Pune Rheumatology Center
Dedicated to raising awareness of rheumatic diseases. PRINCIPLES OF CARE
Dr Patil’s practice is based on keeping professional knowledge and skills up to date.
Dr Pravin Patil has completed 5 years training in Rheumatology from the UK and has extensive experience in the modern treatment of rheumatic disorders. He believes in patient education and involves his patients in making decisions about their treatment. Dr Patil treats more than 200 different health problems that affect the joints, bones, muscles and other internal organs (e.g. kidneys, lungs, blood vessels, brain). INTERESTS:
Use of innovation and technology to bridge rural and urban healthcare gap, social media, medical writing, speaking, consultancy. DR PATIL’S AREAS OF EXPERTISE:
• Auto-immune rheumatic diseases
• Osteoporosis
• Non surgical management of osteoarthritis
• New therapies for rheumatoid arthritis
• Lupus (SLE)
• Paediatric and adolescent rheumatology
• Pregnancy related rheumatic diseases
• Vasculitis
• Musculoskeletal ultrasonography
• Inflammatory back pain
• Gout
• Joint injections
15/09/2026
🙏 ॐ गं गणपतये नमः 🙏
We welcomed Lord Ganesha at Pune Rheumatology Center with devotion, joy and gratitude. 🪔🌺
May Lord Ganesha bless everyone with good health, happiness, wisdom and prosperity.
गणपती बाप्पा मोरया! 🙏
#बाप्पामोरया
14/09/2026
“एक बूंद आंसू की कीमत तुम क्या जानो...!”
अरे, आमच्या Sjögren's च्या warriors ना विचारा!
रुग्णाच्या डोळ्यात अश्रू बघून डॉक्टरला आनंद होईल, असं कधी ऐकलंय का?
आमच्या Sjögren's warriors ना मात्र याचं महत्त्व चांगलंच माहीत आहे.
कारण Sjögren's वर उपचार करताना अश्रूंची किंमत नव्याने कळते!
माझी ४५ वर्षांची एक पेशंट. त्यांना Sjögren's disease आहे.
हा एक autoimmune आजार आहे, ज्यामध्ये आपलीच प्रतिकारशक्ती शरीरावर हल्ला करते. त्यामुळे डोळे आणि तोंडात प्रचंड कोरडेपणा येतो.
इतका की मन भरून आलं, तरी डोळ्यातून पाणीच येत नाही!
काही दिवसांच्या उपचारांनंतर त्या परवा OPD मध्ये आल्या आणि सहज म्हणाल्या,
“डॉक्टर, काल रडताना डोळ्यातून पाणी आलं हो!”
आणि मी एकदम खुश झालो!
कारण तिच्यासाठी तो फक्त एक थेंब नव्हता.
तो तिच्या डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतोय, याची छोटीशी पण महत्त्वाची पावती होती.
आणि माझ्या मनात एकच filmy dialogue आला...
“मेरे पास tears हैं!” 💧
Sjögren’s मध्ये हे ऐकायला मिळणं म्हणजे डॉक्टरसाठी मोठी बातमी!
Sjögren’s शिकवलं एक गोष्ट…
प्रत्येक अश्रू दुःखाचा नसतो; काही अश्रू बरे होत असल्याची खूण असतात.
जर तुम्हाला वर्षानुवर्षे
• डोळे सतत कोरडे किंवा किरकिरी होणे
• तोंड सारखं कोरडं पडणे
• कायम थकवा आणि सांधेदुखी
असा त्रास होत असेल, तर “उन्हामुळे होतंय” म्हणून दुर्लक्ष करू नका.
एकदा Rheumatologist चा सल्ला नक्की घ्या.
07/09/2026
“तुम्ही रोज व्यायाम करता, healthy खाता आणि तरीही RA (आमवात) होऊ शकतो?”
हो.
आणि कदाचित हीच गोष्ट अनेकांना समजायला हवी.
काही दिवसांपूर्वीच ओपीडीत ४० वर्षांच्या एक महिला. रोज योगा, strength training, रविवारी रनिंग. घरचं संतुलित जेवण, वजन प्रमाणात, कोणतंही व्यसन नाही. तरी गेल्या काही महिन्यांपासून बोटांचे छोटे सांधे सुजलेले, सकाळी ४५ मिनिटं बोटं आखडलेली राहतात.
तपासणीत Rheumatoid Arthritis निघालं.
