Finnapp

Finnapp

Share

FINNAPP as the name goes is a forum for Innovation & Application.

15/01/2026

खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद Dr. Pramod Sawant ji..

गतिमान आणि धडाडीचे निर्णय घेणारे आपले गोवा राज्याचे प्रशासन सतर्क आणि कार्यक्षम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. .

भारतीय लोकशाहीचे पावित्र्य राखण्यासाठी मतदार यादी अचूक असली पाहिजे.. आणि ती अचूकता साधण्यासाठी मृत व्यक्तीचे नाव मतदार यादी मधून काढण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आपण गोवा राज्यात कायदा बनविला.
या संदर्भात Finnapp च्या सूचनांचा आपण विचार केला आणि विद्युत वेगाने आवश्यक ती पाउले उचलली.. खूप खूप अभिनंदन..

मृत व्यक्तीचे नाव मतदार यादी मधून काढण्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी फॉर्म नंबर 7 भरून दिल्याशिवाय निवडणूक आयोग त्याचे नाव मतदार यादी मधून काढू शकत नाही. नागरिक आग्रहाने मृत नातेवाईकाचा मृत्यूचा दाखला घेतात पण त्याचे नाव मतदार यादी मधून अथवा अन्य शासकीय लाभार्थी यादी मधून काढत नाहीत..

म्हणुन Finnapp ने 15 डिसेंबर 2025 रोजी मा मुख्यमंत्री महोदयांची भेट घेवून सूचना केली होती की मृत्यू दाखला देताना.. फॉर्म नंबर 7 भरून घेण्याचे आणि तो निवडणूक आयोगा कडे पाठवणे नागरिकांना आणि शासकीय यंत्रणेस बंधनकारक करावे..

या सूचनेची मुख्यमंत्री साहेबांनी त्वरित दखल घेतली आणि आवश्यक ते निर्णय घेतले.
सदर सूचना गोवा विधान सभेत आज कायदेशीर विधेयक स्वरुपात आणून मान्य करून घेण्यात आली आहे.

यामुळे मतदार यादी तर वेळोवेळी दुरुस्त होणार आहेच.. लोकशाहीचे पावित्र्य राखले जाणार आहे आणि गोवा सरकारच्या विविध कल्याणकारी योजनां वर खर्च होणार्‍या रकमेपैकी कोट्यावधी रुपये दरवर्षी वाचणार आहेत...

Chandan Patil Nitin Narayan Patil Chinmay Uday Kavi

Photos from Finnapp's post 15/12/2025

Team Finnapp met Goa CM Shri Pramod ji Sawant today in Goa.

Finnapp is in talks with Goa Government for some important Governance related Reforms.

Its a great pleasure to see Governments responding positively and enthusiastically to Finnapp approach of finding innovative solutions for social problems.

Team also Met Director of Planning and Statistics Goa Government and chief Election officer of Goa and held positive meaningful discussions.

24/11/2025

SIR ची भीती.. SIR चा परिणाम..

भारतीय लोकशाही वरील विश्वास कायम राहण्यासाठी अशी कार्यवाही अधिक n madhun अपेक्षित आहे आणि समर्थनीय आहे.
सरकारी यंत्रणांचे हार्दिक अभिनंदन.

Team Finnapp

Photos from Finnapp's post 28/10/2025

भारताच्या मतदार याद्यांची तपासणी व पुनरावलोकनाची ही मोहीम ( SIR- Special Intensive Revision) आता संपूर्ण देशभर राबवली जात आहे.

FINNAPP ने हा विषय सुमारे सहा वर्षांपूर्वीच उपस्थित केला होता आणि गेल्या ६ वर्षांत सलगपणे व सातत्याने या संदर्भात विविध तक्रार अर्ज आणि सूचना संबंधित यंत्रणांना सादर केल्या होत्या.

मतदार याद्यांतील त्रुटी व विसंगती सखोल अभ्यासासह आणि आवश्यक त्या माहितीसह आम्ही ६ मुख्यमंत्र्यांना, अनेक खासदारांना, भारताच्या निवडणूक आयोगाला, केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शहा यांना आणि शेवटी २८ नोव्हेंबर २०२४ रोजी पंतप्रधान कार्यालयाला प्रत्यक्ष भेटून लक्षात आणून दिली होती.

सोबत जोडलेला एक्सेल Screenshot हा या विसंगती चे गांभीर्य लक्षात आणून देतोय..आजच्या घडीला देशात साधारण 9 कोटी अतिरिक्त किंवा अनधिकृत मतदार दिसत आहेत.. एकतर यातील बरीच नावे दुबार किंवा तीन वेळा आली आहेत किंवा लोकसंख्या मोजणीत नसलेली अन्य देशातून स्थलांतरित झालेली अनधिकृत नावे यात आहेत..

ही नावे कुणाची असतिल हे वेगळे सांगायची गरज नाही..

