The Unique Foundation
Social intervention through education The Unique Foundation has been established under the aegis of The Unique Academy, Pune.
The Unique Academy is renowned for imparting quality coaching for UPSC/MPSC exams since last ten years. The Academy is driven by the broader goal of ushering in a fundamental change in the face and substance of the civil services in India. In order to broaden its horizons and strive towards the aim of positive social intervention to bring about social transformation, the Unique Academy is launchin
14/04/2026
📘डॉ. बाबासाहेब आंबेडकर :
जातिनिर्मूलन, धम्म आणि लोकशाही
-----------
✍️ संपादक :
डॉ. अशोक चौसाळकर
-----------
✍️अस्पृश्यता निवारण्याच्या बाबतीत अस्पृश्य श्रमजीवी जनतेचे हितसंबंध स्पृश्य श्रमजीवी जनतेच्या हितसंबंधातून वेगळे किंवा परस्परविरुद्ध असल्यामुळे अस्पृश्यवर्गाला आपला लढा लढविणे क्रमप्राप्त होते. याची कबुली देऊन आर्थिक लढ्यात मात्र स्पृश्य आणि अस्पृश्य शेतकरी-कामकरी वर्गाचे हितसंबंध एकजीव आहेत. अर्थात, श्रमजीविकांना आपला लढा यशस्वी रितीने लढावयाचा असेल, तर जात-पात, धर्म, देश, वगैरे भेद मनात न आणता मजूर तेवढे सारे एक ही वर्गभावना मनात ठसवून घेऊन त्यांनी आपली अभेद्य संघटना केली पाहिजे.
- डॉ. रावसाहेब कसबे
✍️डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, लोकशाही ही एक अशी जीवनपद्धती आहे ज्यामध्ये लोक सामूहिकरीत्या जीवन जगतात. त्या जीवनाची अनुभूती प्राप्त करतात. सर्व मानवमात्रांना मानव म्हणून एक प्रकारची प्रतिष्ठा प्रदान करण्याची ही पद्धत आहे. त्यातूनच विकसित व प्रगल्भ असा नागरी समाज विकसित होतो. स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तीन तत्त्वे त्या समाजाचा पाया आहेत.
- डॉ.अशोक चौसाळकर
✍️स्वातंत्र्य व समतेच्या प्रस्थापनेत बाबासाहेबांचे राजकारण सामावलेले असते. आता व्यक्तीच्या क्षमतेच्या विकासासाठी अनुकूल परिस्थितीत समता असेल, तर व्यक्तीच्या विकासासाठी प्रतिकूल परिस्थिती मग विषमता ठरते. म्हणजेच ज्यात स्वातंत्र्य व समता नसते, ती विषमता असते. याच निकषाने बाबासाहेब हिंदू समाजरचनेत स्वातंत्र्य व समता नाही, म्हणजेच हिंदू समाज विषमतेवर रचित झालेला आहे, अशी मांडणी करतात.
- सुधाकर गायकवाड
✍️जातिबाह्य विवाहांऐवजी (Exogamy) आंतरजातीय विवाह (Endogamy) केले, तर जात व जातिप्रथा नामशेष होईल ही गोष्ट उघड आहे; पण याला लोकांचा विरोध आहे. कारण, त्यामागे त्यांचे हितसंबंध, अज्ञान आणि अंधविश्वास दडून बसलेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हाच विषय Annihilation of Caste (1936) - या पुस्तकात चर्चिला आहे. वास्तविक हा जातिअंताचा जाहीरनामाच आहे, असे माझे मत आहे.