त्यांचा प्रश्न साहजिक होता - “इतकी शिस्त पाळूनही माझ्याच शरीराने माझ्यावर हल्ला का केला?”
आपण मनात एक समीकरण बनवतो - व्यायाम + चांगला आहार = आजार होणारच नाही. RA या समीकरणात बसत नाही.
RA हा जीवनशैलीचा आजार नाही.
हा ऑटोइम्यून आजार आहे. म्हणजे आपलीच रोगप्रतिकारक शक्ती गोंधळते आणि आपल्याच सांध्याच्या आवरणावर हल्ला करते. त्यामुळे तुम्ही किती धावता किंवा काय खाता याच्याशी त्याचा थेट संबंध नाही.
म्हणूनच तो कोणालाही होऊ शकतो. अगदी ५-६ वर्षांच्या मुलांनाही Juvenile Inflammatory Arthritis होतो. त्यांनी काय जीवनशैली बिघडवली असते?
RA टाळता येत नाही. पण त्याची तीव्रता नक्की कमी ठेवता येते.
मग चांगली जीवनशैली व्यर्थ आहे का?
अजिबात नाही.
समजा दोन व्यक्तींना RA आहे. एक पूर्ण निष्क्रिय आणि दुसरी नियमित व्यायाम करणारी. दोघींनाही उपचार लागणारच, पण दुसऱ्या व्यक्तीमध्ये थकवा कमी असेल, औषधांना प्रतिसाद चांगला मिळेल आणि सांधे वाचण्याची शक्यता जास्त असेल.
व्यायाम RA ला अडवू शकत नाही, पण RA सोबत चांगलं जगण्याची ताकद देतो.
सगळ्यात धोकादायक पाऊल - उपचार लांबवणे.
अनेकजणांना वाटतं “औषध म्हणजे माझ्या शिस्तीचा पराभव.” म्हणून त्या डाएट आणखी कडक करतात, हळद-गुळवेल-काढे घेत राहतात आणि औषधं पुढे ढकलतात.
इथेच वेळ निसटतो. RA मध्ये पहिले ३-६ महिने हा ‘Window of Opportunity’ असतो. या काळात योग्य उपचार सुरू न झाल्यास सुज हळूहळू हाड कुरतडते. एकदा हाडाची झीज झाली की ती परत भरून येत नाही.
व्यायामाने किंवा आहाराने ही आतली सूज विझत नाही. त्यासाठी आधुनिक औषधोपचारच लागतात.
औषधाची गरज पडणं म्हणजे तुम्ही कमी पडलात असं नाही, तर तुमच्या शिस्तीला मिळालेली वैद्यकीय जोड आहे.
शेवटी मी त्यांना एवढंच सांगितलं - “तुम्ही जे करता ते बंद करू नका, ते सुरूच ठेवा. ती तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे. फक्त त्यासोबत वेळेवर तपासणी आणि उपचारही जोडा.”
आरोग्य म्हणजे कधीच आजारी न पडणं नव्हे, तर आजार आल्यावर त्याला तोंड देण्यासाठी शरीराला शक्य तितकं तयार ठेवणं.
Healthy lifestyle is not a shield against RA.
But it can be a powerful ally when you have RA.
खालील लक्षणे असतील तर संधिवाततज्ज्ञांचा (Rheumatologist) सल्ला घ्या:
१. हाता किंवा पायांच्या छोट्या सांध्यांमध्ये दुखणे किंवा सूज
२. सकाळी उठल्यावर किंवा काही वेळ न हालचाल केल्यावर सांधे आखडणे, जे हालचाल केल्यावर थोडे मोकळे वाटणे
३. मूठ घट्ट बंद न होणे, बरणीचे झाकण उघडणे किंवा कणिक मळणे यासारख्या रोजच्या कामात अडचण येणे
#आमवात #सांधेदुखी
31/08/2026
जगातल्या महान Cricketer च्या बॅटमधूनही रोज शतक निघत नाही, तसंच डॉक्टर म्हणून आमच्याही वाट्याला रोज यश येत नाही. पण मला मनापासून वाटतं, की आम्ही बहुतेक दिवस जिंकत असतो. आणि जेव्हा जिंकतो, तेव्हा त्यातून मिळणारं समाध हे अवर्णनीय असतो.
