Dyfisolapur

Dyfisolapur

Share

DYFI Solapur

21/11/2025

DYFI च्या 13 व्या राज्याधिवेशन मध्ये साथी दत्ता चव्हाण यांची राज्य सचिव पदी तर जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांची राज्य उपाध्यक्षपदी तर DYFI चे केंद्रीय समिती सदस्य अनिल वासम यांची राज्य सहसचिव पदी ,जिल्हा कोषाध्यक्ष बालकृष्ण मल्याळ,विजय हरसुरे, कादर शेख,अश्विनी मामाड्याल यांची राज्य समिती सदस्य पदी निवड झाली आहे.या सर्वांचे त्रिवार अभिनंदन !
क्रांतिकारी शुभेच्छा सह लाल सलाम!

Photos from Dyfisolapur's post 18/11/2025

*सोलापूरच्या लढाऊ प्रतिनिधींची DYFI राज्याधिवेशनासाठी बीडकडे आगेकूच*

बीड येथे होत असलेल्या 13 व्या DYFI राज्याधिवेशनासाठी सोलापूरमधील सर्व लढाऊ प्रतिनिधी उत्साहात रवाना झाले.
CITU चे जिल्हा कोषाध्यक्ष कॉ. दीपक निकंबे यांनी शुभेच्छा देत, संघटनेचा पांढरा ध्वज दाखवून सर्व प्रतिनिधींना यशस्वी प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.

06/11/2025

डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी.वाय.एफ.आय) चे 11 वे जिल्हा अधिवेशन कॉ. गोदूताई परुळेकर नगर, मौजे कुंभारी येथे उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनात विक्रम कलबुर्गी यांची जिल्हाध्यक्षपदी, ॲड. अनिल वासम यांची जिल्हा सचिवपदी, तर बाळकृष्ण मल्याळ यांची जिल्हा कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित जिल्हा समिती*
जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी
जिल्हासचिव ॲड. अनिल वासम
जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्याळ
सहसचिव दत्ता चव्हाण
सहसचिव अश्विनी मामाड्याल
उपाध्यक्ष विजय हरसुरे
उपाध्यक्ष कादर शेख
सचिव मंडळ सदस्य बालाजी गुंडे
सचिव मंडळ सदस्य मधुकर चिल्लाळ
सचिव मंडळ सदस्य नरेश गुल्लापल्ली
सचिव मंडळ सदस्य आप्पाशा चांगले
जिल्हा समिती सदस्य प्रभाकर गेंटयाल, योगेश आकिम, दिनेश बडगु,राहुल बुगले, सुनील आमाटी, बजरंग गायकवाड, पुष्पा गुरुपनवरू, किशोर झेंडेकर, अमित मंचले, अभिजित निकंबे इ.

04/11/2025
Photos from Dyfisolapur's post 23/03/2025

23 मार्च हौतात्म्य दिनी भारताचा लोकशाही युवा महासंघाची धगधगती मशाल रॅली.

सोलापुरी - शहीद भगतसिंग, सुखदेव , राजगुरू यांच्या हौतात्म्य दिनी सोलापूर DYFI जिल्हा समिती च्यावतीने एकता मार्च. 23 मार्च 2025 रोजी एकता मशाल रॅली काढून शहीदांना अभिवादन करण्यात आले.
ही एकतेची मशाल जिल्हाध्यक्ष मुन्ना कलबुर्गी यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली व त्यांच्या नेतृत्वाखाली मशाल रॅलीची सुरुवात झाली .
ही एकता मशाल रॅली भैया चौक येथील साहित्यरत्न लोकशाहीर कॉ.अण्णाभाऊ साठे व आंतरराष्ट्रीय मानवतावादी डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांना अभिवादन करून पुढे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पार्क चौक येथील सोलापूरचे चार हुतात्मे व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून मशाल रॅलीचे अभिवादन सभेत रूपांतर करण्यात आले. या अभिवादन सभेस राज्य सचिव साथी दत्ता चव्हाण यांनी संबोधित केले.

सभासद नोंदणी मोहिम 2025 ची सुरुवात नव्या युवक युवतींची नोंदणी जिल्हासचिव ॲड अनिल वासम यांच्या हस्ते करण्यात आली.

या एकता मशाल रॅलीमध्ये युवक विद्यार्थी आणि नागरिक तसेच सर्व राज्य समिती सदस्य,जिल्हा सचिव मंडळ सदस्य, जिल्हा समिती सदस्य आणि तरुणाई मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. अशोक बल्ला यांनी या रॅली चा समारोप केले.

23/03/2025

'जात, धर्म, द्वेषाला देऊ मूठमाती
एकतेची मशाल घेऊन हाती!

*एकता मार्च*
शहीद भगतसिंग, सुखदेव राजगुरू यांच्या शहादत दिनी सोलापूर DYFI च्यावतीने एकता मशाल रॅली


23मार्च 2025 रोजी सायं: 6वा.

एकता मशाल रॅली :भैया चौक कॉ अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून सुरुवात सोलापूरचे चार हुतात्मा येथे समारोप.

02/01/2025

Happy New year 2025

02/01/2025

झूठ –फरेब का आडंबर इतना भी ना फैलाओ की ,
भावी पीढ़ियां सर्वांगीण–दुर्दशा को तुम्हें धिकारे!
–सफदर
2 जानेवारी

जन नाट्य मंचचे संस्थापक, नाटककार, कलाकार, निर्देशक अशी बहुरंगी प्रतिमा असलेले सफदर हाश्मी यांच्या शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी अभिवादन.
DYFI Maharashtra

Want your organization to be the top-listed Government Service in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Solapur