Swa-Roopwardhinee
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swa-Roopwardhinee, Nonprofit Organization, Pune.
We are dedicated towards the enrichment of latent qualities of young, intelligent and capable students from the unprivileged and economically weak section of our society.
18/09/2026
निरोपाचा क्षण... पण अभिमानाचा सोहळा! 🙏
‘स्व’-रूपवर्धिनी प्रस्तुत
विकसित भारताचे आम्ही युवा...
|| श्री गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा ||
नवयुग तरुण मंडळ
विकसित व्हावे! अर्पित होऊनी जावे!
या मंत्राने १० दिवस आम्ही जे संस्कार रुजवले, त्याचा गोड शेवट करायला आम्ही येतोय शिवापूर वाड्यात!
२५०+ बाल-तरुणांचा उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि बाप्पाच्या नावाचा जयघोष!
तुम्ही येणार ना बाप्पाला निरोप द्यायला?
📍 शिवापूर वाडा
🗓️ रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६
⏰ सायं. ६.३० ते ९.३० वा.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! 🚩
puneGanpati viksitbharat ganpatibappamorya
18/09/2026
गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्राचा राज्योत्सव’ म्हणून मिळालेल्या मानाच्या पार्श्वभूमीवर, पुण्यात शनिवारवाडा येथे आयोजित तीन दिवसीय राज्य महोत्सवात ‘स्व-रुपवर्धिनी’च्या पथकांनी उत्स्फूर्त व शिस्तबद्ध सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.
बुधवार, १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी पार पडलेल्या या विशेष सोहळ्यात महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवत वर्धिनीच्या ध्वज, टाळ, झांज आणि लेझीम अशा चारही पथकांनी शनिवारवाडा परिसर दुमदुमवून सोडला. सध्याच्या ध्वनीप्रदूषणमुक्त आणि डीजेमुक्त उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, पारंपरिक वाद्ये आणि शिस्तीचा संदेश देणाऱ्या या सादरीकरणाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. दूरदर्शनसह विविध माध्यमांतून या ऐतिहासिक सादरीकरणाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले.
या विशेष योगदानाबद्दल आणि विधायक गणेशोत्सवाची परंपरा जपल्याबद्दल आयोजकांच्या वतीने ‘स्व-रुपवर्धिनी’चा गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्री. संजयजी तांबट तसेच गणेशोत्सव प्रमुख श्री. शुभम बिबवे यांनी हा सन्मान स्वीकारला.
पारंपरिक संस्कृती, शिस्त आणि युवा ऊर्जेचा अनोखा संगम या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला. ‘स्व-रुपवर्धिनी’च्या या यशाबद्दल सर्व स्तरातून युवक-युवतींचे व कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
18/09/2026
॥ श्री गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा ॥
आयोजित - हिंदवी सोशल वेल्फेअर ट्रस्ट
विकसित भारताचे आम्ही युवा... या मंत्राने १० दिवस जे संस्कार पेले, त्याची गर्जना आता सांगवीच्या रस्त्यावर घुमणार!
ढोल-ताशांच्या गजरात, बाप्पाला निरोप द्यायला तुम्ही येताय ना?
📍 सांगवी, पुणे
🗓️ रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६
⏰ दु. ३.०० ते ६.३० वा.
चला, बाप्पाच्या निरोपाचे साक्षीदार होऊया!
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!
VisarjanMiravnuk GanpatiBappaMorya
18/09/2026
विकसित भारताचे आम्ही युवा... 🇮🇳
गणपती फक्त उत्सव नाही, तर संस्कार आहे!
या वर्षीचा ‘स्व’-रूपवर्धिनीचा गणेशोत्सव २०२६ काही वेगळाच असणार आहे.
पथनाट्य संकल्पना - “नागरी शिष्टाचार - विकसित समाजाची पहिली पायरी”
सिग्नल तोडण्यापासून ते कचरा टाकण्यापर्यंत...
आपण रोज ज्या चुका करतो, त्याच बदलल्या तरच भारत विकसित होणार!
दि. १५ ते २३ सप्टेंबर - पुण्याच्या रस्त्यारस्त्यावर आमचे २५०+ बाल-बालिका १० गटांमधून हाच विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत.
गणपती बाप्पा आला की बदल घडतोच... यावेळी आपण घडवूया!
तुम्ही कुठे भेटताय आम्हाला?
सजग युवा... विकसित भारत... 🚩
pune ganpatibappamorya viksitwhaveArpitHouniJave
13/09/2026
🚩 संध्याकाळ हिंगण्याची… नाद गणरायाच्या स्वागताचा!
🔱 गणेशोत्सव २०२६ | दिवस पहिला
📍 शिवशंकर मित्र मंडळ, हिंगणे (सिंहगड रोड)
🚩 ब्रह्मानंद शाखेचा ध्वज
🥁 श्रद्धानंद शाखेची झांज
⏰ संध्याकाळी ७:०० ते ९:००
भगवा ध्वज डौलाने फडकेल,
झांजांचा नाद दुमदुमेल,
आणि गणरायाचं स्वागत होईल अगदी आपल्या शैलीत! 🔥🥁
हिंगणे सज्ज आहे… आता फक्त बाप्पाची वाट! ❤️🚩
13/09/2026
🥁🔥 झांजांचा कडकडाट आणि लेझीमचा ठेका… बिबवेवाडी सज्ज आहे!
