Kiran Ravindra Samant
MLA, Rajapur Assembly | Vice President, Maharashtra Cricket Association | Director, Sindhuratn Samruddhi Yojana
Addressing to the Senate of Rebulic of Liberia !
https://www.facebook.com/share/v/1CPhwitJMy/?
भारतीय सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असलेले शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सिएरा लिओनच्या येथे पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याची सविस्तर माहिती दिली. पाकिस्तानपुरस्कृत या दहशतवादाला भारत कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतो आहे, याचा भाग म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबतही सखोल माहिती त्यांनी दिली. यावेळी भारताची दहशतवादाविरोधातील शून्य सहिष्णुतेची स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडत पाकिस्तानचा खरा चेहरा आंतराराष्ट्रीय मंचावरून जगासमोर मांडला.
24/05/2025
युएईच्या यशस्वी दौऱ्यानंतर डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ निघाले काँगोच्या दिशेने...
युएई येथे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आता काँगो प्रजासत्ताक या आफ्रिकन देशाकडे कूच केले आहे. यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी युएई सरकारने केलेल्या आदरातिथ्याबद्दल आणि दहशतवादाला रोखण्याच्या मुद्द्यावर पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. तसेच, भारत सरकारची दहशतवादाविरोधातली बाजू आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याची संधी दिल्याबद्दल या शिष्टमंडळाने भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांचेही आभार मानले. तसेच या दौऱ्यात युएईकडून विशेष सहकार्य केल्याबद्दल युएईच्या सहिष्णुता विभागाचे मंत्री शेख नहायन बिन मुबारक अल नहायन आणि युएईच्या संरक्षण समितीचे अध्यक्ष अरी राशीद अल नुवामी यांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विशेष आभार मानले. हा दौरा अत्यंत सूत्रबद्ध नियोजित करून युएईमधले भारताचे राजदूत श्री. संजय सुधीर, या दौऱ्याचे उपप्रमुख श्री. अमरनाथ, काऊन्सल जनरल श्री. सतिशकुमार सिवान आणि परराष्ट्र विभागाच्या अधिकारी आयुषी सुतारिया यांनी भारतीय शिष्टमंडळाचा दौरा यशस्वी केला आहे. आता हे शिष्टमंडळ आफ्रिकेतील काँगो प्रजासत्ताक देशात पोहोचून दहशतवादाविरोधातली भारताची मोहीम आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरुच ठेवणार आहे. या देशातही सर्व महत्त्वाच्या नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा चेहरा हे शिष्टमंडळ उघड करणार आहे.
अबुधाबी, युएई |
"काश्मीरमधल्या पहलगाम इथे अनेक निरपराध लोकांचा बळी गेल्याचा उल्लेख युएईतील वरिष्ठ नेत्यांनी केला. या हल्ल्याबद्दलची सगळी माहिती त्यांच्यापर्यंत आधीच पोहोचलेली होती. त्याचबरोबर, भारतात गेली अनेक वर्षे असे हल्ले होत आहेत. मुंबईतला हल्ला असो, पठाणकोट, पुलवामा इथल्या सर्वच हल्ल्यांबद्दल त्यांना माहिती होती. त्यामुळे दहशतवाद्यांना आसरा देणारा देश किंवा दहशतवादी संघटना यांना थारा देणार नसल्याचे त्यांनी यावेळी आमच्याशी बोलताना स्पष्ट केले. युएई दहशतवादाविरोधात असून जगातील सर्वच देशांनी आता दहशतवादाविरोधात एक होण्याची वेळ आली आहे."
- डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार, शिवसेना
20/05/2025
📍 राजापूर
१९/५/२०२५
मान्सूनपूर्व पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली. येणाऱ्या काळात राजापूर तालुक्यातील सर्वच विभागातील अधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवावी, निर्णयप्रक्रिया राबविताना सर्वसामान्य जनतेशी सहकार्याची भावना असावी. अशा सूचना उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना केल्या.
यावेळी नगर परिषद भागातील पायाभूत सुविधा तसेच तालुक्यातील आरोग्य विभाग, जलसंधारण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, कृषी विभाग, पर्यटन विभाग, महावितरण इ विभागांचा आढावा घेतला.
या बैठकीला संबंधिक विभागांचे सर्व अधिकारी तसेच शिवसेना पदाधिकारी आणि तालुक्यातील नागरीक उपस्थित होते.
20/05/2025
प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे निधन ही भारतीय विज्ञानविश्वाची मोठी हानी आहे.
साहित्य, संशोधन यांच्या माध्यमातून सामान्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. प्रा. नारळीकर यांचे कार्य येणाऱ्या पिढीला सदैव प्रेरणादायी ठरणार आहे.
#भावपूर्णश्रद्धांजली
20/05/2025
📍 लांजा
१९/५/२०२५
तहसील कार्यालय लांजा येथे आगामी मान्सूनला सामोरे जाताना, तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन संदर्भात बैठक घेऊन प्रशासनातील विविध विभागातील अधिकाऱ्यांना जनतेशी सहकार्य करीत काम करण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीला तालुक्यातील महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन , ग्रामीण विकास प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग, शिक्षण विभाग व कृषी विभागांतील अधिकारी त्याचबरोबर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
14/05/2025
महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या न्यायाधीश भूषण गवई जी यांना आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ दिली, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
14/05/2025
शौर्य, धैर्य, तेज, बुद्धिमत्ता आणि पराक्रमाचा अजिंक्य संगम म्हणजे छत्रपती शंभू राजे.
स्वराज्यधर्म आणि स्वाभिमानासाठी बलिदान देणारे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन!
13/05/2025
इयत्ता दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मनःपूर्वक अभिनंदन!
माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आयुष्याच्या शैक्षणिक वाटेवरील एक महत्वाची परीक्षा उत्तीर्ण झालात, निश्चितच या यशामागे तुमची मेहनत, अभ्यासातील सातत्य, जिद्द आणि चिकाटी या सर्व गोष्टी होत्या.
या यशानंतर जीवनात मोठी झेप घेण्यासाठी तुम्ही तयार राहा. अनेक संधींची दार तुमच्यासमोर उघडी आहेत.
ज्यांना अपयश आले आहे, त्यांनी खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने तयारीला लागा आणि नवीन इतिहास रचण्यासाठी सज्ज व्हा.
एकंदरीत राज्यभरात निकाल पाहता यामध्ये विद्यार्थिनींनी बाजी मारल्याचे दिसून येते, याचा अर्थ आपल्या मुली देखील कुठेच कमी नाहीत, हे सकारात्मक चित्र आहे.
पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना तुमच्या पुढील उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.!
#एसएससीनिकाल२०२५
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Devtale, Pali
Ratnagiri
415803