Gtribe Experiences

Gtribe Experiences

Share

Trek Expert | Team building | Team outing | Corporate Outbound Program organiser and Planner We enjoy inspiring women and children to go on adventures.

We organise the activities listed below for people of all ages in the Pune area.

- Women treks �
- Family camping �
- Corporate outing �
- Kids camping �
- Star gazing �
- Bird watching �
- Customized Outdoor events �


We also organise events such as
�Rock climbing,
�Valley crossing and zip lining
�Rappelling to encourage for next level of adventure in the Moutaineering.

Photos from Gtribe Experiences's post 16/12/2025

समुद्रकिनारी सफर – थळ, खांदेरी आणि उंदेरी किल्ले
२०२६ मधील अखेरची मोहीम म्हणून GTribe Experiences ने एका दिवशी ३ किल्ले भेट आयोजित केले.
GTribe Experiences ने अलीबाग समुद्रकिनाऱ्याजवळील थळ, खांदेरी आणि उंदेरी या तीन ऐतिहासिक सागरी किल्ल्यांची यशस्वी व संस्मरणीय मोहीम पूर्ण केली. या विशेष अनुभवात कुटुंबे, आई-मुलगी जोड्या, बहिणी तसेच महिला ट्रेकर्स सहभागी झाल्या होत्या. समुद्र, इतिहास आणि जबाबदार पर्यटन यांचा सुंदर संगम या मोहिमेत अनुभवायला मिळाला.
प्रवासाची सुरुवात पहाटे ५:३० वाजता पुण्याहून करण्यात आली. ट्रॅफिकमुळे नियोजित वेळापत्रक सुमारे दोन तास उशिरा झाले; मात्र सर्व सहभागींच्या संयम, सकारात्मक दृष्टिकोन आणि व्यवस्थापन टीमला दिलेल्या सहकार्यामुळे संपूर्ण दिवस आनंदात पार पडला.
दुपारी थळ गावातून सुरू झालेला बोटीचा प्रवास हा या मोहिमेतील विशेष आकर्षण ठरला. आल्हाददायक हवामान, शांत समुद्र आणि सभोवतालचे निसर्गसौंदर्य अनुभवत आम्ही सर्वप्रथम उंदेरीच्या दिशेने निघालो.. समुद्रावरून किल्ल्यांकडे जाताना त्या काळातील सागरी संरक्षणाचे महत्त्व प्रकर्षाने जाणवत होते.
समुद्राच्या मध्यभागी वसलेला हा किल्ला सिद्दी यांनी उभारलेला किल्ल्याची स्थिती समाधानकारक आहे. येथे चौकोनी आकारातील दोन विहिरी आढळतात; मात्र सध्या त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. तरीही, हा किल्ला त्या काळातील मजबूत सागरी संरक्षण व्यवस्थेचे उत्तम उदाहरण आहे. किल्ल्यापर्यंत पोहचणे जरासे आव्हानात्मक आहे. मोठाले खडक पार करत मुख्य दरवाज यावे लागते.साधारण तासभर आम्ही किल्ला पहिला, इथे बऱ्याच तोफासुस्थितीत आढळल्या.
पुढे आम्ही खांदेरीकडे निघालो.
खांदेरी आणि उंदेरी हे अलीबागजवळील जुळे सागरी किल्ले असून, मुंबई बंदरात प्रवेश करणाऱ्या जहाजांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शक ठिकाण होते. खांदेरी किल्ला मायनाक भंडारी यांनी बांधलेला असून, पुढे मराठा आरमाराच्या इतिहासात त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. हा किल्ला अरबी समुद्रातील एका बेटावर वसलेला असून पूर्वी तो कान्होजी आंग्रे यांचे बेट म्हणून ओळखला जात होता.
आजही खांदेरी किल्ला अत्यंत उत्तम स्थितीत आहे . किल्ल्यावर जाण्यासाठी सुरक्षित पायऱ्या बांधण्यात आलेल्या असून त्या थेट लाइटहाऊसकडे नेतात. येथील लाइटहाऊस हे पाऱ्यावर चालणाऱ्या (Mercury Float Mechanism) यंत्रणेसाठी ओळखले जाते आणि विशेष म्हणजे ते आजही कार्यक्षम व सुस्थितीत आहे.
खांदेरी किल्ल्याची तटबंदी मोठमोठे दगड एकमेकांवर अचूक रचून उभारलेली आहे. विशेष म्हणजे या बांधकामात चुना न वापरता केलेली रचना आजही तितकीच भक्कम उभी आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा आणि वाऱ्याचा सततचा मारा सहन करूनही ही तटबंदी टिकून आहे, हे त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते.
किल्ल्यावर फेरफटका मारताना वेताळ मंदिर, आवाज करणारे खड, शिळा मंदिर, मजबूत तटबंदी, पिराची कबर तसेच जुन्या तोफा पाहायला मिळतात. या सर्व वास्तू किल्ल्याच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि लष्करी महत्त्वाची साक्ष देतात. किल्ला पाहण्यासाठी साधारणतः एक तासाचा वेळ पुरेसा ठरतो.
इथे जरावेळ विश्रंती घेतली. सूर्य मावळतीकडे चालला होता. आम्हाला पण पुण्याला परत निघायचं होत.
एकूणच, ही मोहीम केवळ किल्ले पाहण्यापुरती मर्यादित न राहता निसर्गाचा आदर, समुद्रातील सुरक्षितता, ऐतिहासिक ठिकाणांची जपणूक आणि समूहात शिस्त व सहकार्य या मुळे यशस्वी झाली. या किल्यांचे महत्व आम्हाला निलेश गावडे सरांनी समजून सांगितले. अशा अर्थपूर्ण आणि जबाबदार अनुभवांद्वारे इतिहासाशी जोडणं, हेच GTribe Experiences चे ध्येय आहे.
आमचे पुढील ट्रेक्स खालील लिंक वर लिस्टेड आहेत ज्यात सगळी माहिती डिटेल्स मधे असते. डायरेक्ट ऑनलाइन बुकिंग असत.. किमान १- दीड महिना आधी बुकिंग फुल होतात त्यामुळे व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉइन होऊन माहिती घेऊ शकता.
https://gtribe.in/upcoming_adventure or DM 7588592020 or 075884 92020
Office hours 11~8

02/10/2025

*✨🌿 विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🌿✨*

Registration open for 12 months, 12 treks link is below.. The link is open till 4th Oct only.
https://forms.gle/5Ni7ECxXXb47xFhR6

जशी रावणाची भीती संपवून प्रभु रामांनी विजय मिळवला,
तशीच आपल्यातही पहिल्या ट्रेकला पहिल्या पावलावर भीती असते —
⛰️ उंच डोंगर चढण्याची,
💪 स्वतःच्या आरोग्याची,
🌱 आत्मविश्वास कमी असल्याची …
पण खरी ताकद ही या भीतीवर विजय मिळवण्यात आहे!
आजच्या या दसऱ्याला मनाशी ठरवा —
👉 या भीतीचा “वध” करा
👉 आणि निसर्गातल्या ट्रेक्सला “हो” म्हणा 🌿⛰️
कारण भीतीच्या पलीकडेच खरा आनंद, आत्मविश्वास आणि विजय आहे!

Team
Gtribe

Want your business to be the top-listed Travel Agency in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

https://snehalgherade.blogspot.com/

Address


Gtribe Experiences , Shop No 1, Sector 27 A , Plot No 2, Near Sant Tukaram Garden , Nigdi
Pune
411044

Opening Hours

Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm