Shankar Dhere

Shankar Dhere

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shankar Dhere, Education Website, Satara.

Photos 21/02/2017

शिवजयंती 2017

सातारा

18/07/2016

"धना" ही कादंबरी आपल्या ग्रुपवर वाचण्यास इच्छुक असल्यास सांगा.
एकुण २० भाग आहेत.
दररोज १ भाग वाचता येईल.
पाठवतो 1 भाग .
आवश्यक वाचणार आपण

"धना"

एक गाव होत.महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात असणार्या गावांपैकी एक गाव म्हणा हवेतर.त्या गावात इतर गावाप्रमाणे गावकीसुध्दा होतीच.

गावात एक हनुमानाचे मंदिर होते,फार जुने.कोण म्हणत होते कि ते पांडव वनवासात असताना बांधले होते ,कोण म्हणत होते सातकर्णी राजवटीत बांधले गेले..!!

कोणी बांधले कोणास ठाऊक.मात्र बांधले असे होते काय विचारता.
दगड असले तासले होते कि एकवेळ उर्वशीच्या गालावर फिरवलेला हात सुध्दा थबकावा क्षणभर.
मजबूत,बेलाग,दणकट..उपमा नाही..!

त्याच्या मागे एक सायसंगीण तालीम होती.तीही तशीच जुनी तालीम.तालमीत आजही शड्डू घुमत होते.मोठे मोठे पैलवान रोज सरावासाठी तिथे येत होते.

त्यापैकीच एक होता ''धनाजी''

धनाजी तसा गरीब परिस्थितीतला.आई शेळ्याचे दुध विकून त्याला खुराक पुरवत होती.धनाने नारळापासून कुस्तीची सुरवात केली होती,आज त्याची जोड तशी बरीच मोठी होती.महाराष्ट्रातील बर्याच चांगल्या मल्लांना त्याने असमान दाखवून गावाचे नाव चमकावले होते.

धना चे वस्ताद फार कुस्तीवेडा माणूस.धनाला लहानपणीच त्यांनी पारखले होते.म्हणून आता त्याला काय हवे नको ते त्यांच्याही गरीब परिस्थितीतून पुरवत होते.
वस्ताद देव माणूस.वस्ताद कसा असावा याचे उदाहर होते ते..त्यांचे नाव विठ्ठलकाका...!

पण ,सध्या परिस्थिती वेगळी होती.१ महिन्यावर शेजारच्या गावाचे मोठे मैदान आले होते.पंजाब मधील एका मोठ्या पैलवानाबरोबर त्याची कुस्ती ठरली होती.

पण धनाला आता कुस्ती नको होती.

बाकीच्या पैलवानासारखे गावभर हिंडावे,मुलींशी बोलावे असे त्याला नेहमी वाटत असे.पण आई आणि वस्ताद काका यांच्या दडपणामुळे धना तालीम सोडत नसे.मन मारून व्यायाम आणि कुस्ती सुरु होती.

मागच्या महिन्यात तालुक्याला धना ने मोठे मैदान मारले होते.कोल्हापूरच्या पैलवानाला ढाक लावून अस्मान दाखवले होते.त्यावेळी फेटा बांधून,बैलगाड्या जुंपून,पुढे हलगी आणि घुमक्याच्या तालावर त्याची गावातून प्रचंड मिरवणूक काढण्यात आली होती.

गावाच्या पाटलांच्या वाड्यात मिरवणूक थांबली होती.पाटलांची मुलगी हि नुसतीच तारुण्यात आली होती.धना नदीवर अंघोळीला जाताना ती नेहमी पहात असायची.त्याची ती चालण्याची अदा, भरदार छाती हे सर्व ती वाड्याच्या गच्चीवरून रोज पाहत असे..!

पण धना च्या नजरेने कधी जमीन सोडली नव्हती...हे असे बरेच दिवस चालत होते.

न काळात ती त्याच्याकडे ओढली गेली होती..हा वयाचा दोष म्हणा किंवा इतर काही..प्रेम जडले होते.

त्या दिवशी मिरवणुकीत धना पाटलांच्या वाड्यात पाटलांना विजयाचा सांगावा आणि आशीर्वाद घ्यायला थांबला.बोलणी चालणी झाली..धना जायला निघाला.तितक्यात गच्चीवरून पाटलांच्या मुलीने त्याच्यावर गुलाल टाकला..धना एकदम दचकला.त्याने वर पहिले तर पाटलांची ती मुलगी.

एक क्षण नजरानजर झाली.
ती हासली..पण धना ..विचारू नका.!!

प्रथमच असला प्रकार, नाहीतर वस्ताद काकांना विचारल्याशिवाय धनाला तालमीचा उंबरा ओलांडता येत नव्हता.

गेले महिनाभर धनाला तो दिवस आठवत होता.त्यानंतर रोज नदीवर जाताना तिचे दर्शन घडू लागले.ते पाहून हासणे,लाजने,परत हासणे असले प्रकार घडू लागले.

अहो जवानीची मस्ती आणि म्हातारपणाचा खोकला दाबून कधी दाबेल का..??

धना तिच्या आणि ती धनाच्या प्रेमात पडली.

लहान मुलांकडून सांगावे जावू लागले.

आज शेजारच्या गावात कुस्ती ठरली खरी..पण धनाला कुस्ती नको वाटू लागली होती.

आज तो तिला भेटायला रात्री जाणार होता..तसा निरोप होता.

पण जायचे कसे ??

वस्ताद काका घर सोडून फक्त त्याच्यासाठी तालमीत झोपायला येत होते.पाहते ते स्वत उठवून त्याचा व्यायाम घेत होते.मग ?? कसे ??जाणार

सायंकाळ झाली ..लढती संपल्या.अंघोळी झाल्या.वस्ताद जायला निघाले.

आणि म्हणाले पोरानो आज मी झोपायला नाही येणार..शेजारच्या गावात जेवायचे आमंत्रण आहे ,तुम्ही लवकर झोप..सकाळी लवकर उठवायला येतो ..!!

धनाच्या मनात आनंदाची लकेर उठली.

रात्र झाली.

तालमीच्या मागच्या दाराने धना गुपचूप बाहेर पडला.

रानातील आडवाटेने त्याने सरळ पाटलांचा वाडा गाठला..!!

मनात भीती होतीच.पाटलाला कळले तर ??

कारण धनाच्या खुराकाचा सर्व खर्च पाटील स्वत: करत होते.धनाची आई पाटलांच्या रानात काम करत असे..सर्व डोक्यात होते धनाच्या..पण ओढ सुध्दा तितकीच होती.

वाडा जवळ आला.गच्चीवर कोणीतरी असल्याची चाहूल लागली.धनाने ओळखले...

धना धावत वाड्यामागे गेला.

दगडी वाड्याच्या ,दगडाला संधी-सपाटीत बोटे घालून धरून तो वर चढू लागला.बघत बघत तो वर पोचला.!!

ती दिसली...प्रथमभेट ..कल्पना करा मंडळी.बाकी काही लिहित नाही..!!

त्या रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात..ते दोघे भेटले होते.....!!!

पहाट झाली होती.धनाला रोजच्या प्रमाणे जाग आली होती.तो दचकून उठला .जायला निघाला..

परत भेटायची वचने झाली आणि धनाने तालमीची वाट धरली.

धनला खाली उतरताना पाटलाच्या गड्याने पहिले...!

