Abnormal Home

Abnormal Home

Share

अब-Normal Home; A Project for Special Children
http://abnormalhome.com

A Project for Special Children
We Work for;
Metally Re****ed
Autism
Slow Learner
Attention Deficit Hyper Active Disorder(ADHD)
Cerebral Palsy
Learning Disability

Photos from Abnormal Home's post 22/02/2021

नमस्कार,
एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ....
याची नुकतीच प्रचिती, दीपस्तंभ चॅरीटेबल ट्रस्ट मुळे आली.

या संस्थेतील अनेक तरुण कार्यकर्त्यांनी मिळून आमच्या विशेष मुलांसाठी वर्क शिटस तसेच शिकवण्यास उपयोगी शैक्षणिक साहित्य तयार करून दिले...

दीपस्तंभ च्या सर्व सदस्यांचे खूप मनापासून आभार...
विशेष धन्यवाद :- मिताली कुलकर्णी, अथर्व कुलकर्णी, वैष्णवी सोमा , दिव्या आणि कपिलेश जोशी...

ऋणानुबंध असेच वृद्धींगत होवोत...

धन्यवाद
किशोरी पाठक

Photos from Abnormal Home's post 14/12/2018

लायन्स क्लब ऑफ पुणे, भोसरी तर्फे अब नॉर्मल होम च्या विशेष मुलांच्या कामाचे विशेष कौतुक झाले. तसेच समाजभूषण पुरस्कार ही प्रदान करण्यात आला. ह्या कार्यक्रमात गंपुदादा (श्री पंकज मिठभाकरे) यांचाही सत्कार करण्यात आला.

Photos from Abnormal Home's post 27/11/2018

“अब नॉर्मल होम”चा शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!
ह्या वर्षी दिवाळीनंतरच्या उपक्रमात अब नॉर्मल होमने किल्ल्यांचे प्रदर्शन भरविण्याचा विचार केला ज्यामध्ये रायगड, राजगड, पन्हाळा, सिंहगड आणि जंजिरा अशापाच किल्ल्यांच्या प्रतीकृती विशेष मुलांच्या सहभागाने तयारकरण्यात आल्या.
“ विशेष मुलांनाभाषिककौशल्यं आणि व्यवहारज्ञान ह्या गोष्टी तर आयुष्य चांगले जगण्यासाठी शिकवाव्याच लागतात परंतु आपण महाराष्ट्रात राहतो, पुण्यात राहतो तर त्याची जाणीव व्हावी तसेच त्याचा इतिहास कळावा हयासाठी खरं तर हा उपक्रम राबवावा असे वाटले. मग इतिहास आणि महाराष्ट्र म्हटल्यावर शिवाजी महाराजांपासून सुरुवात करावी असं वाटलं म्हणून मग दिवाळीच्या उपक्रमाच्या निमित्त्याने किल्ल्यांचे प्रदर्शन भरविले.”
ह्या उपक्रमाच्या माध्यमातून ज्यावेळी त्यांच्या समोर इतिहास साकारू लागला तेव्हा त्यांचे कुतूहल, वेगवेगळे प्रश्न, आनंद, समाधान. मजा असे अनेक पैलू समोर येऊ लागले आणि मग रोज गडांवरील चर्चा, बुरुज का असतात?, तटबंदी म्हणजे काय?, समुद्रात कसा किल्ला बांधला असेल? इत्यादी अनेक चर्चा सुरु झाल्या आणि जाणवले कि विशेष मुलदेखील ह्याविषयामध्ये रस घेऊन नवीन माहिती जाणून घेण्याची तयारी दाखवतय तर आपण ती माहिती त्यांना सोप्या भाषेत करून सांगितली पाहिजे.”
प्रदर्शनाच्या दिवशी मुलांनी खूपच छान पद्धतीने इतिहास मांडला. त्याचं खूप कौतुक.

21/11/2018

अब नॉर्मल होम ह्या विशेष मुलांच्या पुनर्वसन केंद्रातील विशेष मुलांनी एक वेगळं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे..."किल्ल्यांचे प्रदर्शन" ...
त्यांचं कौतुक करण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी नक्की या..

22/10/2018
22/10/2018

अब नॉर्मल होमच्या मुलांनी बनविलेल्या पणत्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत... Book your order now...

Photos from Abnormal Home's post 27/09/2018

शाब्बास...
लायन्स क्लब इंटरनॅशनल तर्फे विशेष मुलांसाठी “समूहगीत स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. अब नॉर्मल होमचे विद्यार्थी पहिल्यांदाच अशा स्पर्धेत सहभागी झाले होते आणि ह्या स्पर्धेत मुलांनी बक्षीस मिळविले. खूप कौतुक ह्या सर्व मुलांचे... मिलिंददादा तुळणकर ह्यांचे धन्यवाद. तसेच प्रसाद कुलकर्णी (तबला) आणि मंदार गोडसे (हार्मोनियम) यांच्या साथीचे कौतुक...
लायन सिमा दाबके ह्यांनी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद...
सर्व मुलांचे आणि शिक्षकांचे खूप कौतुक....
- किशोरी ताई

Photos from Abnormal Home's post 25/09/2018
Photos from Abnormal Home's post 25/09/2018

अब नॉर्मल होमच्या मुलांसाठी एक वेगळा अनुभव...
शुक्रवारी अब नॉर्मल होमला अनुपदादा यांनी भेट दिली.
ही भेट म्हणजे विशेष मुलांना आर्मी म्हणजे नक्की काय? हे समजावे हा उद्देश. अनुपदादाशी गप्पा म्हणजे मुलांसाठी मेजवानीच होती. मुलांना समजेल अशा पद्धतीने अनुपदादाने आर्मी म्हणजे काय ?, तिथे कसं काम करतात?, कोणकोणत्या परिस्थितीत काम करतात ? अशा अनेक गोष्टी समजावून सांगितल्या, मुलांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे दिली.
मुलांची घरी जायची वेळ झाली तरी मुलं जागची हालत नव्हती.
संपूर्ण वातावरण देशासाठी प्राण ओतून काम करणाऱ्या आर्मीला सलामी द्यावी असं भारावून गेल होतं.
Thanks to Anup Dada for his valuable time spent with my special children.
Salute to Indian Army...

-किशोरी ताई

Photos from Abnormal Home's post 06/08/2018

अब नॉर्मल होमच्या विशेष मुलांनी बनविलेल्या राख्या विक्रीस उपलब्ध आहेत.
Book your order as early as possible.
Thank you.
Phone : 02025389277
Mobile : 8275747247

Want your practice to be the top-listed Clinic in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Pune
411030

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm