Atish Ananda Barne
समाज सेवा हीच ओळख, साधेपणा हाच स्वभाव ! 🤝
॰ अतिश आनंदा बारणे ॰
18/08/2026
देशाची निस्वार्थ सेवा करणारे थोर स्वातंत्र्यसेनानी, आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून इंग्रज सरकारला धडकी भरविणारे प्रखर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
17/08/2026
पहिला श्रावण सोमवार निमित्ताने सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!
#श्रावणसोमवार #हरहरमहादेव
17/08/2026
नागपंचमीच्या पावन पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
भगवान महादेवांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि मंगलमय आनंद नांदो, हीच प्रार्थना.
#नागपंचमी #नागपंचमीच्या_शुभेच्छा #हरहरमहादेव
16/08/2026
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा कार्यक्षम गृहमंत्री
स्व. आर आर आबा पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
15/08/2026
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाचा अभिमानाचा क्षण…!
आज स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना दिली.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांचे यावेळी कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. शिक्षण, शेती, उद्योग आणि सामाजिक विकासाच्या माध्यमातून सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने योगदान देण्याचा संकल्प करूया. 🇮🇳✨
जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्! 🙏
15/08/2026
स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र पर्वानिमित्त भक्ती-शक्ती उद्यान, निगडी येथे YOUVAN संस्था आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायन कार्यक्रमास उपस्थित राहिलो.
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या लेखणीतून साकारलेले ‘वंदे मातरम्’ हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्यात असंख्य क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या ओठांवरील प्रेरणामंत्र बनले. मातृभूमीला वंदन करणाऱ्या या शब्दांनी पारतंत्र्याच्या काळात देशवासीयांच्या मनात स्वाभिमान, एकता आणि स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली.
देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि मातृभूमीप्रती कृतज्ञतेची भावना नव्या पिढीच्या मनात अधिक दृढ करणाऱ्या या प्रेरणादायी उपक्रमाच्या आयोजनाबद्दल Youvan संस्थेचे पदाधिकारी व स्वयंसेवक तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार!
यावेळी मा. आमदार अमितजी गोरखे, मा. आमदार अश्विनीताई जगताप, महापौर रवीभाऊ लांडगे , मा. उपमहापौर शर्मिलाताई बाबर, मा. शिवसेना गटनेते विश्वजीतदादा बारणे, मा. नगरसदस्य प्रवीणभाऊ भालेकर, अतिशभाऊ बारणे, शांतारामबाप्पू भालेकर, सिनेअभिनेते पुष्कराज चिरपुटकर, Youvan संस्थेचे पदाधिकारी, स्वयंसेवक तसेच देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एक सूर… एक भावना… एक राष्ट्र!
भारत माता की जय! 🇮🇳
वंदे मातरम्! 🇮🇳
JaiHind
15/08/2026
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर ,मार्गदर्शक मा. श्री. रविभाऊ लांडगे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीस भरभरून यश लाभो, ही सदिच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#रविलांडगे #महापौर #वाढदिवसाच्याशुभेच्छा रवि बाबासाहेब लांडगे
15/08/2026
मा. विरोधी पक्षनेते, नगरसेवक पिं. चिं. मनपा मा. श्री. विठ्ठल (नाना) काटे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
Vitthal Kate
14/08/2026
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून प्रसंगी बलिदान देणारे स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्त यांना विनम्र अभिवादन’..!
या स्वातंत्र्यदिनी आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करूया आणि एक समृद्ध, सुरक्षित आणि प्रगत भारताच्या निर्मितीचा संकल्प करूया.
जय हिंद! भारत माता की जय!
स्वातंत्र्यदिनाच्या सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा!
जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्! 🇮🇳
#स्वातंत्र्यदिन 🇮🇳 PCMC
13/08/2026
ॐ नमः शिवाय , हर हर महादेव
श्रावण मासाच्या पावन पर्वानिमित्त
भगवान महादेवांच्या चरणी मनोभावे नतमस्तक होत,
सर्व शिवभक्तांना श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
Dear D-Mart, Dehu-Alandi Road
Moshi
412105