Politics Kida
This is page showing you letest product, You can visit this page and get today bumper offer
25/02/2026
आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा
यांनी टेलिकॉम कंपन्यांच्या धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
👉 म्हणाले –
बॅलन्स कमी असताना आउटगोइंग कॉल ब्लॉक केले जातात हे समजण्यासारखे आहे,
पण इनकमिंग कॉल ब्लॉक करणे हे गरीब आणि प्रीपेड वापरकर्त्यांसाठी देखील अन्याय्य आहे.
💥 राघव चढ्ढा यांचा युक्तिवाद 👇
मोबाइल आता लक्झरी राहिलेली नाही; 😗
ती मूलभूत कनेक्टिव्हिटी बनली आहे.
⚡ टेलिकॉम कंपन्यांना प्रश्न –
नफ्यासाठी सामान्य नागरिकाला आवश्यक कनेक्टिव्हिटीपासून वंचित ठेवले जाईल का?
देशातील लाखो लोक
प्रीपेड कनेक्शनवर अवलंबून आहेत.
#राघव चढ्ढा #टेलिकॉम पॉलिसी #मोबाइल वापरकर्ते #ग्राहक हक्क #डिजिटलइंडिया #इंडियापॉलिटिक्स #पब्लिकइश्यू
23/02/2026
आजपर्यंतचे अनेक डाव होते, हा घाव आहे ! 😥
राजकीय घराणं म्हणून जे एक स्थान निर्माण केलंय ते आपल्या पाठीमागं लीलया पेलेल असा मुलगा नसला तरी मुलाच्या नात्यापेक्षा तसूभरही वेगळा नसणारा सख्खा पुतण्या असतो. पण तोच पुतण्या अकाली सोडून जातो याच दुःख कस आणि किती लपवायचं? डोळ्यात येणारे अश्रू आणि गळ्यात साचणारा आवंढा कसा गिळायचा? आपण कायम तरुण आहोत हे सांगत राहील तरी थरथरणारे हात आणि बोलण्यातला थकवा लपून राहतो का? कितीहीवेळा माझं काय वय झालं का म्हटलं तरी आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलासारखा पुतण्या जाणं हे दुःख वयाची 85 वर्ष गाठलेली असताना सहन होण्यासारखं असत का?
राजकीय परिघात भावनेला तसूभरही थारा नसतो, राज्याच्याच नाही तर देशाच्या राजकीय सारीपाटावर आपण केंद्रस्थानी असाल तर भावनिकता आसपासही फिरकता काम नये इतकं कोरडेपण अंगी बाळगावं लागत, तेव्हा पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेला पुतण्या गेल्याच दुःख सहन करण्याची घुसमट किती वेदनादायी असते हे अजितदादांच्या निधनांनंतर 15 दिवसांत दोनदा शरद पवारांना रुग्णालयात दाखल करावं लागत यावरून लक्षात येते...😥😥😥
#अजितदादा #शरदपवार #राष्ट्रवादी #अजितपवार #पवार
21/02/2026
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या निधनाबाबत आमदार रोहित पवार Rohit Pawar हे मुद्दे उपस्थित करत आहेत. ते अस्वस्थ असून, त्यांची काळजी वाटत आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांना सुरक्षा द्यावी,’ अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे supriya sule यांनी केली.
प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, ‘अजित पवार यांंच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. जनभावना तीव्र असून आमदार रोहित पवार हे अतिशय अभ्यासपूर्ण काही तथ्ये, शंका उपस्थित करत आहेत. त्यांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. या घटनेतील सत्य लोकांसमोर पारदर्शक पद्धतीने पुढे येणे अतिशय गरजेचे आहे.
मात्र, आमदार रोहित पवार यांची काळजी वाटत असल्याने त्यांना राज्य सरकारने सुरक्षा द्यावी.’ ‘विमान अपघातात ‘ब्लॅक बॉक्स’ नष्ट होऊ शकत नाहीत. दुर्घटनेचे पारदर्शक आणि निर्विवाद सत्य पुढे आले पाहिजे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी जय पवार यांनीही केली आहे.’ असे खासदार सुळे यांनी स्पष्ट केले.
तर आपणास काय वाटतं रोहित पवार यांना राज्य सरकारची सुरक्षा मिळायला हवी का?
कोणा कोणाला असं वाटतं आहे. खरंच स्वामी महाराज अडचणीच्या काळात धावून येतात, आणि महाराजांमुळेच आपलं चांगलं झालय त्यांनी मनापासून श्री स्वामी समर्थ लिहा. .
19/02/2026
जय भवानी! जय शिवाजी! 🙏
आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
शौर्य, स्वराज्य न्याय आणि दूरदृष्टीच्या अद्वितीय वारशाला मानाचा मुजरा.
महाराजांचे विचार आणि कार्य सदैव आम्हाला प्रेरणा देत राहो! 🧡🚩
सरपंच संतोष देशमुखांचं प्रथम पुण्यस्मरण, वैभवी देशमुखला अश्रू; संदीप भैय्यांनीही व्यक्त केल्या भावना
🔥 आजची सर्वात मोठी HOT बातमी! निवडणुकीआधी महायुतीत तणाव, अजित पवारांचा धक्कादायक आरोप
🚨 राजकीय भूकंपाचे स्पष्ट संकेत!
मुंबई आणि महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुका जवळ येत असतानाच, सत्ताधारी महायुती मध्ये तणाव वाढला आहे.
महायुती फुटणार? भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून सुरू असलेले एकमेकांवरील शाब्दिक हल्ले थांबायला तयार नाहीत. नेत्यांकडून होणाऱ्या टीका टिप्पणीमुळे युतीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसत आहे.
मतदार यादीतील घोटाळा: उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुंबईच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जवळपास ११ लाख मतदार बोगस असल्याचा त्यांचा दावा आहे.
निवडणूक जाहीर होण्याआधीच जर हे चित्र असेल, तर राजकारण कुठल्या दिशेने जात आहे?
तुमचे मत काय आहे?
#महाराष्ट्राचेराजकारण #महायुती #निवडणूक #आजचीबातमी
29/11/2025
📢 महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट
महाराष्ट्रातील नागपूर महानगरपालिकेसह एकूण 29 नगरपालिका निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. या निवडणुका सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पडाव्यात म्हणून प्रशासनाने काही महत्त्वाचे बंदी आदेश (Code of Conduct related restrictions) लागू केले आहेत.
🗳️ काय आहे महत्त्वाचं?
नागपूर महानगरपालिका तसेच राज्यातील इतर 29 नगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज.
निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली असून, काही क्षेत्रांमध्ये बंदी आदेश जारी केले गेले आहेत.
या बंदी आदेशांत सार्वजनिक सभा, रॅली, प्रचारातील ध्वनीप्रसारकांचे वेळेनुसार निर्बंध, मद्यविक्रीवरील नियम आणि सार्वजनिक जागांचा वापर यावर नियंत्रण असेल.
"ग्रे एरिया" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची नजर अधिकाधिक वाढवण्यात आली आहे.
प्रशासनाचे लक्ष शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि निष्पक्ष मतदान सुनिश्चित करणे.
👥 नागरिकांसाठी संदेश:
या निवडणुकीत प्रत्येक मत महत्वाचे आहे. शहराचा विकास, पायाभूत सुविधा, सेवा आणि प्रशासनातील पारदर्शकता यासाठी योग्य प्रतिनिधींची निवड आवश्यक आहे.
मतदान अवश्य करा कारण आपले मतच आपल्या शहराचे भविष्य ठरवते.
#महाराष्ट्रनिवडणुका #स्थानिकस्वराज्यासंस्था #नगरपालिकाelection #लोकशाही
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune