Pro Samachar
We Provide You Best News Of Maharashtra And India, you will get Marathi political news, entertainmen
26/04/2026
महाविद्यालयात हिजाबबंदी कायम राहणार : मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश, विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली
स्पर्श न करताही आधार देता येतो हे ज्याला कळतं त्यालाच ’पालक’ शब्द समजला. - व पु काळे
05/06/2023
ठाणे नौपाडा विभागातील बेडेकर शाळेत शिकणारी कु. गौतमी सहस्रबुद्धे हिला दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळाल्याबद्दल तिचा सत्कार करून अभिनंदन केले तसेच तिला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सोबत नौपाडा विभाग प्रमुख प्रकाश पायरे, शाखा प्रमुख रमेश शिर्के, आप्पा वेटे, सचिन चांदगुडे, दिनेश चिकणे, निमेष भांडलीकर, जितेष भुवड, बजरंग हटकर, जगन्नाथ तावडे, सिध्देश मेहता, स्वप्निल नेवरेकर,सौ योगीता मेहता व आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ठाणे:- तीन हात नाक्यावर चालत्या गाडीवर पडली सळई.. मेट्रोचं काम सुरु असताना सळई खाली धावत्या गाडीच्या आरापार..
#ठाणे #मेट्रो
04/06/2023
फोटोमधे असलेले ब्रॅंड ओळखा...
24/05/2023
पोलिसांनी मोकाट सुटलेल्या ‘सोशल मिडिया’वर नियंत्रण ठेवावे
उठसुठ माध्यमांनाच काय दम देतात?- एम.एम.देशमुख
मुंबई- वर्तमानपत्रात किंवा चॅनेलवरून प्रसिध्द झालेल्या एखाद्या बातमीमुळे अलिकडे दंगल झालीय असं महाराष्ट्रात कुठं घडलंय का? अकोल्यात जी दंगल झाली ती सोशल मिडियावरून कोणी तरी धार्मिक भावना दुखावल्यामुळे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी पत्रकारांना नोटीस पाठवून त्यांनी कशा बातम्या द्याव्यात यावर प्रवचन दिलं आहे. त्यामुळे पोलिसांना नियंत्रण ठेवायचेच असेल तर ते मोकाट सुटलेल्या सोशल मिडियावर ठेवले पाहिजे.. ते न करता पोलीस ऊठसुठ माध्यमांना काय दम देतात? या शब्दात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी पोलीस प्रशासनाला सुनावले आहे. एस.एम. देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी माध्यमांनी नेहमीच घेतलीय.. दंगलीच्या काळातही माध्यमांनी संयमानं वार्तांकन करीत जबाबदार माध्यमं म्हणून आपली भूमिका नेहमीच पार पाडली.. त्यामुळे आम्ही कश्या बातम्या द्यायच्या हे पोलिसांनी आम्हाला शिकविण्याची गरज नाही.. असं असताना देखील पोलीसांनी दिलेली नोटीस म्हणजे माध्यमांना कारवाईची भिती घालून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आहे.. हा प्रयत्न माध्यमं खपवून घेणार नाहीत.. तेव्हा तळेगाव दाभाडे पोलिसांनी ही नोटीस तातडीने मागे घेऊन आपण माध्यम स्वातंत्र्याचा आदर करतो हे दाखवून द्यावे.. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संबंधितांना तश्या सूचना द्याव्यात अशी विनंती एस.एम.देशमुख यांनी केली आहे.
22/08/2022
मंजिरी देव यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करा : डॉ. राजेश मढवी
ठाणे: तब्बल तीन पिढ्यांची नृत्य कारकिर्द घडवणाऱ्या ठाण्यातील प्रख्यात कथ्थक गुरु मंजिरी देव यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करा, अशी जाहिर मागणी भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांनी केली आहे.
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे या निसर्गकवी बालकवींच्या काव्याला स्मरून आनंदघन हा सुंदर कलाविष्कार हस्तकला उद्योग समूहाचे प्रवीण छेडा यांच्यावतीने ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात नुकताच सादर करण्यात आला. या कलामहोत्सवाचे उद्घाटन डॉ. राजेश मढवी यांच्याहस्ते झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी ही मागणी केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. राजेश मढवी तसेच भाजपच्या माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, प्रख्यात नृत्यांगना मंजिरी देव व तबला वादक मुकुंद देव यांचा उपस्थितीत पार पडले. सदर कला महोत्सवात राधा कृष्णाच्या रासलीलांवर प्रसिद्ध नृत्यांगना मनाली देव यांनी अप्रतिम नृत्यकला सादर केली. त्याचबरोबर भरतनाट्य नृत्यांचेही सादरीकरण नर्तक पवित्र कृष्ण भट यांनी केले.
22/08/2022
डॉ.दाभोलकर बलिदान दिनानिमित्त विवेक निर्धार मेळावा संपन्न
ठाणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 9 व्या बलिदानदिनानिमित्त पुण्यात विवेक निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले ,अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील, अंनिसचे कार्याध्यक्ष माधव बावगे, साहित्याचे अभ्यासक डॉ. शशिकांत पट्टन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे व अनिल करवीर, अतुल सवाखंडे, सचिन गोवळकर अशोक निकम, बालाजी राऊत, धर्मराज चौरे, सारिका देहनकर, गजानन गायकवाड, घनश्याम येणगे, रेश्मा खाडे, विनोद खरटमोल, शीतल वसावे, अरविंद शिंदे, पी. एम. जाधव, प्रदीप हिवाळे, राजेश देवरुखकर अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या मेळाव्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी मार्गदर्शन केले.ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची मांडणी केली. महाराष्ट्र अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील कार्याध्यक्ष माधव बावगे, वाचन साहित्याचे अभ्यासक डॉ. शशिकांत पट्टन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाची सुरुवात श्री.गोवळकर,करवीर यांनी प्रबोधनात्मक गित गाऊन केली. राज्य प्रधानसचिव संजय बनसोडे यांनी प्रस्तावित व राज्य पदाधिकारी विशाल विमल यांनी सूत्रसंचलन केले.
07/08/2022
https://www.prosamachar.com/mumbai/tiranga-yatra-at-independent-day/
मुलभूत समस्यांकडे लक्ष विचलित करण्यासाठी घर घर तिरंगा अभियान? लेखक : सागर रामभाऊ तायडे- ९९२०४०३८५९ भारतीय संस्कृती वर्णव्यवस्था जातीव्यवस्था समर्थन करणाऱ्या साडेतीन टक्केवा...
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Thane
Thane
400607