- डॉ. जनार्दन वाघमारे
-----------
एकूण पाने - 328
किंमत - रु. 360/-
30% सवलतीत उपलब्ध
(पोस्टेज् चार्जेस वेगळा लागेल)
-----------
पुस्तक मागविण्यासाठी संपर्क :
अक्षरनंदन शाळेजवळ, प्राईड पोर्टल बिल्डींग, शिवाजी हौसिंग सोसायटी, सेनापती बापट रोड, जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलमागे, बहिरटवाडी, शिवाजीनगर पुणे - 411005
📞8484086887, 9922608687
03/04/2026
'लातूरच्या जिल्हाधिकारी यांनी लिहिलेले 'फायलींच्या पलीकडे...' पुस्तक हे ललित आणि प्रशासकीय स्वरूपाचे आहे. हे पुस्तक म्हणजे एक प्रशासकाची लातूर डायरी आहे,' असे मत ज्येष्ठ साहित्यिक कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लिहिलेल्या 'फायलींच्या पलीकडे...' या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी सायंकाळी प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी इतिहासाचे अभ्यासक डॉ. सोमनाथ रोडे होते. यावेळी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, प्रा. गणेश घुगे, द युनिक संस्थेच्या अश्विनी घोटाळे-बोरगांवकर व्यासपीठावर उपस्थित होते.
#फायलींच्या_पलीकडे... या पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करताना लेखिका जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे म्हणाल्या, 'माझा शासकीय प्रवास हा मानवी प्रवास असतो. कागदाच्या मागचा मानवी चेहरा नेहमी जपला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे.'
----
फाउंडेशनच्या इतर प्रकाशनांप्रमाणेच या पुस्तकाचेदेखील आपण चिकित्सकपणे स्वागत कराल, ही खात्री आहे.
07/03/2026
द युनिक ॲकॅडमीने गेल्या २० वर्षापासूनची यशाची परंपरा या वर्षीही कायम राखली आहे. केंद्रिय सेवेत मराठी टक्का वाढविण्यासाठी ही संस्था व्यापक प्रयोग व प्रयत्न करत असते. केवळ परीक्षेत यश मिळविण्यापुरते मार्गदर्शन व ठरवून दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व व्यापक विचार - दृष्टिकोन तयार करण्याचे आणि एक कर्तव्यनिष्ठ, संवेदनशील, तळपातळीपर्यत, दुर्बल-वंचित घटकांपर्यत धोरण अंमलबजावणी करणारा अधिकारी निर्माण करण्याचे काम संस्था करते.
Congratulations to all the successful students, their parents, mentors, directors Tukaram Jadhav and Malhar Patil, all the faculty and all the staff.
17/02/2026
द युनिक फाउंडेशन प्रकाशित
आणि अभ्यासकांनी संदर्भ ग्रंथ
म्हणून नावाजलेला ग्रंथ...!
-----
📘 महाराष्ट्र वार्षिकी : 2026
✍️ संपादक -
तुकाराम जाधव, विवेक घोटाळे, मुक्ता कुलकर्णी
-----
✍️ 2008-2009 सालापासून ‘महाराष्ट्र वार्षिकी' हा संदर्भ ग्रंथ आकारास येत आहे. ‘टीम युनिक‘ आणि ‘युनिक ॲकॅडमी-युनिक फाउंडेशन'शी संबंधित हितचिंतक, लेखक, अभ्यासक, प्राध्यापक, पत्रकार, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून महाराष्ट्र वार्षिकीचा सतरावा अंक आम्ही प्रकाशित करीत आहोत. प्रस्तुत ग्रंथात 2025 या वर्षातील घटना-घडामोडी-समस्यांची कारणपरंपरा आणि उपाय सुचविणाऱ्या आशयसंपन्न सविस्तर आणि विश्लेषणात्मक मांडणी करणाऱ्या लेखांचा समावेश केला आहे. प्रस्तुत ग्रंथात एकूण 15 विभागांत 81 लेखांचा आणि 57 सविस्तर नोंदींचा समावेश करण्यात आला आहे.
