Pune Live

Pune Live

Share

30/05/2026

तिर्थक्षेत्र नारायणपूर दत्त मंदिर परीसरात दर गुरुवारी वाहतुक कोंडी...
रस्त्यावर नो पार्किंग करून ठोस उपाययोजना करण्याची मागणी.

27/05/2026

🔥 गावाकडचा रुबाब… ढोलकीचा जबरदस्त ताल… आणि दादागिरीचा भन्नाट स्वॅग! 🔥

🎵 “दादाचा नादच करायचा नाय”
🎵 “समद्या तालुक्यात लै भारी”

हे नवीन मराठी लोकगीत आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सज्ज! 💥

ताशा, ढोलकी, हलगी आणि दमदार शब्दांनी भरलेलं हे गाणं एकदा ऐकलंत तर पुन्हा पुन्हा ऐकाल! 😍🔥

👉 Reels बनवा
👉 Status ठेवा
👉 मित्रांना शेअर करा
👉 आणि कमेंटमध्ये सांगा — “दादाचा नादच करायचा नाय!” 😎🔥

🎧 New Marathi Lokgeet 2026
🎶 DJ Dholki Song
📢 MUKTRANG MUSIC

#समद्यातालुक्यातलैभारी #दादाचानादचकरायचानाय

26/05/2026
04/05/2026

मुंबई-पुणे जोड द्रूतगतीमार्गाला हुतात्मा वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव द्या...!
जनतेची मागणी.

Photos from Pune Live's post 24/04/2026

पुणे : अवैध धंदेवाल्यांकडून 'वसुली'; सहकारनगर पोलिस ठाण्यातील दोन कर्मचारी निलंबित; 'व्हिडिओ' व्हायरल झाल्यानंतर कारवाई

Photos from Pune Live's post 22/04/2026

"गुळहळ्ळी गावची लेक बनली गावची पहिली महिला MBBS डॉक्टर".

दि २२ मुंबई (प्रतिनिधी-अंबादास गोरे)

सामान्य कुटुंबातील मुलीने जर मनात आणले, तर ती आभाळालाही गवसणी घालू शकते, हे धनश्री रंजना जगन्नाथ चेंडके हिने सिद्ध केले आहे. जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या या कन्येने आज वैद्यकीय क्षेत्रातील MBBS पदवी मिळवून इतिहास घडवला आहे.

मुंबई सारख्या शहरात घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून देखील आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द धनश्रीला स्वस्थ बसु दिली नाही.

दि २१ रोजी लोकमान्य टिळक मुन्सिपल मेडीकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल सायन मुंबई यांच्या वतीने स्मृतीचिन्ह डिगरी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील गावाकडची अत्यंत गरिबीची परिस्थिती यातून आम्हाला शिकता आले नाही तू तरी खुप मोठी हो हे तिच्या आईचे वाक्य तिला स्वस्थ बसू देत नव्हते आज ती आईची इच्छा पूर्ण होत असल्याचे दिसून आले.

धनश्रीच्या या यशाने संपूर्ण राज्यात तिचे कौतुक होत आहे. एका गरीब आई वडिलांनी पाहिलेले 'डॉक्टर लेकीचे' स्वप्न आज सत्यात उतरले असून, संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.

30/03/2026

पुणे शहरांसह हवेली परीसरात अवकाळी पावसाने झोडपले.

27/03/2026

श्रद्धेचा बाजार, वासनेचा खेळ आणि नेत्यांची लाचारी - भोंदू बाबा अशोक खरातचे काळे सत्य!

25/03/2026

रजनीकांत यांची ‘धुरंधर 2’ला दाद; आदित्य धर भावूक

मुंबई : सुपरस्टार यांनी दिग्दर्शक यांच्या ‘धुरंधर 2’ चित्रपटाचे कौतुक करत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्याने चित्रपटसृष्टीत चर्चेला उधाण आले आहे.

रजनीकांत यांनी आपल्या पोस्टमध्ये ‘धुरंधर 2’ हा “प्रत्येक भारतीयाने पाहायलाच हवा असा चित्रपट” असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करत आदित्य धर यांना “बॉक्स ऑफिसचा बाप” असे संबोधले.

रजनीकांत यांच्या या कौतुकावर आदित्य धर यांनी भावूक प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, “आम्ही सगळे एंटरटेनमेंटचा मापदंड म्हणून फक्त रजनीकांत यांनाच पाहत मोठे झालो. त्यांनी ‘धुरंधर 2’ला ‘मस्ट वॉच’ म्हटल्याने हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे.”

धर यांनी पुढे सांगितले की, रजनीकांत यांच्याकडून मिळालेली ही प्रशंसा म्हणजे आशीर्वादासारखी असून ती शब्दांत व्यक्त करता येणार नाही.

दरम्यान, ‘धुरंधर 2’ चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये आधीच उत्सुकता असून, रजनीकांत यांच्या या प्रतिक्रियेमुळे चित्रपटाकडे अधिक लक्ष वेधले गेले आहे.

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Darsh Niwas, Near Janseva Bank
Pune