तो दिवस धनला तिच्याशिवाय दुसरे काही सुचत नव्हत.

ना व्यायामाकडे लक्ष,ना खुराकाकडे लक्ष...!!

असेच २-३ दिवस गेले...ती भेटण्याची ओढ परत निर्माण झाली..!!

पुन्हा रात्री तोच प्रकार..असे आता रोज घडू लागले..!!

कधी वस्ताद नसताना..तर कधी असतानासुद्धा घडू लागले.

आजारी असल्याचे कारण सांगून धना सर्व पचवू लागला.!!

आणि कुस्ती तोंडावर आली....!!

कसेबसे मन सावरले..सराव सुरु झाला ,खुराक सुरु झाल्या...३-३ तास सरावने धना लवकर झोपू लागला.....!!

पण मन मात्र तिच्याभोवती फिरत होते...!!

कुस्तीचा दिवस उजाडला.

तिने सांगितले होते,कुस्तीला जायच्या आधी मला भेटून जायचे..म्हणून धना भल्या पहाटे उठून तिला भेटायला निघाला....

वास्तादना शंका आलेली आधीच...आज त्यांनी त्याचा पाठलाग केला व सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला पन ते काहीच बोलले नाहीत...!!

सर्व कुस्त्याच्या ठिकाणी आले.

कुस्त्या सुरु झाल्या.

धना शरीराने मजबूत असला तरी त्याचे मन वेगळीकडेच होते....

याचा परिणाम म्हणून धनाला प्रतिस्पर्धी पैलवानाने खाली धरून इराणी एकलंगी इतकी जोरात घातली कि धनाचा पाय गुडघ्यातून निसटला ..!!

आर्त किंकाळीने मैदान हादरले....पराभव सपशेल पराभव.

आणि कायमचा अधूपणा......

जखमी धनाला इस्पितळात आणले ...

वास्तादानी विचारले धना खेळू शकेल का पुन्हा...?

डॉक्टर म्हणाले होय..पण २ महिने विश्रांती घ्यावी लागेल...!!

गावाचे नाव गेले,पैलवानाची अब्रू गेली ,वस्तादांची इज्जत गेली आणि हे अधूपण आले..याचे कारण धना आणि वास्तदना माहित होते.

इर्षेने त्याच पैलवानाला पुढच्या मैदानात धरून पाडायचे असा विचार गाव करत होता.....
लेखक- पै.गणेश मानुगडे कुस्ती मल्ल विद्या

उर्वरीत भाग उद्या

08/03/2016

वेळ काढून जरुर वाचा

WCF*WCF*WCF*WCF* #
😊World Culture Festival-2016😊
विश्वाच्या निर्मितीपासुन अशा काही प्रमुख ठळक घटना घडल्या ज्याच्यानंतर मानवाची जीवनपद्धती संपुर्णतः बदलुन गेली..! जसं की रावणाचा वध करुन रामानं आपलं'रामराज्य' उभारलं..,तसचं भगवान श्री क्रिश्नांनी सुद्धा महाभारतातुन परम संदेश देऊन मनुष्याचं खरं ते रुप त्याला सांगितलं..! त्यानंतर पहिले व दुसरं महायुद्ध..! ज्याच्यानंतर मानवाने अनेक चांगल्यावाईट गोष्टी अनुभवल्या व अफाट अशी प्रगती केली..! तुम्हाला माहीत आहे का..? अशीच एक घटना न भुतो,न भविष्यती घडत आहे येत्या मार्च मध्ये घडत आहे..! आणि ती सुद्धा आपल्या भारतात..!The World Culture Festival-WCF(विश्व सांस्क्रुतीक महोत्सव-2016) जगाच्या इतिहासातील एक सुवर्णपान..! प्रुथ्वीतलावरील सर्वात भव्य-दिव्य कार्यक्रम..!

