Uday Ravindra Samant

Uday Ravindra Samant

Share

Cabinet Minister for Industries & Marathi Language, Government of Maharashtra | Deputy Leader, Shiv Sena | MLA Ratnagiri-Sangameshwar Constituency

Photos from Uday Ravindra Samant's post 15/06/2026

रत्नागिरी जिल्ह्यातील 'जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श विद्यामंदिर, पाली नं.१' या शाळेत आज चिमुरड्यांचा 'विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सव सोहळा' अत्यंत उत्साहात पार पडला. याप्रसंगी उपस्थित राहून नव्या दमाने शाळेत पाऊल ठेवणाऱ्या भावी पिढीचे स्वागत करण्याचा आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अनुभवण्याचा सुखद प्रसंग लाभला. यावेळी विद्यार्थी – विद्यार्थिनींना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना, शासकीय शाळांमधील प्रत्येक मूल दर्जेदार शिक्षण घेऊन आपल्या स्वप्नांना गवसणी घालेल, हाच आमचा कायम ध्यास असून, शासकीय शाळांचा विकास आणि विद्यार्थ्यांचे हित हीच आमच्या महायुती सरकारची प्राथमिकता आहे. सर्व लाडक्या बाल मित्र मैत्रिणींना शाळाप्रवेश व नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#शाळाप्रवेशोत्सव #रत्नागिरी #शिक्षण

14/06/2026
Photos from Uday Ravindra Samant's post 14/06/2026

रत्नागिरी शहराचा चेहरामोहरा बदलणाऱ्या आणि नागरिकांचे जीवन सुकर करणाऱ्या विविध विकासकामांची आज प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यामध्ये शहरातील प्रमुख रस्ते, आधुनिक फुटपाथ बांधणी आणि इतर सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला.
​सर्व कामे दर्जेदार आणि विहित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना दिल्या.
😎

14/06/2026

कोम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन २०२६ साठी मनःपूर्वक शुभेच्छा!

दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या जगप्रसिद्ध कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत रत्नागिरीचे सुपुत्र प्रसाद देवस्थळी आणि अभिजित पड्याळ सहभागी होत असल्याचा संपूर्ण जिल्ह्याला अभिमान आहे. ८५.७७ किलोमीटरच्या या अत्यंत खडतर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागणारी जिद्द, चिकाटी, शिस्त आणि कठोर परिश्रम यांचे तुम्ही उत्तम उदाहरण आहात. कोकणाच्या मातीत वाढलेल्या या दोन धावपटूंनी आपल्या मेहनतीच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीचे नाव पोहोचवले आहे, ही आनंदाची बाब आहे.
प्रसाद देवस्थळी यांनी गतवर्षी या स्पर्धेत यशस्वी कामगिरी करून आपली क्षमता सिद्ध केली आहे, तर अभिजित पड्याळ यांचा पहिलाच सहभाग निश्चितच प्रेरणादायी ठरेल.तुमच्या सातत्यपूर्ण सराव, आत्मविश्वास आणि अथक परिश्रमाच्या जोरावर तुम्ही या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी कराल, असा मला पूर्ण विश्वास आहे.
रत्नागिरी जिल्ह्य

14/06/2026

#जागतिक_रक्तदाता_दिवस
आपल्या एका रक्तदानामुळे एखाद्याचे आयुष्य वाचू शकते.
चला, #रक्तदान करूया आणि मानवतेचे ऋण फेडूया!
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त सर्व रक्तदात्यांना मनःपूर्वक सलाम!

13/06/2026

मराठी साहित्यिक, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, पत्रकार आणि प्रभावी वक्ते आचार्य #प्र_के_अत्रे यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली!

Photos from Uday Ravindra Samant's post 12/06/2026

सोलापूर दौऱ्यावर असताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या धामधुमीत आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभर आयोजित केल्या जाणाऱ्या विविध सामाजिक आणि क्रीडा उपक्रमांचा एक भाग असणाऱ्या 'लोकनाथ मीडिया चषक २०२६' क्रिकेट स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याचा आनंद मिळाला. यावेळी स्पर्धा आयोजकांनी केलेल्या अत्यंत जिव्हाळ्याच्या स्वागताचा सहर्ष स्वीकार केला.
केवळ भेटच नाही, तर मैदानावर उतरून बॅट हातात धरत क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंदही लुटला. आज मैदानावर खेळाडूंच्या ऊर्जेने एक वेगळाच उत्साह दिला. सर्व पत्रकार बांधवांना आणि सहभागी खेळाडूंना या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Photos from Uday Ravindra Samant's post 12/06/2026

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, महायुतीचे उमेदवार श्री. राजेंद्र राऊत यांच्या प्रचार रणनीतीसाठी आज सोलापूरमधील महायुतीचे सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी आणि ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली.
यावेळी बोलतांना, महायुती सरकारने केलेली विकासकामे आणि लोककल्याणकारी योजना हीच आपली ताकद आहे. या बळावर आणि कार्यकर्त्यांच्या अथांग ऊर्जेच्या जोरावर सोलापूरमध्ये महायुतीचा ऐतिहासिक विजय निश्चित होईल, असा विश्वास व्यक्त केला.
उपस्थित पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी या निवडणुकीत महायुतीचा झेंडा अभिमानाने फडकावण्यासाठी आणि सोलापूरच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी सर्व घटकांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीला ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री श्री.जयकुमारजी गोरे, खासदार ज्योतीताई वाघमारे, माजी मंत्री श्री.सिध्दराम म्हेत्रे, माजी मंत्री श्री.उत्तम खंदारे, श्री.शहाजीबापू पाटील, संपर्कप्रमुख श्री.चंद्रहार पाटील, नगराध्यक्षा प्रणिताताई भालके, नगरध्यक्षा सिध्दीताई वस्त्रे, श्री.अमोल शिंदे, श्री.मंगेश चिवडे, श्री.अमर पाटील, श्री.चरणराज चवरे, श्री.लक्ष्मीकांत ढोंगे पाटील, श्री.महेश चिवटे, श्री.शहाजी पवार, श्रीमती रोहिणीताई तडवडकर, श्री.शशिकांत नाना चव्हाण, श्री.सचिन चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे प्रमुख लोकप्रतिनिधी, जिल्हा संपर्कप्रमुख, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्यासह महायुतीचे विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

12/06/2026

आपल्या लेखणीने मराठी साहित्यक्षेत्रावर अधिराज्य गाजविणारे साहित्यिक स्व. #पु_ल_देशपांडे यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली!

11/06/2026

राजकारण, साहित्य. समाजकारण क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे संवेदनशील समाजसुधारक #सानेगुरुजी तथा पांडुरंग सदाशिव साने यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली!

Want your public figure to be the top-listed Public Figure in Ratnagiri?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Mumbai
Ratnagiri