Mandake Fincorp
We are financial services providers of Mutual funds/SIP , Pension plans, Tax saving Products & Life/
We are financial services providers of Mutual funds/SIP , Pension plans, Tax saving Products & Life/Health/Mediclaim Insurance.
21/05/2025
लेखक : प्रीतम मांडके
नुकतीच भारताने पाकिस्तानला युद्धभूमीवर ऑपरेशन "सिंदूर"द्वारे धूळ चारली. भारताशी आगळीक केल्यास याचा परिणाम किती गंभीर होऊ शकतो याची जाणीव शत्रू राष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला झाली.
युद्धाच्या बातम्यांमध्ये काही आर्थिक बाबींशी निगडित महत्त्वाच्या बातम्या या काळात दुर्लक्षित राहिल्या. ज्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने पाकिस्तानला दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी सुमारे दीड अब्ज डॉलर्सचे पॅकेज जाहीर केले त्याचाच भारताबद्दल एक अहवाल प्रस्तुत झाला.
या वर्षाखेर भारतीय अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल तसेच पुढच्या दोन-तीन वर्षांमध्ये जर्मनीला मागे टाकून भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला. ज्या ठिकाणी दहा ते पंधरा अब्ज डॉलरच्या विदेशी चलन गंगाजळीवर पाकिस्तानच्या उड्या मारणं चालू आहे त्या ठिकाणी भारताची विदेश चलन गंगाजळी साठा तब्बल 690 अब्ज डॉलर्सच्या जवळपास पोहोचला. कोरोनानंतर भारत सातत्याने जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला आला. भारताने निषेध नोंदवल्यामुळे पाकिस्तानला कर्ज देताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने तब्बल 50 अटी घातल्या त्याचवेळी ॲप्पल सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतामध्ये आपले आणखी प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहेत.
या योजनेविरोधात नुकताच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ॲप्पल कंपनीला दिलेला इशारा आपल्या सर्वांनी बघितला असेल.
आता याच प्रकारे जर भारत पुढे जात राहिला तर काही काळात एक महासत्ता म्हणून जगभरात भारताचा दबदबा आणखी वाढणार हे निश्चित.
याबाबतीत "थ्री इडीयट्स" सिनेमातला एक डायलॉग आठवतो "दोस्त एक्झाम मे फेल हो गया तो बुरा लगता है लेकिन फर्स्ट आया तो और भी बुरा लगता है "
सध्या भारताच्या बाबतीत हे चालू आहे. वर्षानुवर्षे महासत्ता म्हणून मिरवलेल्या किंवा नुकतेच मागील दशकात महासत्ता म्हणून उदयाला आलेल्या बड्या राष्ट्रांना भारताचे हे यश बघवले जाईलच असे नाही त्यामुळे कधी व्यापार युद्धात तर कधी प्रत्यक्ष रणांगणावर भारत कसा गुंतून पडेल यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहेत. युद्धभूमीवर सपाटून मार खाल्ल्यावर कांगावा करणे ही जशी पाकिस्तानची रणनीती आहे तसेच भारताला अस्थिर ठेवून त्याच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणे ही सध्या जगातील काही बड्या राष्ट्रांची रणनीती आहे. कंगाल पाकिस्तानला गमावण्यासारखे काही नाही परंतु भारताने या सापळ्यात अडकता कामा नये.
भारतातल्या विशेषतः सर्वसामान्य नागरिकांनी भावनेच्या आहारी न जाता भारतीय लष्करावर पूर्ण विश्वास ठेवणे गरजेचे आहे. प्रपोगंडा मेसेज पासून दूर राहून आपली विवेक बुद्धी जागृत ठेवावी. तरच स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत भारताला पुन्हा एकदा विश्वगुरू बनवण्याचे आपले स्वप्न साकार होईल.
लेखक : प्रीतम मांडके
15/05/2025
"Health insurance isn’t just about low premiums — it’s about trusted support when you need it most. Service matters."
Our customer's Health Claims approved by HDFC Health Insurance & Care Health Insurance....
For more information about Health/Life insurance
Contact
Preetam Mandake
098818 76536
21/04/2025
Planning for trip?
Start SIP today itself.
098818 76536
15/04/2025
"मांडके सर, काय जबरदस्त रिटर्न्स मिळाले हो आठवड्याभरात. मला तर वाटतं प्रॉफीट बुक करून टाकू"....
स्वतःच्या मुलांसाठी जवळपास 10 ते 12 वर्ष कालावधी ठरवून म्युच्युअल फंड मध्ये आठवड्यापूर्वी गुंतवणूक सुरु केलेल्या व्यक्तीने मला फोनवर विचारले....©
या व्यक्तीने सहा महिन्यापूर्वी एक फ्लॅट घेतला होता. मी म्हणाल "ठीक आहे हरकत नाही सर, फ्लॅटची व्हॅल्यू एकदा व्हॅल्यूएटरकडे चेक करून घेतली ना? सहा महिन्यात ती पण वाढली असेल".....