श्री श्री रवीशंकरजी (गुरुजी) पुरस्क्रुत द आर्ट आँफ लिवींग या जगातील सर्वांत मोठ्या अशासकीय संस्थेच्या(Non-Govermenatal Orgnisation-NGO)च्या 35 व्या वर्धापनानिमित्त"वसुधैव कुटुंबकम्" ही एकात्मतेची भावना सगळ्या जगभर पोहचवण्यासाठी,सगळं जग शांततेतुन एकत्र आणण्यासाठी हा सांस्क्रुतीक व आध्यात्मिक सोहळा आयोजित केला आहे...तरी आपणांस ही याद्वारे मेसेजद्वारे सादर आमंत्रण..!
🎉🎉वैशिष्ठ्ये व भव्यता:-
#(1)कार्यक्रम क्षेत्र-1000 एकर
(सौजन्य:-यमुना बँक)
#(2)155 देशांचा सहभाग(जे अशाप्रकारच्या कुठल्याही कार्यक्रमात आजपर्यंत घडलं नाही)
#(3)तब्बल 35 लाख लोकांचा सहभाग( कल्पना करा-पट्टण कोडोली सारख्या 30-35यात्रा एकाचवेळी)
#(4)7 एकरमध्ये पसरलेला विशाल स्टेज(आपण सर्वांनी फुटबाँलचे ग्राउंड पाहिले असेलच...अशा कमीत-कमी 6 ग्राउंडएवढा हा स्टेज असेल आणि त्याची उंची असेल 40 फुट..! कलाकारांना स्टेजवर जाण्यासाठी 'खास लिफ्ट'ची सोय) हा स्टेज गिनीज बुक आँफ वर्ल्ड रेकाँर्ड मध्ये नोंदवला गेला आहे..!
याच स्टेजवर भारतासहित इतर 15 देशांचे प्रमुख (राष्ट्रपती/पंतप्रधान),अनेक देशांचे मंत्री,परराष्ट्र मंत्री,युनो परिषदेचे उच्चस्तरीय सदस्य,व भारतातील बहुतांश केंद्रीय मंत्री,17 राज्यांचे मुख्यमंत्री,सर्व धर्मांचे प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु,बिझनेसमनस्,सुपरस्टार्स,राजकीय लोक,खेळाडु व समाजसेवक उपस्थित असतील श्री श्री रवीशंकरजींसोबत..!🙏
🎁कार्यक्रम:-
या कार्यक्रमासाठी जगभरातुन सुमारे 33,500 कलाकार एकाच मंचावर आपली कला सादर करणार आहेत,तसेच नानाविध प्रकारची40 प्रकारची वाद्ये समाविष्ट असतील..! यामध्ये भारतातील सर्वच राज्यातील प्रत्येकी एक-एक कला असेल...
(1)1050 धनगरी ढोल-महाराष्ट्र
(2)1000 ओडिसा डान्सर्स
(3)1000 कथ्थक डान्सर्स
(4)1500 कुच्चपुडी डान्सर्स
(5)1000 उत्तरपुर्वीय डान्सर्स
(6)1000 भरतनाट्यम् डान्सर्स
(7)1000 भांगडा डान्सर्स
(8)1000 घुम्मर् डान्सर्स
(9)1500 गरबा डान्सर्स
(10)1000 गायक(टीम रवींद्र)
(11)1620 कथ्थक व मोहिनित्तम् डान्सर्स
(12)1000 वेदिक पंडीत(मंत्रोच्चारन)
(13)1500 हरियानवी डान्सर्स
(14)1000 नाट्टी डान्सर्स
(15)1000 पंथी डान्सर्स
(16)आफ्रिकन ढोल-ड्रम्स्
(17)रशियन फोल्कस्
(18)ब्राझिलीयन सांबा न्रुत्य
(19)अर्जेंटियन टँगो न्रुत्य
(20)अमेरिकन हिप हाँप व रँप
(21)बल्जेरीयन फोल्कस्
(22)3000 कलाकारांचे सादरीकरण-वैश्विक ताल 25 डान्सप्रकारांमध्ये
(23)स्वीस अल्फोन्स्
(24)वर्लींग दरवेशी
(25)थाई डान्स
(26)होरो डान्स-बुलगारिया
(27)पुंक सुफी-पाकिस्तान
(28)जर्मन क्वायर-जर्मनी
(29)मँटी फोल्क डान्स-हंग्री
(30)अवा चीअर डान्स-जपान
(31)जाँय आँफ रियुनीयन-चीन
(32)कंडीयान डान्स-श्रीलंका
(33)लायन डान्स-सिंगापुर
(34)लँटीन फायर फाँर पीस
(35)ग्लो आँफ प्लानेट-तैवान
(36)यांसह फिलीपाईन्स,ईराण,कुरदिस्तान,मलेशिया,मंगोलिया,मध्य आशियासह अनेक देशांतील संस्क्रुती,वाद्य व कला..!
🙏विशेष सहकार्य:-👍
#सांस्क्रुतीक मंत्रालय,भारत सरकार
#इंडीयन आर्मी
#अम्रुतसर गुरुद्वारा साहेब व अकाल तख्त यांच्यामार्फत दररोज सुमारे 400000 लोकांना अन्नदान
#भारतातील सर्व राज्य सरकारे
⭐इतर:-
#दिल्लीतील सर्व शाळांच्या परिक्षा फेब्रुवारीमध्येच होऊन सुट्टी जाहीर केली आहे..! त्या शाळांमध्ये लोकांच्याराहण्याची सोय..!
#भारत सरकारद्वारा फक्त जर्मनी व रशियासाठी सुमारे 317ज्यादा विमानसेवा..!
#भारत सरकारद्वारा विदेशी नागरिकांसाठी4000 हाँटेल्स बुकींग करण्यात आली आहेत..!
#26500 अस्थायी शौचालये बनवण्यात आली आहेत
🚎17000 बसेस प्रेक्षकांना कार्यक्रमस्थळी ने-आण करण्यासाठी असणार आहेत..!
🔆1000 एकरच्या ग्राउंडला प्रकाशमय करण्यासाठी 9500 हुन अधिक हाय पावर जनरेटर्स..!
🏆विशेष:-👇
महाराष्ट्रातील अनेक कला-संस्क्रुतींमधुन,त्यांची प्रात्यक्षिके बघुन खुद्द श्री श्री रवीशंकरजींनी आपल्या सर्वांच्या आवडत्या*धनगरी ढोलाची*निवड केली आहे आणि हा ढोल जगभरातील सर्वच TV चैनल्स् वर एकाच वेळी घुमणार आहे..! यासारखा दुसरा कार्यक्रम यानंतर या प्रुथ्वीवर होणे नाही..!आणि यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्यातलाच एक मी सुरज अशोक रोंगे एक ढोलवादक म्हणुन सहभागी होत आहे...याच्यासारखी दुसरी परमआनंदाची गोष्ट ती कोणती..?
मी जातोय.., तुम्हीही या..!
अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आर्ट आँफ लिवींगच्या स्वयंसेवकांशी संपर्क साधा..!
11-12-13 मार्च 2016 रोजी
सायंकाळी 4 नंतर
स्थळ:-विहार मेट्रो स्टेशनच्या मैदानात,नवी दिल्ली,भारत
सर्व माहिती संकलन व लेखन:-
सुरज अशोक रोंगे
पट्टण कोडोली
ता.हातकणंगले
जि.कोल्हापुर
🙏🙏जय गुरुदेव🙏🙏
्यवाद #
🎉धनगरी ढोल विशेष🎉
धनगरी ढोल दिल्लीत गाजणार

दिल्ली येथे 11 ते 13 मार्च 2016 या काळात होणाऱ्या अतिभव्य आणि अभूतपूर्व अशा ‘वर्ल्ड कल्चर फेस्टिवल’ला आता फक्त काही दिवस राहिले आहेत. या सोहळ्यात जगभरातील 8500 संगीतकार तसेच33500 हून अधिक कलाकार नृत्य आणि वादन कला सादर करणार आहेत. यात 40 प्रकारची वाद्ये असतील. त्यापैकीच एक वाद्य म्हणजे महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर भागातील धनगरी ढोल. या भागातील 1050 हून अधिक धनगरी ढोल वादक, वर्ल्ड कल्चर फेस्टिवलमध्ये त्यांची कला सादर करणार आहेत.

“फेब्रुवारी 2011मध्ये, कोल्हापूर येथे आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे झालेल्या अभंगनाद या कार्यक्रमात 1356 धनगरी ढोल वादकांनी ढोल वाजवून जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. आता 1050 हून अधिक धनगरी ढोल वादकांना दिल्ली येथे होणाऱ्या वर्ल्ड कल्चर फेस्टिवल मध्ये संपूर्ण जगासमोर आपली कला सादर करायला मिळणार ही आनंदाची गोष्ट आहे.”
निसर्गाशी समरस होणारा, प्रामाणिक, धाडसी, विश्वासू, प्रेमळ व आध्यात्मप्रिय समाज म्हणून धनगर समाजाची ओळख आहे. भारदस्त बांधा, डोक्यावर फेटा किंवा गांधी टोपी, तीन बटनांचा सदरा, धोतर किंवा विजार, अंगावर ‘घोंगडे’, पायामध्ये चामडी पायताण, हातामध्ये छोटी धारदार कुऱ्हाड, कपाळावर भंडारा, अथांग पसरलेले आकाश म्हणजे पांघरून – सारी जमीन म्हणजे अंथरूण, आजही निसर्गाच्या कुशीत अगदी आनंदाने वावरणारा एक माणूस ज्याला तमा नाही कशाची – चिंता नाही उद्याची, मिळेल ते खाणारा आणि आनंदात जगणारा माणूस म्हणजे धनगर होय, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
धनगर समाजात, ढोल या वाद्यास फार मोठे महत्व व परंपरा आहे. एका बाजूस मेंढ्यांचे व दुसऱ्या बाजूस बकरीचे चामडे लावलेले असते. व ढोल वाद्यामधून निर्माण होणारा नाद एक प्रकारचे ‘ध्यान’ असते. प्रत्येक धार्मिक व मंगल कार्यात असते. दिलेले ‘वचन’ म्हणजे भंडारा होय.धनगर म्हणजे धनाचे आगर ज्याच्या हाती आहे तो, आणि ज्या ढोलामध्ये सृष्टीचा नाद गुंतला आहे तो म्हणजे ‘धनगरी ढोल’ होय..!

