Subhash Deshmukh

Subhash Deshmukh

Share

Official page of Subhash Deshmukh. member of legislative assembly South solapur constituency.

05/06/2026

१२ वर्षे विश्वासाची, विकासाची आणि शेतकरी कल्याणाची!

१० लाखांहून अधिक सौर कृषी पंप जोडण्यांसह महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावत शेतकऱ्यांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली आहे.

दिवसा मोफत व अखंडित वीजेच्या माध्यमातून समृद्ध, स्वावलंबी आणि शाश्वत शेतीचा पाया अधिक भक्कम होत आहे.

#राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती

Narendra Modi
Nitin Nabin
Devendra Fadnavis
Ravindra Chavan
Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra

Photos from Subhash Deshmukh's post 05/06/2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न!

📍 पाटील नगर, प्रभाग क्र. २३, सोलापूर

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोलापूर शहरातील प्रभाग क्र. २३ मधील पाटील नगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन यांसारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रत्येकाने अधिकाधिक वृक्ष लागवड करणे आणि त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. केवळ झाडे लावणेच नव्हे, तर त्यांचे संवर्धन करून हरित आणि पर्यावरणपूरक परिसर निर्माण करण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास श्रीमती ज्ञानेश्वरी देवकर, श्री. सत्यजित वाघमोडे, श्री. राजू पाटील, श्री. शिवराज सरतापे, श्री. महेश देवकर, श्री. दत्ता सूर्यवंशी, श्री. आनंद बिराजदार, श्री. प्रभाकर पडवळकर, श्रीमती निलिमा शितोळे, श्रीमती श्वेता व्हनमाने, श्री. श्रीनिवास, श्रीमती गीता पाटोळे, श्री. सतीश धारूरकर तसेच श्री. सिद्धेश्वर होनराव यांच्यासह परिसरातील नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"एक झाड लावा, पर्यावरण वाचवा" हा संदेश देत सर्वांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प केला. हरित, स्वच्छ आणि शाश्वत भविष्यासाठी वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

#जागतिकपर्यावरणदिन #वृक्षारोपण #पर्यावरणसंवर्धन #हरितसोलापूर #जनसहभाग

05/06/2026

प्रखर राष्ट्रभक्त, थोर विचारवंत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांना स्मृतीदिनी कोटी-कोटी नमन!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू. श्री गुरुजी यांचे कार्य हे केवळ संघटन उभारणीपुरते मर्यादित नव्हते, तर ते एका वैचारिक क्रांतीचा भक्कम पाया होते. संघटनशक्तीचे अभेद्य अधिष्ठान निर्माण करत असतानाच त्यांनी तरुणाईला राष्ट्रनिष्ठेचा मंत्र दिला. संकटांच्या काळातही ध्येयापासून विचलित न होता राष्ट्रसेवेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणे, हीच त्यांच्या जीवनकार्याची सर्वात मोठी प्रेरणा आहे.

त्यांचे जीवन म्हणजे निस्वार्थ सेवा, त्याग आणि राष्ट्रभक्तीचा तेजस्वी दीपस्तंभ असून, तो आजही असंख्य कार्यकर्त्यांना राष्ट्रकार्यासाठी प्रेरणा आणि दिशा देत आहे.

#माधव_सदाशिव_गोळवलकर #गुरुजी

Photos from Subhash Deshmukh's post 04/06/2026

महायुतीचे सोलापूर विधानपरिषद निवडणुकीचे उमेदवार श्री. राजेंद्र राऊत यांची निवासस्थानी सदिच्छा भेट!

📍 सोलापूर

सोलापूर विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार श्री.राजेंद्र राऊत यांची निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

यावेळी आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक, राजकीय तसेच विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली.

सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, जनतेच्या अपेक्षा व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि लोकहिताच्या प्रश्नांना प्रभावीपणे न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे नेतृत्व निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

जनसामान्यांशी असलेली त्यांची नाळ, विकासाविषयीची बांधिलकी आणि कार्यक्षम नेतृत्वाच्या बळावर ते आगामी काळात सोलापूरच्या प्रगतीला नवी दिशा देतील, असा विश्वास व्यक्त करत विधान परिषद निवडणुकीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

त्यांच्या यशस्वी वाटचालीस आणि आगामी निवडणुकीतील विजयासाठी हार्दिक शुभेच्छा!

#जनसेवा #विकास #सोलापूर

Photos from Subhash Deshmukh's post 04/06/2026

निरोगी बालक, सक्षम महिला आणि सुरक्षित कुटुंब - हाच नव्या भारताचा मंत्र!

वाढते लसीकरण, कुपोषणातील घट, आयुष्मान भारतचे संरक्षण आणि डिजिटल क्षेत्रातील महिलांची वाढती सहभागिता यामुळे देश सुदृढ भविष्यासाठी वेगाने पुढे जात आहे.



Narendra Modi
PMO India
Bharatiya Janata Party (BJP)

Photos from Subhash Deshmukh's post 04/06/2026

सोलापूरच्या सांस्कृतिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या प्रस्तावित नाट्यगृहाबाबत बैठक संपन्न!

📍 सोलापूर

सोलापूर महानगरपालिका, अशोक नगर येथे प्रस्तावित असलेल्या आधुनिक नाट्यगृहाच्या उभारणीसंदर्भात महत्वपूर्ण विशेष बैठक अत्यंत यशस्वीपणे पार पडली.

यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नाट्यकलावंत प्रशांत दामले यांच्या विशेष उपस्थितीत नाट्यगृहाची रचना, कलाकार व प्रेक्षकांसाठी आवश्यक आधुनिक सुविधा, तांत्रिक बाबी तसेच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन उभारण्यात येणाऱ्या नाट्यगृहाबाबत सविस्तर चर्चा केली. त्यांनी दिलेल्या मौल्यवान सूचना व मार्गदर्शनाचा आगामी नियोजनात निश्चितच उपयोग होणार आहे.

सोलापूर शहराला आधुनिक, सुसज्ज आणि दर्जेदार नाट्यगृह उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर सकारात्मक विचारविनिमय झाला. हे नाट्यगृह शहरातील कलाकार, नाट्यप्रेमी आणि सांस्कृतिक चळवळीसाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरणार असून सोलापूरच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणार आहे.

याप्रसंगी उपमहापौर श्रीमती. ज्ञानेश्वरी देवकर, आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त श्री. संदीप कारंजे, श्री. दादा साळुंखे, श्री. प्रशांत बडवे तसेच महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

#नाट्यगृह

Prashant Damle

03/06/2026

पक्ष बांधणीसाठी सर्वस्व अर्पण करणारे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!

एक 'संघर्षशील नेतृत्व' म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास जिद्द आणि जनसेवेची प्रेरणा निर्माण केली. त्यांचे विचार आणि कार्य आजही अनेकांसाठी संजीवनी आहे. राजकीय पटलावर आपल्या कार्यकर्तृत्वाची वेगळी छाप उमटवणाऱ्या या लोकनेत्याच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन!

#गोपीनाथ_मुंडे #लोकनेते

02/06/2026

जनतेचं सरकार, महायुती सरकार!

#मंत्रिमंडळ #बैठक #कॅबिनेट #मुंबई #देवेंद्र_फडणवीस #भाजपा

Devendra Fadnavis
CMOMaharashtra
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Sunetra Ajit Pawar
Ravindra Chavan
BJP Maharashtra

Photos from Subhash Deshmukh's post 01/06/2026

विश्वमंगल मराठी बिझनेस फोरम, पंढरपूर शाखेची दिमाखदार सुरुवात!

📍 पंढरपूर

पंढरपूर येथे विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या माध्यमातून “विश्वमंगल मराठी बिझनेस फोरम – पंढरपूर” शाखेचा शुभारंभ माझ्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

“एकमेका साहाय्य करू, अवघे होऊ धनवंत” हे ब्रीदवाक्य घेऊन मराठी उद्योजक, व्यावसायिक आणि होतकरू तरुणांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

विश्वमंगल मराठी फाउंडेशनची मुहूर्तमेढ संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन नगरी आळंदी येथे रोवली गेली. आज पांडुरंगाच्या नगरी पंढरपूरमध्ये विश्वमंगल मराठी बिझनेस फोरमची सुरुवात होत असल्याचा आनंद यावेळी व्यक्त केला.

माझ्या व्यावसायिक प्रवासातील अनुभव उपस्थितांसमोर मांडले. समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द, गावागावातील तरुण उद्योजकांना संधी उपलब्ध करून देणे आणि स्थानिक उद्योग-व्यवसायांना बळ देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचे असेल तर उद्योजकता वाढली पाहिजे आणि त्यासाठी अशा व्यासपीठांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले.

तसेच, विश्वमंगल मराठी बिझनेस फोरमच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांना “लोकल टू ग्लोबल” व्यवसायवृद्धीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी विश्वमंगल मराठी फाउंडेशनचे मुख्य समन्वयक श्री. विजय पाटील यांनी फोरमची संकल्पना मांडत ग्रामीण व शहरी भागातील मराठी व्यावसायिकांना एकत्र आणून व्यवसायवृद्धीसाठी सक्षम व्यासपीठ निर्माण करण्याचा उद्देश स्पष्ट केला.

उद्योग विभाग प्रमुख श्री. भूषणजी कुलकर्णी यांनी “लोकल टू ग्लोबल” या संकल्पनेवर आधारित फोरमचा आराखडा सादर करत नेटवर्किंग, प्रशिक्षण, डिजिटल डायरेक्टरी, नवीन बाजारपेठांचा शोध, अनुभवी मार्गदर्शन आणि व्यवसायवृद्धीच्या विविध संधींबाबत सविस्तर माहिती दिली.

तसेच श्री. अजित कंडरे-यलमार यांनी मनोगत व्यक्त करत पंढरपूरमध्ये या फोरमची झालेली सुरुवात स्थानिक व्यावसायिकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. फोरमची कार्यपद्धती, शिस्त, वेळेचे महत्त्व, पारदर्शकता आणि परस्पर सहकार्य याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी विश्वमंगल मराठी बिझनेस फोरम, पंढरपूरच्या अध्यक्षपदी श्री. गणेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचे अभिनंदन करून आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित व्यावसायिकांनी स्वतःची व आपल्या व्यवसायाची ओळख करून देत परस्पर सहकार्याच्या संधींवर चर्चा केली. मराठी उद्योजकांसाठी सकारात्मक, विश्वासार्ह आणि परिणामकारक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले.

#विश्वमंगलमराठीफाउंडेशन #विश्वमंगलमराठीबिझनेसफोरम #पंढरपूर

Want your public figure to be the top-listed Public Figure in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Lokmangal House, Juna Puna Naka
Solapur
413001