GoMarathi
Learn Marathi from english. Carefully designed content, Inline translations and responsive UI which
13/12/2025
*अरे मार्केट मार्केट *
अरे मार्केट मार्केट, जशी गरम भजी प्लेट ।
आधी लॉसचे चटके, तेंव्हा मिळते प्रॉफीट ।। १ ।।
अरे मार्केट मार्केट, इथे सारेच पंडित ।
किती करावा अभ्यास, तरी चुकती भाकितं ।। २ ।।
अरे मार्केट मार्केट, ओव्हर ट्रेडिंग करू नये ।
माती मऊ लागल्यास, कोपराने खणू नये ।। ३ ।।
अरे मार्केट मार्केट, सट्टा कधी म्हणू नये ।
सूती लेंग्याच्या नाडीला, पट्टा कधी म्हणू नये ।। ४ ।।
अरे मार्केट मार्केट, जशी आयुष्याची ओळ ।
नेहमीच नागमोडी, कधी चालेना सरळ ।। ५ ।।
(बहिणाबाईंच्या 'अरे संसार संसार' ह्या कवितेवरून प्रेरित)
- गुरुराज बुधकर
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा. म्हणजे, मराठीचा अभिमान, अट्टाहास आहेच. परंतु, सोबत एक हुरहूर सुद्धा आहे.
https://gomarathi.in/blogs/gururaj-budhkar/hurhur.html
https://gomarathi.in/.../gururaj.../marathi-cha-attahas.html
27/10/2024
*पापोचाकुकुचि*
दिवाळी अगदी तोंडावर आली होती आणि कुसुमच्या आईने आजच कुसुमसाठी बघण्याचा कार्यक्रम ठेवला. एका दिवसात दोन स्थळं कुसुमला बघायला येणार होती. काही अपरिहार्य कारणांमुळे असा तारखांचा घोळ झाला होता.
कुसुम खरं म्हणजे लग्नासाठी फार उत्सुक नव्हती. सगळंच फार झटपट होतंय असं तिचं मत होतं. आधुनिक विचारांची असल्याकारणाने मुली बघण्याच्या कार्यक्रमाला तर तिचा तीव्र विरोध होता. केवळ आई बाबांच्या आग्रहाने ती तयार झाली.
"काय गं आई. एवढी कसली घाई झालीये तुला माझ्या लग्नाची?" कुसुम पापोचाकुकुचि कढईत परतत म्हणाली.
पापोचाकुकुचि म्हणजे, पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा.
दिवाळीचा बहुतेक फराळ कुसुमची आईच बनवते. पापोचाकुकुचि मात्र कुसुम स्वतः बनवते. अगदी खमंग आणि कुरकुरीत.
तर, ठरल्याप्रमाणे एकापाठोपाठ एक अशी दोन स्थळं कुसुमला बघून गेली. त्यांचं आदरातिथ्य करता करता कुसुमच्या आई बाबांची पार तारांबळ उडाली. एरव्ही अशा कार्यक्रमांना कांदेपोहे असतात. आज मात्र कुसुम स्पेशल पापोचाकुकुचि होते. सर्वांना ते फार आवडले. कुसुमचं खूप कौतुकही झालं.
दोन्हीही स्थळं उत्तम होती. दोघांनाही कुसुम आवडली होती. आता दोघांपैकी कुसुम कोणाची निवड करणार, याचं आई बाबांना कुतुहल होते. अंतिम निर्णय कुसुमचा असणार होता. कुसुम मात्र दिवाळीचा आकाशकंदील बनवण्यात व्यस्त होती.
बराचवेळ वाट बघून शेवटी बाबांनीच विषय काढला. सोबत आई होतीच.
"कुसुम, मग काय ठरलं तुझं?" बाबांनी सावधपणे विचारले.
"कशा बद्दल?" कुसुम कंदिलाची शेपटी चिकटवत म्हणाली.
"अगं कशाबद्दल म्हणून काय विचारतेस? आज तुला बघुन गेलेल्या दोन मुलांपैकी तुला कोण पसंत आहे, हे विचारतोय मी."
कुसुमने एकवेळ आपल्या अधीर झालेल्या आईबाबांकडे पाहिले.
"जो पहिला मुलगा आला होता, तो." कुसुम आत्मविश्वासाने म्हणाली.
"म्हणजे मी त्याच्याशी लग्न करीनच असं नाही, पण मला त्याच्याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल."
कुसुमचं उत्तर ऐकून आई बाबांना अगदी हायसं वाटलं. दोघांपैकी एक तरी मुलगा कुसुमला आवडला होता. आधी लग्नाला ठाम नकार देणारी कुसुम आता "बघुया" वर आली होती.
"छान!!" कुसुमचे बाबा हसत म्हणाले.
"तुझी आवड, तीच आमची आवड. आपल्याला कसलीही घाई नाही, पण तुला तोच मुलगा का आवडला? म्हणजे, असं काय पाहिलंस तू त्याच्यात?" बाबांनी न राहवून विचारले.
"दोन्हीही मुलांना मी बनवलेला पापोचाकुकुचि दिला होता. दोघांनाही तो खूप आवडला." कुसुम पहिल्यांदाच थोडीशी लाजत होती.
"पहिल्या मुलाने मात्र अगदी सुकं खोबरं, मिरची आणि कडिपत्त्यासकट ताट स्वच्छ केलं."
"तुम्हाला समजतंय का बाबा?"
कुसुम डोळे विस्फारून बोलत होती.
"त्याने ताटात काहीही शिल्लक ठेवलं नाही. मोहरीचा एक दाणा सुद्धा नाही."
कुसुमचे आई बाबा कौतुकाने ऐकत होते.
शितावरून भाताची परीक्षा करतात, तशी कुसुमने पापोचाकुकुचि वरून वरपरीक्षा केली होती.
-- गुरूराज बुधकर (२७ ऑक्टोबर २०२४)
https://gomarathi.in/blogs/gururaj-budhkar/papochakukuchi.html
20/10/2024
13/10/2024
Welcome onboard Shashi Samant as a blogger on GoMarathi blogs.
https://gomarathi.in/blogs/shashi-samant/
20/09/2024
Check Kaprekar constant demo on GoMarathi.in
https://gomarathi.in/blogs/gururaj-budhkar/kaprekar-constant.html
07/09/2024
*बाप्पा*
बिंदूच्या पलिकडून नभ वायू अग्नीतून
पाझरतो पाण्यातून उगवतो भूमीतून ।।
मंगलमय भावातून भक्तीमय मनातून
सरावल्या हातातून साकारतो मूर्तीतून ।।
शेंदूराच्या रंगातून दुर्वांच्या गवतातून
जास्वंदी माळांतून हासतो फुलांतून ।।
स्तोत्र मंत्र आरतीतून टाळ वाद्य मृदुंगातून
वाजतो नाचतो मिसळतो गर्दीतून ।।
चंदनाच्या गंधातून लाडू मोदक पेढ्यांतून
सुख घेऊन येतो बाप्पा उंदराच्या गाडीतून ।।
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया ।।
©गुरूराज बुधकर
७ सप्टेंबर २०२४ (गणेश चतुर्थी)
https://gomarathi.in/blogs/gururaj-budhkar/
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Address
Pune