Aark Foundation
Aark Foundation is a leading Rehabilitation Centre for Drug Addiction and Alcohol Addiction based in Pune, India.
De-addiction and Rehabilitation Center
90 Day's Residential Treatment ( Yoga, Meditation, Group Therapy, One on One Counseling, Recreational Therapy, Occupational Therapy, Art Based Therapy, Rational Emotive Behaviour Therapy, Music Therapy)
01/06/2026
90 दिवसांचा निर्णय घेण्यापूर्वी...
फक्त 30 दिवसांचा अनुभव घ्या!
आम्ही कधीही म्हणत नाही की 30 दिवसांत व्यसन पूर्णपणे संपेल.
कारण वर्षानुवर्षे लागलेलं व्यसन एका महिन्यात जात नाही.
पण हे 30 दिवस तुम्हाला स्वतःमध्ये होणारे बदल अनुभवण्याची संधी नक्की देऊ शकतात.
कदाचित तुम्ही पुन्हा अनुभवू शकाल...
✔ सकाळी ताजेतवाने उठणं
✔ शांत आणि गाढ झोप लागणं
✔ शरीरात ऊर्जा जाणवणं
✔ मनात सकारात्मकता निर्माण होणं
✔ घरच्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसणं
खूप लोकांना वाटतं...
"10 दिवसांत व्यसन सुटेल..."
"15 दिवस पुरेसे आहेत..."
"एक महिना झाला की सगळं ठीक होईल..."
पण व्यसन इतकं सोपं नसतं.
म्हणून...
30 दिवस व्यसनापासून दूर राहून तर बघा.
आमच्या सेंटरमध्ये तुम्हाला तुमच्यासारखाच संघर्ष केलेल्या लोकांचे अनुभव, मार्गदर्शन आणि मन मोकळं करण्याची संधी मिळेल.
AARK Foundation
आम्ही आशा, आत्मविश्वास आणि नव्याने जगण्याची उमेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.
तुमची इच्छाशक्ती आणि आमचा अनुभव...
चला, नव्या आयुष्याची सुरुवात करूया.
77090 14514
अनुभवांची देवाणघेवाण, बदलाची नवी दिशा...
आजच्या ग्रुप मिटिंगमध्ये व्यसनमुक्तीच्या प्रवासातील अनेक अनुभव, संघर्ष, चुका आणि यशस्वी टप्पे एकमेकांसोबत शेअर करण्यात आले.
जेव्हा एक व्यक्ती स्वतःची कहाणी सांगते, तेव्हा ती दुसऱ्या व्यक्तीसाठी आशेचा किरण ठरते. अशा बैठका केवळ चर्चा नसतात, तर आत्मपरीक्षण, प्रेरणा आणि नव्या सुरुवातीची संधी असतात.
"मी एकटा नाही" ही जाणीवच पुनर्वसनाच्या प्रवासाला अधिक बळ देते.
एकमेकांच्या अनुभवांतून शिकत, समजून घेत आणि साथ देत व्यसनमुक्त आयुष्याकडे वाटचाल सुरू आहे.
Support NewBeginning
26/05/2026
घरात कुणाला दारू, ड्रग्स किंवा इतर व्यसनाचा त्रास आहे का?
तुम्ही एकटे नाही आहात.
AARK Foundation तुमच्यासोबत आहे.
✔ गोपनीय मदत
✔ समुपदेशन
✔ Rehabilitation Guidance
✔ Family Support
मदतीसाठी WhatsApp करा.
आमची टीम तुमच्याशी संपर्क करेल.
Aark Foundation Aark Foundation is a leading Rehabilitation Centre for Drug Addiction and Alcohol Addiction based in Pune, India.
दारू सोडणं म्हणजे फक्त व्यसन सोडणं नाही, तर स्वतःला पुन्हा एकदा नव्याने घडवणं आहे.
आज घेतलेला एक चांगला निर्णय उद्याचं सुंदर आयुष्य बदलू शकतो.
स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी व्यसनमुक्त जीवनाची निवड करा.
मदतीची गरज असेल तर योग्य मार्गदर्शन घ्या आणि नव्या सुरुवातीला आजच सुरुवात करा.
17/05/2026
आमच्या बद्दल लिहिलेला एक अनुभव
"व्यसनमुक्ती केंद्र"
पुण्याच्या डोणजे बाजूला जाताना, रस्ता हळूहळू शांत होत जातो… शहर मागे राहतं… मोठमोठे hoardings संपतात… आणि मग एका जागेजवळ गाडी थांबते — Aark Foundation
नाव आधी खूप वेळा ऐकलं होतं… पण प्रत्यक्ष जाण्याचा योग पहिल्यांदाच आला.
आणि खरं सांगायचं तर, मनात आधीपासूनच एक ठरलेलं चित्र होतं…
Rehab म्हणजे काय ? एक बंदिस्त अशी जागा… भिंतींवर awards… समोर motivational quotes… आणि बाहेरून “सगळं perfect” दिसणारं वातावरण…
पण इथे आत गेल्यावर पहिल्याच काही मिनिटांत जाणवलं — आपण ज्या गोष्टींना “मोठेपणा” समजतो, त्या खरंतर किती वरवरच्या असतात…
कुठे awards मांडलेले नाहीत… कुठे “आम्ही सर्वात बेस्ट” चे बोर्ड नाहीत… कुठे स्वतःचं कौतुक नाही… कुठे show off नाही…
पण तरीही… त्या जागेत एक वेगळीच ताकद जाणवत होती.
