Solapur Social Foundation
To Promote, Marketing and Brand building of 3 Ps of Solapur. First P for Places, Second P for Personalitiy's and Third P for Products of Solapur
19/04/2026
सोलापूर सोशल फाउंडेशनचा ८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा; नवीन कार्यालयाचा शुभारंभ
सोलापूर सोशल फाउंडेशनच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त आज संस्थापक अध्यक्ष मा. आ. सुभाष बापू देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत नवीन कार्यालयाचा शुभारंभ संपन्न झाला.
मागील आठ वर्षांत संस्थेने सोलापूर जिल्ह्याचे प्रभावी मार्केटिंग व ब्रँडिंग करण्याबरोबरच समृद्ध गाव अभियानच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध विकासात्मक उपक्रम राबवले आहेत. तसेच सोलापूर पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचे महत्त्व अधोरेखित करण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. ग्रामीण व कृषी पर्यटनाला प्रोत्साहन, वृक्षलागवड व ऑक्सिजन पार्क निर्मिती, श्रीमंती सोलापूर पुरस्कार, आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म गारमेंट प्रदर्शन, सोलापूर फेस्ट, रोजगार निर्मिती आदी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे संस्था कार्यरत असून सामाजिक क्षेत्रात अग्रस्थानी आहे.
नवीन कार्यालयाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना एक सक्षम व हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी या कार्यालयातून अधिक प्रभावी काम केले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छा देत संस्थेच्या सामाजिक कार्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
19/04/2026
सोलापूर सोशल फाउंडेशन
“घडावा सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, हाच आमचा ध्यास”
🎉 ८ वा वर्धापन दिन 🎉
सोलापूर सोशल फाउंडेशनच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
आमचे प्रमुख उपक्रम :
सोलापूर जिल्ह्याचे प्रभावी मार्केटिंग व ब्रँडिंग
समृद्ध गाव अभियान
सोलापूर महोत्सव आयोजन
ग्रामीण व कृषी पर्यटनास प्रोत्साहन
वृक्षलागवड व ऑक्सिजन पार्क निर्मिती
श्रीमंती सोलापूर पुरस्कार
आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शनाचे आयोजन
🌱 एकत्र येऊया, सोलापूरला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेऊया!
18/04/2026
आज १८ एप्रिल — जागतिक वारसा दिन.
हा दिवस आपल्या इतिहास, संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करत त्यांचे जतन करण्याची जाणीव करून देतो.
सोलापूर जिल्हा ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाने समृद्ध आहे. जरी येथे UNESCO जागतिक वारसा स्थळ नसले तरी अनेक महत्त्वाची स्थळे जतन करण्यासारखी आहेत.
सोलापूर शहरातील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, इंद्रभवन (महानगरपालिका इमारत), मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, कोटणीस स्मारक, सोलापूर विद्यापीठ संग्रहालय
पंढरपूरमधील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, कैकाडी महाराज मठ, गोपाळपूर, विष्णुपद, हरे कृष्ण मंदिर तसेच पखालपूर गणेश मंदिर, कासेगाव येथील मंदिरे, सूर्यनारायण मंदिर
अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ मंदिर, शस्त्रास्त्र संग्रहालय, न्यू पॅलेस, अन्नछत्र मंडळ, राजेराय मठ तसेच शिवपुरी अग्निहोत्र केंद्र, काशी विश्वेश्वर मंदिर, जेऊर, मल्लिकार्जुन मंदिर, चपळगाव, नागणसूर, बुऱ्हाणपूर
बार्शीतील श्री भगवंत मंदिर, संत बोधले महाराज समाधी मंदिर
मोहोळमधील नागनाथ मंदिर, वडवळ नागनाथ मंदिर
माढामधील माढेश्वरी देवी मंदिर, मध्ययुगीन गढी, संत सावता माळी समाधी मंदिर
मंगळवेढ्यातील सिद्धेश्वर मंदिर, मातुलिंग गणपती
माळशिरसमधील अर्धनारीनटेश्वर मंदिर, सयाजीराजे पार्क, आनंदी गणेश मंदिर, अकलाई देवी मंदिर
करमाळ्यातील कमलादेवी मंदिर, ९६ पायऱ्यांची बारव
दक्षिण सोलापूरमधील हरिहरेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर
उत्तर सोलापूरमधील माळढोक पक्षी अभयारण्य, हिप्परगा तलाव.
सोलापूर सोशल फाउंडेशन (Solapur Social Foundation) ही संस्था सोलापूर जिल्ह्यातील या वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. “5P” (Places) या उपक्रमांतर्गत वारसा जपण्याचे काम करत असून, सोलापूर जिल्ह्याचा हा अमूल्य ठेवा जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.
चला, आपल्या वारशाचे जतन करूया — कारण तोच आपली खरी ओळख आहे.
18/04/2026
जागतिक क्षितिजाकडे वाटचाल: मराठी उद्योजकांचा विश्वमंगल संकल्प”
“मराठी शक्तीचे एकत्रीकरण: विश्वमंगल मराठी फाउंडेशनची भव्य सुरुवात”
18/04/2026
सोलापूर सोशल फाउंडेशन यांच्या वतीने दक्षिण सोलापूर तालुक्यात बालसंस्काराची चळवळ अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक मा. आमदार सुभाष (बापूसाहेब ) देशमुख यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस तालुक्यातील विविध आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी येत्या काही वर्षांत दक्षिण सोलापूर तालुका “बालसंस्काराचा आदर्श तालुका” म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.