एक महिला रुग्ण... गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची केदारनाथला जाण्याची तीव्र इच्छा होती. पण संधिवातामुळे (Rheumatoid Arthritis) एक पाऊलही पुढे पडत नव्हते, मनात सतत भीती असायची. योग्य उपचारांनंतर आजार नियंत्रणात आला आणि त्यांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला. त्या केदारनाथ यात्रा पूर्ण करून सुरक्षित परतल्या! प्रवासाहून परत आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा तो कृतार्थ आनंद कोणत्याही रक्त तपासणीच्या रिपोर्टपेक्षा बरंच काही सांगून जात होता.
तसाच एक तरुण मुलगा... मणक्यांचा संधिवात - ॲन्किलोजिंग स्पॉन्डिलायटिसचा (Ankylosing Spondylitis) त्रास असलेला. अवघ्या तीन महिन्यांवर त्याची महत्त्वाची परीक्षा होती. त्याची एकच साधी मागणी होती - "डॉक्टर, मला परीक्षेत सलग काही तास न थांबता लिहिता आलं पाहिजे."
काही दिवसांपूर्वीच तो पेढ्यांचा बॉक्स घेऊन क्लिनिकमध्ये आला... त्याची परीक्षा उत्तम झाली होती!
आणि एक आई... ज्यांना आपल्या मुलीच्या बाळंतपणात तिच्यासोबत राहायचं होतं, नातीचा सांभाळ करायचा होता. दोन महिने त्यांनी मुलगी आणि नातीची मनापासून सेवा केली. त्या दोघी घरी परतल्यानंतर जेव्हा त्या मला भेटायला आल्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान ओसंडून वाहत होतं. संधिवात त्यांच्या या आनंदाच्या आड आला नाही.
एक डॉक्टर म्हणून काम करताना हेच ते क्षण असतात, जे मनात खोलवर समाधान देऊन जातात.
वैद्यकीय जगतात आपण नेहमी 'ट्रीट-टू-टारगेट' (Treat-to-Target) बद्दल बोलतो — लॅब रिपोर्ट्स, सूज आणि रक्तातील आकडे नियंत्रणात आणण्यावर भर देतो.
पण त्यासोबतच तितकाच महत्त्वाचा एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे -
"रुग्णाच्या आयुष्यात नक्की कोणतं ध्येय महत्त्वाचं आहे?"
'ट्रीट-टू-टारगेट'मुळे आजारावर नियंत्रण मिळवता येतं, हे खरं आहे.
पण रुग्णाचं ध्येय (Goal-Based Treatment) आपल्याला हे सांगतं की, आपण हे नियंत्रण नक्की कशासाठी मिळवत आहोत!
जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र येतात, तिथेच सर्वोत्तम उपचार घडतात.
कारण वैद्यकीय उपचारांचं सर्वात सुंदर आणि अर्थपूर्ण फळ कोणत्याही लॅब रिपोर्टमध्ये नसतं, तर रुग्णाला त्याच्या आयुष्यात पुन्हा काय करता आलं, यामध्ये असतं.
भारतात डॉक्टर आणि रुग्णांमधलं नातं आता पहिल्यासारखं राहिलं नाहीये, असं आपण नेहमीच ऐकतो.
आणि खरंच, नकारात्मक किंवा वाईट गोष्टी व्हॉट्सॲपच्या वेगाने पसरतात; पण चांगल्या गोष्टी मात्र क्लिनिकच्या चौकटीबाहेर क्वचितच पडतात. कदाचित म्हणूनच की काय, सगळीकडे फक्त नकारात्मकताच दिसतेय असं वाटत राहतं.
कालचीच गोष्ट, आमच्याकडे नियमित येणाऱ्या आम वाताच्या (Rheumatoid Arthritis) एक महिला रुग्ण क्लिनिकमध्ये आल्या, त्यांच्या हातात पेढ्यांचा बॉक्स होता.
गेल्या दोन पाहिले दोन वर्षांपासून त्यांची तब्येत एकदम उत्तम आहे. (याचं श्रेय अर्थातच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या त्यांच्या रुमॅटॉलॉजिस्टला देऊ शकता! :)
त्यामुळे मला थोडं नवल वाटलं. वैद्यकीयदृष्ट्या तर असं काही नवीन घडलं नव्हतं. त्यांचं वय ४८ आहे, त्यामुळे एखाद्या तरुण ल्युपस (Lupus) रुग्णाकडून ऐकायला मिळते तशी 'गुड न्यूज' असण्याची शक्यताही नव्हती :)
त्यांनी छान हसून सांगितलं, "डॉक्टर, माझ्या मुलीने सीए (CA) ची परीक्षा क्लिअर केली."
