Shabda
मराठी वर प्रेम करणारयांसाठी...मराठी जपणाऱ्यांसाठी
09/11/2025
We
Kathak enthusiasts!!
It was a mesmerizing Kathak performance- Sanchit by .nirgun represented Banaras Gharana, full of grace and rhythm.
Witnessing such artistry was a true delight.
The elegance and expression left a lasting impression.
18/10/2025
दिवाळीची सुरूवात झाली ती कविता आणि बासरी च्या सुश्राव्य मैफिलीने - ऋतु बरवा!! खास च्या पोतडीतून बाहेर पडलेल्या नवीन कविता, शेर, रूबाया…प्रेक्षकांशी संवाद साधण्याची त्याची आणि त्यांना अक्षरशः कार्यक्रमात ओढून घ्यायची कला त्याची तोच जाणे..’जे न देखे रवी ते देखे कवी’ ही प्रतिभा त्यालाही पुरेपुर लाभली आहे आणि कधी डोळ्यात टचकन पाणी आणलं तर कधी हशा पिकला…
अमर ची बासरी सर्वश्रुत आहेच, पण ती समोर बसून ऐकताना प्रेक्षक म्हणून आपण त्या सूरांमध्ये न्हाऊन निघतो.केवळ अप्रतिम! श्वास कसा पुरतो इतक्या विविध रागांमध्ये, तालांमध्ये अलगद फिरून येतो आणि आपल्यालाही हा अल्हाददायक प्रवास घडवतो.
Synthesiser आणि तबल्याती ची उत्तम साथ आहे. विक्रम ची तबल्यावरची बोटं थांबत नव्हती, आयत्या वेळी वैभव आणि अमर कितीही बदल करत असले तरी दरवेळी अचूक…हे कसलेले कलाकारच जाणोत…
आज स्वानंद टिकेकर चा पहिला निवेदनाचा प्रयोग होता..वैभव शेजारी बसून बोलणं काय असतं आणि किती दडपण येतं हे मलाही माहिती आहे, जेव्हा मी त्याची मुलाखत घेतली होती. स्वानंदी चं voice modulation नक्कीच आवडलं.
आणि सरतेशेवटी मित्र Sujay Bhadkamkar च कौतुक ही तेवढंच आहे, उत्तम प्रकाशयोजना दिवेकर्स…राधेच्या कवितेला प्रत्येक ओळीनुसार बदलणार रंग कविता जिवंत करत होते आणि शेवटची निळाई ने साक्षात राधा कृष्णाचा आभास निर्माण केलास..
मन तुझं जलतरंग व्हायलाच हवं होतं, once more सकट…ते अपरिहार्य!! दर्दी रसिकांना नक्कीच या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा…अप्रतिम अनुभवाने घरी परत याल ही खात्री 😊
समिरा
.bhat.75
16/08/2025
संगीत देवबाभळी
एव्हाना परेश रावल यांनी कौतुक केल्यामुळे सगळेच प्रयोग बऱ्यापैकी हाऊसफुल्ल सुरू असलेलं मराठी नाटक म्हणजे ‘संगीत देवबाभळी’ एवढीच ती माहिती होती…तसंही ओढून ताणून सुरू असलेल्या कॅामेडी नाटकांनी रसभंग केल्यामुळे वेगळं काहीतरी बघायला मिळावं या अपेक्षेने हे नाटक बघायचं ठरवलं…
नाटकाची ४ वेगवेगळ्या ठिकाणची तिही balcony मधली तिकीट्स मिळाली, नाट्यगृह प्रेक्षकांनी भरलं होतं.
नाटकाची सुरूवातच होते सुरस अभंगाने! हळूहळू नाटक खुलायला लागते. पांडूरंगाच्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या तुकोबांची पत्नी अवली आणि साक्षात पांडूरंगाची अर्धांगिनी रखुमाई या दोघींची त्या पांडूरंगानेच घडवून आणलेली भेट.
तुकोबांनी संसारावर तुळशीपत्र ठेवल्यामुळे संसाराचा गाडा ओढणारी अवली, सुखसौख्याचा त्याग करून तुकारामांची सावली बनून राहणारी अवली, पदरी आलेल्या हालअपेष्टा सहन करणारी अवली, मुखी देवाचं नाव पण तेही सरळ नाही, देवाशी भांडण करून जाब विचारण्यासाठी आतुर असलेली अवली…
पांडुरंगावर युगानुयुगे रूसून बसलेली रखुमाई, पांडुरंगावर निस्सीम प्रेम असलेली रखुमाई, नवऱ्याला कोणी बोल लावले तर सामान्यांसारखी चिडणारी रखुमाई…
या दोघींचा जगण्याकडे पहायचा दृष्टीकोन, पडलेले प्रश्न आणि मिळालेली उत्तरं या सगळ्याचा प्रवास म्हणजे संगीत देवबाभळी!
मिश्किल संवाद, कथा जुन्या काळातली असली तरी प्रवाही कुठेही रटाळ न वाटतां तुम्हाला आपलंस करून घेते लेखक, दिग्दर्शक प्राजक्त याच्या चोख कामाची ही पावती आहे…खणखणीत आवाज, आवाजाचा throw आणि समोर भरगच्च प्रेक्षक असताना कसलंही दडपण न घेता सुरांची धार कमी न होऊ देता ताकदीने अवली ची भूमिका साकारणारी शुभांगी सदावर्ते…सुरेल आवाजात अभंग सादर करत, द्विधा अवस्थेत असलेली रखुमाई उत्तम अभिनयाच्या जोरावर उभी करणारी मानसी जोशी…अभिनय आणि अभंग समोर बसून अनुभवणं ही एक पर्वणी आहे! खुप कौतुक.
आनंद भाटे यांच्या अभंगानी तुकारामांचा आभास निर्माण केला आहे तो शब्दांत मांडता येणार नाही…
मुद्दमून उल्लेख करावासा वाटतो तो प्रकाशयोजना (प्रफुल्ल दीक्षित) आणि संगीताचा (आनंद ओक) इंद्रायणी काठी बसल्याचा भास होतो क्षणभर, संधीप्रकाश, पावसाच्या सरी सगळंच अनुभवल्यासारखं खरंखुरं…काही अभंग नवीन( न ऐकलेले)आहेत पण साजेसे आहेत! नेपथ्यही (प्रदीप मुळ्ये)कथेला नक्कीच वेगळी उंची देतं! एकूणचं केवळ दोघींच्या जीवावर नाटक उभं करणं, जूना काळं जिवंत करणं, त्यातही संगीत नाटकं आजच्या reels च्या दुनियेत ही reality मांडण हे निर्मात्यांनी प्रसाद आणि कविता कांळी यांनी पेललेलं शिवधनुष्य आहे!! सगळ्या टीम ला अनेक शुभेच्छा!!
रसिक प्रेक्षकांनी वेगळा अनुभव घेण्यासाठी आवर्जून पहावं असं उत्तम नाटक ‘संगीत देवबाभळी’!!
समिरा दीक्षित
22/06/2025
Thanks everyone for your warm wishes & blessings on my birthday!
Visiting Mai Bal Bhavan,Mamurdi on my birthday brings me immense joy. Founded by Mai Deshpande—this home offers love and care to visually impaired and orphaned girls. After her sudden deo, her husband Mr. Ingale Sir has continued her noble mission with the same heartfelt dedication.
Spending time with these incredible girls and celebrating special moments with them is always a blessing. Despite facing daily struggles, limited resources, and lack of funding—even for essentials—these girls continue to rise with determination and hope.
I’m proud to share that the Mai Bal Bhavan football team recently won the runners-up trophy at the national level and is now preparing for the International Blind Football Championship.
I humbly request you to come forward and support them. Your small help can bring a big smile to their faces and brighten their future.
22/06/2025
Visiting Mai Bal Bhavan,Mamurdi on my birthday brings me immense joy. Founded by Mai Deshpande—this home offers love and care to visually impaired and orphaned girls. After her sudden deo, her husband Mr. Ingale Sir has continued her noble mission with the same heartfelt dedication.
Spending time with these incredible girls and celebrating special moments with them is always a blessing. Despite facing daily struggles, limited resources, and lack of funding—even for essentials—these girls continue to rise with determination and hope.
I’m proud to share that the Mai Bal Bhavan football team recently won the runners-up trophy at the national level and is now preparing for the International Blind Football Championship.
I humbly request you to come forward and support them. Your small help can bring a big smile to their faces and brighten their future.
