Dnyandev Ranjane
Social Worker
04/12/2024
नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श विचारसरणीला अनुसरून भारतीय नौदलाचे कार्य आणि शौर्य निरंतर सुरू आहे. आज राष्ट्रीय नौदल दिन! भारतीय नौदल दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..!
03/11/2024
आईनंतर जगात तुमच्यावर जीव ओवाळून टाकणारी व्यक्ती म्हणजे बहीण. माया, प्रेम, जिव्हाळ्याच्या या नात्याची महती शब्दात व्यक्त करणं अशक्यच. भाऊ-बहिणींसाठी जणू आनंद सोहळा!
भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
02/11/2024
'दीपावली पाडवा' आणि 'बलिप्रतिपदे'च्या हार्दिक शुभेच्छा! या मंगलदिनी घरा-दारातील इडापीडा टळो, प्रत्येकाच्या जीवनात सुख-समृद्धी, शांती, चैतन्य, ऐश्वर्य नांदो, आरोग्य चांगलं राहो तसंच शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस येवो, पशूधनाची भरभराट होवो, हीच सदिच्छा!
31/10/2024
।। नरक चतुर्दशी ।।
उत्साहाचे, चैतन्याचे आणि आनंदाचे प्रतीक असलेला हा दिव्यांचा सण आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी घेऊन येवो!
आपणा सर्वांना दीपावली व नरक चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
29/10/2024
आज धनत्रयोदशी... कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो. तुम्हा सर्वांना या दिवाळीच्या निमित्ताने समृद्धी आणि निरामय आरोग्याचे दान मिळो ही शुभेच्छा. धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
28/10/2024
#वसुबारस
आजपासून दीपावली उत्सव पर्वाची सुरूवात होते.
वसुबारस या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. आपल्या कृषिप्रधान देशात गायीला खूप महत्व आहे आणि कामधेनू रुपी गाईच्या पोटी सर्व देवांचा वास असतो , म्हणून या दिवशी गाईची पूजा करण्याची प्रथा आहे.
आपणांस व आपल्या परिवारास दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा !!!
#वसुबारस #दिवाळी #दिवाळी2024
16/10/2024
सर्व पौर्णिमांमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाणारी शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा आज आहे. यानिमित्ताने आपल्या आयुष्यात चंद्राची शीतलता व वैभव लाभो ही शुभेच्छा. सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
#कोजागिरी
12/10/2024
नवरात्रीचे पावन पर्व संपल्यानंतर आज दसरा....सर्व नकारात्मक विचार व दुःखांच्या सीमा ओलांडून सकारात्मकता व आनंदाच्या शिलांगणाचं सोनं लुटण्याचा हा दिवस. तुम्हा सर्वांना दसरा अर्थात विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
#विजयादशमी
03/10/2024
'स्त्री शक्तीला' प्राधान्य देत 'तिला' विकासाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येण्याचा निर्धार नवरात्रीनिमित्त करूया. महिला सक्षमीकरण व स्त्री सन्मानासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यास कटिबद्ध राहूया. घटस्थापना व शारदीय नवरात्रौत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
02/10/2024
‘जय जवान, जय किसान’ हा प्रेरणादायी नारा देत देशाच्या विकासासाठी आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे
भारताचे माजी पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्रीजी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
02/10/2024
रघुपति राघव राजाराम..
पतित पावन सीताराम..
ईश्वर अल्लाह तेरो नाम सब को सन्मति दे भगवान..
महात्मा गांधी
जयंती निमित्त
विनम्र अभिवादन..!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Address
Satara
415002