Manavya
Manavya has been established in 1997 by Late Mrs Vijay Tai Lawate. Our NGO works for rehabilitation of orphaned-destitute born HIV+ children and destitute
मानव्य संस्थेच्या ‘विजयाश्री ‘ या उपक्रमांतर्गत सस्थेमधील मुले-मुली आणि महिला बचत गट विविध सुंदर हस्तनिर्मित (Handmade) वस्तू बनवतात. आमचा कलांगण एक्झिबिशन मधे १ व २ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते रात्री १० आसावरी क्लब, नांदेड सिटी येथे स्टॉल आहे. आमच्या स्टॉल ला जरूर भेट द्या 🙏
25/07/2026
🌟 मानव्य उमेद फिरता दवाखाना: कासार आंबोलीत आरोग्य शिबीर! 🚑
'मानव्य उमेद फिरता दवाखाना' अंतर्गत बुधवारी, २१ जुलै २०२६ रोजी कासार आंबोली गावातील जिल्हा परिषद शाळेत लहान मुलांसाठी एका विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल ८३ विद्यार्थ्यांची यशस्वीपणे तपासणी करण्यात आली.
गावपातळीवर आरोग्याच्या सुविधा थेट मुलांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांचे भविष्य निरोगी करणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या सत्कार्यासाठी शाळेतील शिक्षक आणि ग्रामस्थांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 🙏
21/07/2026
२९ वा वर्धापन दिन
‘मानव्य’ संस्थेचा २९ वा वर्धापन दिन भूगाव येथील मानव्य गोकुळ येथे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ‘लायब्ररी मॅन ऑफ इंडिया’ प्रदीप लोखंडे यांनी मुलांमध्ये आत्मविश्वास, वाचनाची आवड आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी संस्थेच्या नवीन सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन ‘सार्थ वेल्थ’चे संस्थापक अरविंद परांजपे यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष शिरीष लवाटे यांनी संस्थेच्या २९ वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासाचा आढावा घेत स्वर्गीय विजयाताई लवाटे यांच्या कार्याला अभिवादन केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
SMIT कंपनीचा प्रेरणादायी CSR उपक्रम
SMIT कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी ८.०० वाजता संस्थेत भेट देऊन मुलांसाठी प्रेमाने आणि उत्साहाने पौष्टिक नाश्ता तयार केला. त्यांनी मुलांसाठी सँडविच, उकडलेली अंडी, इडली, मेदूवडा, सांबार, फळे अशा विविध पदार्थांची व्यवस्था केली.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ मुलांसाठी नाश्ता तयार केला नाही, तर मुलांसोबत बसून तो नाश्ता घेतला, संवाद साधला आणि आनंदाचे क्षणही वाटले.हा उपक्रम समाजामध्ये एचआयव्ही बाधित मुलांविषयी असलेला गैरसमज आणि कलंक (Stigma) हळूहळू कमी होत असल्याचे अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी उदाहरण ठरला. अशा संवेदनशील सहभागामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास आणि समाजाशी त्यांचे नाते अधिक दृढ होण्यास मोठी मदत होते आहे.
16/07/2026
💐राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत यश 💐
६४ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेअंतर्गत आयोजित बाल नाट्य स्पर्धेत मानव्य संस्थेच्या मुलांनी “वाढदिवस” हे नाटक सादर केले.
या स्पर्धेत संस्थेतील पार्थ जाधव याने आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर “उत्कृष्ट अभिनय” या पुरस्कारासह प्रमाणपत्र प्राप्त करून संस्थेचा गौरव वाढविला आहे.
16/07/2026
आर्ट अँड क्राफ्ट शिबिर !
संस्थेच्या स्वयंसेविका सौ. स्वाती वर्तक मॅडम यांनी दिनांक १ जून ते ११ जून या कालावधीत मुलांसाठी आर्ट अँड क्राफ्ट शिबिराचे आयोजन केले. या शिबिरामध्ये मुलांनी कागदापासून विविध प्रकारची फुले, फुलपाखरे तसेच आकर्षक सजावटीच्या वस्तू तयार केल्या. मुलांनी अत्यंत उत्साहाने, सर्जनशीलतेने आणि आवडीने या उपक्रमात सहभाग घेतला. व ह्या तयार केलेल्या वस्तूनी आम्ही वर्धापन दिनाची सजावट केली.
याचबरोबर स्वाती मॅडम यांनी मुलांना लेझीम प्रशिक्षणालाही सुरुवात केली असून मुलांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
24/06/2026
काळ्याभोर रानमेव्याची आंबट-गोड चव आणि मानव्यच्या बच्चेकंपनीची धमाल 'करवंद पार्टी'! 😋🌳
उन्हाळा संपता संपता आणि पावसाच्या स्वागताला निसर्गाने दिलेली सर्वात सुंदर भेट म्हणजे 'करवंदे'!
10/06/2026
🌸 फ्लॉवर ज्वेलरी कार्यशाळाहेल्प फॉर चिल्ड्रन फाउंडेशनतर्फे संस्थेमध्ये फ्लॉवर ज्वेलरी बनविण्याचे सत्र आयोजित करण्यात आले. मुलींबरोबरच मुलांनीही या सत्रात उत्साहाने सहभाग घेतला आणि आकर्षक फ्लॉवर ज्वेलरी तयार करण्याचा आनंद लुटला🌸
10/06/2026
🌟 व्यक्तिमत्त्व विकास शिबिरअश्विनी जप्तीवाले स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीने १९, २० व २१ मे रोजी तीन दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रार्थना, हास्ययोग, कराटे, पेपर क्राफ्ट, अभिनय, वारली चित्रकला, फोटोग्राफी आणि भाषेतील गमती-जमती अशा विविध विषयांवरील सत्रांमधून मुलांना नवे अनुभव मिळाले. शिबिराच्या समारोपावेळी मुलांनी आपले अनुभव व्यक्त केले. प्रतिष्ठानच्या सुनंदा जप्तीवाले यांनीही मुलांचे कौतुक केले आणि अनेक वर्षांनंतर पुन्हा संस्थेत येऊन शिबिर घेण्याचा आनंद व्यक्त केला.
10/06/2026
🎭 नाटकाचा आनंद...
आपले देणगीदार व मुलांचे हितचिंतक शशांक वाघ सर यांच्या सौजन्याने मुलांना “संभवामि युगे युगे” हे नाटक पाहण्याची संधी मिळाली. मुलांनी नाटकाचा मनापासून आनंद घेतला.
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
Flat No. 13, Laxman Villa Apartment, Paud Road, Nr. Jehangir Hospital, Kothrud
Pune
411038
Opening Hours
| Monday | 9:30am - 5pm |
| Tuesday | 9:30am - 5pm |
| Wednesday | 9:30am - 5pm |
| Thursday | 9:30am - 5pm |
| Friday | 9:30am - 5pm |
| Saturday | 9:30am - 5pm |