PositiveSaathi.com
India's First Matrimonial Portal for People Living with HIV (PLHIV)...Rebuilding the 55 lakh broken BLOCKS of Nation
India’s First Online Matrimony Portal for HIV Positive People. Among 55 lakh HIV+ve INDIANS, there are thousands of girls and boys who want to get married and live the life more positively. There are many other diseases like cancer and brain tumor which are more dangerous and life–threatening than HIV/AIDS. But a HIV+ve person never tells anybody that he is HIV+ve. The search of a HIV+ve life partner ends before starting because of this reason
10/08/2024
documentary by a singapur media house. our coverage from 31 to 36 min. time
Fixer S4 线人 S4 EP5 | HIV issues in India! 印度有200万性工作者,妇女因贫困或被迫进入行业,城市流动人口和娼妓业被认为是HIV传播源 Urban migrant populations & prostitution industry are known as sources of HIV transmission in India. Many organisations provide education & counselling for s...
24/07/2024
6 years ago
पुणे -वेबसाईटच्या मदतीने जमवली हजारो एचआयव्ही पीडित ग्रस्ताची लग्न NTV NEWS MARATHI
B grateful
13/01/2024
*कृतज्ञता*
कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा .आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा.या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख,अडचणी नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय . आपण तर साधारण मनुष्य आहोत.सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो. *कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं.* मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं. आपल्याशी कोण कसही वागेना आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं. इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे.आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते. *आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका.फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे.* जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत.जगणं कोणाचंही सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं, *सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो.*
ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली, तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे त्याला अजूनही नोकरी नाही.ज्या प्रार्थनेचे उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले, तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत पण यश मिळाले नाही. तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता, तोच रस्ता आहे जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले.ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला, त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात, तरीही त्यांचेजीवन विसंवादात आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये वापरलेला बेड, तुम्ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला, त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतला.ज्या पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आले, त्याच पावसाने दुसऱ्याचे शेत उध्वस्त केले.कारण तुमच्याकडे जे काही आहे ती फक्त *"ईश्वरी कृपा"* आहे. तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा तो दाता आहे.म्हणुनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी *कृतज्ञ* रहा. पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे..
वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये. कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात, त्या नक्कीच संपतात. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, ज्याच नाव आहे, आत्मविश्वास. *जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी.*
समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून......!
*जय हरी माऊली*
Unbelievable information about fasting and bodies natural healing mechanism
09/12/2023
Sorry
01/12/2023
Pls share website for HIV marriage...
Positivesathi.org
and helpline ...7788991097
10/11/2023
प्रसिद्धी पत्रक
दिनांक 29 ऑक्टोबर रोजी च्या वर्ल्ड स्ट्रोक डे निमित्त वाहन चालक तसेच सर्वसामान्य जनतेमध्ये मोफत जनजागृती करण्याच्या उद्देशाने टीम फिजिओथेरपी सर्विसेस पुणे या संस्थेच्या तज्ञ डॉक्टरांच्या कडून तसेच पॉझिटिव्ह सोलस् फाउंडेशन या एनजीओच्या सहकार्याने शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (आरटीओ पुणे), संगम ब्रिज जवळ, येथे सकाळी दहा ते बारा या वेळेत स्ट्रोक\लकवा \परालिसिस याचा त्रास झालेले रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक तसेच इतर सर्व सामान्य जनता, खास करून वाहन चालक मालक यांच्याकरिता मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
Brain stroke हा एक गंभीर आजार असून मेंदू मधील एखाद्या भागात रक्तपुरवठा खंडित झाल्याने अथवा उच्च रक्तदाबामुळे मेंदूमधील रक्तवहिनी फुटल्यामुळे यामध्ये मेंदूतील काही भागास इजा पोहोचते व त्यामुळे तात्पुरते अथवा कायमस्वरूपी अपंगत्व येवू शकते. पुणे परिवहन कार्यालयातील एक माजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री वळीव यांनासुद्धा काही वर्षांपूर्वी बीपी ची गोळी चुकल्याने उच्च रक्तदाब व रक्तवाहिनी फुटल्याने ब्रेन stroke चा त्रास झाला होता. त्यानंतर योग्य उपचार न केल्यामुळे त्यांना या आजारातून बाहेर पडण्याकरिता थोडा वेळ लागत आहे. चुकीच्या दिशेने उपचार घेऊन रुग्णाने बहुमोल वेळ वाया घालवण्याऐवजी योग्य उपचार घेवून पेशंटने लवकरात लवकर या आजारावर मात करावी व या आजारातून लवकर कसे बाहेर पडावे याचे सुयोग्य मार्गदर्शन इतर पेशंटना व्हावे या व्यापक दृष्टीकोनातून त्यांनी स्वतः या शिबिरा करता पुढाकार घेतला आहे. व त्यांना स्वतःला आलेले अनुभव सुद्धा ते सांगणार आहेत.
