Smart Solapurkar

Smart Solapurkar

Share

Trending Digital Media In Solapur news

Photos from Smart Solapurkar's post 06/06/2026

राजाभाऊ आलूरे यांचा एकनाथ शिंदे गटात जाहीर प्रवेश

भाजपला शहरात मोठे खिंडार

सोलापूर, प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी शुक्रवारी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. सोलापूर शहरातील हॉटेल ऐश्वर्या येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात सोलापूरचे संपर्कप्रमुख तथा खासदार धैर्यशील माने आणि खासदार ज्योतीताई वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राजाभाऊ आलोरे यांच्या प्रवेशामुळे सोलापूर शहरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चर्चा सुरू झाली असून भारतीय जनता पक्षाला मोठे खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या प्रवेश सोहळ्यास जिल्हाध्यक्ष अमोल बापू शिंदे, मनीष काळजे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, प्रियदर्शन साठे, रमेश बारस्कर, निवृत्त पोलीस अधिकारी नागनाथ पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजाभाऊ आलोरे यांचे शिवसेनेत स्वागत करत त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव केला. आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, नागनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक ५ मधील शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. त्यामुळे शहरातील शिवसेनेची ताकद आणखी वाढल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. घोषणाबाजी, टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोषात पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्याची शहरभर चर्चा रंगली आहे.

05/06/2026

Biggest Jodi offer

📍पंजवाणी मार्केट, अक्कलकोट रोड, सोलापूर.
📱7507001002

Dwarkadas Shamkumar Solapur

Solapur Clothing shopping

solapursmartcity saree shopping

05/06/2026

ब्रँडेड यार्न डायड कॉटन- फक्त 500/- रु किलो!
फक्त 1000/- रुपयांत मिळणार 5 शर्ट पीस!
1984 पासून ब्रँडेड शुटिंग शर्टिंग कटपिससाठी प्रसिद्ध..


📍 विजापूर रोड, नेहरू नगर शासकीय ग्राउंडसमोर
📞 9850480888

Bakale Fashion Suiting Shirting Cutpis Solapur
Solapur shopping Lagn Sarai

03/06/2026

धन्यवाद आमदार साहेब!

सोलापूरला खऱ्या अर्थाने स्मार्ट करण्यासाठी प्रयत्नशील असणारे आमदार देवेंद्र कोठे यांच्या टीमने स्मार्ट सोलापूरकरच्या व्हिडिओची दखल घेतली.

व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही वेळातच परिसरात स्वच्छता करण्यात आली आहे.

सोलापूरच्या इतरही लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीने सजगता दाखवल्यास सोलापूर खऱ्या अर्थाने स्मार्ट व्हायला वेळ लागणार नाही!

धन्यवाद आमदार साहेब..

– स्मार्ट सोलापूरकर

03/06/2026

अशी अस्वच्छता असेल तर भाविक, पर्यटक कसे येणार?

Photos from Smart Solapurkar's post 03/06/2026

‘चंदेरी आठवणींची रीळं’ कार्यक्रमाने सोलापूरकर रसिक मंत्रमुग्ध!

मंजुषा गाडगीळ यांच्या सादरीकरणाला दाद

सोलापूर (स्मार्ट सोलापूरकर मीडिया) : येथील प्रसिद्ध श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वतीने आयोजित ‘चंदेरी आठवणींची रीळं’ या दृकश्राव्य कार्यक्रमाने सोलापूरकर संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. मंगळवारी सायंकाळी वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात हा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.

जुन्या आठवणींना उजाळा आणि बहारदार सादरीकरण

कार्यक्रमाच्या मुख्य सादरकर्त्या मंजुषा गाडगीळ यांनी आपल्या ओघवत्या आणि भारदस्त आवाजात जुन्या काळातील सुवर्णमयी आठवणींना उजाळा दिला. त्यांनी केलेले उत्कृष्ट अभिवाचन आणि एकूणच सादरीकरण उपस्थितांची दाद मिळवून गेले. जुन्या गाण्यांचे संदर्भ आणि त्यामागील किस्से ऐकताना रसिक प्रेक्षक भूतकाळात रमून गेले होते.

तांत्रिक बाजू आणि संयोजन

या दृकश्राव्य कार्यक्रमाला रुद्रेश व्हदलुरे यांनी उत्कृष्ट तांत्रिक सहकार्य लाभले. श्राव्य आणि दृश्यांची अचूक सांगड घातल्यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली. वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर आणि सचिव डॉ. नभा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नेटके आयोजन करण्यात आले होते.

संपूर्ण सोलापूरकर संगीत रसिकांसाठी ही सायंकाळ अतिशय सुंदर आणि संस्मरणीय ठरली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात मंजुषा गाडगीळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.

