Gharat Ravi
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gharat Ravi, Politician, Thane.
05/09/2026
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः ॥
ज्ञान, संस्कार आणि मूल्यांची शिदोरी देत विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
भारताचे दुसरे राष्ट्रपती, महान शिक्षणतज्ज्ञ व भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 💐🙏
#शिक्षकदिन #गुरु #शिक्षण
04/09/2026
भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि यश नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.
गोपाळकाला व दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
गोविंदा आला रे आला!
जय श्रीकृष्ण! 🙏🚩
04/09/2026
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी,
हे नाथ नारायण वासुदेवा!
भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवाचा हा पावन दिवस आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने सर्व नागरिकांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🙏
जय श्रीकृष्ण!
#श्रीकृष्णजन्माष्टमी #जन्माष्टमी #जयश्रीकृष्ण #श्रीकृष्ण #कृष्णजन्माष्टमी
04/09/2026
द्वारीं देवाचिये
उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ति चारी
साधियेल्या ॥
हरि मुखें म्हणा,
हरि मुखें म्हणा ।
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
02/09/2026
आज नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक मा. श्री. सुरज पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.
Suraj Balaram Patil
02/09/2026
आज नवी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर मा. श्री. दशरथजी सीताराम भगत यांची सदिच्छा भेट घेतली.
31/08/2026
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
श्री गणरायाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होवोत, सुख-समृद्धी, आरोग्य आणि यश लाभो, हीच श्री चरणी प्रार्थना.
संकष्टी चतुर्थी निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺
#संकष्टीचतुर्थी #गणपतीबाप्पामोरया #श्रीगणेश #मंगलमूर्ती
30/08/2026
ठाणे, पोखरण रोड क्रमांक २ येथे Trinity Group च्या भव्य शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहून श्री. विनीत जैन यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
व्यवसायाच्या माध्यमातून नवनवीन संधी निर्माण करत यशाची नवी शिखरे गाठण्यासाठी त्यांच्या पुढील व्यावसायिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
30/08/2026
ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथील Meats & Plants यांच्या नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा माझ्या उपस्थिती मध्ये उत्साहात पार पडला. यावेळी Meats & Plants च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आणि पुढील व्यवसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
एका छोट्याशा स्वप्नातून सुरू झालेला हा प्रवास आज ठाण्यात आपल्या दुसऱ्या शाखेपर्यंत पोहोचला आहे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.
30/08/2026
महाराष्ट्र माझा… मराठी माझी संवाद भाषा..!
महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ तसेच परिवहन मंत्री मा. श्री. प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या संकल्पनेतून रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी राबविण्यात आलेल्या ‘मराठी भाषा संवाद कौशल्य अभियान’ अंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रवाशांशी सुसंवाद साधताना मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा आणि आपल्या मायमराठीचा प्रसार व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातील सहभागी रिक्षा व टॅक्सी चालकांना आज माझ्या उपस्थितीमध्ये प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून, आपल्या संस्कृतीची आणि अस्मितेची ओळख आहे. तिचा दैनंदिन व्यवहारात अधिकाधिक वापर व्हावा.
या स्तुत्य उपक्रमासाठी संबंधित सर्व विभाग, संस्था, आयोजक आणि सहभागी रिक्षा-टॅक्सी चालकांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!
जय महाराष्ट्र!
#महाराष्ट्रमाझा #मराठीमाझीसंवादभाषा
Category
Website
Address
Thane
400 601, 400 602, 400 603, 400 604, 400 605, 400 606, 400 607, 400 615