NLP Solapur

NLP Solapur

Share

NLP Solapur is providing education in body mind field & also therapies

02/10/2020

नमस्कार मित्रांनो. आज आपण अंतरमना विषयी जाणून घेऊया. एन एल पी ची मान्यता आहे की दिवसातील आपण सर्व व्यवहार अंतर्मनाच्या दिशेनुसार करत असतो. अंतर्मनात ज्या काही घटना स्मृती म्हणून साठवलेल्या असतात त्याच आपल्याला कार्य करायला भाग पाडत असतात. सहाजिकच अंतर्मनात चांगल्या स्मृतींचा साठा जास्त असेल तर आपले वर्तन त्यानुसार चांगले व आनंददायी होईल परंतु अंतर मनामध्ये नकारात्मक स्मृतींचा साठा जास्त असेल तर आपण सतत बैचेन राहू. एन एल पी मुळे आपण आपल्या नकारात्मक स्मृतींचा दैनंदिन वागण्यावर होणारा परिणाम बहुतांशी कमी करू शकतो. त्याकरिता सब मॉडेलिटी चेंजेस हे तंत्र परिणामकारक सिद्ध होते. तसेच असोसिएट, डिस असोसिएट, डबल डीस असोसिएट ही तंत्रे परिणामकारक ठरतात. आपल्या सर्व आनंददायी मेमरीज या आपण कायमस्वरूपी असोसिएट मोडमध्ये ठेवल्या पाहिजेत. म्हणजेच या स्मृतींची उजळणी जाणीवपूर्वक करताना त्या आत्ता तुमच्यासमोर घडत आहेत . आणि तुम्ही स्वतःच्या डोळ्याने आता बघत आहात असे वाटले पाहिजे. त्याच्याविरुद्ध ज्या नकारात्मक स्मृती आहेत त्याला डिसअसोसिएट करता आलं पाहिजे. म्हणजेच नकारात्मक स्मृती बघताना त्या स्मृतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही बघत आहात ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः त्या प्रसंगात हजर आहात असे तुमच्या मनाच्या डोळ्याने बघितले गेले पाहिजे. डबल डीस असोसिएशन म्हणजे ही व्हिडिओ फिल्म एखाद्या आवडत्या थेटरमध्ये तुमच्या आवडत्या खुर्चीत पन्नास फूट अंतरावर तुम्ही बघत आहात. अर्थात या सर्व गोष्टी सरावाने शक्य होतात. यशस्वी लोक याचा वापर अंतर्मनात द्वारे अजाणतेपणे करत असतात. हे सर्व प्रयोग तुम्हाला शिकायचे असतील तर कृपया माझ्याशी संपर्क करावा ही विनंती.
माधव राखेलकर
एम एल पी कोच व थेरपिस्ट.
९९२३०३२२३१
७०२०१६७१९८

30/09/2020

नमस्कार मित्रांनो काल आपण सिक्स स्टेप रिफ्रेमिंग बघितलं. आज आपण रिफ्रेमिंग चे दोन नवीन प्रकार बघुयात. एक आहे कन्टेन्ट रिफ्रेमिंग. दुसरे आहे कंटेक्स्ट रिफ्रेमिंग. रिफ्रेमिंग हे तंत्र मनाची अवस्था बदलण्या करता वापरले जाते. अर्थातच मनाची चांगली अवस्था कोणी बदलायला जाणार नाही. मनाची बिघडलेली अवस्था बदलणे रिफ्रेमिंग ने शक्य होते. त्याची काही उदाहरणे आपण बघू यात. covid-19 च्या काळामध्ये बऱ्याच जणांच्या व्यवसायाला बाधा आलेली आहे तसेच नोकरीवर गदा आलेली आहे. उदाहरणादाखल रमेश नावाच्या व्यक्तीचा व्यवसाय घटला आहे. व तो निराश अवस्थेत आहे. त्याच्या सुदैवाने त्याला माझ्यासारखा एखादा मित्र असतो जो एन एल पी तज्ञ असतो. रमेश मला सांगतो मित्रा बघ काय दिवस आलेत covid-19 मुळे माझा व्यवसाय घटलेला आहे. काय करावं ते सुचत नाही. मी अत्यंत निराश झालेलो आहे. तेव्हा मी त्याला सांगतो अरे मित्रा covid-19 ला भारतात येऊन सहा महिने होऊन गेले परंतु तुझ्या पूर्वपुण्याई मुळे तुला covid-19 ची बाधा झाली नाही. जान है तो जहान है असे म्हणताच त्याचा चेहरा उजळतो व तो निराश अवस्थेतून बाहेर येतो. हे कंटेक्सट रिफ्रेमिंग चे उदाहरण आहे. एन एल पी ची मान्यता आहे की मनाला चांगल्या अवस्थेत आणण्याकरता लागणारे सर्व रिसोर्सेस आपल्या मनामध्ये असतात परंतु आपल्या विचारांच्या पद्धतीमुळे ते आपल्याला दिसत नसतात. एन एल पी मार्गदर्शक रिफ्रेमिंग द्वारा मनाची अवस्था बदलू शकतो. यशस्वी लोक ही गोष्ट त्यांच्या अवचेतन मनाद्वारे सतत करत असतात. धन्यवाद
माधव राखेलकर
एन एल पी कोच, थेरेपिस्ट.
९९२३०३२२३१
७०२०१६७१९८

29/09/2020

नमस्कार मित्रांनो आज आपण एन एल पी च्या सिक्स स्टेप रिफ्रेमिंग या तंत्राची माहिती घेऊयात. एन एल पी मध्ये एक प्रिसपोझिशन आहे. एवरी बीव्हेअर हेज पॉझिटिव्ह इटेन्शन. म्हणजेच आपली कोणतीही आपणास न आवडणारी कृती याच्यामागे काहीतरी अंतर्मनात सकारात्मक हेतू असतो. सिक्स स्टेप रिफ्रेमींग द्वारे आपल्याला आपली न आवडणारी व वारंवार होणारी कृती थांबवु शकतो.
१ जे वर्तन आपण वारंवार करतो परंतु ते आपल्याला नको असते त्याची निवड करा.
२ एन एल पी मध्ये अशी मान्यता आहे की आपल्या अंतर्मणा मध्ये वेगवेगळे भाग असतात जे वेगवेगळ्या कृती घडवत असतात. जे वर्तन आपल्याला बदलायचे आहे त्या करता एक भाग जबाबदार असतो. त्या भागाला बोलायचे विनंती करायची की आज पावेतो तुझी मला मदत झाली व हे वर्तन मी वारंवार करू शकलो. तसंच त्याला विचारायचे की या वर्तना मागे पॉझिटिव इनटेन्शन काय आहे. तसेच त्या भागाला धन्यवाद द्यायचे.
३ आपल्या अंतर्मनात क्रिएटिव्हिटी करता एक भाग असतो त्याला आमंत्रण द्यायचे व विनंती करायची वरील सदरील वर्तनाला पर्याय म्हणून इतर वर्तन सुचवावेत. किमान तीन वर्तन सुचवावीत अशी विनंती करायची.
४ त्यातील सर्वोत्कृष्ट वर्तन सुचवायचे विनंती क्रिएटिव पार्ट ला करायची.
५ सदर वर्तन जाणिवपुर्वक वापरायला सुरुवात करायचे. ही वापरत असताना अंतर्मनातील इतर भागांना काही ऑब्जेक्शन आहे का हे विचारायचे जर विरोध;असेल तर त्याविरोधात करता परत सिक्स स्टेप रिफ्रेरमिंग करायचे.
६ क्रिएटिव पार्टला धन्यवाद देऊन नवीन वर्तन जाणीवपूर्वक वापरायला सुरुवात करावी.
एन एल पी चे सर्व प्रयोग हे मास्टर प्रॅक्टिशनर च्या मार्गदर्शनाखाली करावेत अथवा प्रॅक्टिशनर अथवा मास्टर प्रॅक्टिसधर चा कोर्स केल्यानंतर करावेत ही विनंती.
धन्यवाद
माधव राखेलकर
एन एल पी मास्टर प्रॅक्टिशनर
९९२३०३२२३१
७०२०१६७१९८