03/06/2026

प्रसिद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना सांगीतिक श्रद्धांजली

हि.ने. वाचनालयात उद्या गुरुवारी विशेष कार्यक्रम

​सोलापूर : पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या अजरामर गाण्यांवर आधारित एका विशेष सांगीतिक श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हि.ने. वाचनालयाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, संगीतप्रेमींसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे.

​सुमन कल्याणपूर यांनी आपल्या बहारदार आवाजाने मराठी आणि हिंदी संगीतविश्वावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या याच अथांग सांगीतिक प्रवासाला उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी हे सुमनजींची लोकप्रिय हिंदी-मराठी गाणी सादर करणार आहेत.

​कार्यक्रमाचा सविस्तर तपशील:

​दिनांक: गुरुवार, ४ जून २०२६

​वेळ: सायंकाळी ठीक ६:०० वाजता

​स्थळ: लोकमान्य टिळक सभागृह, हि.ने. वाचनालय परिसर, सोलापूर

सुमन कल्याणपूर यांच्या सुरेल गाण्यांचा आणि आठवणींचा हा प्रवास अनुभवण्यासाठी सर्व रसिक प्रेक्षकांनी आणि नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे सस्नेह आवाहन हि.ने. वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

Photos from Smart Solapurkar's post 03/06/2026

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांची भेट!

​सोलापूर : सोलापूरकरांची जीवनवाहिनी असलेल्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये एक महत्त्वाची राजकीय भेट पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा सोलापूरचे माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांची रेल्वे प्रवासादरम्यान अनपेक्षित भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये व्हीआयपी कोचमध्ये महाराष्ट्रातील सद्य राजकीय घडामोडींवर आणि सोलापूरच्या आंबेडकरी चळवळीवर प्रदीर्घ चर्चा झाली.

​प्रवासादरम्यान रंगल्या आठवणी

​मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे हे दोन्ही नेते सिद्धेश्वर एक्सप्रेसने सोलापूरहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान व्हीआयपी कोचमध्ये दोघांची भेट झाली. या सदिच्छा भेटीत दोन्ही नेत्यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधला.

​आंबेडकरी चळवळीतील जुन्या आठवणींना उजाळा

​या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील सद्य राजकीय पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा तर झालीच, पण त्याचसोबत मंत्री रामदास आठवले यांनी सोलापूर शहरात आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या अनेक जुन्या आणि ज्येष्ठ नेत्यांचा आवर्जून उल्लेख केला. सोलापूरमधील चळवळीचे योगदान आणि जुन्या सहकाऱ्यांच्या आठवणींना आठवले यांनी यावेळी उजाळा दिला.

Photos from Smart Solapurkar's post 01/06/2026

हातभट्टी व अवैध दारू विक्रीवर
राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई!

२३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

​🚨 पुण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट; विषारी दारूमुळे मृत्यू, अंधत्व येण्याचा धोका; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

​सोलापूर (स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडिया) राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूरच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैध हातभट्टी निर्मिती, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात एक अत्यंत मोठी व धडक मोहीम राबवण्यात आली आहे. या धडक कारवाईत एकूण २३,५६,८४०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

​पुणे येथे नुकतीच मिथेनॉलयुक्त बनावट दारूमुळे दुर्दैवी दुर्घटना घडली असून, यामध्ये निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेत सोलापूर प्रशासनाने ही कडक मोहीम हाती घेतली आहे. विषारी व बनावट दारूमुळे किडनी निकामी होणे, कायमस्वरूपी अंधत्व येणे आणि अकाली मृत्यू होणे असे गंभीर व जीवघेणे दुष्परिणाम संभवतात. त्यामुळे नागरिकांनी अशा कुठल्याही अमिशांना बळी पडू नये, असे कडक आवाहन प्रशासनाने केले आहे.

१० दिवसांत ६४ गुन्हे दाखल, ४७ आरोपींना अटक

​राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त (पुणे विभाग) मा. श्री. सागर धोमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूरच्या अधीक्षक मा. श्रीमती भाग्यश्री पं. जाधव व उपअधीक्षक श्री. सौरभ बा. अदाटे यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली दि. २१/०५/२०२६ ते ३१/०५/२०२६ या १० दिवसांच्या कालावधीत ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

या धडक कारवाई दरम्यान एकूण ६४ गुन्हे नोंदवून ४७ आरोपींवर कडक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ४३,१७५ लीटर रसायने, ३,७८३ लीटर हातभट्टी दारू, १२५ बॉक्स लीटर ताडी, १६.२ बॉक्स लीटर देशी मद्य आणि १५.६ बॉक्स लीटर बिअर असा प्रचंड मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गुन्ह्यात वापरलेली ३ वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.

Want your business to be the top-listed Media Company in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Hotagi Road Solapur
Solapur