Shubham Patil

Shubham Patil

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shubham Patil, Art, Savitribai Phule Pune University, University Road, Ganeshkhind, Pune, Pune.

Photos from Shubham Patil's post 01/08/2022

नमस्कार,

कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी सामुदायिक रेडिओ १०७.४ वर लेखक म्हणून मुलाखत संपन्न झाली.

हा अजून एक वेगळा अनुभव. लेखक म्हणून मुलाखत देण्यासाठी साक्षात पुणे विद्यापीठात जाणे ही माझ्यासारख्या थोडाफार लिहू म्हणणाऱ्या नवीन साहित्यिकासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब होती.

विद्येच्या माहेरी असं सन्मानाचं आमंत्रण येणं सर्वांच्याच नशिबी नसतं, मला ह्या योग्यतेचा समजल्याबद्दल पुणे विद्यापीठ, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ १०७.४ आणि मुलाखतदात्या रोशनी शिंदे यांचे मनापासून आभार..

'कम्युनिटी कट्टा'

या विशेष कार्यक्रमात ऐका माझी मुलाखत आणि लेखक बनण्याचा प्रवास

प्रसारण

मंगळवार, दि. ०२ ऑगस्ट २०२२ सकाळी १०.३० ते ११ या वेळेत बुधवार, दि. ०३ ऑगस्ट २०२२ दुपारी ०३ ते ३.३० या वेळेत

पुनः प्रसारण

लाईव्ह स्ट्रीमिंग ऐकण्यासासाठी डाउनलोड करा, Vidyavani 107.4 FM App.
https://play.google.com/store/apps/details?id=solutions.quartet.vidyavani

Website : https://vidyavani.unipune.ac.in

Photos from Shubham Patil's post 14/01/2022

दोन वर्षं – वाराणसीची

अगदी याच तारखेला, याच शुभमुहूर्तावर सकाळी सात वाजता बहुप्रतीक्षित मेल आला. ज्याची अगदी चातकासारखी वाट बघत होतो. आदल्या रात्री एका नवीन आणि अनामिक आनंदाच्या प्रतीक्षेत अहर्निश जागरण आपसूकच घडले होते !

सकाळी “वाराणसी” प्रकाशित झाल्याचा मेल आला आणि सुरुवात झाली एका वेगळ्या प्रवासाला, ज्याचा रस्ता फार कमी लोकांना सापडतो आणि त्यातल्या त्यात बर्‍याच जणांसाठी हा लवकर संपतो.

तर, दिवसांमगून दिवस जाऊ लागले आणि पुस्तकाबद्दल येणारे अभिप्राय आत्मिविश्वासाच्या एकेक पायर्‍या चढण्यास मदत करू लागले.

हे प्रवासवर्णन लिहिण्याचा किंवा काहीही लिहिण्याचा उद्देश असा की आपण जे अनुभवलं आहे ते इतरांना सांगणे अशी एक प्राथमिक उत्कट भावना असते. काहींना ती व्यक्त करता येते आणि काहींना नाही एवढंच.

रोज ऑफिस संपल्यावर बसची वाट बघत असताना बस येईपर्यंत मिळालेल्या वेळेत थोडं-थोडं करत सुमारे महिन्याभरात वाराणसी संपलं. वाराणसीचं अवघं लिखाण उभ्याने झालं हे या पुस्तकाचं आणखी एक विशेष.

वाराणसीतल्या दिवसांचा वर्तमानकाळ आता भूतकाळ झाला होता आणि वाचताना आपण वर्तमानकाळात जगत आहोत अशी भावना वाचकांच्या मनात निर्माण करण्याचे दायित्व लेखक म्हणून आपसूकच माझ्यावर होते आणि वाचकांच्या अभिप्रायांनी मी जबाबदारी पेलल्याचे लक्षात आणून नवीन उर्मी दिली.

पण मनात कुठेतरी खंत होती की वाराणसीच्या प्रवासवर्णनात बर्‍याचश्या गोष्टी सांगायच्या राहून गेल्या आहेत. किंबहुना पहिलेच पुस्तक असल्यामुळे झाले असेल. मग दुसर्‍या आवृत्तीविषयी ईसाहित्यला विनंती केली आणि लगेचच सकारात्मक प्रतिसाद आला. मग यथावकाश मागच्या संक्रांतीला वाराणसीची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. या पुस्तकालाही वाचकवर्गाचा अतिशय उदंड प्रतिसाद मिळाला आणि लेखक हे नाव मी माझ्या नावापुढे लावू शकतो अशी मुकसंमती वाचकांनी दिली.