24/08/2020

नमस्कार मित्रांनो. आपण आज आपल्या भोवतालच्या वातावरणाचे ग्रहण कसे करतो त्याची माहिती घेऊयात. आपण आपल्या पंचेंद्रियां द्वारे ज्याला आपण ज्ञानेन्द्रिय असेही म्हणतो त्यांच्याद्वारे माहिती घेत असतो. त्याला एन एल पी मध्ये VAKOG model म्हंटले आहे. त्याचा सविस्तर विस्तार आपण आज पाहू. व्ही म्हणजे व्हिजवल. आपण डोळ्याद्वारे माहिती घेत असतो व ती स्मृतीमध्ये साठवत असतो. स्मृतीमध्ये ती चित्र अथवा दृश्याच्या स्वरुपात साठवली जाते. ज्यामध्ये वेगवेगळे रंग असतात. ए म्हणजे ऑडिटरी. आपण कानाद्वारे वेगवेगळे आवाज ऐकत असतो व त्यांची पण साठवण स्मृतीमध्ये होते. के म्हणजे केंनेस्टेटीक्स. आपण त्वचेद्वारे काही माहिती साठवत असतो. जसे की गरम थंड उबदार अंगावर काटा येणे इत्यादी. ओ म्हणजे ओल्फॅक्टरी. आपण जिभे द्वारे वेगवेगळ्या चवी अनुभवत असतो. आणि शेवटचे जी म्हणजे गष्ट्याटोरी. म्हणजेच आपण घ्राणेंद्रिया द्वारे वेगवेगळे वास अनुभवत असतो. व्यक्तीमत्व बनताना माहिती ग्रहण करण्याकरिता पहिल्या तीन पैकी एक पॅटर्न आपणा मध्ये प्रबळ असतो. परंतु माहिती सादर करण्याकरिता दुसरा पॅटर्न असू शकतो. ग्रहण करण्याच्या पद्धती मुळे व्यक्तिमत्त्वाचे तीन प्रकार बनतात. पहिला विजुअल पर्सन दुसरा ऑडिटरी पर्सन व तिसरा कॅनस्टॅटिक पर्सन. परंतु यशस्वी लोकांमध्ये या तिन्ही प्रकारांमध्ये स्वीच व्हायची क्षमता असते. समोरची व्यक्ती कोणत्या प्रकारची आहे त्याचे अनुमान एन एल पी ने सांगितलेले आहेत. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यात वारंवार चित्र व दृश्याचा उल्लेख होत असेल तसेच रंगांचा उल्लेख होत असेल तर ती विजूवल समजावी. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यात वेगवेगळ्या आवाजा विषयी माहिती असेल तर ती ऑडिटरी समजावी. तर समोरच्या व्यक्ती ने बोलताना भावनांचा उल्लेख केला असेल अथवा समोरच्याला स्पर्श करून बोलत असेल तर ति केनस्टॅटिक समजावी. तुम्हाला जेव्हा समोरच्या व्यक्ती शी रेपो (सुसंवाद) प्रस्थापित करायचा असेल तर ती कोणत्या प्रकारची आहे हे ओळखून त्याच्या मोडलिटी मध्ये तुम्ही बोललात तर संवाद सोप्या पद्धतीने होतो व मैत्रीपूर्ण भावना निर्माण होते. धन्यवाद
माधव राखेलकर
एन एल पी मास्टर प्रॅक्टिशनर
९९२३०३२२३१
७०२०१६७१९८

23/08/2020

नमस्कार मित्रांनो आज आपण एन एल पी च्या सेल्फटॉक या विषयाची माहिती घेऊयात. सेल्फ टॉक म्हणजे स्वतःशी संवाद. आपण सतत कोणतीही कृती करत असू अथवा नसू आपला स्वतःशी संवाद चालूच असतो. हा संवाद सतत सकारात्मक असेल तर ताणतनाव जाणवणार नाहीत. परंतु काही विशिष्ट परिस्थितीमध्ये अथवा व्यक्तींसमोर आपण स्वतःला नकारात्मक बोलत असू तर आपल्याला ताण-तणाव जाणवतोय हे निश्चित. हा नकारात्मक सेल्फ टॉक हा आपल्या अंतर्मनातील द्वंद्वामुळे आलेला आहे. आणि तो मूल्यांमुळे आलेला आहे की धारणांमुळे आलेला आहे हे लक्षात घ्यावे लागेल. एखाद्या प्रसंगा मुळे आपण विचलित होऊन त्यातून काही धडा घेण्याऐवजी आपण त्या प्रसंगाला दोष देण्याचा व पर्यायाने स्वतःला दोष देण्याचा मार्ग अवलंबत असू तर तो नकारात्मक सेल्फ टॉक मध्ये परावर्तित होणार आहे. याबाबतीत मला जगप्रसिद्ध बॉक्सर मोहम्मद अली यांच्या बाबतीत माझे प्रशिक्षक श्री अनिल थॉमस यांनी सांगितलेली गोष्ट आठवते. मोहम्मद अली ची लढत विश्व जेतेपदाकरीता दुसऱ्या एका मोठ्या बॉक्सरशी होते लढत अतिशय अटीतटीची होते परंतु थोड्याशा फरकाने मोहम्मद अली ती लढत हरतो. आणि विजेतेपदाच्या बक्षीस समारंभात तो सर्व प्रेक्षकांसमोर त्याला बजावतो की तुझ्याकडे विजेतेपदाचा बेल्ट आहे परंतु मी चॅम्पियन आहे. आणि त्यानंतर तो सतत स्वतःच्या मनाला बजावतो यु ह्याव बेल्ट बट आय एम दी चॅम्पियन आणि या सेल्फ टाकला तो कठोर परिश्रमाची जोड देतो आणि पुढल्या वर्षी परत त्याच प्रतिस्पर्ध्या समोर तो ताकतीने उभा राहतो व लढत होते. मित्रानो निकाल काय लागला असेल अर्थातच मोहम्मद आली त्या वर्षीचा जगज्जेता होतो .
हे उदाहरण बरेच काही सेल्फ टॉकविषयी सांगून जात. धन्यवाद
माधव राखेलकर
एन एल पी मास्टर प्रॅक्टिशनर
9923032231
7020167198

