Subodh R Sutkar

Subodh R Sutkar

Share

अध्यक्ष - काँग्रेस शिक्षक सेल.
उपाध्यक्ष- सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी.

10/03/2026

सोलापूर शहर मुख्याध्यापक संघ सचिवपदी श्री. विद्यानंद स्वामी यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..! ✨💐

-
सुबोध रमेश सुतकर
अध्यक्ष
काँग्रेस शिक्षक सेल, सोलापूर.

01/02/2026

३० वर्षानंतर जेव्हा मित्र पहिल्यांदा भेटतात..
माझ्यापेक्षा वजनदार पैलवान होऊन..!
(अशोकराव व गणेशराव शिंदे दोघंही सख्खे भाऊ)
माझ्या आयुष्यातील ही एक मजेशीर, गुढ व न उलघडलेली गोष्ट..
चक्क आज उलघडली..!

सर्वांना आता जबरदस्तीने फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जावं लागेल..!

५० पैसे पोस्ट कार्डच्या जमान्यात,
मला पण दोन मित्रांनी पत्रे लिहली होती..!
(ज्यामध्ये भावना महत्त्वाच्या होत्या, अक्षरे आणि शब्द काही का असेना..!!)
पत्र फक्त योग्य पत्त्यावर यायचं आणि जायचं हेच महत्त्वाचं होतं..!
आम्ही पाचवी-सहावीत असताना पत्र लिहायची बोंब होती..
वरून कहर म्हणजे अशोकराव व गणेशराव दोघेजण मिळून मला पत्र लिहीत होते..
(आप लिखे.. खुदा पढे.. आमच्या तिघांची अवस्था.. त्यातल्या त्यात माझी अवस्था थोडी चांगली होती)
अचानक ही पत्रे व लँडलाईन फोन याची बंद झाली..!

तेंव्हा मी जेम-तेम ५-६ वीत असेन..
माझ्या आत्याच्या गावी जायचो उन्हाळ्याच्या सुट्टीत..
माळीनगरला (अकलूज)..
१२-१५ दिवसांसाठी..
मी शहरातून आलो हेच कौतुक असायचं तिथं..
तिथल्या मित्रांचे प्रश्न..
तिकडं कसं असतं रं..?
इथून सुरुवात व्हायची..!
थोडं थोडं अजूनही लक्षात आहे..
२ मुलं होती माझ्याच वयाची..
नेहमीच सोबत असायची..
रानात, मळ्यात फिरत असताना..
लांब छोट्याशा टपरीवाजा दुकानात पायवाटेने चालताना..
सावकाराच्या मळ्यात चिकू, कैऱ्या तोडताना..
रात्रीच्या अंधारात काजवे पकडताना..
चंद्राच्या प्रकाशात रात्री झाडाखाली गप्पा मारताना..!!
तिथं राहून आजारी पडल्यावर माझ्या आत्या सोबत तिथल्या डॉक्टरांकडे आलेले हेच मित्र..!
मी आत्याकडून सोलापूरला निघताना टेन्शन घेतलेली..
माझ्या मोडक्या-तोडक्या मराठी भाषेत मी त्यांना माझा पत्ता दिला.. पहिला वहिला घरात आलेला लँडलाईन नंबर दिला..
नंबर होता २७२०१ (अशोक नावाच्या पठ्ठ्याला हा नंबर अजून पण पाठ..!!)

पण योगायोगाने..
कसंतरी आमचा संपर्क शेवटी झालाच..!
त्याला कारणही तितकच भावुक होतं..
अकलूजला जाणे-येणं बंद झालं होतं..!
आत्याच्या निधनामुळे मागच्या महिन्यात जाणं झालं..
तिथं त्या दोन मित्रांची मी आठवण काढली..
त्या दोन मित्रांपर्यंत ही बातमी पोहोचली..!
माझा मोबाईल खणाणला..!
तब्बल ३० वर्षा नंतर त्रिकूट पुन्हा एकत्र आलं..!!
३० वर्षात सर्वकाही बदललं होतं..
पण "मन" मात्र तेच होतं..!
निखळ मैत्रीचं..!!

© सुबोध रमेश सुतकर
Digital Blogger
Mo- 9503221222
-
Subodh (Yashwant) R Sutkar.

Pic credit - Akshay Chalwadi

31/12/2025

प्रभाग क्रमांक 22
वंचित बहुजन आघाडी अधिकृत उमेदवार,
रमेश शिवाजी सुतकर (सर) ✨

प्रभाग क्रमांक 22 वंचित बहुजन आघाडी कडून हा उमेदवार रिंगणात 31/12/2025

प्रभाग क्रमांक २२
रमेश शिवाजी सुतकर (सर)

वंचित बहुजन आघाडी अधिकृत उमेदवार...!

प्रभाग क्रमांक 22 वंचित बहुजन आघाडी कडून हा उमेदवार रिंगणात Lokpradhan NewsShare, Support, Subscribe!!! Subscribe: https://bit.ly/3lVnZzyYoutube: https://www.youtube.com/lokpradhannewsWebsite: https://lokpradhannews.c...

वंचित बहुजन आघाडी कडून रमेश सुतकर प्रभाग 22 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल.... 31/12/2025

प्रभाग क्रमांक २२
रमेश शिवाजी सुतकर (सर)

वंचित बहुजन आघाडी अधिकृत उमेदवार...!

वंचित बहुजन आघाडी कडून रमेश सुतकर प्रभाग 22 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल....

09/11/2025

✨ पुरुष साफसफाई कामगार पाहिजे ✨
शिक्षणाची अट नाही.
वय वर्ष १८ पूर्ण.
पगार- ८००० ते १०,००० महिना.

-: संपर्क :-
यशोधरा प्रशाला व ज्युनिअर कॉलेज.
संजय गांधी नगर, भूषण नगर जवळ, वळसंगकर हॉस्पिटल मागे, सोलापूर-४
मो- 7276187542

30/10/2025

धन्यवाद दैनिक लोकमत वृत्तपत्र समूह..! ✨

Photos from Subodh R Sutkar's post 14/10/2025

जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी यांचेकडून निर्गमित झालेले अन्यायकारक पत्र रद्द..!✨

काँग्रेस शिक्षक सेल व अल्पसंख्यांक असोसिएशन, सोलापूर यांच्यावतीने जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी दिलीप पवार यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी यांचे कडून दि- १८/०९/२०२५ व २३/०९/२०२५ रोजी अल्पसंख्यांक संस्था संचलित शाळांना लागू नसलेले अन्यायकारक पत्र निर्गमित झाले होते. सदर पत्र रद्द करावे यासाठी काँग्रेस शिक्षक सेल व अल्पसंख्यांक असोसिएशन यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भावनात जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी कार्यालय यांचेकडून निर्गमित झालेले अन्यायकारक पत्र रद्द काँग्रेस शिक्षक सेल व इतर संघटना यांच्या निवेदनानुसार दि-१४/१०/२०२५ रोजी रद्द करण्यात आले.

सदर प्रसंगी सुबोध सुतकर (अध्यक्ष-काँग्रेस शिक्षक सेल, सोलापूर), इस्माईल शेख-उपाध्यक्ष, रावसाहेब भालेराव-सचिव, वैजनाथ हत्तुरे (अध्यक्ष-अल्पसंख्यांक असोसिएशन) श्रावण बिराजदार-उपाध्यक्ष, विशाल दारफळे, ए जी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Want your public figure to be the top-listed Public Figure in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Solapur