✍️ प्रस्तुत महाराष्ट्र वार्षिकीचा नव्या स्वरूपातील अंक विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांच्या विविध टप्प्यांसाठी, विशेषतः एमपीएससीच्या नवीन पॅटर्न व अभ्यासक्रमानुसार तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, वेगवेगळ्या परीक्षेच्या मुलाखतीसाठी आवश्यक चिकित्सक व व्यापक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी उपयुक्त ठरेल. याशिवाय प्राध्यापक, संशोधक, पत्रकार, राजकीय पक्ष व सामाजिक चळवळी यांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनाही उपयुक्त ठरत आला आहे. याही वर्षाच्या ‘महाराष्ट्र वार्षिकी' या संदर्भ ग्रंथाचे आपण चिकित्सक स्वागत कराल, ही अपेक्षा आहे.
-----
📘 एकूण पाने - 458
💰 एकूण किंमत - रु. 450/-
-----
📦 30 % सवलतीत उपलब्ध
(पोस्टेज चार्ज वेगळा)
-----
अधिक माहितीसाठी संपर्क
📞 8484086887
📞 9922608687
www.theuniquefoundation.co.in
13/02/2026
लवकरच प्रकाशित करत आहोत...
📘
द युनिक फाउंडेशन प्रकाशित
आणि अभ्यासकांनी संदर्भ ग्रंथ
म्हणून नावाजलेला ग्रंथ...!
-----
📘महाराष्ट्र वार्षिकी : 2026
✍️संपादक -
तुकाराम जाधव, विवेक घोटाळे, मुक्ता कुलकर्णी
-----
महाराष्ट्र वार्षिकी : 2026 हा अभ्यासकांनी 'संदर्भ ग्रंथ' म्हणून नावाजलेला ग्रंथ (मराठी इयर बुक) वाचकांच्या हाती 18 फेब्रुवारीपर्यंत देत आहोत. प्रस्तुत ग्रंथात एकूण 15 विभागात 81 विशेष लेख व 57 नोंदी समाविष्ट आहेत.
-----
एकूण पाने - 458
एकूण किंमत - रु. 450/-
-----
अधिक माहितीसाठी संपर्क
📞8484086887
📞9922608687
www.theuniquefoundation.co.in
07/02/2026
https://youtu.be/_RfHq-ftW8c?si=k2moC0qmG14e4jJx
The Myth of Being "Apolitical" | Why Politics is Everywhere | Mukta Kulkarni | Let's Simplify "Man is by nature a political animal." – Aristotle.We often hear people say, "I hate politics" or "I am apolitical." But is it really possible to step outsid...
03/02/2026
द युनिक फाउंडेशन प्रकाशित आणि संजीव चांदोरकर लिखित
कार्यकर्त्यांसाठी टिपणवही
भाग 1 व भाग 2
--------
'कार्यकर्त्यांची टिपणवही' हे प्रा. संजीव चांदोरकर यांचे पुस्तक दोन भागांत प्रकाशित करण्यात आले. चळवळीच्या पडझडीच्या कालखंडात समकालीन समाजातील सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक प्रश्नांची गुंतागुंत समजणे चळवळ सुदृढ होण्यासाठी आवश्यक आहे, ही भूमिका समोर ठेवून व व्यवस्था परिवर्तनात पूर्णवेळ वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांचे जीवन-अनुभव समजून घेण्यासाठी हे दोन भाग उपयुक्त ठरतील असे आम्हास वाटते.
-------
मूळ एकत्रित किंमत - रु. 240/-
घरपोच किंमत - रु. 250/-
-------
पुस्तक मागविण्यासाठी संपर्क :
8484086887
9922608687
17/01/2026
नमस्कार वाचकांनो आम्ही आजपासुन पुढील चार दिवस छत्रपती संभाजीनगर येथे आहोत
कृषिरंग प्रकाशनाचे आमचे मित्र सचिन चोभे यांच्यासोबत आहोत. आमच्या दालनास आपण जरूर भेट द्यावी
भेटू....
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Telephone
Website
Address
C/O The Unique Academy, Sancheti Hospital Chowk, Behind Mitcon, Shivajinagar
Pune
411005