मी त्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे अभिनंदन केले.
पण नंतर माझ्या डोक्यात एक विचार आला.
मी त्यांच्या मुलीला कधीच भेटलेलो नाही. तिच्या या यशात माझा प्रत्यक्ष असा कोणताही वाटा नाही. तरीही, त्यांच्या घरात जेव्हा एवढी आनंदाची गोष्ट घडली, तेव्हा आपल्या डॉक्टरला हे माहीत असायला हवं आणि त्यांनीही या आनंदात सामील व्हावं, असं त्या माऊलीला वाटलं.
ही काही एकमेव किंवा वेगळी गोष्ट नाही. भारतातील असंख्य क्लिनिक्समध्ये दररोज असे सुंदर क्षण अनुभवले जातात.
बऱ्याच रुग्णांसाठी डॉक्टर म्हणजे फक्त औषधं लिहून देणारा माणूस नसतो. हळूहळू, नकळत का होईना, ते त्या कुटुंबाच्या प्रवासाचा एक छोटासा भाग बनून जातात.
कदाचित म्हणूनच, आजूबाजूला एवढी नकारात्मकता असूनही, अनेक डॉक्टर्स आजही रोज सकाळी तितक्याच उत्साहाने क्लिनिकमध्ये पाऊल ठेवतात.
अशा सकारात्मक गोष्टी आपल्या कानावर वारंवार पडायला हव्यात, नाही का?
विचार करा, जर प्रत्येक डॉक्टरने दर आठवड्याला आपल्या रुग्णाशी जोडलेली अशी फक्त एक सकारात्मक गोष्ट सोशल मीडियावर लिहिली तर? यात स्वतःच्या उपचारांची बढाई मारण्याचा मुळीच हेतू नसेल, तर हे नातेसंबंध अधोरेखित करण्याचा प्रयत्न असेल.
या निमित्ताने आपण इंटरनेटवर अशा गोड आठवणींचा पूर आणू शकू, ज्या एरवी क्लिनिकच्या चार भिंतींच्या बाहेर कधी येतच नाहीत. यामुळे लोकांमधील डॉक्टर-रुग्ण नात्यावरचा विश्वास आणि समाजातली सकारात्मकता वाढवायला नक्कीच मदत होईल.
NEET पेपरफुटीच्या आरोपांमुळे केवळ एका परीक्षेचीच विश्वासार्हता धोक्यात येत नाही, तर संपूर्ण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास हादरून जातो.
भारतात अनेक विद्यार्थ्यांसाठी परीक्षा म्हणजे फक्त गुण मिळवण्याची प्रक्रिया नसते; तर आयुष्यात मेहनत आणि प्रामाणिकपणाला खरोखरच न्याय मिळतो का, याची पहिली जाणीव त्यांना परीक्षांच्या माध्यमातूनच होते.
एखाद्या वयात मुलांना राजकारण, भ्रष्टाचार, वशिलेबाजी किंवा व्यावसायिक विषमता पूर्णपणे समजत नसते. पण त्यांना एक गोष्ट नक्की समजते, “मी प्रामाणिकपणे मेहनत केली, तर मला योग्य संधी मिळालीच पाहिजे.”
माझ्यासारख्या छोट्या गावातून, मध्यमवर्गीय कुटुंबातून आणि मर्यादित परिस्थितीतून पुढे आलेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा हा आयुष्यात प्रगती करण्याचा सर्वात मोठा आणि कदाचित एकमेव समानतेचा आधार असतो.
दूरच्या खेड्यात बसून अभ्यास करणारा विद्यार्थी या विश्वासावर जगतो की, उत्तरपत्रिकेला त्याचे आडनाव, कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा आर्थिक परिस्थिती माहीत नसते; ती फक्त त्याची गुणवत्ता पाहते.
हा विश्वास डळमळीत झाला की त्याचे परिणाम फक्त गुण किंवा रँकपुरते मर्यादित राहत नाहीत, तर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात व्यवस्थेबद्दल कायमची निराशा आणि अविश्वास निर्माण होऊ शकतो.
