Decode India

Decode India

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Decode India, Media/News Company, Pune.

31/01/2024

"मी 'महात्मा' म्हटला गेलो म्हणून माझे वचन प्रमाण आहे असे समजून कोणी चालू नये. महात्मा कोण हे आपल्याला माहीत नाही. म्हणून चांगला मार्ग हा की, महात्म्याचे वचन देखील बुध्दीच्या कसोटीवर घासून घ्यावे आणि ते कसास न उतरल्यास त्याचा त्याग करावा!"
- महात्मा गांधी

29/01/2024

अर्थसंकल्प म्हणजे काय? हे अगदी साध्या, सोप्या भाषेत समजून घेऊयात. अर्थतज्ञ कॉ. अजित अभ्यंकर यांच्याकडून. Center For Holistic Human Development and Research (CHHDR ) यांनी मांडलेल्या 'जनअर्थसंकल्प' कार्यक्रमावेळी कॉ. अजित अभ्यंकर यांनी बजेट विषयी मांडणी केली.

#अर्थसंकल्प

27/01/2024

संसदेत दरवर्षी देशाचा अर्थसंकल्प सादर होतो. प्रत्येक भारतीय माणसाच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या या बजेट विषयी जनतेला काही माहिती असते का? यामध्ये जनतेच्या मुद्द्यांना किती प्राधान्य दिलं जात. यासंदर्भातील चर्चा करण्यासाठी Center for Holistic Human Development and Research च्या वतीने जनअर्थसंकल्प सादर केला जातो. याविषयी या व्हिडिओ मधून समजून घेऊयात.

#जनअर्थसंकल्प #अर्थसंकल्प

20/01/2024

जीवन नव तेज राहो, अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लाभो, मानवाच्या जिवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्य त्या सशांकता
सत्य सुंदर मंगलाची, नित्य हो आराधना
- वसंत बापट

#भारतमाझादेश #भारतमेरादेश

13/01/2024

कोटी कोटी हे बळकट बाहू, समतेचा रथ ओढून नेऊ
आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही
- वसंत बापट
#भारतमाझादेश #भारतमेरादेश

15/10/2023

अंधाना मेट्रो कशी दिसते
15 ऑक्टोबर : व्हाईट केंद्र सेफ्टी डे निमित्त रिना पाटील यांच्या नजरेतून मेट्रोची सैर.

23/09/2023

अबोलांची बोलकी शाळा
कर्णबधीर मुलांची भाषा आपण शिकूयात का?
जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त विशेष स्टोरी

21/09/2023

काय बाय सांगू, कसं गं सांगू?

15/09/2023

रविवार, 24 सप्टेंबर 2023, कास पठार

19/08/2023

special

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Decode India – न उलगडलेल्या भारताच्या शोधात

Decode India हे पर्यायी माध्यमं (Alternative Media) आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांकडून दुर्लक्षित राहिलेल्या किंवा दुर्लक्ष केलेल्या सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्नांवर Decode India च्या माध्यमातून मागील दोन वर्षांपासून काम सुरु आहे. त्यातही विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागांमधील प्रश्नांवर भर अधिक असतो. सोशल मिडीयाच्या युट्यूब, फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सऍप आदी प्रकारच्या व्यासपीठांवरून माहिती प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहचवत असतो.

दोन वर्षात आम्ही एकूण २० सामाजिक विषयांना हाताळण्याचा प्रयत्न केला, आणि व्हिडीओ स्टोरीजच्या माध्यमातून तो लोकांसमोर घेऊन आलो. त्यामध्ये मुख्यतः ऊसतोड मजूर, ऊसतोड मजूरांच्या मुलांचे शिक्षण, कातकरी समाज, ग्रामीण भागातील मुलींचे प्रेम-आकर्षणावरील मुक्त विचार, मासिक पाळी आणि आरोग्य यावरील त्यांची मतं, प्रगतीशील शेतकरी, गावगाड्यात अडकलेले लोणारी आणि होलार समाज, शासनाने १३१४ मराठी शाळा बंद केल्याच्या निर्णयानंतर ग्रामीण भागातील शाळेवर होणार परिणाम, प्रा. हेमा साने – ८० वर्षात एक दिवसही विज न वापरणारी प्राध्यापिका , दरवर्षा मधाच्या शोधात दोन-दोन महिने पुण्यात स्थलांतरीत होऊन येणारा कुर्मी समाज, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आदि विषयांवर आम्ही काम केले आहे. आणखी बरेच विषय आम्ही अभ्यासत आहोत. समाजातील अनेक प्रमुख प्रश्न प्रभाविपणे समाजात यायला हवेत हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

Decode India ने केलेल्या अनेक स्टोरीजचा मुख्य प्रवाहातील माध्यमांकडून पाठपुरावा केला जातो. यातील काही प्रश्नांची शासन दरबारी दखल सुद्धा घेण्यात आली आहे.

उदा.

Address


Pune