Car Driver Association pune
we provide car drivers & driving training instratctors
02/01/2024
भारतातील प्रत्येक व्यक्तीबरोबर ट्रकचा कधी ना कधीतरी संबंध आलेला असतोच.
कोणतीतरी एखादी तरी वस्तू ट्रकमधूनच येते.
ट्रकडायवर हा पेशा रिस्की असतो. घरातून पंधरा दिवस महिनाभर तो बाहेर असतो. आणि पगार म्हणाल तर त्याच्या मानाने अत्यल्प असतो.
घरापासून अनेक दिवस बाहेर असतो.
बाकीच्या तुमच्या हाफीसातील ड्युटीवर तुम्ही डुलकी मारू शकता, टंगळमंगळ करू शकता पण ड्रायवर हा पेशा असा आहे की तिथं सेकंदाच्या शंभराव्या भागाला सुद्धा अलर्ट राहावं लागतं.
अपघात हे अपघात असतात. जाणूनबुजून कुणालाही कुणी मारायचं धाडस करत नाही. नजरचुकीने अपघात घडतात त्याला पुर्वी दोन वर्षे शिक्षा होती.
आता अमितभाईंनी ती शिक्षा १० वर्षांवर नेली. मूळात अशी काही जरूरत नव्हती. ट्रकडायवर होणे हीच तशी एक मोठी शिक्षा आहे. त्यावर अमितभाईंनी आणलेला कायदा म्हणजे नरकात जन्माला एखादा जाणार असेल तर तो भारतात ट्रकडायवर होईल अशी परिस्थिती करून ठेवली आहे.
ट्रकचा अपघात झाला की, पुढे असणारा वाहनधारक शक्यतो वाचत नाही तो मरतोच. मात्र अशावेळी मॉब असा काही खवळतो की ट्रकडायवरचा जीव घेऊनच तो शांत होतो.
त्यामुळे डायवरला तिथून पळून जाण्याशिवाय काही पर्याय राहत नाही. मग ही केस हिट अँन्ड रनची होते.
दहा वर्षाची सजा ही अत्यंत घाणेरडी गोष्ट आहे. अशाने ड्रायवर व्हायला कुणीही धजावणार नाहीत. सरकारने असला उंडगेपणा करण्यापेक्षा चांगले रस्ते, दिशादर्शक फलक, रस्त्यावर व्यवस्थित पट्टे, डिव्हायडर, काम चालू असते तिथे रिफ्लेक्टर आदी गोष्टी नीट केल्या तर अपघात कमी होतील.
सरकारच्या चुकीमुळे हजारो अपघात होतात मग रस्ते वाहतूक मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षाच द्यायला हवी.
सरकारने हा जुलमी कायदा माघारी घेऊन दोनच वर्षांची शिक्षा कायम ठेवावी. आणि भारतातील सर्वात रिस्की धंद्याला न्याय द्यावा अन्यथा येणाऱ्या काळात कुणीच ड्रायवर पेशा स्विकारणार नाही.
सुज्ञ नागरिकांनीही ट्रकडायवरच्या संपास पाठिंबा द्यावा.
- Narade
07/12/2021
जर तुम्ही कोविड व्हक्सीनचे दोन डोस घेतले असतील तर...
विमान प्रवास , लोकल प्रवास , आंतरराष्ट्रीय प्रवास, इतर स्टेट अडव्हर्जरी नुसार पास बंधनकारक करण्यात आलेला आहे तो कसा काढायचा?
युनिव्हर्सल ट्रायव्हल पास कसा काढायचा?
सुरुवातीला तुम्ही http://epassmsdma.mahait.org या वेबसाईटवर जा. त्यानंतर तुम्हाला citizens हा पर्याय निवडा. आता ‘universal pass for double vaccinated citizens’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आपण कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करताना जो मोबाईल क्रमांक नमूद केलेला आहे, तो क्रमांक दिलेल्या पर्यायात टाकावा. त्यानंतर तत्काळ या रजिस्टर मोबाईलवर ओटीपी अर्थात One Time Password एसएमएसद्वारे प्राप्त होईल.
हा ओटीपी नमूद केल्यावर तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल क्रमांक समोर दिसेल. सर्व तपशील योग्य असल्याची खात्री झाल्यावर जनरेट पास (Genrate Pass) या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या दोन्ही कोविड लसींचा तपशील (लस घेतल्याची तारीख, वेळ) तुम्हाला दिसेल. तिथे सेल्फ इमेज Self image हा पर्याय असेल. तिथे तुम्ही स्वतःचा सेल्फी किंवा गॅलरीतून एखादा फोटो अपलोड करू शकता.
हे सर्व झाल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ई-पास जनरेट झाल्याचा एसएमएस येईल. या मॅसेजमधील लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा युनिव्हर्सल पास डाऊनलोड download करू शकता.
------ सुनील गंभीरे
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4613502725410506&id=100002524728159
11/11/2021
पुणे आणि परिसराची वाहतूक कोंडी 'अशी' फुटू शकेल! पायाभूत सुविधा, भौतिक सुविधा, आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असलेली बहुतेक साधने पुण्यामध्ये मुबलक प्रमाणात आहेत. pune city ...
25/09/2021
Driving License | खुशखबर ! जर मोबाइलमध्ये असेल डॉक्यूमेंट्सची कॉपी तर Driving License | केंद्र सरकारने देशभरातील कोट्यवधी वाहन चालकांना दिलासा (Driving License) देत आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. सरकारन...
10/08/2020
पावसात कार बुडाली तर इन्श्युरन्स क्लेम कसा मिळवाल ? गेले दोन दिवस पडणार्या पावसाने अनेक गावात -शहरात पूर आला आहे. शहरात अनेक नव्या वसाहतीत पाणी साचल्याने बर्याचजण.....
08/07/2020
Do you know your rights as a in the city? Do you feel you, your family, children and elderly alike deserve safe walking spaces in the city? Join this short course to channel these concerns into a result oriented effort to bring about change! Lets move beyond complaining and towards changing through education and advocacy. Sign up TODAY!!!
https://bit.ly/3guyE0z
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pune Solapur Road Hadapsar Pune
Pune