सध्या वडापूर, आनंद नगर, साडेपूर, अकोले (मंद्रूप) या गावांमध्ये बालसंस्काराचे कार्य नियमितपणे सुरू असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. त्याच धर्तीवर उर्वरित गावांमध्येही हा उपक्रम विस्तारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीदरम्यान सर्वांच्या सहकार्याने आगामी पिढी घडविण्याच्या दृष्टीने सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच भजनी मंडळे, आध्यात्मिक संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या बैठकीमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात बालसंस्काराची व्यापक व संघटित चळवळ उभारण्यास नवी दिशा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
14/04/2026
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन.
समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचा संदेश देत समाजाला नवी दिशा देणारे महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या विचारांनीच आपल्याला न्याय, हक्क आणि सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली.
त्यांचे विचार आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली.
Inspiration Babasaheb Respect
03/04/2026
शिवरायांचा इतिहास हा केवळ पराक्रमांचा नाही, तर अस्मिता, स्वाभिमान आणि मातृभूमीवरील अथांग प्रेमाचा जाज्वल्य दीप आहे.
रयतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणारे, अन्यायाविरुद्ध सिंहासारखे उभे राहणारे, हिंदवी स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवणारे राजे — छत्रपती शिवाजी महाराज…
त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन. 🙏🚩
#छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवराय #जयशिवराय #शिवजयंती #मराठाअभिमान स्वराज्य महाराष्ट्र इतिहास प्रेरणा
02/04/2026
🚩 हनुमान जयंतीच्या पवित्र पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
अखंड शक्ती, अढळ श्रद्धा आणि निःस्वार्थ भक्ती यांचे प्रतीक असलेले श्री हनुमंत आपल्याला प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद देवो. 🙏
आपल्या जीवनात धैर्य, सकारात्मकता आणि यशाची नवी ऊर्जा निर्माण होवो हीच प्रार्थना. 💫
या पवित्र दिवशी, आपल्या मनातील सर्व भीती दूर करून आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळो. 🚀
जय बजरंगबली! 🚩
जय श्री राम! ❤️
#हनुमानजयंती #जयबजरंगबली #जयश्रीराम SpiritualIndia MarathiFestivals IndianCulture Faith PositiveEnergy Blessed InstaMarathi FestiveMood Bhakti StrengthAndFaith
01/04/2026
भंडीशेगाव येथील ऐतिहासिक श्रीमंत बाजीराव पेशवे विहीर सुशोभीकरण शुभारंभ !
📍भंडीशेगाव
भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथील ऐतिहासिक श्रीमंत बाजीराव पेशवे विहीर येथे सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ आ. सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला.
देहू - आळंदी - पंढरपूर या पवित्र पालखी मार्गावर वसलेली ही प्राचीन बारव वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. संत परंपरेचा अखंड वारसा जपत दरवर्षी लाखो वारकरी या मार्गावरून पायी प्रवास करतात. विशेषतः संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील उभे व गोल रिंगण याच ठिकाणी पार पडत असल्याने या स्थळाचे आध्यात्मिक महत्त्व अधिक अधोरेखित होते.
111 फूट लांबी, 18 फूट रुंदी आणि 65 फूट खोली तसेच 62 पायऱ्या व 6 टप्प्यांची रचना असलेल्या या ऐतिहासिक विहिरीचे जतन व संवर्धन करत तिला अधिक आकर्षक स्वरूप देण्याच्या दृष्टीने सोलापूर सोशल फाउंडेशनच्या पुढाकारातून यापूर्वीही सुशोभीकरण व वृक्षारोपण करण्यात आले आहे.
या ठिकाणाचा सर्वांगीण विकास करून ते भाविकांसाठी सोयीस्कर, आकर्षक पर्यटनस्थळ तसेच वारकरी परंपरेचा अभ्यास व अनुभव घेण्यासाठी प्रेरणादायी उद्यान केंद्र म्हणून विकसित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे भाविकांसाठी सुविधा वाढणार असून, वारकरी संप्रदायाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यास मोठी चालना मिळणार आहे.
यावेळी जि.प. सदस्य मा. संतोष बागल , उद्योजक श्री. अजित कंडरे, सरपंच श्री. गणेश पाटील, श्री. अनंता चव्हाण, डॉ. श्रीधर यलमार, श्री. गणेश बागल, सायकल असोसिएशनचे सायकलर्स व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#वारकरीसंप्रदाय
31/03/2026
मनात करुणा, वाणीमध्ये सत्य आणि कृतीत अहिंसा असू दे ✨
अहिंसा, सत्य आणि करुणेचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान महावीरांना विनम्र अभिवादन 🙏
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
PositiveVibes
25/03/2026
दुर्जनांचा नाश करून धर्म, सत्य आणि न्याय यांचा विजय प्रस्थापित करणारे,
आदर्श नेतृत्व, कर्तव्यनिष्ठा आणि मर्यादेचं सर्वोच्च उदाहरण असलेले मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांना कोटी कोटी वंदन. 🙏✨
राम नवमी निमित्त आपण सर्वांनी रामनामाचा जप करून, त्यांच्या आदर्शांनुसार जीवन जगण्याचा संकल्प करूया. 🙌
सर्वांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
जय श्रीराम! 🏹🔥
Bhakti Devotion FaithInGod SanatanDharma HinduCulture SpiritualIndia RamNaam PositiveVibes Peace InnerPeace FestiveVibes IndiaFestivals InstaIndia ReelsIndia TrendingNow
24/03/2026
एकत्र येऊ, जागरूकता पसरवू आणि TB मुक्त समाज घडवूया!🌍
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Address
Arjun Tower, Jule Solapur, Vijapur Road
Solapur
413004
Opening Hours
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |
| Saturday | 9am - 5pm |
| Sunday | 9am - 5pm |