🔱 गणेशोत्सव २०२६ | दिवस पहिला
📍 गणेश मित्र मंडळ, बिबवेवाडी
🥁 सी. डी. अभ्यासिका शाखेची झांज
🎶 दयानंद शाखेची लेझीम
⏰ सायंकाळी ६:०० ते ९:००
गणरायाच्या आगमनाचा उत्साह
तालात, ठेक्यात आणि जल्लोषात अनुभवायला मिळणार! 🚩❤️🔥
बिबवेवाडी… तयार राहा! बाप्पाचा जल्लोष होणार!
13/09/2026
🔥 तालात भक्ती… पावलांत जोश… आणि मनात बाप्पा!
🔱 गणेशोत्सव २०२६ | दिवस पहिला
📍 राजबाग मित्र मंडळ, गणेश नगर (कोथरूड)
🚩 युवती शाखेचा ध्वज
🥁 अभेदानंद शाखेचे टाळ पथक
⏰ सायंकाळी ५:०० ते ७:३०
गणरायाच्या स्वागतासाठी
युवतींच्या ध्वजाची शान आणि टाळांचा गजर…
गणेश नगरचा माहोल तयार! 🚩🥁
यंदाचा उत्सव… संस्कारांचा, तालाचा आणि एकजुटीचा!
13/09/2026
🥁 सोमवार पेठेत आज तालही असेल… आणि उत्साहही!
🔱 गणेशोत्सव २०२६ | दिवस पहिला
📍 गणेश मित्र मंडळ, सोमवार पेठ
🚩 उत्थान शाखेचा ध्वज
🥁 भगिनी निवेदिता शाखेची झांज
⏰ दुपारी १२:०० ते २:३०
गणरायाच्या स्वागतासाठी
ध्वजाची शान आणि झांजांचा नाद एकत्र येणार! ❤️🔥🚩
बाप्पा येतोय… मग जल्लोष तर होणारच!
13/09/2026
🚩 गणरायाच्या आगमनाची पहिली हाक… अप्परमध्ये!
🔱 गणेशोत्सव २०२६ | दिवस पहिला
यंदा नवएकता मित्र मंडळ, अप्पर येथे
🚩 ब्रह्मानंद शाखेचा ध्वज
🥁 सी. डी. अभ्यासिकेची झांज
यांच्या साथीने गणरायाचं स्वागत रंगणार आहे!
⏰ सकाळी ११:०० ते दुपारी १:००
सुरुवात अशी… की पुढचे दिवस आपोआप गाजणार! 🔥🚩
27/05/2026
❇️ ‘स्व’ - रूपवर्धिनी ❇️
🇮🇳 युवा विभाग 🇮🇳
प्रिय निर्माण / नेतृत्व शाखा युवक,
(इयत्ता ११ वी ते वय वर्ष २५ पर्यंत)
━━━━━━━━━━━━━━━
*💥 युवक शिबिर २०२६-२७ 💥*
━━━━━━━━━━━━━━━
*🇮🇳 शिबिर विषय:*
✨ सजग व्यक्ती, सुजाण नागरिक ✨
स्वतःला घडवत समाजाला जोडणारा,
कर्तव्य, संस्कार आणि नेतृत्व जपणारा…
स्वतःच्या विकासातून समाजाचा विचार करणारा,
हाच खरा सजग व्यक्ती आणि सुजाण नागरिक !
🌱 ‘स्व’ घडले तर व्यक्तिमत्व उजळते,
🤝 संघटन घडले तर नेतृत्व फुलते,
🌍 सामाजिक भान जागले तर समाज बदलतो !
📚 स्व-विकासातून व्यक्तिमत्व,
🏅 संघटनातून नेतृत्व,
❤️ सामाजिक जाणिवेतून राष्ट्रनिर्मिती !
“मी बदललो तर समाज बदलेल,
समाज बदलला तर राष्ट्र घडेल !”
🌿 सजग व्यक्ती म्हणजे केवळ स्वतःपुरती मर्यादा नसते, तर समाज, पर्यावरण, संविधान आणि राष्ट्र यांच्याशी जोडलेली जबाबदारी असते !
“व्यक्तिमत्व विकासातून नेतृत्व, नेतृत्वातून संघटन, आणि संघटनातून सक्षम समाजनिर्मिती !”
“स्वतःसाठी घडणे,
संघटनेसाठी उभे राहणे,
आणि समाजासाठी झटणे —
यातूनच निर्माण होतो आदर्श भारत !”
━━━━━━━━━━━━━━━
📞 संपर्क:
🤳 सौरभ मोरे – 9325387613
(शिबिर प्रमुख)
🤳🏻 शुभम कामठे – 7820809016
(व्यवस्था प्रमुख)
━━━━━━━━━━━━━━━
🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳
Click here to claim your Sponsored Listing.