनेकदा जातो, पण जंजिऱ्याच्या उरावर शिवरायांनी उभारलेल्या या दुसऱ्या जंजिऱ्यालाही नक्की भेट द्या. स्वराज्याचा पराक्रम अनुभवा आणि आपल्या कोळी बांधवांच्या व्यवसाय व पर्यटन वृद्धीसाठी हातभार लावा.

तसेच जंजिऱ्यावर जाण्यासाठी राजापुरी जेटीव्यतिरिक्त थोडे पुढे “एकदरा खोरा बंदर” येथेही जेटीची व्यवस्था उपलब्ध आहे.

बोट संपर्क :
छत्रपती बोट – संतोष पावशे : 9168162337
धर्मवीर बोट – मंगेश मकू : 9028969474

🚩🚩🚩🚩🚩

जय श्रीराम!
लेखक, व्याख्याता
✒️ नीलेश रमेश भिसे
ंभू_मेरा_परिचय

10/05/2026

नुसते सामाजिक आणि धार्मिक नाही तर राजकीयदृष्ट्या देखील हिंदू म्हणून एकत्र या

🚩🚩🚩🚩🚩

जय श्रीराम!
लेखक, व्याख्याता
✒️ नीलेश रमेश भिसे
ंभू_मेरा_परिचय

07/05/2026

ज्या मातीत शिवराय आणि शंभूराजे जन्मले, त्या मातीचा इतिहास विसरू नका. 🚩 स्वराज्याच्या रक्षणासाठी प्रत्येक हिंदूंनी जागृत होणे गरजेचे आहे!



🚩🚩🚩🚩🚩

जय श्रीराम!
लेखक, व्याख्याता
✒️ नीलेश रमेश भिसे
ंभू_मेरा_परिचय

06/05/2026

हिंदू धर्माचा पाया म्हणजे आपली 'कुटुंब संस्था' आणि या कुटुंबाचा कणा म्हणजे आपल्या घरातील स्त्रिया! 🏠✨ पण
मंगळसूत्र, कुंकू या हिंदूंच्या प्रथा परंपरेवर यथेच्छ टिंगल टवाळी करून हिंदूंमध्ये आपल्या संस्कृती संबंधी न्यूनगंड निर्माण करायचा हा पुरोगाम्यांचा डाव आहे.
तेव्हा आपल्या परंपरांचा सार्थ अभिमान बाळगा. 🙌🚩

🚩🚩🚩🚩🚩

जय श्रीराम!
लेखक, व्याख्याता
✒️ नीलेश रमेश भिसे
ंभू_मेरा_परिचय

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Pune
411051