भारतामध्ये दरवर्षी 1,85,000 लोकांना stroke चा त्रास होतो. वयाच्या साठ ते 65 वर्षावरील व्यक्तींना stroke होण्याची जास्त शक्यता असते पण आजकालच्या धकधकीच्या व तणावपूर्ण वातावरणामुळे 15 ते 40 वयोगटातील तरुणांना सुद्धा या त्रासाचे प्रमाण उल्लेखनिय रित्या वाढले आहे.
जागतिक आकडेवारीनुसार दर चार पैकी एका व्यक्तीला स्ट्रोक होण्याचा धोका असतो.भारतामध्ये दर 40 सेकंदाला एका व्यक्तीला स्ट्रोक होतो व या आजारामुळे प्रत्येक चार मिनिटाला एक मृत्यू होत असतो .
योग्य उपचार (physiotherapy) मिळाल्यास या आजारावर मात करून रुग्ण लवकरात लवकर स्वावलंबी होतो व दर्जेदार आयुष्य जगू शकतो. अन्यथा रुग्णास अंशतः अथवा पूर्णपणे परावलंबित्व येते. त्यामुळे रुग्ण मानसिक दृष्ट्या पूर्णपणे खचून जाऊ शकतो व या सर्व गोष्टींचा अप्रत्यक्षरीत्या रुग्णाच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास होतो. फिजिओथेरपी मध्ये स्नायूंची ताकद वाढवणे तसेच स्नायूंना नियंत्रित करणाऱ्या मेंदूमधील पेशींना प्रशिक्षित करून दैनंदिन कामकाजमधे स्वावलंबी होणे या गोष्टी शिकवण्यावर भर दिला जातो . मसाज तसेच इतर पर्यायी उपचार पद्धती या आपल्या ठिकाणी योग्य असल्या तरी त्यांना प्रचंड मर्यादा आहेत. पेशंटला या गोष्टींची माहिती नसल्याने मसाज तसेच इतर उपचारांमध्ये तो अडकून राहतो व परिणामी त्यास यातून बाहेर पडण्यास जास्ती कालावधी लागू शकतो. असे होऊ नये म्हणून सदर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कृपया आपल्या ओळखीच्या अथवा संबंधित असे कोणी रुग्ण असल्यास त्यांना या मोफत शिबिरात सहभागी होण्यास प्रवृत्त करावे असे नम्र आवाहन परिवहन कार्यालय तसेच टीम फिजिओथेरपी यांनी केले आहे.
सदर शिबिरामध्ये डेंटिस्ट श्री राजाराम खिलारी हे उपस्थीतांची मोफत दंत तपासणी करून देणार आहेत याची नोंद घ्यावी.
आपल्या ग्रुप मधील सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती आहे, एचआयव्ही साठी काम करणारी एखादी एनजीओ\संस्था असेल पण त्या संस्थेला msacs(महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था)तर्फे त्यांना निधी मिळत नाही, अशा संस्थांची माहिती एकत्र करण्याची जबाबदारी श्री अनिल वळीव यांना अतिरिक्त संचालक महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांनी व्यक्तिशः दिली आहे.
आपल्या संपर्कात किंवा माहिती मधे अशी एखादी संस्था असेल तर त्या संस्थेची थोडक्यात माहिती श्री वळीव यांच्या व्हाट्सअप मेसेज मध्ये (8007478478) कळवन्यास सांगावे.त्यामधे खालील माहिती पाठवावी
(संस्थेचे नाव, ठिकाण, कामाचे स्वरूप.कधीपासून कार्यरत आहे, संस्थापक आणि त्यांचा संपर्क क्रमांक, ई.) सर्वांच्या सहकार्याने 2030 पर्यंत एचआयव्ही संसर्गित व्यक्तिंचा मिशन शून्य साध्य करायचा प्रयत्न आपण करीत आहोत. कृपया सहकार्य करावे ही नम्र विनंती.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
Pune
411011
12/11/2023