उत्तर आले "अहो, सारखं कशाला किंमत बघेन फ्लॅटची पुढच्या पंधरा-वीस वर्षे राहण्यासाठी घेतलाय , लोनचे हप्ते सुरू आहेत एवढ्या लगेच कशाला विकू?
अर्थात मला काय जाणीव करून द्यायची आहे हे या व्यक्तीला समजले. म्युच्युअल फंड ही 100 मीटरची स्प्रिंट रेस नसून मॅरेथॉन आहे प्रत्येक दिवशी पोर्टफोलिओकडे बघून जसे घाबरायचं नसते तसे हुरळून देखील जायचे नसते.©
अर्थात स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता ही स्वतःच ठरवायला लागते मार्केट जोरात आपटले तर काहीजण म्हणतील बाप रे,मार्केट पडले; तर काही म्हणतील बरं झालं आता खालच्या किमतीला इन्व्हेस्ट करण्याची संधी उपलब्ध झाली.
जी इन्व्हेस्टमेंट कितीही वर-खाली झाली तरी तुम्हाला शांत झोप लागेल ती गुंतवणूक तुमच्यासाठी योग्य आहे असा साधारणपणे ठोकताळा असतो आणि त्यानुसारच स्वतःची क्षमता जोखून मगच कुठल्याही असेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करावी....©
लेखक
प्रीतम मांडके
10/04/2025
"बाबा, हे टीव्ही वर असलेले ट्रम्प आजोबा ना?" कुठल्यातरी यू ट्यूब व्हिडिओमध्ये बघितलेली व्यक्ती बातम्यांमध्ये दिसल्यावर माझ्या 5 वर्षाच्या मुलानी विचारले....
सध्या घराघरात जगात चालू असणाऱ्या व्यापार युद्धाच्या बातम्यांच्या चर्चा सुरू आहेत. दिवसागणिक चढणारे आणि कोसळणारे शेअर बाजार याबद्दल सोशल मीडियामुळे लोकांना बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे...
कोणी म्हणतो चीनला याचा फटका बसणार, कोणी म्हणतो युरोपचे काय होणार? तर कोणी म्हणतो भारताचे काय होईल? पण हे व्यापार युद्ध नक्की आहे तरी काय?
दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जगात अमेरिका महासत्ता म्हणून उदयाला आली. भांडवलशाही देश असल्याने साहजिकपणे अमेरिकेने जगभर भांडवलशाहीचा पुरस्कार केला. सुरुवातीला नाईलाजाने काही देशांनी याला अनुमती दिली परंतु मुक्त व्यापार धोरणामुळे आधी जपान आणि नंतर चीन,भारत, कोरिया सारख्या देशांच्या अर्थव्यवस्था नावारूपाला येऊ लागल्या; चीन सारख्या देशाने तर गेल्या काही दशकांमध्ये अमेरिकेला थेट आव्हान दिले...
आता जगात सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून स्थान टिकवण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न चालू आहेत आणि म्हणूनच अमेरिकेने बाहेरून येणाऱ्या वस्तूंवर आयात कर वाढवण्याची भाषा केली. यामध्ये प्रामुख्याने अमेरिकेबाहेर गेलेले उद्योगधंदे अमेरिकेत पुन्हा आणणे हे जरी उद्दिष्ट असले तरी यामुळे अमेरिकेतच मोठी भाव वाढ आणि महागाई पाहायला मिळणार आहे. यामुळे अमेरिका आर्थिक मंदीच्या तडाख्यात सापडेल की काय अशी शक्यता निर्माण झाली. भारतासारख्या देशाला चीन आणि अमेरिकेच्या या व्यापार युद्धात झळ जरूर बसेल परंतु चीनवरील वस्तूंवर कर वाढवल्याने निर्माण झालेल्या पोकळीमध्ये भारताला बाजारपेठ काबीज करण्याची नवीन संधी देखील उपलब्ध होईल.
अमेरिकेच्या अशा या बेभरवशाच्या भूमिकाबदलामुळे युरोपमधील मित्र देश तसेच ऑस्ट्रेलिया सारखे काही देश हे चांगलेच दुखावले गेले त्यामुळे नवीन उदयाला येणारी एक जबाबदार आर्थिक महाशक्ती म्हणून भारताला जगात स्थान बळकटी करण्यासाठी निश्चितच संधी उपलब्ध झाली आहे. आता भारत या संधीचा कसा उपयोग करेल हे येणारा काळच ठरवेल...
लेखक:
प्रीतम मांडके
02/04/2025
We extend our sincere gratitude to our valued clients and wellwishers for their unwavering support throughout the financial year....
02/03/2025
Another feather in the cap for Mandake Fincorp 🙏🙏
Accepting this award from HDFC ERGO Health Insurance🙏🙏
We are thankful for the continued trust and support of our customers and well-wishers...
26/02/2025
#महाशिवरात्री च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
24/02/2025
For more information about Mutual Funds/SIP/insurance contact
098818 76536
29/01/2025
For more information about Mutual Fund/ SIP, insurance get in touch with us...
Contact
Preetam Mandake
9881876536
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Address
A 538 Ideal Park
Pune
411046