EKATI

EKATI

Share

Ekati organization works for women empowerment

17/03/2025

एकल वधू वर मेळावा पार पडला 💐

Photos from EKATI's post 09/03/2024

एकटी संस्था विधवा परितक्ता,निराधार ,बेघर वयोवृद्ध, महिलांकरता कार्य करणारी सेवाभावी संस्था आहे. संस्थेचे कार्य केली आठ ते नऊ वर्षापासून अविरतपणे सुरू आहे. संस्थेमार्फत मोफत देशात केंद्र देखील चालवले जाते.
गेली पाच वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिका व एकटी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर शहरातील शहरी बेगरांच्यासाठी दोन महिला व दोन पुरुष निवारे कार्यान्वित आहेत. कोल्हापूर शहरातील शहरी बेघरांचा सर्वे करून त्यांना रेस्क्यू करून निवाऱ्यात आणले जाते व त्यांना स्वच्छ करून निवारातील सोयी सुविधांचा लाभ दिला जातो. तसेच त्यांची आरोग्य तपासणी करून निवाऱ्यात त्यांना ठेवले जाते. त्यांच्या राहण्याची-खाण्याची,पिण्याची सर्व सोय मोफत केली जाते. त्यांच्या हाताला काम मिळावे याकरीता निवारामध्ये चारी निवाऱ्यांमध्ये कागदी कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण प्रशिक्षण दिले जाते.तसेच शाहू नका पुरुष निवारा या ठिकाणी रोपवाटिका तयार करून रोपांची विक्री केली जाते. त्यातून मिळणारा जो निधी आहे त्याचा वापर या बेघर बंधू भगिनींच्या औषधोपचारासाठी व इतर खर्चासाठी त्याचा वापर केला जातो. निराधार,परित्कता, घटस्फोटित, वयोवृध्द,कौटुंबिक हिंसाचार ग्रस्त त्यांच्यामध्ये असणाऱ्या कौशल्यानुसार आपण कागदी पिशव्या,कापडी पिशव्या,टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे उदा. पायपुसनी बनवणे, लोकरी पासून हॅण्ड पर्स तयार तयार केलेले आहेत मोबाईल पर्स बनवले आहेत, तसेच जुन्या साड्यापासून पाय पुसणे तयार केलेले आहेत अशा अनेक खूप खूप सुंदर अशा आणि खूप सुंदर वस्तू या वयोवृत्त निराधार अपंग महिलांनी तयार केलेल्या असून आठ मार्चच्या जागतिक 8 मार्च महिला दिनाच्या औचित साधून या वस्तूंचे एकटी संस्थेमार्फत प्रदर्शन भरवण्यात येणार आहे कोल्हापूर शहरातील दानशूर देणगीदार तसेच इतर लोकांनी या प्रदर्शनास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन या महिलांनी निराधार महिलांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करून एकटी संस्थेच्या कार्यास हातभार लावावा असे आवाहन एकटी संस्थेच्या अध्यक्षा माननीय अनुराधा भोसले मॅडम यांनी सर्व कोल्हापूरकरांना केलेले आहे.

13/01/2024
कोल्हापूर महानगरपालिका व एकटी संस्थेने निराधार अवस्थेत पडलेल्या आजोबांना दिले जीवदान 11/01/2024

कोल्हापूर महानगरपालिका व एकटी संस्थेने निराधार अवस्थेत पडलेल्या आजोबांना दिले जीवदान #कोल्हापूर #महानगरपालिका व #एकटी संस्थेने #निराधार अवस्थेत पडलेल्या #आजोबां ना दिले #जीवदान...Kolhapur Municipal Corporation and a single organization g...

Photos from EKATI's post 05/01/2024
Photos from EKATI's post 04/01/2024

बेघर पुरूष निवारा शिरोली नाका या ठिकाणी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.

Photos from EKATI's post 04/01/2024

जुने विचारे विद्धालय, महिला बेघर निवार्यामध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी.....
कोल्हापूर महानगरपालिका व एकटी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या बेघर महिला निवारा जुने विचारे विद्यालय येथे सर्व महिला लाभार्थी महिला व कर्मचार्यांनी मिळून निवार्यामध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
सावित्रीबाई फुले यांची माहिती निवार्यातील लाभार्थी महिला प्रतीक्षा बिळूर यांनी सांगितली, तसेच एक लाभार्थी महिला रंजना कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांची व्यक्तिरेखा साकारली. सर्व महिलांनी फोटो पूजन करून सावित्रीबाई फुले यांच्या फोटो ला वंदन केले व “इतनी शक्ती हमे देना दाता” हे गाणे म्हणून सर्व महिलांनी सावित्रीबाई जयंती साजरी केली.

Photos from EKATI's post 04/01/2024

*धागा महिला निवारा, लक्ष्मीपुरी या ठिकाणी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी....

कोल्हापूर महानगर पालिका व एकटी संस्था यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या बेघर महिला निवारा लक्ष्मीपुरी या ठिकाणी 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती धागा महिला निवारा, लक्ष्मीपुरी या ठिकाणी सर्व निराधार महिलांनी मिळून साजरी केली यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यांच्या कार्याची माहिती निवाऱ्यात राहत असलेल्या अनुराधा इंगळे यांनी निराधार महिलांना दिली तसेच सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित एक गीत सादर करण्यात आले सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे अवचित्य साधून आजपासून धागा निवाऱ्यामध्ये निराधार महिलांसाठी साक्षरता वर्ग व वृत्तपत्र वाचन करून चालू घडामोडींचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमाविषयीचे मार्गदर्शन एकटी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी केले
यावेळी पुष्पा कांबळे,सविता कांबळे, वनिता कांबळे, मृणाली कांबळे, मैत्री संघटना व निवार्यातील महिला यांनी मिळून सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली.

04/01/2024

★बेघर पुरुष निवारा शाहू नाका या ठिकाणी आज दि:-03/01/2024 रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली.

कोल्हापूर महानगर पालिका व एकटी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या बेघर पुरुष निवारा शाहू नाका या ठिकाणी आज 3 जानेवारी ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती पुरुष निवारा शाहू नाका या ठिकाणी सर्व निराधार वृद्ध पुरुषानी मिळून साजरी केली यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यांच्या कार्याची माहिती निवाऱ्यातील कर्मचारी व निवाऱ्यात राहत असलेले प्रकाश नावलगी यांनी दिली .तसेच सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित एक गीत सादर करण्यात आले .सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे अवचित्य साधून आज शाहू नाका बेघर पुरुष निवारा या ठिकाणी लाभार्थ्यांच्या कडून झाडे लावून घेण्यात आले.या उपक्रमाविषयीचे मार्गदर्शन एकटी संस्थेच्या अध्यक्षा मा.अनुराधाताई भोसले यांनी केले.
या वेळी श्रीकृष्ण दणाने,सुरेश पिंपळे, अभिजीत कांबळे,आणि निवाऱ्यातील सर्व लाभार्थी यांनी मिळून सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली.

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Kolhapur