07/05/2025
Jai Hind 🫡🇮🇳
12/04/2025
Tucked away in the heart of old Pune, the bamboo market once echoed with the rhythm of craftsmen shaping tradition into utility
06/04/2025
Proud to have completed my second half marathon! Every mile was a reminder that limits exist only if we let them.
No excuses—just growth, grit, and gratitude.
Feels amazing to crush limits and leave excuses in the dust.
15/02/2025
छावा
जवळपास ४-५ सिनेमा हॅाल्स पूर्ण booked आहे पाहिल्यावर पुढची तिकीट्स पदरी पडली, पण तरीही छावा पहायचं वेड होतचं, रात्री ११ः३५ चा show.
हे वेड सिनेमाचं नाही ‘छाव्या’साठी चं आहे!
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच हे वेडं आहे!
मराठी राजाचं कतृत्त्व जगभर दाखवण्यासाठी, त्याची किर्ती अमराठी लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ‘छावा’ हा सिनेमा नक्कीच काम करेल.
पण…मराठी इतिहास ज्यांना माहिती आहे, संभाजी महाराजांची निर्भिडता, त्यांच साहस, पराक्रम, आक्रमकता, विविध भाषांवरच प्रभुत्व, वक्तृत्व ज्यांना माहिती आहे त्यांची थोडी फार निराशा होऊ शकते…माझी तरी झाली..
मुळात सुरवातच होते ती कोणाती धर्म आम्ही मानत नाही पासून…कशासाठी? हिंदूच्या कट्टर राजाचं चरित्र दाखवताना हिंदू धर्माबद्दल अभिमान व्यक्त करताना कसली भिती??
संभाजी महराजांनी अभेद्य जंजीऱ्या ला वेढा घालून सिद्दी च्या नाकी नऊ आणले होते, त्याकाळी कमी वेळात समुद्रात रस्ता बांधण्याची असाध्य गोष्ट त्यांनी केली होती त्याचा उल्लेख ही सिनेमात नाही…जवळपास १२० लढाया लढून आणि सगळ्यात यशस्वी होणाऱ्या या पराक्रमी छाव्याला केवळ बुऱ्हाणपूर ची लूट दाखवून सिमीत केलं आहे.
मध्यांतरानंतर सगळ्या लढाया उरकल्या आहेत, राजांबरोबर कुठल्या प्रांतांत कोण स्वराज्याचे रक्षण करणारे मावळे होते याचा स्पष्ट उल्लेख ही नाही..त्यांचाही पराक्रम तेवढाच महत्वाचा आहे.
संवादांसाठी उत्तम वाव असताना ही फारशी मेहनत दिसत नाही. अगदी छावा या शिवाजी सावंत यांच्या पुस्तकातून हिंदी भाषांतर केलं असतं तरी प्रभावित करणारे संवाद होऊ शकले असते.
रेहमान असूनही संगीत छाप सोडत नाही…मराठी बाजच मुळात संगीतात सापडत नाही…आया के तूफान चं संगीत ही मराठी पेक्षा अलीकडच्या काळातल्या एखाद्या athlete ला शोभेल असं वाटतं…एकही music masterpiece टाकता आला नाही..कदाचित इथे अजय अतुल असते तर काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं असतं जे मराठी मातीतलं असतं.
विकी कौशल ने मेहनत घेतली आहे तरीही दिग्दर्शन अत्यंत कमकुवत वाटलं त्यामुळे फक्त शेवटचा प्रसंग सोडता महराजांची छबी म्हणून विकी कौशल लक्षात राहिल असं फारसं घडलं नाही. रश्मिका मंदाना त्यामानाने उजवी वाटली.
शेवटच्या प्रसंगाला सामोरं जाताना डोळे घळाघळा वहातात..जखमा पुन्हा ताज्या होतात..
मराठी सिनेमा धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हपाहिल्यावर छावा कुठेतरी कमी पडला आहे असं जाणवत रहातं…पण अर्थात हा माझा मराठी माणूस म्हणून अपेक्षा असलेला दृष्टीकोन आहे…
ज्यांना निधडा छावा माहितच नाही अशांपर्यंत पोहचण्यासाठी हे उत्तम माध्यम आहे. तुम्हीही एकदा जरूर बघू शकता! पुष्पा, KGF ला हिरो न बनवता छाव्या ला आपण आपला आदर्श बनवूच शकतो!