22/08/2020

नमस्कार मित्रांनो. श्री गणपती आगमनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रत्येकाला आपलं पुढील आयुष्य खूप दीर्घ असावं .सर्व सुख आपल्याला उपभोगायला मिळावीत. मुलं सुना जावई नातवंडे बघायला मिळावीत. त्यांचेही आयुष्य सुखासमाधानाने जावे अशी तीव्र इच्छा असते. परंतु तुमचा जगण्याचा मानसिक भाग ठरवतो कि तुम्ही किती जगणार आहात ते. तुमच्या विचारांचा पॅटर्न तुमची दैनंदिन जीवनशैली ठरवतो. त्याकरता पुढील घटक महत्त्वाचे ठरतात. त्यातील पहिला घटक आहे तुमच्या भावना. लोकांशी व्यवहार करताना तुम्ही तुमच्या भावना प्रगट करता की दाबून ठेवता यावर तुमचा ताण तणाव निर्भर राहतो. भावनांचे व्यवस्थापन कसे करावे हे बर्‍याच जणांना माहित नसते. एन एल पी त्याकरता तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. भावना तुम्हाला विचारांना प्रवृत्त करतात व त्यानंतर तुम्ही वर्तन करता. व त्यानुसार तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते प्राप्त होत. अथवा त्यामध्ये अडचणी निर्माण होतात. त्याकरिता तुम्ही कोणत्या वातावरणात राहत आहात याचेही निरीक्षण करणे गरजेचे आहे. तसेच तुमचे तुमच्या घरातील व्यक्तींशी नातेवाईकांशी तसेच सहकार्‍यांशी व वरिष्ठांशी संबंध कसे आहेत यावर सर्व जीवन निर्भर करते. तुमचा कोणत्या गोष्टीवर विश्वास आहे तुम्ही कोणत्याही घटनेचा अर्थ कसा लावत आहात यावर तुमच्या जीवनाची दिशा ठरत असते. आणि या सर्वांचा परिणाम तुमच्या शरीराच्या सुदृढ पणावर होत असतो. तुम्हाला जर सतत अस्वस्थ वाटत असेल अथवा आजारपणाची भावला असेल तर निश्चितच काही गंभीर चुका तुमच्याकडून घडल्या आहेत याची खात्री बाळगा. एन एल पी या ठिकाणी तुम्हाला मदत करेल. जे लोक सतत उत्साही असतात त्यांचे ब्लड प्रेशर अतिशय नॉर्मल असते तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय उत्तम असते. आणि जीवनाच्या दुरुस्तीची सुरुवात कोणत्याही क्षणापासून करता येते फक्त याकरिता तुम्हाला आतून पूर्ण तहान लागली पाहिजे. प्रसिद्ध भारतीय तत्त्ववेत्ते श्री ओशो रजनीश यांनी त्यांच्या एका भाषणात सांगितले आहे की पाप करायचं असेल तर छोटे-छोटे पाप करू नका खूप मोठे पाप करा जेणेकरून त्यातून उद्भवणाऱ्या पिडेतून तुम्ही सन्मार्गाला लागाल. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वाल्याचा वाल्मिकी ऋषी होणं
धन्यवाद
माधव राखेलकर
एन एल पी कोच आणि थेरपिस्ट
करियर गायडन्स कौन्सिलर.
मेटाफर थैरेपिस्ट.
ई एफ टी हो'पोनोपोनो व
हिलिंग कोड तज्ञ
9923032231
7020167198

