Quality Dry Systems

Quality Dry Systems

Share

We provide high quality pulley based cloth drying systems with Alluminium pipes in various sizes like

14/03/2022

क्वालिटी ड्राय सिस्टिम्स

आपलं स्वतःचं घर असावं हे प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं एक स्वप्न असतं आणि स्वप्नपूर्ती होऊन नवीन घरात स्थलांतरित झाल्यानंतर सर्वात प्रथम गरज पडते ती म्हणजे कपडे वाळत घालण्यासाठी लागणाऱ्या जागेची! मग बाजारात जाऊन पट्कन एक लोखंडी/प्लास्टिकचा स्टॅन्ड आणला जातो आणि तात्पुरता तोडगा निघतो. काही दिवसांनंतर असं लक्षात येतं की तो स्टॅन्ड खूपच छोटा आहे, त्यावर कपडे नीट वाळत घालता येत नाहीत, कपडे दाटीवाटीने घातल्यामुळे ते नीट वाळत नाहीत, गालिचा/गोधडी असे मोठे कपडे त्यावर नीट वाळत घालता येत नाहीत, तो स्टॅन्ड घरातली साधारण १० ते २० चौरस फुटाची जागा व्यापतो, स्टॅन्ड ठेवलेल्या जागेचा बाकी काहीही उपयोग करता येत नाही आणि ते चटई क्षेत्र निव्वळ वाया जातं. आपण गणित मांडल्यास असं लक्षात येतं की आपण केवळ कपडे वाळत घालण्यासाठी काही हजार रुपयांची जागा वापरत आहोत! अशा परिस्थितीत वरील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा नव्याने शोध चालू होतो जेणेकरून उपलब्ध जागेचा प्रयेक इंच योग्य वापरात आणता येईल!

आम्ही क्वालिटी ड्राय सिस्टिम्स च्या माध्यमातून या सर्वच प्रश्नांवर रामबाण उपाय घेऊन आलो आहोत. क्वालिटी ड्राय सिस्टिम्स मध्ये कप्पीयुक्त (pulley) अल्युमिनिअमचे पाईप आहेत ज्यामुळे कपडे वाळवणं अगदी सहज सोपं होतं, वेळेची, श्रमाची आणि पैशाचीही बचत होते आणि उपलब्ध चटई क्षेत्र संपूर्ण वापरात येण्यासही मदत होते

क्वालिटी ड्राय सिस्टिम्सचे फायदे :

• अत्युच्य दर्जा आणि अत्यंत वाजवी किंमत (फ्लॅटच्या/घराच्या किंमतीच्या 0.01% पेक्षाही कमी)
• आवश्यकतेनुसार किंवा उपलब्ध जागेनुसार ४ फूट ते ९ फूट या विविध मापांमध्ये उपलब्ध
• प्रत्येक पाईप स्वतंत्रपणे खाली घेऊन त्यावर कपडे वाळत घालता येतात / वाळत घातलेले कपडे काढता येतात
• प्रत्येक पाईप साधारण ९ ते १० किलोग्रॅम वजन पेलू शकतो त्यामुळे गोधडी / गालिचा यांसारख्या जड वस्तूंसाठीसुद्धा वापरण्यायोग्य आहे
• पाईप अल्युमिनिअमचा असल्यामुळे गंजत नाही किंवा हवेतील बदलांमुळे खराब होत नाही
• खूप कमी किंवा नगण्य देखभाल खर्च
• उंचावर लावल्यामुळे छत किंवा भिंत अशी उभी जागा वापरात आल्यामुळे चटई क्षेत्रात बचत होऊन कपडे वळवण्याचा जागेत इतर कोणत्याही हालचाली करण्यास बंधन / बाधा येत नाही
• गरज पडल्यास स्थानांतरण शक्य आहे

अधिक माहितीसाठी संपर्क साधा:

सौ जयंती देशपांडे
९०२२००७७४५
[email protected]

14/03/2022

We at Quality Dry Systems provide high quality pulley based cloth drying system with high grade Alluminium pipes in various sizes (4 ft to 9 ft) with competitive rates. Contact 9022007745 for more details

Want your business to be the top-listed Home Improvement Business in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Pune
411046

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm