Rahul Kalate
जनसेवक | नगरसेवक, पिंपरी-चिंचवड मनपा
16/05/2026
भारतीय जनता पक्षाच्यावतीने पिंपरी चिंचवड शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत मान्यवरांकडून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.
जिल्हा प्रभारी श्री भरतजी पाटील, रा. स्व. संघाचे श्री नरेंद्रजी पेंडसे, विधान परिषद आमदार श्रीमती उमाताई खापरे, आमदार श्री अमित गोरखे, आमदार श्री शंकरशेठ जगताप, माजी आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप, शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न काटे, महिला शहराध्यक्ष श्रीमती सुजाताई पलांडे, सरचिटणीस श्री मोरेश्वर शेंडगे, सरचिटणीस श्री मधुकर बच्चे यांच्यासह इतर सहकारी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
📍 लोणावळा
Ravindra Chavan
Rajesh Pande
BJP Maharashtra
Shatrughna Kate
[Pandit Deendayal Upadhyay, प्रशिक्षण महाभियान, Lonavala, BJP, Maharashtra, Maha Abhiyan, PCMC,
Rahul Kalate]
16/05/2026
📍जनसंवाद...
आज जनसंपर्क कार्यालयात परिसरातील नागरिकांची भेट घेऊन सर्वांशी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. यावेळी नागरिकांनी त्यांच्या दैनंदिन समस्या आणि प्रभागातील अडीअडचणी मांडल्या.
नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नावर प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही केली जाईल आणि हे प्रश्न मार्गी लावले जातील, याची ग्वाही दिली.
Ravindra Chavan BJP Maharashtra
[Public Meeting, Wakad, Punawale, Tathawade, PCMC, Pimpri Chinchwad, BJP, Rahul Kalate]
16/05/2026
पैठणी परंपरेला नवे बळ; ताथवड्यात भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन ✨
ताथवडे येथे सोनाली पैठणी हॅण्डलूम सिल्क साडी परिवार व किरण सोमासे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय भव्य पैठणी साडी प्रदर्शन व विक्री दालनाच्या उद्घाटन सोहळ्यास उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित राहून, आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख असलेल्या पैठणी परंपरेला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. “लोकल फॉर व्होकल” या संकल्पनेला बळ देत स्थानिक विणकर, हातमाग उद्योग आणि पारंपरिक कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक, महिला वर्ग, उद्योजक आणि कला प्रेमी उपस्थित होते.
Sunetra Ajit Pawar BJP Maharashtra
[Rahul Kalate, Paithani, Handloom, Vocal For Local, Maharashtra Culture, Women Empowerment, Traditional Art, Tathawade, Maharashtra Heritage]
15/05/2026
पिंपरी-चिंचवडचे सुपुत्र कु. कबीर राहुल कांबळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत संपूर्ण देशात १२५ वा क्रमांक पटकावत दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत अभिनंदन केले.💐
हे यश पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानास्पद असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या असंख्य तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी यावेळी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
[UPSC, SuccessStory, Pimpri Chinchwad, Kabir Kamble, Civil Services, Rahul Kalate]
l पिंपरी चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभा
🗓️ १५ मे २०२६
पिंपरी चिंचवड - Pimpri Chinchwad City
[Pimpri Chinchwad, PCMC, Rahul Kalate]
15/05/2026
#भावपूर्ण_श्रद्धांजली
मानसिक आरोग्य क्षेत्रातील ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, लेखक आणि समाजसेवक डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे.
अत्यंत संवेदनशील, अभ्यासू, मृदूभाषी आणि माणुसकी जपणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकांसाठी प्रेरणास्थान होते.
त्यांच्या कार्याचा ठसा समाजमनावर कायम राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गती प्रदान करो.
ॐ शांती!💐
l पिंपरी चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभा
🗓️ १५ मे २०२६
पिंपरी चिंचवड - Pimpri Chinchwad City
[Pimpri Chinchwad, PCMC, Rahul Kalate]
15/05/2026
पं. दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यशाळा संपन्न..!
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज लोणावळा येथे 'पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६'अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधींसाठी कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी वरिष्ठांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले.
मा. प्रदेशाध्यक्षांनी यावेळी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मा. नितीनजी नबीन यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अधिक जागरूक आणि सक्षम बनविण्यासाठी या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
हे अभियान भविष्यातील नवे नेतृत्व आणि सुजाण नागरिक घडविण्याची एक चळवळ असून, राज्य सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ, आमदार श्री. महेशदादा लांडगे, आमदार श्रीमती उमाताई खापरे, आमदार श्री शंकरशेठ जगताप, माजी आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप, जिल्हा प्रभारी श्री भरतजी पाटील, मा. रविंद्रजी अनासपुरे, माजी खासदार श्री अमरजी साबळे, भाजपा शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न काटे, सरचिटणीस श्री मोरेश्वर शेडगे आदींसह सर्व प्रमुख पदाधिकारी, सहकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
📍 लोणावळा
Ravindra Chavan Chitra Wagh
Rajesh Pande
BJP Maharashtra
[Pt Dindayal Upadhyay Abhiyan, BJP, Pimpri Chinchwad, PCMC, Rahul Kalate]
15/05/2026
भारतीय लष्कराचे पहिले सरसेनापती, फिल्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
[KMCarriappa, Indian Army, Rahul Kalate]
15/05/2026
व्यक्तीच्या आयुष्यात कुटुंबाचे स्थान हे सर्वात वरचे असते. कुटुंब ज्यावेळी सोबत उभे राहते, त्यामुळे जीवनातील कोणत्याही संकटाला तोंड देण्याची शक्ती मिळते. त्यामुळे जागतिक कुटुंब दिनानिमित्त आपल्या घरातील सदस्यांप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करून आपले नाते अधिक दृढ करूया!
सर्व नागरिकांना जागतिक कुटुंब दिनाच्या शुभेच्छा!
[International Day of Families, Rahul Kalate]
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Website
Address
2, Wakad Chowk Road, Wakad
Pune
411057