“आम्ही तुमच्या सोबत वराणसीत फिरत आहोत असेच वाटत होते.” जवळपास सर्वच अभिप्राय या आशयाचे आहेत. अजूनही अभिप्राय येत असतात.

सध्या Vlogs चा जमाना असल्याने आपल्या ह्या जुन्या पद्धतीच्या साहित्याला कितीसा प्रतिसाद मिळणार अशी धाकधूक होतीच. पण या धाकधुकीवर विजय मिळवण्यास मदत केल्याबद्दल इसहित्य प्रतीष्ठानाचे अतिशय मनापासून आभार. केवळ आपल्यामुळेच हे शक्य झाले आहे.

धन्यवाद,

#लेखक

Photos from Shubham Patil's post 01/01/2022

आणि अनपेक्षितपणे स्वप्नपूर्ती झाली...

एक लेखक म्हणून भरपूर वेगवेगळे अनुभव येत असतात. तुमचे पुस्तक आवडले, आही नायक आहोत असेच वाटत होते, तुमच्यासोबत आम्हीच फिरत आहोत असे वाटत होते, असं सांगणारे शेकडो फोन, मेसेजेस, मेल्स येतात तेव्हा काहीतरी वेगळं केल्याची जाणीव होते. आणि हा आनंद तर प्रत्येकाला अनुभवता येत नाही, या बाबतीत मी खूप नशीबवान आहे. आता मुळ विषयाकडे,

नेहमीप्रमाणे न्यू मनोरंजन वाचनालय, कोथरूड इथे पुस्तक बदलण्यासाठी गेलो होतो. तिथे गेल्यावर मी खरंतर गोंधळून जातो. कोणतं पुस्तक घ्यावं हे लवकर सुचत नाही. एकेक साहित्यिकाचे साहित्य वरचेवर चाळत नंतर ऐतीहासिक, धार्मिक, राजकीय, नवीन पुस्तके या प्रकारात पुस्तक शोधू लागलो. नंतर आत्मचरित्र या प्रकारात पुस्तक शोधत असताना एक पुस्तक दिसले – “श्रवणधारा ”

श्रवणधारा, अरे हे तर माझेच पुस्तक, क्षणभर काही समजलेच नाही. आणि मग एका अनामिक आनंदाने मन भरून गेले.

एका लेखकाने स्वतःचे पुस्तक वाचनालयात बघणे यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो. किंबहुना एखाद्या लेखकासाठी हे काही पुरस्काराशिवाय कमी नसते. या क्षणाची अपेक्षा होती, पण इतक्या अनभिज्ञपणे आणि लवकर येईल ही तीळमात्र असा विचारसुद्धा कधी केला नव्हता.

पुण्यात त्यातल्या त्यात कोथरूडमधल्या वाचनालयात आपले पुस्तक असणे हे म्हणजे खूपच अभिमानाचे झाले.

हे असं काही झालं की वाटतं, हेच ते - ज्याच्याठी आपल्या जगण्याला काहीतरी कारण आहे. मिळवून मिळवावं तर असं, की ज्याच्या नादात जन्मभर रहाता येईल, तीच आपली ओळख बनेल आयुष्याच्या शेवटपर्यंत आणि शेवटानंतरच्या आरंभलासुद्धा...

#लेखक
#लेखन

Photos from Shubham Patil's post 30/10/2021

🎉🎊

23/07/2021

नमस्कार,

आजच्या शुभदिनी माझे प्रकाशित झालेले सहावे पुस्तक (समांतर विश्वावर आधारित विज्ञान कादंबरी) आपल्या हाती देताना मनस्वी आनंद होत आहे.

सहावे पुस्तक प्रकाशित करण्याची संधी आपल्यासारख्या रसिक वाचकांमुळे मिळाली यात तिळमात्र शंका नाही.

अंतराळ हा मानवासाठी कायम कुतूहलाचा विषय राहिला आहे. यात समांतर विश्व हा म्हणजे समस्त खगोलप्रेमींसाठी जिज्ञासेचा विषय आहे. या विषयावर आधारीत प्रस्तुत कादंबरी आहे.

कादंबरी वाचून झाल्यावर अभिप्राय द्यायला विसरू नका. आपला अभिप्राय हा आत्मविश्वासाच्या एकेक पायऱ्या चढायला मदत करत असतो.

माझे आतापर्यंत प्रकाशित सर्व साहित्य मोफत असून आपण इतरांना पाठवू शकता.
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/kaalratra_shubham_patil.pdf

धन्यवाद आणि शुभेच्छा,

शुभम शरद पाटील
२३ जुलै २०२१
(गुरुपौर्णिमा)

Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Art

Address


Savitribai Phule Pune University, University Road, Ganeshkhind, Pune
Pune
411007