Rohit Rajendra Pawar

Rohit Rajendra Pawar

Share

MLA from Karjat-Jamkhed

Photos from Rohit Rajendra Pawar's post 12/06/2026

अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाला बसल्यापासून या आंदोलनाला भरघोस पाठींबा मिळण्यास सुरवात झालीय. विविध पक्ष, संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेटून विनाअट सरसकट कर्जमाफीसाठी सुरु असलेल्या या अन्नत्याग आंदोलनात जाहीर पाठींबा असल्याचं पत्र दिलं. तसंच वैयक्तिक पाठींबा देणाऱ्यांची संख्या तर मोजता न येणारी आहे. या सर्वांचे मनापासून आभार! आपल्या सर्वांच्या पाठींब्यामुळंच विनाअट सरसकट २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्यास सरकारला भाग पाडू, असा विश्वास आहे.

#अन्नदात्यासाठी_अन्नत्याग
#कर्जवसुली_नकोय_कर्जमाफी_हवीय
#विनाअट_सरसकट_कर्जमाफी

12/06/2026

📍छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंढरपूर
⏭️ 12-06-2026
➡️ अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनातून लाईव्ह

Photos from Office Of Rohit Pawar's post 12/06/2026
Photos from Rohit Rajendra Pawar's post 12/06/2026

शेतकऱ्याचे हात कोणत्याही एका जाती-धर्माचे नाहीत तर मातीत राबणारे सर्व जाती-धर्माचे आहेत. जगाला जगवणाऱ्या या अन्नदात्याला आज जगवण्याची वेळ आलीय आणि त्यासाठीच समता, एकता आणि बंधुतेचं प्रतिक असलेल्या आणि संतांच्या व महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंढरीत विठुरायाच्याच आशीर्वादाने या क्षणापासून माझ्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली…!

|| रामकृष्णहरि ||

Photos from Rohit Rajendra Pawar's post 12/06/2026

अन्नत्याग आंदोलनापूर्वी पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं आणि तमाम वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पवित्र नामदेव पायरीवर माथा टेकून आशीर्वाद घेतले. यावेळी राज्यभरातील शेतकरी बांधव, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

#अन्नदात्यासाठी_अन्नदान_आंदोलन

12/06/2026

📍छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंढरपूर
⏭️ 12-06-2026

➡️ अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनातून लाईव्ह

Photos from Rohit Rajendra Pawar's post 12/06/2026

पंढरपुरात अन्नदात्यासाठीच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी जात असताना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत थोर संत श्री गाडगेबाबा यांच्या मठात जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं आणि आशीर्वाद घेतले.

#अन्नदात्यासाठी_अन्नत्याग #पंढरपूर

Photos from Rohit Rajendra Pawar's post 12/06/2026

पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलनाच्या आजूबाजूने पडदा लावून हे आंदोलन जनतेपर्यंत पोहोचू नये, असा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. खरं म्हणजे पडदा लावायला इथं काही तमाशा सुरु नाही.. उलट सरकारच्या धोरणांमुळं सामान्य माणूस आणि शेतकऱ्याच्याच संसाराचा तमाशा झालाय, मात्र सरकारला याचं काहीही घेणंदेणं नाही, हे दुर्दैव आहे!

#अन्नदात्यासाठी_अन्नत्याग

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Srujan House, Ganeshdatta Co-Operative, SHRUJAN HOUSE, Plot No 10A, HSG Society, Sahakar Nagar, Parvati
Pune
411009