Photos from Shankar Dhere's post 23/02/2016
06/02/2016

धनगरी ढोल दिल्लीत गाजणार

दिल्ली येथे ११ ते १३ मार्च २०१६ या काळात होणाऱ्या अतिभव्य आणि अभूतपूर्व अशा ‘वर्ल्ड कल्चर फेस्टिवल’ला आता फक्त काही दिवस राहिले आहेत. या सोहोळ्यात जगभरातील ८५०० संगीतकार तसेच ३३५०० हून अधिक कलाकार नृत्य आणि वादन कला सादर करणार आहेत. यात ४० प्रकारची वाद्ये असतील. त्यापैकीच एक वाद्य म्हणजे महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर भागातील धनगरी ढोल. या भागातील ११०० हून अधिक धनगरी ढोल वादक, वर्ल्ड कल्चर फेस्टिवलमध्ये त्यांची कला सादर करणार आहेत.
या कार्यक्रमाच्या कोल्हापूरमधील आर्ट ऑफ लिव्हिंगचे समन्वयक मानसिंग जाधव म्हणाले,
“फेब्रुवारी २०११ मध्ये, कोल्हापूर येथे आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे झालेल्या अभंगनाद या कार्यक्रमात १३५६ धनगरी ढोल वादकांनी ढोल वाजवून जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. आता ११०० हून अधिक धनगरी ढोल वादकांना दिल्ली येथे होणाऱ्या वर्ल्ड कल्चर फेस्टिवल मध्ये संपूर्ण जगासमोर आपली कला सादर करायला मिळणार ही आनंदाची गोष्ट आहे.”
निसर्गाशी समरस होणारा, प्रामाणिक, धाडसी, विश्वासू, प्रेमळ व आध्यात्मप्रिय समाज म्हणून धनगर समाजाची ओळख आहे. भारदस्त बांधा, डोक्यावर फेटा किंवा गांधी टोपी, तीन बटनांचा सदरा, धोतर किंवा विजार, अंगावर ‘घोंगडे’, पायामध्ये चामडी पायताण, हातामध्ये छोटी धारदार कुऱ्हाड, कपाळावर भंडारा, अथांग पसरलेले आकाश म्हणजे पांघरून – सारी जमीन म्हणजे अंथरूण, आजही निसर्गाच्या कुशीत अगदी आनंदाने वावरणारा एक माणूस ज्याला तमा नाही कशाची – चिंता नाही उद्याची, मिळेल ते खाणारा आणि आनंदात जगणारा माणूस म्हणजे धनगर होय, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
धनगर समाजात, ढोल या वाद्यास फार मोठे महत्व व परंपरा आहे. एका बाजूस मेंढ्यांचे व दुसऱ्या बाजूस बकरीचे चामडे लावलेले असते. व ढोल वाद्यामधून निर्माण होणारा नाद एक प्रकारचे ‘ध्यान’ असते. प्रत्येक धार्मिक व मंगल कार्यामध्ये धनगरी ढोल वाजवणे ठरलेले असते. ढोल वाजवण्याच्या स्पर्धा देखील भरतात. त्यावेळी रात्र-रात्रभर ‘वादक’ ढोल वाजवत असतात. ‘धनगर’ समाज हा हजारो वर्षांची परंपरा असलेला समाज आहे. शेळ्या-मेंढ्यांचे पालन करणे व त्यावरच उदरनिर्वाह करणे हा धनगरी लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. दऱ्या – खोऱ्यामधून, रानावनातून भटकंती करणारा धनगर शरीराने अगदी धष्टपुष्ट व निरोगी असतो. शेळ्या-मेंढ्यांचे दुध, जे जे नैसर्गिक अन्न, धान्य, फळे, भाज्या खाणे, तसेच निसर्गाच्या सततच्या सानिध्यामुळे अनेक वनौषधींचे ज्ञान, धनगर मेंढपाळांना असते. अनेक रस्त्यांचे मार्ग धनगरी मेंढपाळांनी सुचवलेले आहेत. त्यांपैकी उदाहरणार्थ, मुंबई-पुणे हा मार्ग शिंग्रोबा धनगराने सुचवलेला मार्ग आहे. हिंदू धर्मामधील धनगर समाज हा एक प्रमुख समाज आहे. समाजाच्या चालीरीतींची, परंपरेचे जपणूक करणारा हा समाज आहे. निसर्गामधील वृक्ष, वेली, दगड, जल, पशु, पक्षी यांच्या प्रती आदर व या सर्व घटकांना देवतेच्या रुपात मानणारा हा समाज होय. देव-देवता, साधू-संत, गुरुजनांना मानणारा व त्यांना पुजणारा हा समाज आहे. कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी नगरीमध्ये आदमापूर – पट्टण कोडोली – आप्पाची वाडी येथे धनगर लोकांची विठ्ठल-बिरदेव, हलसिद्धनाथ, संत बाळूमामा आदी दैवते आहेत व येथे मोठ्या यात्रा होत असतात व या वेळी ‘भाकणूक’ म्हणजे भविष्यवाणी होते व यावेळी लाखो लोकांची उपस्थिती असते. ‘ढोलच्या’ नादामध्ये तल्लीन होऊन ज्या पुजाऱ्यांच्या अंगामध्ये संचार येतो त्याला ‘भाकणूक’ म्हणतात.
याविषयी अधिक माहिती देत असताना समन्वयक प्रशांत पाटील म्हणाले, “बऱ्याच वर्षापासूनची ही परंपरा आहे व याद्वारे भविष्यवाणी होऊन लोकांना दिशा दाखवण्याचे अध्यात्मिक कार्य होत असते, या भविष्यवाणी मधूनच अनेक वर्षापासून एका अध्यात्मिक धर्मरक्षण करणाऱ्या महापुरुषाच्या आगमनाची भविष्यवाणी होत आहे व त्याचा आपल्या सर्वांना आता अनुभव येत आहे.” धनगरी लोकांच्यामध्ये ढोल वाजवणे, गजनृत्य करणे, ‘हेडाम’ खेळणे म्हणजे ढोलच्या तालावर तल्लीन होऊन स्वतःच्या शरीरात तलवारीचे आघात करून घेतले जातात, याला ‘हेडाम’ म्हणतात व या हेडाममध्ये कोणतीही इजा होत नाही असा धनगरी लोकांचा समज आहे. याचबरोबर प्रत्येक कार्यक्रमामध्ये भंडारा उधळणे (भंडारा म्हणजे हळद) ठरलेले असते, व हा भंडारा म्हणजे आयुर्वेदिक औषध आहे. तसेच हा भंडारा ज्यावेळी कपाळी लावला जातो त्यावेळी एखादे लग्न, एखादा मोठा व्यवहार किंवा कोणत्याही कायदेशीर कागदपत्रापेक्षा भंडाऱ्याला प्रमाण मानण्यात येते. व दिलेले ‘वचन’ म्हणजे भंडारा होय. अनेक शासकीय सोयी-सुविधांची वाट पाहणारा. शिक्षणाच्या वाटेवर येऊ पाहणारा, थोडाबहुत आलेला, धनगरी समाज, मेंढपाळ समाज ज्याला गरज आहे एक मार्गाची की ज्यामधून पारंपारीक मेंढपाळ व्यवसायामध्ये वृद्धी होण्याची, जुन्या परंपरा जपण्याची, त्या वाढवण्याची व येणाऱ्या पिढीकडे सुपर्द करण्याची, कारण धनगर म्हणजे धनाचे आगर ज्याच्या हाती आहे तो, आणि ज्या ढोलामध्ये सृष्टीचा नाद गुंतला आहे तो म्हणजे ‘धनगरी ढोल’ होय

13/01/2016

पोलिस स्टेशनमधे फोन आला.
कचर्याच्या ढिगात एक मृतदेह पडलाय..
पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली.
मृतदेह ताब्यात घेतला.
पोष्टमार्टमला पाठवला.
पोलिसांना घटनास्थळी कोणताही पुरावा सापडला नाही...
एका अज्ञात खुनाची नोंद झाली..
दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला.
मृतदेह मुलीचा आहे. वय २० ते २५ दरम्यान असावे. शरीरावर असंख्य
जखमा. माराचे व्रण. तीच्यावर सामुदायिक अत्याचार झालेत.
तीची किडनी, डोळे गायब आहेत. आणि याहूनही क्रुरता म्हणजे
जिवंत असतानाच तीचे अवयव काढले. आणि यातच तिचा मृत्यू
झाला.
पोलिसांना ही मुलगी कोण ? कुठली ?
काहीच माहिती नव्हती...
मिसिंग केस तपासल्या.
बाकी पोलिस स्टेशनला चौकशी केली.
पण काहीच हाती लागले नाही..
अखेर त्या मुलीचा फोटो वर्तमानपत्रात दिला.
कोण होती ती?
काय झाले तिच्याबाबत?
कशी घडली ही घटना?
काय शिकवते ही घटना?
ते एक सुखी कुटूंब.
आई वडील एक मुलगा आणि दोन मुली.
घरावर संस्कारांची छाया.
वडीलांनी सकाळी उठावे. देवपुजा करावी.
दोन्ही मुलींनी वडीलांना साथ द्यावी.
घरच आवरावे आणि वडीलांनी कामाला तर मुलींनी काँलेजला
निघावे.
भाऊ महाशय अजूनही झोपेतच.
मुली देवाची पुजा ऐकून तर भाऊ महाशय आईची बडबड ऐकून
उठायचे.
पण एकंदरीत घरात खेळत वातावरण.
एकमेकांवर प्रेम.
सुसंस्कारी आणि सुसंस्कृत अस घर...
तिन्ही भाऊ बहिणींचा गोंधळ घराला घरपण देत होता..
भाऊ थोडा आळशीच पण तिघेही हुशार...
असे हे कुटूंब.
पण या घराला कुणाची नजर लागली आणि ....
तो काळा दिवस उजाडला.
नेहमी प्रमाणे
आईने डबे करून दिले.
वडील कामाला, थोरली मुलगी काँलेजला आणि धाकटी शाळेत
गेली.
भाऊसाहेबांचे दुपारी काँलेज . यामुळे ते निवांत होते....
दुपार झाली.
भाऊ काँलेजला गेला.
काही वेळा नंतर धाकटी बहिण शाळेतून आली.
नंतर वडील कामावरून आले.
भाऊ आला.
पण
पाच वाजता येणारी बहिण माञ आलीच नाही..
येईल एवढ्यात..
बस लेट असेल.
लेक्चर असतील.
बस मिस झाली असेल.
असे एकमेकांना समजावत घरचे वाट पाहत होते...
संध्याकाळचे सात वाजले.
आठ वाजले.
आता माञ शंकेची पाल चुकचुकायला लागली.
फोन सुरू झाले.
मैञीनींना फोन.
जवळच्या पाहुण्यांना फोन.
तपास लागेना..
भाऊ काँलेजला गेला.
पण चार वाजताच सगळे गेलेत.
कोणतेही एक्ट्राचे लेक्चर, क्लास नव्हता.
भावाला काय करावे सुचेना.
आईने टाहो फोडलाय.
बापाच काळीज फडफडतय. पण तसे न दाखवता सर्वांना धीर
देतोय.
लहान बहिण रडतेय.
सर्वांना विचारणा झाली.
फोन झाले.
आजुबाजुचा भाग पाहिला.
कुठे काहीच नाही...
राञभर डोळ्याला डोळा नाही.
दिवस उजाडला.
शेजारची एक मुलगी अशीच गायब झाली आणि कुणासोबत पळून
गेली ही गोष्ट ताजी होती.
यामुळे तर काळजी अजुनच वाढली.
आपण पोलिसांत तक्रार देऊ.
पण काय होईल.
फक्त आब्रु जाईल.
तिला काय कमी केले आम्ही ?
काय चुकले आमचे?
तिने असे का केले ?
अशी पळून का गेली ?
लहान बहिणीचा विचार करायचा.
आई बापाचा विचार.
घरचा, घराण्याचा विचार करायचा.
आपली मुलगी निघून गेली. आता पोलिसांत गेले तर आपलीच आब्रू
जाणार.
मनात असुनही.
प्रेम असुनही.
लहान मुलीच लग्न आणि घरची आब्रु
या भीतीने पोलिसांत तक्रार दिली नाही.
एक दिवस गेला. दोन. तीन. चार
एक आठवडा गेला.
दोन आठवडे..
आणि अचानक पेपरवरील फोटो पाहिला.
आपल्याच मुलीचा. बहिणीचा...
काय अवस्था झाली असेल त्या कुटूंबाची.
रडतच सगळे पोलिस स्टेशनला पोहचले.
मुलीची चौकशी केली.
ओळख दिली.
पण दुर्दैव पहा.
बाँडी जास्त सडल्याने पोलिसांनी तीचे अंन्त्यसंस्कार उरकले
हो.
आता त्या कुटूंबाला फक्त अस्तीचे मडके मिळाले.
१५ दिवसापुर्वी आनंदाने गेलेली मुलगी आज एका मडक्यात घरी
आली.
काय घडली ही घटना?
मुलगी काँलेजला गेली.
चार वाजता माघारी फिरली.
बसची वाट पाहत थांबली होती.
तीच्या शेजारी एक मध्यमवयाची बाई आली.
बोलणे सुरू झाले.
ही बाई चार दिवसापासून बससाठी थांबत होती.
दोघींची मैत्री झाली होती.
बस आली. दोघी बसमध्ये चढल्या.
एकाच सीटवर शेजारी बसल्या.
बस थोडी पुढे गेली.
बाईने दोन चाँकलेट काढल्या.
एक स्वतः खाल्ली दुसरी तीला दिली.
कोणतीही शंका न येता तिने खाल्ले.
काही वेळात चक्कर यायला लागली.
ही बाई घाबरली ?
कन्डक्टर गाडी थांबवा. हीला दवाखान्यात न्यायचेय.
गाडी थांबली.
ती बेशुद्ध होती.
बाकीच्या प्रवाशांच्या मदतीने दोघी खाली उतरल्या.
बस निघून गेली.
आणि मागून एक फोरव्हिलर आली.
आतुन तीन तरूण उतरले.
बेशुद्ध मुलीला गाडीत घेतले.
त्या बाईला २० हजार दिले.
गाडी निघून गेली.
या नंतर पुढील चार दिवस अत्याचार होत होते.
आणि मग तीला वेश्यांच्या बाजारात एका टोळीला विकले.
या काळात तिने अनेकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला.
घरी संपर्क करण्यासाठी धडपड केली.
पण व्यर्थ ...
ही मुलगी शांत बसणारी नाही.
आणि वेश्याव्यावसाय करायलाही विरोध करते.
मग काय करावे.
हि जिवंत फायद्याची नाही पण हिच्या किडनीचे आणि डोळे,
रक्त यातुन पैसा मिळवू...
आणि
जिवंतपणीच तीचे डोळे, कीडणी, रक्त आणि इतर अवयव काढून
घेतले. यातच तिचा मृत्यू झाला.
एक निष्पाप जीव गेला...
हि हत्या आणि प्रकार थांबू शकला असता का ?
मुलीला वाचवता आले असते का?
हो.
ति वाचू शकली असती.
जगली असती...
जर तीच्या आईवडीलांनी लगेचच पोलिसांना तक्रार दिली
असती.
तीचा लगेचच शोध सुरू झाला असता तर,
जर त्या अनोळखी व्यक्तीच्या हातून काही खाल्ले नसते तर,
थोडीशी सावधानता बाळगली असती तर आज ती जिवंत असती.
पण दुर्दैव ???????
आजही ती गुन्हेगार बाई, ते अत्याचारी, वेश्याव्यावसायाला
लावणारी टोळी, अवयव काढणारे आणि विकणारे
असे कितीतरी नराधम मोकाट आहेत.
शिक्षा माञ कुणाला ?
आम्ही आपणाला विनंती करतो.
एखादी मुलगी चुकीचे वागली याचा अर्थ सगळ्याच मुली
चुकीच्या असतात हा आपला भ्रम दुर करा.
घरातून मुलगी गायब झाली याचा अर्थ ती पळूनच गेली असे
समजणे चुक आहे.
असे काहीही घडले तरी त्वरित पोलिसांना कळवा.
बाहेरच्या अनोळखी व्यक्तीकडून कोणतीही गोष्ट खाऊ आणि
घेऊ नका.
समाजात विकृत लोक भरपुर आहेत. आपण सावध रहा.
आज हजारो मुली गायब होत आहेत,
अत्याचारासाठी, घरकामासाठी, परदेशात विकण्यासाठी,
आतंकवादासाठी, वेश्याव्यावसायासाठी आणि अवयव
विक्रीसाठी मुलींना पळवले जाते. आणि ठारही मारले जाते.
यामुळे अखंड सावधान रहा.
आपली आणि आपल्यांची काळजी घ्या...