आम्ही वारंवार मतदार संख्येत कृत्रिमरीत्या वाढ झाल्याबाबत इशारा दिला होता, कारण यामुळे प्रत्येक निवडणुकीत काही गैरप्रकार झाल्याची आणि इथून पुढे होण्याची शक्यता आहे.

आता या सर्वसमावेशक पुनरावलोकन प्रक्रियेला सुरुवात झाल्याने आम्ही आशा करतो की अचूक आणि प्रामाणिक मतदार याद्यांमुळे भारतीय लोकशाही आणखी मजबूत होईल.

एका सशक्त व निरोगी लोकशाहीसाठी
प्रामाणिक, सत्यनिष्ठ आणि पारदर्शक माहितीचा पाया हा मूलभूत आणि अत्यावश्यक अशी गरज आहे.

“माझ्या मताचा अधिकार” या वाक्याला असलेले कायदेशीर, व्यावहारिक आणि भावनिक वजन हे कोणत्याही परिस्थितीत कमी होता कामा नये.

FINNAPP टीम आणि सर्व समर्थकांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले आहे.

05/09/2025

Finnapp is Hiring.
A Great Opportunity to work in the exciting Domain of Innovations, Startups and Problem Solving Ecosystem.
Highly professional yet warm and caring environment.
Attractive Salary and Most importantly a satisfaction of working for the Nation...
for Viksit Bharat 2047
Immediate requirement
Kindly DM / WA to 9657600076 to get the Job Description Document

Do share and Circulate in your circles.

Rekindling the Flame: Why India Must Embrace Innovation for All 02/09/2025

https://finnapp.org/f/rekindling-the-flame-why-india-must-embrace-innovation-for-all

India needs its Culture of Innovation and Entrepreneurship Back in Action
Do read, Comment and share

Rekindling the Flame: Why India Must Embrace Innovation for All Have you ever wondered why India, once a cradle of great thinkers and inventors, seems to be trailing behind in social innovation today? From Aryabhata’s celestial calculations to Sushruta’s surgical precision, our ances...

31/08/2025

वाळवंटातली शेती – नॉर्वेचं क्रांतिकारी तंत्रज्ञान

नॉर्वेतील डेजर्ट कंट्रोल या कंपनीने एक विलक्षण तंत्रज्ञान विकसित केलं आहे – लिक्विड नॅनो क्ले (LNC). या तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरडी, नापीक वाळू फक्त सात तासांत सुपीक जमिनीत बदलू शकते.

माती, पाणी आणि स्थानिक जमिनीतून बनवलेलं हे द्रावण वाळूच्या कणांना वेढून धरतं. त्यामुळे त्यात पाणी आणि पोषकतत्वं साठवण्याची क्षमता तयार होते – अगदी सामान्य जमिनीप्रमाणे.

या शोधामुळे वाळवंट किंवा नासधूस झालेली जमीन जवळजवळ क्षणार्धात शेतीयोग्य करता येते. परंपरागत पद्धतींनी जिथे १०–१५ वर्षं लागतात, तिथे हे तंत्रज्ञान काही तासांतच परिणाम दाखवतं.

हे प्रयोग यशस्वीपणे संयुक्त अरब अमीरातआणि अमेरिकामध्ये करून पाहिले गेले आहेत. त्यामुळे शेती, वाळवंटीकरणाविरोधी लढा आणि टिकाऊ अन्न उत्पादन यासाठी हे तंत्रज्ञान भविष्यकाळात मोठा बदल घडवू शकतं.

लिक्विड नॅनो क्ले (LNC) म्हणजे काय?

हे एक अभिनव कृषी तंत्र आहे. यात नॅनो-स्तरावरील मातीचे कण आणि पाणी एकत्र मिसळून एक द्रव तयार केला जातो. हे द्रव वाळवंटी किंवा उथळ जमिनीवर टाकल्यावर मातीचे बारीक कण वाळूच्या कणांना घट्ट चिकटतात. त्यामुळे ती जमीन पाणी आणि पोषकतत्वं जास्त काळ साठवू शकते.

उपयोग आणि फायदे

जलद परिणाम : LNC मुळे जमिनीत ३० ते ६० सेंमी खोलीपर्यंत बदल फक्त ७ तासांत घडतो. ही प्रक्रिया नैसर्गिकरीत्या घडण्यासाठी अनेक वर्षं लागतात.

पाण्याची बचत : उपचार केलेली जमीन पाण्याचा वापर ६५–७७% ने कमी करते. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागात ही पद्धत खूप उपयुक्त ठरते.

उत्पन्नवाढ : जमिनीत ओलावा टिकल्यामुळे पिकांचं उत्पादन वाढतं आणि जमिनीतल्या महत्त्वाच्या सूक्ष्मजीवांनाही आधार मिळतो.

पर्यावरणावर परिणाम

LNC मुळे पाण्याची बचत होते, जमिनीचं आरोग्य सुधारतं आणि वाळवंटीकरण तसेच मृद्स्खलन थांबवण्यात मदत होते.