18/08/2020

नमस्कार मित्रांनो आजपासून आपण एन एल पी चे प्री सपोझिशन्स समजावून घेऊयात. याला मराठीमध्ये ग्रहीतके अथवा अंतर्मनात रुजवावे लागणारे नियम असे म्हणणे उत्तम राहील. ही ग्रहीतके सर्व यशस्वी महापुरुषांच्या अंतर्मनात त्यांनी जाणीवपूर्वक रुजवलेली असतात. त्यातील एक गृहीतक आपण आज पाहू.
देअर इज नो फेल्युअर ओन्ली फीडबॅक्स. असफलता नावाची कोणतीही गोष्ट नाही . प्रत्येक असफल घटने चे त्रयस्थ नजरेने विश्लेषन केले तर त्यातून कोणती ना कोणती गोष्ट शिकायला मिळते आणि ती जर आपण पुढल्या वेळी टाळली तर आपण यशाच्या एक पाऊस जवळ जाऊ. थॉमस अल्वा एडिसन च फिलामेंट दिवा कसा पेटतो याचं उदाहरण सर्वांना माहिती आहे. असं म्हणतात की थॉमस अल्वा एडिसन ला फिलामेंट दिवा बनवताना बऱ्याच वेळा अपयश आलं आणि त्यांनी ते सकारात्मक घेऊन 999 पद्धती मध्ये फिलामेंट दिवा पेटत नाही असे सांगून ते 999 प्रयोग लोकांना सांगण्याकरता प्रसिद्ध केले व एक हजारावा प्रयोग जगप्रसिद्ध झाला. आताच्या युगात भरपूर ज्ञान मायाजालावर उपलब्ध आहे. त्यामुळे एवढी थांबण्याची चिकाटी आपल्याकडे राहिलेली नाही. तरीपण आपण जर रोज त्या दिवसाची उजळणी दुसऱ्या दिवशी सकाळी केली तर कालची सर्वात मोठी चुक कोणती होती व ती अनावधानाने झालेली आहे की बिहेवियर पॅटर्न चा भाग बनलेली आहे हे समजावून घेणे आवश्यक आहे. त्याकरिता त्रयस्थ नजरेने पाहणारा व समजावून घेणारा जवळचा मित्र अथवा नातेवाईक याची मदत सतत घेणे अथवा एखाद्या चांगल्या व्यवसायिक मनोवैज्ञानिक मार्गदर्शकाची मदत घेणे उत्तम ठरेल. आणि रोज एक याप्रमाणे एका महिन्यात तीस व वर्षात 365 चूका आपण टाळल्या तर यश ही आपल्याकरता वरमाला घालण्यास तयार होईल. चुकांमधून शिका हेच हे प्रिसपोझीशन सांगते. धन्यवाद
माधव राखेलकर
एन एल पी मास्टर प्रॅक्टिशनर,
कोच व थेरपिस्ट
ई एफ टी हिलिंग कोड व
हो'पोनोपोनो तज्ञ
मेटाफर थेरपिस्ट
9923032231,7020167198
कृपया माझ्या एन एल पी सोलापूर या फेसबुक पेजला लाईक व सबस्क्राईब करावे तसेच माझे एन एल पी अंड लॉ ऑफ अट्रॅक्शन या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट व्हावे ही नम्र विनंती धन्यवाद.

17/08/2020

आपल्यातील कर्तृत्व ओळखा /आपलीच आपल्याला नवी ओळख करवून द्या.

*NLP आणि Natural Healing* बाबत माहिती आणि मार्गदर्शन पर ऑनलाईन वेबिनार *दि. २० ऑगस्ट रोजी* सकाळी 11 वाजता आयोजित केला आहे,
इच्छुकांनी स्वतंत्र मेसेज करून आपले सीट बुक करावे.
(बुकिंग रक्कम नाममात्र 50 रु फक्त, गुगल पे अथवा फोन पे)

श्री माधव राखेलकर (NLP Trainer)
+91 99230 32231
आणि
श्री मृगांक डिंगरे (ReiKi Master)
+91 89755 73200

17/08/2020

नमस्कार मित्रांनो काल आपण स्टेट म्हणजेच मनस्थिती ची माहिती घेतली. आज आपण गोल विषयी माहिती घेऊया. ह्याला एन एल पी मध्ये आउटकम असेही म्हणतात. गोल/आउटकम हे smart असावे. स्मार्ट या शब्दाला एक विशिष्ट अर्थ एन एल पी मध्ये आहे. s for specific . आपला गोल ठरवताना तो स्पेसिफिक असावा. व्हेग नसावा. एन एल पी मध्ये गोल सेटिंग हा एक स्वतंत्र विषय आहे. आणि तो आपण आरोग्य आणि संपत्ती निर्मिती या दोन गोष्टी करिता वापरू शकतो. एन एल पी चा वापर तीनच गोष्टी करिता होऊ शकतो ते म्हणजे आरोग्य संपत्ती निर्मिती व नातेसंबंध सुधारणे. आणि या तीन गोष्टीवरच जगाचा डोलारा उभारलेला आहे. आणि तुमचं स्वतः च स्वतःची नातं कसं आहे त्यावरचं बाहेरचं जग आवलंबून आहे. तर परत आपण गोल सेटिंग या विषयाकडे वळूयात. गोल सेटिंग मध्ये स्पेसिफिक म्हणजे काय ते उरलेल्या 4 वर्णांचा विस्तार बघितल्यानंतर आपण समजावून घेऊ.
एम फोर मेजरलेबल. म्हणजेच गोल सेटिंग करताना तो आकड्यांमध्ये मोजता आला पाहिजे. ए म्हणजे अच्छी व्हेबल. म्हणजेच तो अच्छीव्ह करता आला पाहिजे. आर म्हणजे रियलास्टिक. म्हणजेच तो वास्तववादी असावा. आणि शेवटी टी चा अर्थ आहे टाईम बाउंड. आता आपण गोल् सेटिंग चे उदाहरण बघूया. आज जगात बहुसंख्य लोक वजन वाढलेल्या अवस्थेत जगत आहेत. आणि वजन कमी करू इच्छिणाऱ्यांची संख्या भरपूर मोठी आहे आणि तो एक मोठा व्यापाराचा हिस्सा झालेला आहे. तर त्याकरता वजन कमी करायचे गोल सेटिंग आपण घेऊयात. एन एल पी चारच गोष्टीवर आधारलेली आहे. त्या म्हणजे तुम्हाला काय हवे आहे ते आउटकम. तर वजन कमी करण्याकरिता तुम्हाला तुमचे वजन किती हवे आहे हे ठरवावे लागेल. साधारणतः तुमच्या उंचीच्या सेंटिमीटर्स मधून 100 वजा केले की तुमची आदर्श उंची ठरते. म्हणजेच एखाद्या ची उंची 170 सेंटिमीटर असेल तर 70 किलो हे त्याचे आदर्श वजन ठरते. एन एल पी मध्ये दुसरा महत्त्वाचा घटक आहे प्रेझेंट पॉझीशन. तुमचे आजचे वजन किती आहेत. समजा ते 80 किलो आहे तर दहा किलो वजन तुम्हाला कमी करायचे आहे. हे स्पेसिफिक झाले मेजरेबल झाले
वास्तववादी जगाशी निगडित आहे म्हणजेच रीयलास्टीक आहे. आता ह्याच्या मध्ये एक गोष्ट ऍड करायची आहे ती म्हणजे वेळ. आपण या करता एक वर्षाचा कालावधी ठरवूया. म्हणजेच 17 ऑगस्ट 21. आता हे टाईम बाउंड झाले. म्हणजेच हा गोल स्मार्ट झाला. तुमचे प्रेसेंट पोझिशन व आउटकम ठरले. आता आवश्यकता आहे रिसोर्सेस व स्ट्रेटजी ची. त्याकरिता रिसोर्सेस म्हणजे तुमच्याकडे असणारा खाद्यपदार्थांचा साठा व व्यायामा करिता लागणारे साहित्य अथवा जागा. आणि स्ट्रटजी मध्ये लागणारे घटक म्हणजे तुमचा मेटाबोलिजम रेट आणि तुम्हाला किती आहार घ्यावा लागणार आहे त्याची माहिती व किती वेळ व्यायाम करावा लागणार आहे आणि त्यानंतर किती उष्मांक जळणार आहेत त्याची माहिती. या सर्व गोष्टींचा मेळ घालून त्याला बाराने भागले तर तुमचा महिन्याचा चार्ट तयार होईल व तीसने भागले की तुमचा दिवसाचा चार्ट तयार होईल. दर महिन्याला अंदाजे 900 ग्राम वजन कमी होऊ लागले तर तुम्ही योग्य दिशेने जात आहात. याला एल पी मध्ये फीडबॅक हा शब्द वापरलेला आहे. आणि हे सर्व साध्य करण्याकरिता तुम्ही जर तुमचा आवडता या विषयातील रोल मॉडेल निवडला तर दुधात साखर .धन्यवाद
माधव राखेलकर
एन एल पी मास्टर प्रॅक्टिशनर कोच व थेरपिस्ट
ई एफ टी हिलिंग कोड हो'पोनोपोनो तज्ञ
मेटाफर थेरपिस्ट.
9923032231
7020167198

16/08/2020

नमस्कार मित्रांनो आज आपण एन एल पी मधील स्टेट वर्सेस गोल याची माहिती घेऊयात. एन एल पी मध्ये स्टेट हा शब्द मानसिक अवस्थे करता वापरलेला आहे. आपल्या मनाच्या दोन अवस्था असतात. एक आहे रिसॉर्र्सफुल स्टेट ऑफ माइन्ड ज्याला मराठीमध्ये चांगली मनस्थिती म्हटले जाते. दुसरी आहे अंनरिसोर्स फुल स्टेट ऑफ माईंड. याला मराठीमध्ये बिघडलेली मनस्थिती असे म्हटले जाते. आणि हे आपण सतत अनुभवत असतो. ही मनस्थिती ठरवण्याला आपलं मोडेल ऑफ वर्ल्ड जबाबदार असत. आपले स्वतःचे मनातील जग जबाबदार असते. ज्यामध्ये काही अन हेल्दी बिलिफ्स आपल्या मध्ये वर्षानुवर्षे पडून असतात. आपण आज पर्यंत आपल्या मनालाआपल्या अनुभवातून काही गोष्टीसांगितलेल्या असतात.
आपल्याकरता त्या लाभदायी नसतात. याला एन एल पी मध्ये अन हेल्दी बिलिफ् असे म्हटले आहे. याला मराठीमध्ये अंतर्मनातील नकारात्मक धारणा असा शब्दप्रयोग आपण करू शकतो. ह्या नकारात्मक धारणा आपल्या जवळच्या व्यक्तींनी जसे की पालकांनी शिक्षकांनी मित्रांनी व समाजातील इतर घटकांनी आपल्यामध्ये रुजवलेल्या असतात. व आपलं अंतर्मन त्याला खरं म्हणून चालत असतं. तसेच काही चांगल्या धारणा पण आपल्या अंतर्मणा मध्ये असतात. हातघाईच्या क्षणी आपली धारणा कोणत्या प्रकारची अंतर्मनातून बाहेर येते त्याप्रमाणे आपले वर्तन घडत असते. या चांगल्या किंवा वाईट धारणा बनत असताना आपल्या जीवन मूल्यां चा महत्त्वाचा सहभाग असतो. आपल्या जीवनमूल्यांचा योग्य क्रम आपणास लावण्याकरिता एन एल पी आपल्याला
मदत करते. एन एल पी ची खासियत अशी आहे की आपल्या अंतर्मनातील प्रोग्राम आपण चुटकीसरशी बदलू शकतो. ज्या गोष्टींना बरे करण्याकरिता मानस उपचाराद्वारे वर्षानुवर्षे लागायची त्या गोष्टींना एन एल पी च्या माध्यमातून एका किंवा दुसऱ्या सिटिंग मध्ये चांगला अनुभव येऊ लागतो. तर आपल हे मोडेल ऑफ वर्ल्ड आणि अन हेल्दी बिलिप्स चा मॅप आपण जर सुधारत गेलो तर जीवन सुसह्य व्हायला सुरुवात होते. धन्यवाद
माधव राखेलकर
एन एल पी कोच , मास्टर प्रॅक्टिशनर, थेरेपिस्ट
मेटाफर थेरपिस्ट
९९२३०३२२३१
७०२०१६७१९८