28/12/2015

विद्यार्थ्यांना विसरभोळे कोण बनवतो?

शिक्षण अभ्यासक सचिन यांचा महाराष्ट्र टाइम्स मधील लेख.

शाळेतील बर्‍याच विद्यार्थ्यांना का वाटते की, “आपण अभ्यासात हुशार नाही!“ विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी विचार येतो की, “माझी स्मरणशक्ती चांगली नाही, मला गणित अवघड जाते.“ मी हुशार विद्यार्थी/विद्यार्थींनी नाहीऽ मी मठ्ठ आहे, इत्यादी. असे विचार विद्यार्थ्यांच्या मनात का येतात? याचा शिक्षक म्हणून, पालक म्हणून आपण कधी विचार केला आहे का? या नकारात्मक भावनांचा शिक्षणपध्दतीशी काय संबंध आहे? हे आपण नीट समजवूून घेऊ.

“गोबल्स” नावांचा हिटलरचा सल्लागार होता. त्याची एक पॉलिसी होती. एखादी गोष्ट खोटी असेल तर ती समाजात खरी आहे. असे सातत्याने बिंबवतात. पहिले समाज म्हणते ही गोष्ट खोटी आहे, पण सातत्याने बिंबवून नंतर समाज समजायला लागतो की, ही गोष्ट खरी आहे. आपण पण विद्यार्थ्यांशी वागतांना असेच बोलतो. आपण विद्यार्थ्याला बोलतो तु मूर्ख आहेस का रे? पहिले तो/ती नाही म्हणतो. पण पहिलीत, दुसरीत, तीसरी इयत्तेपासून सातत्याने लेबल लावले जाते. की तु मूर्ख आहे. तुला अक्कल नाही, तुला समजत नाही, मग पाचवी पासून तो /ती स्वत:ला समाजायला लागते की, मी मूर्ख आहे. ती मान्य करते की, मला अक्कल नाही. असेच लक्षात ठेवा पालकांनो, आपण विद्यार्थ्यांना जे समजतो तेच स्वत:ला तसेच समजतात.

तुम्ही जसे आपल्या मुलांबद्दल विचार कराल तसेच ते घडत जातात. तुम्हाला वाटत असेल की, आपला मुलगा/मुलगी विसरभोळी आहे. ते सर्वांसमोर, वर्गासमोर त्याला दहा दा बोलून दाखवले तर तो/ती विसरभोळीच बनणार आहे. तुम्हाला वाटतयं त्याला परिक्षेत आठवणार नाही. तर त्याला खरंच परिक्षेत आठवणार नाही. तुम्हाला वाटतंय तो/ती चुकणार आहे आणि त्याला त्याची सातत्याने जाणिव करुन दिली तर तो/ती चुकणारच आहे. कारण ‘यश हे माणसाच्या इच्छेपासून सुरु होते.’ वैद्यकिय शास्त्राचा जनक हिप्पोक्रिटसने 2400 वर्षापूर्वी म्हणाले, “माणसांच सुख आणि दुख:, माणसाचं यश आणि अपयश मेंदूतुन निर्माण होते.” लहान मुलाचा मेंदू कम्प्युटर सारखा असतो. त्याला जे इनपुट द्याल तेच आऊटपुट मिळते. म्हणून नेहमी विद्यार्थ्यांशी विधायक बोलले पाहिजे तरच विद्यार्थी खर्‍या अर्थाने हुशार बनतील. त्याच्यांत एक आत्मविश्‍वास राहिल.

असंख्य विद्यार्थ्यांचे समुपदेशन केल्यावर एक गोष्ट लक्षात आली की, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्‍न येत असतो. तो म्हणजे, “मी कसा आहे?’‘ याचे उत्तर तो आपल्याला आलेल्या अनुभवातून, त्याला मिळालेल्या यश-अपयशातून आणि सर्वात महत्त्वाचं कुटुंबाने, शाळेने, शिक्षकांनी त्याच्याविषयी प्रकट केलेले मत यातुन या सर्वांच्या आधारे तो स्वत:विषयी तो एक इमेज बनवतो. त्याची इमेज विधायक बनली तर प्रगती होते आणि इमेज नकारात्मक बनली तर प्रगती खुंटते. मग विद्यार्थी बोलतात की, मला गणित अवघड जाते, माझी स्मरणशक्ती चांगली नाही, मी हुशार नाही, मी विसरभोळा आहे. विद्यार्थ्यांची इमेज बनविण्यात पालकांची आणि त्याहुनही जास्त शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे. बरेच शिक्षक एक वैज्ञानिक वास्तवतेपासून दूर असतात. ती वास्तविकता म्हणजे विद्यार्थ्यांकडे त्यांचे शिक्षक कोणत्या दृष्टीने पाहतात. आणि त्यांंच्या विषयी कोणते मत बाळगता त्यावर त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण वर्तवणुक ठरत असते. म्हणून शिक्षकांनी नेहमी विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरीत केले पाहिजे. त्यांना निगेटीव्ह लेबल चिटकवले नाही पाहिजे. लहान मुले सिमेंट प्लास्टर सारखी असतात. आपण जे बोलु ते शब्द मेंदूत कायमचे चिपकले जातात. विद्यार्थ्यांचे नेहमी कौतुक केले पाहिजे. शाळेत, वर्गात, घरात त्याचे/तीचे कौतुक होईल अशा संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. “तुला जमंतच” ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे. त्यासाठी शाळेत-घरात नेहमी उत्साही वातावरण, विधायक बोलणे, प्रयत्नाचे कौतुक व्हायला हवे.

