Yogesh Tilekar
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yogesh Tilekar, Public Figure, Yogesh Tilekar Office, Kondhwa Budruk, Pune.
MLC, Maharashtra | आमदार, विधानपरिषद |
Ex MLA, Hadapsar Constituency | मा.आमदार हडपसर विधानसभा |
Yuva Morcha State President (2015-2020)
OBC Morcha State President (2020-2023)
BJP Maharashtra |
14/06/2026
प्रभाग क्रमांक ४० मधील गगन सिग्नेट सोसायटी येथे MNGL पाईप लाईन व १०० KV सोलर पॅनल प्रकल्पाचे उद्घाटन आज माझ्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी नगरसेविका रंजना नानी टिळेकर, वृषाली कामठे, पूजा कदम, अर्चना जगताप यांच्यासह सोसायटीचे चेअरमन, सर्व सदस्य, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वच्छ ऊर्जा व आधुनिक सुविधांमुळे नागरिकांचे जीवन अधिक सुलभ व पर्यावरणपूरक होण्यास निश्चितच मदत होईल.
13/06/2026
भारतीय जनता पार्टी हडपसर विधानसभा पूर्व मतदारसंघाच्या कार्यकारिणीची नियुक्ती आज माझ्या हस्ते संपन्न झाली.
यावेळी सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! जनतेची सेवा, संघटनेची मजबुती आणि विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वजण उत्तम कार्य कराल, असा विश्वास आहे.
Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Maharashtra
13/06/2026
ओबीसी जनसंवाद अभियान🚩
भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने राज्यभर आयोजित”ओबीसी जनसंवाद अभियान”अंतर्गत उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागातील कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच समाजबांधवांशी संवाद साधणार आहे.
या अभियानाच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, समाजाच्या अपेक्षा जाणून घेणे आणि आगामी वाटचालीसाठी कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन करणे हा उद्देश आहे.
सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन.
Devendra Fadnavis Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule BJP Maharashtra
13/06/2026
प्रखर बुद्धिमत्ता, निर्भीड लेखणी आणि समाजप्रबोधनाची अखंड ज्योत असलेले आचार्य अत्रे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा आजही प्रेरणादायी आहे.
#आचार्य_अत्रे
10/06/2026
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाची व्यापक बैठक आज मुंबई येथील प्रदेश कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
यावेळी मध्यप्रदेशच्या मंत्री (स्वातंत्र्य प्रभार) मा. श्रीमती कृष्णा गौडजी, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराजजी अहिर, प्रदेश महामंत्री तथा प्रभारी मा. योगेशजी सागर, मुंबई प्रदेशाध्यक्ष मा. शरदजी चिंतनकर आणि दिव-दमन प्रदेशाध्यक्ष मा. हरीश पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या यशस्वी १२ वर्षांच्या जनसेवा, सुशासन आणि विकासपूर्ण कार्यकाळानिमित्त “संकल्प ते सिद्धी” या अभियानाच्या अनुषंगाने संवाद व समालोचन करण्यात आले. तसेच आगामी काळातील संघटनात्मक बळकटीकरण, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ पोहोचविणे आणि ओबीसी समाजाच्या सक्षमीकरणासाठी कार्याचा आराखडा निश्चित करण्यात आला.
या बैठकीस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे अध्यक्ष, सरचिटणीस, प्रदेश पदाधिकारी, महिला संयोजक, युवा संयोजक तसेच मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
10/06/2026
जनतेचा प्रचंड विश्वास, विकासाची अखंड वाटचाल आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाचा आणखी एक ऐतिहासिक टप्पा!
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे जनतेतून निवडून येत सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविणारे नेते ठरले आहेत. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण केली असून विकसित भारताच्या संकल्पनेकडे देश वेगाने वाटचाल करत आहे.
हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण! 🇮🇳🪷
10/06/2026
महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
अखंड ऊर्जेचे शक्तिपीठ असलेल्या दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे हे माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. दादा, आपल्याला उदंड आयुष्य लाभो! 💐
Chandrakant Patil
09/06/2026
मंत्रिमंडळ निर्णय ९ जून २०२६.!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
#मंत्रिमंडळनिर्णय
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी साहेब यांच्या निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट..!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Address
Yogesh Tilekar Office, Kondhwa Budruk
Pune
411048