परीक्षा या केवळ शैक्षणिक प्रक्रिया नसतात, तर समाजाने तरुण पिढीला दिलेले ते एक आश्वासन असते की प्रामाणिकपणा आणि मेहनतीला आजही किंमत आहे. म्हणूनच म्हणूनच परीक्षांची पारदर्शकता आणि पवित्रता जपणे अत्यंत गरजेचे आहे. जपणे अत्यंत गरजेचे आहे.
एकदा का हा विश्वास तुटला, तर तो पुन्हा निर्माण करणे हे दुसरी परीक्षा घेण्यापेक्षाही कितीतरी पटीने कठीण असते.
– डॉ. प्रविण पाटील (Rheumatologist)
आम्हाला अलीकडेच एका रुग्णाने अपॉइंटमेंट बुक करण्यापूर्वी विशिष्ट प्रश्न विचारला:
“पुणे रुमॅटॉलॉजी सेंटरमध्ये RA / आमवातावर स्टिरॉइड्सशिवाय उपचार होऊ शकतो का?”
होय, अनेक रुग्णांमध्ये हे शक्य आहे.
संधीवाताचे निदान ऐकल्यावर अनेक रुग्णांच्या मनात सर्वात मोठी भीती असते:
“मला आयुष्यभर स्टिरॉइड्स घ्यावे लागतील का?”
आधुनिक RA उपचारांमध्ये खूप मोठा बदल झाला आहे.
लवकर निदान आणि योग्य रुमॅटॉलॉजी केअर मिळाल्यास, आज अनेक रुग्णांना आधुनिक उपचार पद्धतीने DMARDs (disease modifying anti rheumatic drugs - जसे की मेथोट्रेक्सेट - जे आजाराला पुढे जाण्यापासून थांबवते) आणि नवीन टार्गेटेड थेरपीजद्वारे (biologics) दीर्घकाळ स्टिरॉइड्सशिवाय व्यवस्थित नियंत्रित करता येते.
स्टिरॉइड्सचा दीर्घकाळ वापर टाळण्याने होणारे फायदे:
✔ वजन वाढणे आणि चेहरा सुजणे (moon face) कमी होते
✔ शुगर आणि ब्लड प्रेशर चांगले नियंत्रणात राहते
✔ ऑस्टिओपोरोसिस आणि हाडे मोडण्याचा धोका कमी होतो
✔ इन्फेक्शनचा धोका कमी होतो
✔ दीर्घकालीन सुरक्षितता वाढते
मात्र, काही परिस्थितींमध्ये स्टिरॉइड्स अजूनही आवश्यक असतात:
• तीव्र आजाराचा फ्लेअर (अचानक वाढ)
• खूप झपाट्याने वाढत चाललेला संधिवात
• फुफ्फुस किंवा डोळ्यांचा सहभाग
• DMARDs काम करायला सुरुवात होईपर्यंत – ब्रिज थेरपी म्हणून
स्टिरॉइड्स ही “वाईट औषधे” नाहीत. योग्य पद्धतीने वापरल्यास ती अत्यंत प्रभावी आणि कधीकधी जीव वाचवणारी ठरू शकतात. समस्या असते ती अनावश्यक किंवा दीर्घकाळ डॉक्टरांच्या देखरेखीशिवाय वापरल्याने.
स्टिरॉइड्स कधीही स्वतःहून अचानक बंद करू नका. नेहमी आपल्या रुमॅटॉलॉजिस्टचा सल्ला घ्या.
पुणे रुमॅटॉलॉजी सेंटरमध्ये, आमचे ध्येय आहे – जेव्हा वैद्यकीयदृष्ट्या शक्य असेल तेव्हा प्रत्येक रुग्णावर स्टिरॉइड्सशिवाय उपचार करणे. आम्ही स्टिरॉइड्सचा वापर कमीत कमी करण्याचा किंवा पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करतो, पण ते रुग्णासाठी त्या स्टेजला सुरक्षित आणि योग्य असेल तरच.
लवकर निदान आणि DMARDs (मेथोट्रेक्सेट सारखी) किंवा बायोलॉजिक्सचा वापर केल्यास स्टिरॉइड-मुक्त उपचार खूप जास्त प्रमाणात शक्य होतो.
जर तुम्हाला सतत सांधेदुखी आणि सकाळी उठल्यानंतर आखडल्यासारखे जाणवत असेल, तर लवकर रुमॅटॉलॉजिस्टला भेटा.