एका गणित प्राध्यापकाने एक प्रयोग केला त्याने 30 विद्यार्थ्यांचे दोन ग्रुप केेले. 15 विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपला एका वर्गात बसविले आणि दुसर्‍या 15 विद्यार्थ्यांच्या ग्रुपला दुसर्‍या वर्गात बसविले. ते प्राध्यापक पहिल्या वर्गात गेले आणि तेथे फळ्यावर एक गणित मांडले. गणिताचा प्रश्‍न लिहून ते म्हणाले हे जगातील सर्वात सोपे गणित आहे. ज्याला गणित जमत नाही त्याला सुध्दा हे गणित सोडवता येईल. हे सांगून ते दुसर्‍या वर्गात गेले. दुसर्‍या ग्रुपला पण तेच गणित फळ्यावर मांडले आणि विद्यार्थ्यांना सांगितले हे जगातील सर्वात अवघड गणित आहे. खुद्द आईनस्टाईनला सुध्दा हे गणित सोडविता आले नव्हते. पाहु कोणाला गणिताच्या एखाद्या दोन पायर्‍या जमता का? थोड्या वेळाने ते प्राध्यापक दोन्ही वर्गात गेले. जिथे सांगितले होते की, हे जगातले सर्वात सोपे गणित आहे तेथील 15 पैकी 13 विद्यार्थ्यांना ते गणित बरोबर सोडविता आले. दुसर्‍या वर्गात जिथे सांगितले होते की, हे जगातील सर्वात अवघड गणित आहे तेथील 15 पैकी 14 विद्यार्थ्यांना ते गणित सोडविता आले नाही. काय झाले असेल या विद्यार्थ्यांना? काय घडले असेल त्यांच्या मनात? एकदा का मनाला हे पटले की एखादी गोष्ट आपल्याला जमु शकत नाही तर त्यांना ती जमत नाही. आपल्या बोलण्यावागण्यातुन विद्यार्थ्यांना समजले की, ही कठीण गोष्ट आहे आणि यात आपण अपयशी होवू तर विद्यार्थी मनाच्या पातळीवर तसाच विचार करतात. त्यांची ठाम समजूत होते की, आपल्याला हे जमू शकत नाही.

मला असे वाटते मुलांमध्ये “मला जमू शकते,“ “आय कॅन डू “ ही भावना खोलवर विद्यार्थ्यांमध्ये रुजवतील तेव्हा आपण गुणवत्तापुर्ण शिक्षणपध्दतीच्या दिशेने वाटचाल करू

28/12/2015

आयकर....
आपल्या जिव्हाळ्याचा विषय. आणि याविषयी अनेक गैरसमजच जास्त आहेत. त्याविषयी सविस्तर अभ्यास करूनच हा विषय मांडला आहे.....

· आयकर वकीलामार्फत निश्चित करूनच भरावा लागतो.
हा आपल्या सर्वांचा सर्वात मोठा गैरसमज आहे. मुळात Income Tax विभागाने अशी कोणतीही सक्ती केलेली नाही. आयकर कसा निश्चित करावा यासाठी दरवर्षी आयकर विभाग परिपत्रक काढत असते. आपण त्याचे जरूर वाचन करावे. आणि या परीपात्रकानुसार आपला आयकर निश्चित करावा.एवढेच काय तर आयकर विभाग Self Assessed Taxसुद्धा मान्य करते. मग आपला आयकर कसा निश्चित करावा.

उदा. समजा एका शिक्षकांचे वार्षिक उत्पन्न ३१०००० आहे.

तर एकूण उत्पन्नाची वर्गवारी खालील प्रमाणे करावी

उत्पन्न

वजावट

महिना

मूळ

ग्रेड

एकूण

महागाई

प्रवास

घरभाडे

फरक

एकूण

व्य.कर

गटविमा

L.I.C.

P.F.

other

एकूण
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टे
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर
जाने
फेब्रुवारी
मार्च
एकूण

वरील रकान्यात आपण दरमहा आकडेवारी भरत जावी. शेवटी एकूण रक्कम लिहावी.

आता जर आपण वरील रकान्यात आपली माहिती भरली तर मग आपणाकडे एकूण वार्षिक उत्पन्न किती हे सांगता येईल. आता वरील शिक्षकाचे एकूण उत्पन्न ३१०००० आहे असे समजूयात. त्याच वेळी आपणाला पगार पत्रकातील आयकर पात्र वजावटी लक्षात घ्याव्या लागतील. आता आयकर पात्र वजावटी मी पुढे सांगणार आहेच. तर या वजावटी ची एकूण रक्कम एकूण वार्षिक उत्त्पानातून वजा करावी. या वजाबाकी चे उत्तर म्हणजे आपले निव्वळ आयकर पात्र उत्पन्न होय.

समजा वरील शिक्षकाच्या वजावटी ४०००० च्या आहेत तर मग

एकूण वार्षिक उत्त्पन्न : ३१००००

वजा

एकूण आयकर पात्र वजावटी : ४००००

निव्वळ आयकर पात्र उत्त्पन्न : २७००००

आता या शिक्षकांस २७०००० या रक्कमेवर प्रचलित नियमानुसार आयकर भरावा लागेल.

सन २०१४-१५ या वर्षायासाठीचे नियम पुढील प्रमाणे

· आयकर मुक्त उत्पन्न मर्यादा

सामान्य नागरिक, महिला . .................................२५००००

जेष्ठ नागरिक .८० वर्षायाहून अधिक वय................५०००००

· आयकर टप्पे

५००००० पर्यंत १०%

५००००१ते १०००००० २०%

१०००००१ ते पुढे ३०%

अर्थात अजूनही पुढे टप्पे आहेत पण मी शिक्षकांना समोर ठेवत हे आकडे सांगतोय.

आता आयकर पात्र वजावटी त्यांची कलमे यांचा आढावा घेवूयात. त्यातून तुम्हाला आयकर नियोजन करणे सोपे जाते.

Section 80C:

हा शिक्षकांच्या सर्वात माहितीचाSection आहे. यात पुढील वजावटी पात्र आहेत.

· Provident Fund (PF)

· Mutual Fund investment

· Government’s Debentures

· Contribution to Govt. Fund

· Postal Saving Scheme

· Pension Plan

· Tuition Fees

· Time bonded fixed deposits in banks

· LIC Policy Premium

80CCF : Long term Infrastructure bonds limit 20000

Section 80D

Health Insurance Premium limit 15000

Section 80DDB

Medical treatments expenditure limit 50000

Section 80DD

Treatment of Handicapped child limit 50000

Section 80 G

Fund donation to NGO



आता वरील काही ठराविक कलमांचा उल्लेख केला आहे. मुलतः आयकर कायद्यात एकूण ११० Section आहेत.मी केवळ ३ Section चा उल्लेख याठिकाणी केला आहे. कारण शिक्षक याच Section मधील तरतुदींचा लाभ घेऊ शकतो. आता याचा मी जरा सविस्तर विचार मांडतो.

आपल्या पगारातील व्यवसाय कर, गटविमा , गटविमा कर, फंड या वजावटी मान्य आहेत.मात्र आपणास अजून एक वजावट मिळू शकते ती म्हणजे

घरभाडे भत्ता.