माती तुळापुरची झाली, पावन तुझ्या रक्ताने,
ते साखळदंड झाले, धन्य तुझ्या स्पर्शाने,
पाहुनी शौर्य तुजं पुढे, मृत्युही नतमस्तक झाला
स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभूराजा अमर झाला
छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मुजरा !!
समिरा
11/01/2025
कालच रिलीज झाला आणि पाहिलाही! खुप दिवसांपासून या सिनेमाबद्दलची आतुरता होती. मूळ नाटकाला, गाण्यांना हा चित्रपट न्याय देऊ शकेल का, हा प्रश्न मनात होता. तर प्रत्येक कलाकाराने जीव ओतून काम केलं आहे, Casting perfect झालं आहे, चंद्रविलास ची सत्ता आणि भामिनी मिळवण्याची धडपड, सेनापती आणि बाप म्हणून राज्यासाठी आणि लेकीसाठी योग्य निर्णय घेण्याची तळमळ, धैर्यधर चा साधेपणा पण तितकाच बाणेदारपणा, भामिनी चा अंहकार गळून वनमालेपर्यंतचा प्रवास….
संगीत मानापमान देखणी आणि श्रवणीय कलाकृती.
जुन्या गाण्यांना नवीन कोंदणात बसवायचा प्रयत्न बहुतांशी सफल झाला आहे. जुनी गाणी इतकी कानांत बसली आहेत की नकळत तुलना होतेच, पण .mahadevan .barve यांनी नव्या रूपात सादर करताना यथोचित न्याय दिला आहे.
संगीत या नाटकाचा गाभा आहे. पण नाटक आणि चित्रपट या दोन्ही वेगवेगळ्या कलाकृती असतात यांच भान ठेवून ने चित्रपटाची आणि गाण्यांची सांगड घातली आहे. कट्यार नंतर संगीत मानापमान ला पुनुरूज्जीवन देण्याचा प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहें
आपण सर्वांनी हा चित्रपट theatre मध्येच बघावा, तरच त्याचं देखणेपण अनुभवता येईल.
समिरा
18/12/2024
Season 2
पहिला season 2020 मध्ये आला होता. वेगळ्या कथानकामुळे आवडलेली पहिली web series होती, ना हाणामारी, ना harassment, ना vulgar, ना abusive language खरंतर web series ला लागणारा मालमसाला न टाकता ही अशी series बनवण्याचं धाडस Anand Tiwari आणि Amritpal Singh Bindra यांनी केलं त्याला Shankar Ehsaan Loy च्या music ने चार चॅंाद लावले.प्रत्येक कलाकाराने ताकदीने भूमिका निभावल्या आहेत मग कसलेले कलाकार असो वा नवोदित कलाकार. या webseries चा 2nd season येणार एवढीच hint होती आणि finally 4 वर्षांनंतर दुसरा season आला.
Generally 2nd season ताणलेला असतो, कथानक भरकटलेलं असतं पण पुन्हा सुखद धक्का देत season 2 ने बाजी मारली आहे. मूळ कथानक धरूनच गोष्ट पुढे सरकते आणि त्या प्रवाहात येणारी उपकथानकं कुठेही रेंगाळत नाहीत. Anand Tiwari यांच्या दिग्दर्शना ने काही प्रसंगांची उंची कमाल वाढवली आहे.
राठोड घराण्याच्या गाण्याचा वारसा जपण्याची राधे ची धडपड, घरातल्या प्रत्येकाची तीच धडपड पण मार्ग वेगवेगळे, त्यात होणारी फरफट, हळूहळू गळून पडणारे अंहकार, प्रसिध्दी बाजूला ठेवून संगीत शिकायची तमन्नाची तळमळ, नंदिता ची गाण्यावरची निष्ठा…सगळंच मुद्देसूद न भरकटता मांडलं आहे…फक्त राहून राहून यावेळी गाणी मागच्या season च्या तुलनेत थोडी कमी प्रभावी वाटली, कथानकावर focus जास्त असल्यामुळेही असू शकेल किंवा पुन्हा jukebox ऐकल्यावर आवडूही शकतात 😊
ज्यांना चांगल कथानक, least faul language,No nudity, music मध्ये interest असेल आणि clean web series मध्ये invest करायला वेळ असेल त्यांनी
Brandish Bandit Season 2 नक्की बघावा!
समिरा
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Yashwantrav Chavan Natygruh
Pune
411038