Yesterday’s webinar on Ankylosing Spondylitis and Parenthood: Planning, Pregnancy, and Pills was one of those sessions that reminds you why these conversations matter.
👥 166 patients and family members joined us live.
For a Saturday evening, that is quite something.
We spoke about issues that patients and parents often find difficult to bring up during routine clinic visits.
And that made all the difference.
The interaction was honest and thoughtful.
The questions were real, practical, and often coming from lived experiences. It turned into a conversation rather than a one-way talk.
A big thank you to Dr Abhijeet Danve for joining and sharing his perspective.
And most importantly, thank you to all the patients who participated so openly.
Your questions are what make these sessions relevant and worthwhile.
🏥 Organised by Ankylosing Spondylitis Welfare Society
👉 The more we talk, the better decisions patients can make.
📢 World Ankylosing Spondylitis Day 2026
Are you living with Ankylosing Spondylitis or planning a family?
Join us for a Patient Education Webinar with guest speaker Dr Abhijeet Danve and Dr Pravin Patil, organised by Ankylosing Spondylitis Welfare Society (ASWS).
We will discuss real-life concerns around:
✔ Pregnancy planning
✔ Medication safety
✔ Male fertility
✔ Hereditary risk
👨⚕️ Ask your questions directly in a live Q and A session.
🗓 Saturday, 2nd May 2026
⏰ 8:00 pm onwards
👥 Who should attend
Patients with AS, couples planning pregnancy, and family members
👉 Register here: https://exiweb.in/worldankylosingspondylitisday2026
15/04/2026
वह 32 साल की हिंदी शिक्षिका है।
पिछले 10 सालों से बच्चों को पढ़ा रही है।
स्कूल में उसकी पहचान है,
एक सख्त लेकिन बेहतरीन टीचर के रूप में।
लेकिन उसकी एक और पहचान भी है,
जो हर किसी को नहीं दिखती।
उसे 18 साल की उम्र से रूमेटॉइड आर्थराइटिस है।
समय के साथ उसके हाथों के जोड़ों में बदलाव आ गया।
उंगलियाँ सीधी नहीं रहीं।
लेकिन उसने हार नहीं मानी।
वह लिखती है।
वह पढ़ाती है।
वह पूरी क्लास संभालती है।
वह रोज बाइक चलाकर स्कूल जाती है।
एक दिन उसने सोचा,
घर के पास वाले स्कूल में नौकरी कर ले।
उसने आवेदन किया।
रिज्यूमे दिया।
कई दिन तक कोई जवाब नहीं आया।
उसने खुद फोन किया।
जो जवाब मिला, वह चुभ गया।
उसे इंटरव्यू के बिना ही रिजेक्ट कर दिया गया था।
कारण?
“हाथ देखकर लगता है ये पढ़ा नहीं पाएंगी।”
उन्होंने उसकी काबिलियत नहीं देखी।
उन्होंने सिर्फ उसकी बीमारी देखी।
एक पल के लिए बुरा लगा।
नौकरी नहीं मिलने का नहीं…
बल्कि इस बात का कि
सालों की मेहनत,
उसकी काबिलियत,
उसकी पहचान…
सब कुछ उसके हाथों की शक्ल के पीछे छिप गया।
लेकिन वह रुकी नहीं।
अगले दिन वह फिर क्लास में खड़ी थी।
चॉक उठाया…
और वैसे ही पढ़ाया, जैसे हमेशा पढ़ाती है।
आत्मविश्वास के साथ।
पूरी पकड़ के साथ।
क्योंकि सच बहुत सीधा है:
समस्या उसके हाथ नहीं थे।
समस्या नजरिया था।
संदेश
रूमेटॉइड आर्थराइटिस हाथों की शक्ल बदल सकता है।
लेकिन इंसान की काबिलियत नहीं।
👉 मौका दीजिए, काबिलियत खुद दिख जाएगी
Category
Contact the practice
Telephone
Address
Pune Rheumatology Center, Ground Floor, Flat Number 1, Sheetal Apartment, Opposite Mahaveer Jain Vidyalaya, Sathe Path, BMCC College Road Deccan
Pune
411004
Opening Hours
| Monday | 9:30am - 1pm |
| Tuesday | 9:30am - 1pm |
| Wednesday | 9:30am - 1pm |
| Thursday | 9:30am - 1pm |
| Friday | 9:30am - 1pm |
| Saturday | 9:30am - 4am |