कशी मिळवावी घरभाडे भत्ता वजावट?

मात्र त्यासाठी पुढील अटी पूर्ण कराव्या लागतात.

१. तुमच्या नावे कुठेही घर नसावे.

ही अट काळजीपूर्वक वाचा. घर तुमच्या आई, वडील, पत्नी,भाऊ कुणाच्याही नावे असू द्या. फक्त तुमच्या नावे नको. काही जण असेही म्हणतील आमचे घर गावाकडे आहे. मी दुसऱ्या जिल्ह्यात नोकरी करतो. तर नीट वाचा घर कुठे पण असो ते तुमच्या नावे नसावे.

मग आता काही जण असे म्हणतील कि घर तर माझ्या नावे आहे पण मी नोकरीच्या ठिकाणी भाड्याच्या घरात राहतो. चालेल. या ठिकाणी तुम्हाला घरभाडे वजावट मिळेल. पण तुमच्या नावे जे घर आहे त्या घराचे घरभाडे तुम्ला तुमच्या उत्पन्नात दाखवावे लागते.

आता काही जण असे म्हणतील कि मी माझ्या गावात किंवा गावाजवळ नोकरी करतो आणि माझे घर माझ्या वडील ,आई पत्नी च्या नावे आहे.तर मग तुम्ही पण घरभाडे सूट मिळवू शकता. तुम्ही तुमच्या वडिलांना , आईला, पत्नीला घरभाडे देता असे पावती द्यावी लागते. घाबरु नका!!!!!! आयकर विभागानेच तसे सांगितलेय कि you can pay rent to your father, mother .sister. brother ,wife as well.

आता वरील अटी पात्र केल्यात तर तुम्ही घरभाडे सूट मिळवण्यास पात्र आहात. पण सरसकट घरभाडे सूट मिळत नाही. त्याचे ३ निकष आहेत. त्या ३ निकषांपैकी सर्वात कमी रक्कम दाखवणारा निकष तुम्हाला तितकी वजावट मिळवून देतो.

उदा.एका शिक्षकास एकूण वार्षिक मूळ उत्पन्न ३००००० इतके मिळते असे समजू आणि त्याला वार्षिक ३२००० इतका घरभाडे भत्ता मिळतो .लक्षात घ्या आयकर विभागानुसार पगार Basic means (Basic +Grade Pay +Dearness Allowance) . मग तुम्ही तुमचे एकूण वार्षिक Basic काढा. यात कोणतेही फरक मिसळू नका. आणि एकूण घरभाडे काढा. आता हा शिक्षक महिना ५५०० घरभाडे देतो असे समजू.

घरभाडे सूट मिळवण्यासाठी तुमच्याकडे खालील आकडे लागतील

१. प्रत्यक्षात दिलेले एकूण घरभाडे

२. सरकारकडून मिळालेले एकूण घरभाडे

३. एकूण Basic Salary

आता आपल्या उदाहरणातील शिक्षकाचे आकडे पाहू.

१. प्रत्यक्षात दिलेले एकूण घरभाडे ....(५५००*१२)= ६६०००

२. सरकारकडून मिळालेले एकूण घरभाडे =३२०००

३. एकूण Basic Salary=३०००००

४. Actual house rent allowance received from your employer

५. Actual house rent paid by you minus 10% of your basic salary

६. 50% of your basic salary if you live in a metro or 40% of your basic salary if you live in a non-metro

This minimum of above is allowed as income tax exemption on house rent allowance.

आता घरभाडे सूट मिळवण्याचे निकष पहा

१. सरकारकडून मिळालेले एकूण घरभाडे

२. प्रत्यक्षात दिलेले एकूण घरभाडे वजा १०% एकूण Basic Salary

३. ४०% एकूण Basic Salary किंवा ५०% एकूण Basic Salary

आता ४०% चा निकष इतर शहरानासाठी असून ५०% निकष ४ महानगरांसाठी आहे

आता आपल्या उदाहरणातील शिक्षकास किती सूट मिळेल ते पाहूयात.

आता घरभाडे सूट मिळवण्याचे निकष पहा

४. सरकारकडून मिळालेले एकूण घरभाडे =३२०००

५. प्रत्यक्षात दिलेले एकूण घरभाडे वजा १०% एकूण Basic Salary(६६०००-३००००)=३६०००

४०% एकूण Basic Salary किंवा ५०% एकूण Basic Salary=१२००००

६.



आता आपल्या कडे पुढील आकडे आहेत

· ३२०००

· ३६०००

· १२००००

आयकर खात्याच्या नियमानुसार वरील ३ आकाड्यांपैकी सर्वात कमी रक्कम सूट म्हणून मिळते. त्यामुळे सदर शिक्षकास ३२००० इतकी रक्कम एकूण वार्षिक उत्पनातून वजा करता येते.

आता आपण जर काही दुर्धर आजारांवर उपचार केले असतील तर त्याचा खर्च देखील सूट म्हणून मिळवता येतो.

तर खालील आजार लक्षात ठेवा

Neurological Diseases where the disability level has been certified to be of 40% and above,—

(a) Dementia ;

(b) Dystonia Musculorum Deformans ;

(c) Motor Neuron Disease ;

(d) Ataxia ;

(e) Chorea ;

(f) Hemiballismus ;

(g) Aphasia ;

(h) Parkinsons Disease ;

(ii) Malignant Cancers ;

(iii) Full Blown Acquired Immuno-Deficiency Syndrome (AIDS) ;

(iv) Chronic Renal failure ;

(v) Hematological disorders :

(i) Hemophilia ;

(ii) Thalassaemia.

वरील नावे मुद्दामच आहे तशीच दिली आहेत.कारण आयकर विभाग इंग्लिश भाषेला प्राध्यान्न देतो. आता जर यापैकी कोणत्याही आजारावर तुमच्या घरातील व्यक्तींनी उपचार घेतले असतील तर जास्तीत जास्त ५०००० पर्यंत सूट मिळेल. अर्थात एकूण उपचार खर्च ५०००० पेक्षा कमी असेल तर मग उपचार खर्च वजा करावा. आता हि सूट कशी मिळवावी तर त्यासाठी Form no 10I भरून घ्यावा. यावर सरकारी दवाखान्यातील डॉक्टर ची सही लागते. सही करणारा डॉक्टर हा त्या आजाराचा तज्ञअसावा. अशी अट आहे.आता हि सूट तुमचे आई, वडील,पत्नी.मुले यांनाच मिळते.भाऊ, बहिणीला पण मिळू शकते पण ते तुमच्यावर अवलंबून असावेत अशी अट आहे.

मागील वर्ष्यापासून रोग प्रतिबंधक चाचण्यासाठी खर्च केलेली रक्कम देखील वजा करता येते. यासाठी section 80D sub section (2) नुसार ५००० पर्यंत सूट मिळेल. तसेच आरोग्य विमा १५००० पर्यंत वजावट मिळते. लक्षात घ्या या सर्व वजावटीsection 80 c व्यतिरिक्त आहेत. आणि section 80 c ची मर्यादा १५०००० आहे. शिक्षकांनीsection 80 c व्यतिरिक्त इतर ही वजावटी लक्षात नियोजन करावे.

Want your school to be the top-listed School/college in Satara?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Satara