सगळं खूप साधं… खूप स्वच्छ… आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, खूप खरं वाटणारं…
आत शिरलो तेव्हा session चालू होतं.
सगळे patient इतक्या लक्षपूर्वक ऐकत होते, की आम्ही आत आलो हे सुद्धा कुणाच्या लक्षात गेलं नाही…
त्या काही मिनिटांत एक गोष्ट जाणवली — जे लोक आयुष्यात हरवले होते, ते इथे स्वतःला परत शोधायचा प्रयत्न करत होते.
फक्त शांतपणे… मनापासून… प्रत्येक जण स्वतःशी लढत होता.
आणि बाहेरच्या जगात आपण किती सहज बोलून जातो — “अरे त्याला addiction आहे…” “त्याचं काही होणार नाही…” “तो बदलणार नाही…”
पण त्या दिवशी जाणवलं — व्यसन लागलेली माणसं वाईट नसतात… कधी कधी ती फक्त आतून खूप तुटलेली असतात.
आणि अशा वेळी त्यांना lecture नाही… तर कोणीतरी शांतपणे समजून घेणारं माणूस लागतं.
आजकाल जगात लोकांकडे वेळ नाही… लोक एकमेकांचं बोलणंसुद्धा पूर्ण ऐकत नाहीत… आणि इथे काही लोक, दुसऱ्याचं आयुष्य परत उभं राहावं म्हणून दिवस-रात्र मेहनत घेतायत.
हे पाहून मन खरंच शांत झालं.
कारण इथे treatment पेक्षा जास्त, माणुसकी दिसली.
काही ठिकाणं business म्हणून चालतात… काही mission म्हणून…
Aark Foundation ही दुसऱ्या प्रकारातली जागा वाटली.
आणि तिथून बाहेर पडताना मनात एकच प्रश्न सतत फिरत राहिला —
आपण खरंच “व्यसनाधीन” माणसांकडे माणूस म्हणून पाहतो का ? की फक्त त्यांच्या चुका पाहतो ?
कारण… प्रत्येक addiction च्या मागे, एक अपूर्ण गोष्ट असते… एक तुटलेलं नातं असतं… एक न ऐकलेली वेदना असते… आणि एक माणूस असतो, जो कदाचित फक्त थोडं समजून घेणं शोधत असतो…
सगळं पाहून फक्त एवढंच वाटलं —
“Rehab असे पण असतात…”
जिथे दिखावा नाही… पण विश्वास आहे.
जिथे मोठेपणा नाही… पण माणुसकी खूप मोठी आहे.
हा अनुभव खरंच खूप छान होता…
— Laxman S.
13/05/2026
दारू किंवा ड्रग्सच्या व्यसनामुळे अनेक व्यक्ती आणि त्यांचे कुटुंब मानसिक, आर्थिक आणि सामाजिक त्रासातून जात असतात. पण योग्य वेळी योग्य मदत मिळाली तर या परिस्थितीतून बाहेर पडणे शक्य आहे.
AARK FOUNDATION तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.
आमच्याकडे गोपनीय समुपदेशन, व्यसनमुक्ती उपचार आणि कुटुंबासाठी योग्य मार्गदर्शन उपलब्ध आहे.
मदतीसाठी संकोच करू नका…
एक फोन तुमचे आयुष्य बदलू शकतो.
संपर्क: 7709014514
WhatsApp Available
11/05/2026
व्यसनातून बाहेर पडण्याचा निर्णय ही नव्या आयुष्याची सुरुवात असते.
आज एक पाऊल उचला — स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी.
AARK Foundation मध्ये अनुभवी डॉक्टर टीम, सुरक्षित वातावरण आणि समुपदेशनाच्या मदतीने व्यसनमुक्त जीवनाकडे वाटचाल करा.
Aark Foundation
संपर्क: 7709014514
प्रत्येक शुक्रवार – नव्या आयुष्याची सुरुवात
Aark Foundation मध्ये प्रत्येक शुक्रवार हा खूप महत्त्वाचा दिवस असतो.
या दिवशी अनुभवी Psychiatrist येऊन प्रत्येक patient चे सखोल examination करतात.
दारूच्या व्यसनामुळे मेंदूवर होणारा परिणाम समजून घेऊन, त्यानुसार त्यांना योग्य treatment आणि medicines दिली जातात.
हे फक्त उपचार नाहीत…
ही आहे एक नवीन आयुष्याची वाटचाल,
स्वतःला पुन्हा शोधण्याची संधी.
योग्य मार्गदर्शन, योग्य उपचार आणि मनापासूनचा प्रयत्न –
यामुळे बदल शक्य आहे!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the practice
Telephone
Website
Address
S. No. 680/1, Sundarvishwa Building, G*t No. 225, Golewadi, At Post Donje, Sinhgad Road, Taluka Haveli, Dist. Pune
Pune
411025