11/08/2020

नमस्कार मित्रांनो.NLP च्या या अद्भुत जगात पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो NLP चा लॉंग फॉर्म आहे Neuro linguistic programming. काल आपण बघितलं की NLP कशा पद्धतीने जन्माला आली. त्यामागची प्रेरणा पण काल आपण बघितली. डॉक्टर रिचर्ड बॅन्डलर डॉक्टर जॉन ग्रिन्डर यांनी तीन महान व्यक्तींचा अभ्यास केला. हे तिन्ही लोक मनाशी संबंधित उपचार पद्धती शी जोडले गेलेले होते. या तिघांचाही काम करण्याचा ढाचा एकाच प्रकारचा होता
त्यांची नावे डॉक्टर मिल्टन इरीक्सन फ्रीट्ज पल्स आणि वर्रजीनीया सटायर. याच बरोबर बेंडलर व ग्रिंडर यांनी ग्रैग्री बेटसन या महान शास्त्रज्ञाचा पण अभ्यास केला. बॅन्डलर व ग्रिंडर यांनी नवीन उपचार पद्धतीच केंद्र या तिघांच्या कार्यालया जवळच चालू केले. सहाजिकच गर्दीचा ओघ वाढू लागला. मग या दोघांनी त्या तिघांची भेट घेऊन त्यांनी जो काही अभ्यास केला होता तो त्याना दाखवला . त्या तिघांनाही त्यांची स्वतःची काम करण्याची पद्धत अशा पद्धतीने एका योग्य भाषे मध्ये व ढाच्यामध्ये बसवलेली बघून अतिशय आनंद झाला. त्याला या तिघांनी मान्यता दिली. त्यानंतर NLP वेगाने फोफावत जाऊ लागली. मला वाटते एवढी प्रस्तावना पुरेशी आहे.
मानवी मनाचा सखोल अभ्यास एन एल पी एवढा कोठेच झाला नाही. मानवी वर्तन हे कशाप्रकारे सर्वोत्कृष्टते कडे नेले जाऊ शकते हे एन एल पी आपल्याला शिकवते. आपल्या सर्वांच्याच जीवनात काही आदर्श व्यक्तिमत्व असतात. ज्यांचा आपल्यावर अतिशय प्रभाव असतो. त्यांचा सिस्टिमॅटिक अभ्यास NLP च्या माध्यमातून आपण करून त्यांच्यासारखंच जीवन आपण प्राप्त करून घेऊ शकतो. मग ते आरोग्याच्या क्षेत्रात असेल, संपत्ती निर्माण करण्याच्या क्षेत्रात असेल किंवा सामाजिक अथवा अध्यात्मिक क्षेत्रात असेल. एन एल पी हे स्वहित साधण्याचे अत्यंत प्रभावी मॉडेल आहे. ज्यांची अशी धारणा आहे की आम्ही आमच आयुष्य अतिशय आनंदाने व उत्साहाने जगत आहोत त्यांनी एन एल पी चे नियम त्यांच्या अंतर्मनात अगोदरपासून आहेत असे समजावे. आणि ज्यांना असे वाटते की माझ्या मध्ये सुधारणेला वाव आहे त्यांनी तिचा अभ्यास आवर्जून करावा अशी माझी विनंती आहे धन्यवाद
माधव राखेलकर
9923032231
7020167198

13/07/2020

नमस्कार दोस्तो आज हम पॅरंट इगो स्टेट के बारे मे बात करेंगे. इस इगो स्टेट मे बच्चे के जनम से लेकर 5 साल तक जो कमांड उसके मा बाप बच्चे को देते है भले वो सही हो या ना हो लेकिन वह बच्चा सही मानकर चलता है. उदाहरण के तौर पर बुरा बोलना नही चाहिये, झूट बोलना नही चाहिये, चोरी करनी नही चाहिये सब्जी फल खाना अच्छा है. दुसरे के कपडे नही पहनना चाहिये इत्यादी. लेकिन बच्चा जब देखता है की पालक बताते एक है और करते एक है तो वो इस दोगलापन से परेशान हो जाता है. लेकिन एक छोटा बच्चा सवाल भी नही खडा कर सकता है. ये जो सब घटनाये का वो जो अर्थ लगाता है और उसे आपले अंतर्मन मे स्थापित करत है. यही सब धारणाये उसके बाद के जीवन में प्रतिबिंबित होती है. इसी को प्यारंट इगो स्टेट कहा गया है. शुक्रिया
माधव राखेलकर
9923032231
7020167198

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Baner
Pune
411045