Harshad Khandare
I'm an author, cartoonist, photographer, artist, traveler and founder of marathimati.com artist
"आशाबाईंच्या जाण्याने मनाच्या एका कोपऱ्यात जी 'चर्र' ओढली गेली, ती त्यांच्याबद्दलच्या प्रेमाची साक्ष आहे. काही माणसे आपल्या जगण्याचा भाग कधी होतात, हे ते गेल्याशिवाय उमजत नाही.
त्यांचे कर्तृत्व आणि त्यांनी दिलेली माया कायम आपल्यासोबत राहील. ही रुखरुख लागून राहणे, यातच त्यांच्याबद्दलची खरी कृतज्ञता साठवलेली आहे.
आशाबाई, तुमच्या निखळ प्रेमाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आम्ही सदैव ऋणी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली!"
— हर्षद खंदारे (तुमची गाणी ऐकणारा)
02/04/2026
शक्ती, संयम आणि समर्पित बुद्धिमत्तेचा महामेरू: हनुमान
Harshad Khandare
प्रस्तुत लेख मराठीमाती डॉट कॉमचे निर्माते व मुख्य संपादक हर्षद खंदारे यांच्या लेखणीतून साकारलेला, हनुमान जयंतीनिमित्त शक्ती आणि संयमाचा वेध घेणारा विशेष वैचारिक संवाद आहे.
#संपादकीय #निमित्त #मराठीमाती
शक्ती, संयम आणि समर्पित बुद्धिमत्तेचा महामेरू: हनुमान शक्ती, संयम आणि समर्पित बुद्धिमत्तेचा महामेरू: हनुमान. मराठीमाती डॉट कॉमचे मुख्य संपादक हर्षद खंदारे यांचा तरुणा...
12/02/2026
अहंकाराचे निर्वाण - मराठी कविता (हर्षद खंदारे)
नदी आणि समुद्राच्या प्रतिमांमधून अहंकाराच्या विलयनाची सूक्ष्म मांडणी करणारी ही लघुकविता.
#मराठीकविता #मराठीमाती
https://www.marathimati.com/2026/02/ahankarache-nirvan-marathi-kavita.html
08/02/2026
थोडंसं...
https://www.harshadkhandare.com/p/about.html
fans
06/02/2026
या आणि यासम अनंत सदिच्छा—पूर्वी पत्रांतून आणि आज ई-संवादातून—जेव्हा-जेव्हा येतात, तेव्हा आईने माझ्या पहिल्या पहिल्या लिखाणावर, कवितेवर दिलेली ती पहिली कौतुकाची थाप पुन्हा जिवंत होते.
- Harshad Khandare
तंत्रयुगातील झोंबी
‘झोंबी’ हा शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर उभी राहते ती एक अक्राळविक्राळ, बेढब आणि भयावह मनुष्याकृती—जिच्या कृतींना न विचारांचा लगाम असतो, न विवेकाची दिशा. समोर जे दिसेल त्यावर तुटून पडणे, चावा घेणे आणि त्यालाही स्वतःसारख्याच विकृत, अविचारी अवस्थेत ढकलणे—इतकाच काय तो तिच्या अस्तित्वाचा उद्देश. आश्चर्य एवढेच की, आपल्या जातीतीलांवर आघात न करण्याचे एक विकृत औदार्य ती जपताना दिसते.
मात्र बदलत्या जगात या पारंपरिक व्याख्याही हळूहळू बदलत चालल्या आहेत. शरीराऐवजी मनावर, देहाऐवजी आत्म्यावर चावे घेणारे नवे झोंबी आता अवतरले आहेत. हे झोंबी रक्त शोषत नाहीत; ते विवेक शोषतात. निरागस विचारशक्ती बधिर करतात. परीकथांमधील झोंबीपेक्षा हे अधिक सूक्ष्म, अधिक धोकादायक आणि अधिक विकृत आहेत—कारण ते दिसत नाहीत, पण परिणाम घडवतात.
धर्म, सत्ता, पैसा आणि बेगडी पुरुषत्व यांचे बाजारीकरण करताना या झोंबींचे अस्तित्व इतके ठळक होते की, एखाद्या समाजसुधारकालाही लाज वाटावी अशी ती उंची गाठते. या बाजारू भ्रमजाळ्यात अडकणारे बळी काही अज्ञानी नसतात; ते असतात सर्वसामान्य बुद्धिमत्तेचे, मात्र विवेकशील स्त्री-पुरुष. कळपावर हल्ला करताना त्यातील कोवळे, संवेदनशील सावज हेरणे आणि त्यावर नेमकेपणाने झडप घालणे—हा गुण या झोंबींना निसर्गतः लाभलेला असतो, आणि ते तो कुशाग्रतेने वापरतात.
— हर्षद खंदारे
लाल महाल, पुणे
लाल महाल ही पुण्यातील ऐतिहासिक वास्तू असून छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण येथे व्यतीत झाले. १६३० साली शाहाजी राजे भोसले यांनी हा महाल बांधला होता.
व्हिडिओ सौजन्य: हर्षद खंदारे / Harshad Khandare
06/10/2025
मराठीमाती डॉट कॉम हा केवळ “मराठी भाषेचा अभ्यास” नाही,
तर त्या भाषेत दडलेले महाराष्ट्राचे मन, त्याची माती, त्याची संवेदना, आणि त्यातून उमटणारी मानवी मूल्ये — ह्याचा अनुभव घेणे हे आहे.
https://www.marathimati.com/p/harshad-khandare.html
fans
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Address
Pune
15/12/2025