मोठ्या प्रमाणावर हे तंत्रज्ञान वापरलं गेलं, तर भूक, हवामान बदल आणि जमिनीची टिकाऊपणा या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये (SDGs) मोठा हातभार लागू शकतो.

#

27/08/2025

गणेश चतुर्थी निमित्त सर्वांचे हार्दिक अभीष्टचिंतन..

Photos from Finnapp's post 16/08/2025

विरोधी पक्ष नेते श्री राहुल गांधी यांनी बिहार मधील मतदार याद्यांवरुन मतचोरी असा आरोप करून बराच गदारोळ माजवला आहे. त्यावर अनेक वृत्त वाहिन्या आणि वृत्त पत्रे यांनीही त्यांची तळी उचलून धरली आहे.

आता जो गोंधळ चालला आहे तो मतदार याद्या मधील नावे कमी केली म्हणुन चालू आहे..

Finnapp ने हा विषय मागील वर्षी च अभ्यास करून हातात घेतला होता आणि Finnapp चे संचालक श्री चिन्मय कवि आणि श्री अविनाश देशमुख यांनी माननीय गृहमंत्री श्री अमित शहा जी आणि भारतीय निवडणूक आयोगापुढे प्रत्यक्ष भेट घेवून मांडला होता..

गेले काही दशके भारतात मतदार नोंदणी अथवा मतदार यादी मधून नाव कमी करणे या संदर्भातील कायदे, पद्धती आणि अमलबजावणी या मधील त्रुटी आपण संबंधितांना निदर्शनास आणून दिल्या.

सोबत दिलेल्या फोटो मध्ये काही ठळक आकडेवारी दिसते आहे
1991 ते 1996 या कालावधी मध्ये भारतात साधारण 7.5 कोटी लोक जन्मले आणि 2 कोटी 16 लाख लोक मृत्यू पावले..
91 ते 96 मध्ये जन्मलेले नागरिक 2009 ते 2014 या कालावधीत 18 वर्षे पूर्ण करतात आणि मतदान करण्यास पात्र होतात..
जे नागरिक 18 वर्षांचे झाले त्यांचे नाव मतदार यादीत येणे आणि जे मृत्यू पावले त्यांचे नाव यादीतून कमी होणे अपेक्षित आहे.

त्याप्रमाणे वरील कालावधी मध्ये मतदार यादी मध्ये 5.33 कोटी वाढ होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात 7.62 कोटी वाढ झाली आहे..

हे अतिरिक्त 2.29 कोटी लोक कुठून आले? अगदी सर्व जन्मलेले नागरिक मतदार म्हणुन नोंद झाले असे गृहीत धरले तरीसुद्धा हा आकडा कसा आला आहे काही स्पष्टीकरण नाही. 2011 मध्ये जनगणना झाली होती हे विसरू नये.

याच प्रमाणे 2014-2019 या कालावधी मध्ये 5.43 कोटी इतके अतिरिक्त अनधिकृत मतदार नोंदले गेले आहेत आणि 2019-2024 या कालावधी मध्ये 5.90 कोटी अतरिक्त अनधिकृत मतदार नोंदले गेले आहेत..

वरील आकडे हे जन्मलेल्या नोंदणीकृत व्यक्ति ज्या 18 वर्षानंतर मतदार म्हणुन नोंदणी करण्यास पात्र आहेत त्यांच्या व्यतिरिक्त आहेत.

गेल्या काही वर्षा मध्ये भारतात अनधिकृत बांगलादेशी, आणि म्यांमार मधून होणारी घुसखोरी आणि त्याला मिळणारे राजकिय प्रशासकीय अभय याला कारणीभूत आहे का?

Finnapp ने याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी लेखी मागणी संबंधितांकडे केली होती..

त्याप्रमाणे माननीय गृहमंत्री आणि निवडणूक आयोगाने याची सखोल चौकशीचे आश्वासन दिले होते.



#

Photos from Finnapp's post 10/08/2025

Thank you a lot dear friends for your graceful Presence for the Satyanarayan Pooja at our New Office at Navi Peth Pune.

We had the fortune of having the blessings and good wishes from you all and esteemed dignitaries like

Honorable Higher and Technical Education Minister Mr Chandrakant Dada Patil,

Honorable Member of Parliament from Pune Sou. Medhatai Kulkarni

Honorable Member of Maharashtra Legislative council Sou Umatai Khapre

Honorable ex Member of Parliament Shri Kirit Somaiya ji

at the New Office.

Respected dignitaries like Mr Jagdish Kadam, Trustee and Head Shivshrushti Pune,
Mr Mahesh Pohnerkar, Chief Mentor PARC,
Shri Chandan Patil, State Organising secretary and founder of Finnapp and many other esteemed citizens including our friends, well wishers and Volunteers paid a visit to our office for the Pooja.

Thanks a lot for your Love and support.

Team Finnapp feels highly inspired to continue it's work on innovation promotion and innovative entrepreneurship development in the country.

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Prabhat Road
Pune