Shilp Creation

Shilp Creation

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shilp Creation, Home decor, Pune.

28/03/2026

ईशान देवता : ईशान्येचा स्वामी 🚩
'ईशान' म्हणजे सर्व विद्यांचा स्वामी. ईशान्य दिशा ही जलतत्वाशी संबंधित असून, तिथे साक्षात महादेवाचा वास असतो. ही दिशा आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारी आहे.
वास्तुपुरुषाचे शिर ईशान्य दिशेला असते, म्हणूनच या दिशेला 'देवघर' किंवा ध्यानासाठी सर्वोत्तम मानले जाते. या दिशेचे स्वामी ईशान देवता (शिव) आहेत. जिथे शिवाची कृपा असते, तिथे सुख, शांती आणि समृद्धी आपोआप येते. असे आध्यात्मिक आर्टवर्क खास तुमच्यासाठी... आजचं खरेदी साठी संपर्क किंवा मेसेज DM करा.
#महादेव #ईशान #ईशान्य

24/03/2026

"उत्तर दिशेचे स्वामी, धनाचे रक्षक आणि यक्षांचे अधिराज - भगवान कुबेर देवता." या चित्रात साठवलेली आहे ती केवळ संपत्ती नाही, तर समृद्धी आणि आशीर्वादाची ऊर्जा! उत्तर दिशेकडून येणाऱ्या सकारात्मकतेचे प्रतीक.जिथे कुबेराचा वास असतो, तिथे समृद्धीची कमतरता नसते.
वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही संधी आणि यशाची दिशा मानली जाते. त्याच दिशेचे रक्षण करणाऱ्या कुबेर देवतेचे हे एक विशेष चित्रण. तुमच्या जीवनात सुख-समृद्धीचा ओघ अखंड वाहत राहो! 💰🙏
आजचं खरेदी साठी संपर्क साधा!
#कुबेरदेवता
# वास्तुशास्त्र

21/03/2026

"गती आणि शक्तीचे साक्षात रूप: वायू देवता."
"जो अदृश्य असूनही अस्तित्वाचा आधार आहे, जो शांत आहे पण वादळाचे सामर्थ्य राखतो... वायव्य दिशेचे रक्षक 'वायू देवता' यांच्या दिव्य रूपाचे दर्शन."
"ज्यांच्या स्पर्शाने सृष्टी प्रवाही राहते, त्या प्राणवायूचे साक्षात रूप. वायव्य कोपऱ्याचे रक्षक आणि गतीचे अधिपती - पवनदेव. कलेच्या माध्यमातून मांडलेला एक दैवी प्रवास."
#वायूदेवता

17/03/2026

🙏🔱"कलेतून साकारलेले जलाधिपती: वरुण देवता" 🎨🌊
पाण्याचे गांभीर्य आणि अथांग सागराची शांती दर्शवणारे वरुण देवांचे हे विशेष चित्र.ज्यांच्या आज्ञेनुसार नद्या वाहतात आणि समुद्र आपली मर्यादा ओलांडत नाही
पश्चिम दिशा ही यशाची आणि स्थिरतेची दिशा मानली जाते, ज्याचे अधिपती वरुण देव आहेत. त्यांच्या हातातील 'पाश' अनैतिकतेचा नाश करतो आणि त्यांचे वाहन असलेला हा विशाल 'मकर' (सुसर/जलचर) हे अथांग शक्तीचे प्रतीक आहे. वास्तुशास्त्रानुसार हे चित्र केवळ सजावट नसून घरासाठी एक संरक्षण कवच आहे.
अशा अष्टदिक्पाल वरुण देवांचे सात्विक रूप आता तुमच्या घराच्या भिंतीवर.
जर तुम्ही तुमच्या ऑफिस किंवा घरासाठी एखादे शांत आणि प्रभावशाली चित्र शोधत असाल, तर हे चित्र तुमच्यासाठीच आहे. आजच संपर्क साधा!

11/03/2026

अष्टदिक्पालांमधील गूढ व्यक्तिमत्व - नैऋत्य देव.
•ज्यांचे वाहन 'शव' (नर-वाहन) आहे, हे वाहन केवळ मृत्यूचे प्रतीक नसून, ते 'तामसी वृत्ती' आणि 'अहंकारा' वरील विजयाचे प्रतीक मानले जाते.
• हे प्रतीक आपल्याला शिकवते की मृत्यू अटळ आहे आणि जीवनातील जडत्व संपवूनच स्थिरता प्राप्त होते.
• नैऋत्य देवता त्यांना राक्षसांचे पती किंवा नैऋत्य दिशेचे रक्षक मानले जाते. ही दिशा 'पृथ्वी तत्त्वा'शी संबंधित असल्याने ती स्थिरतेचे प्रतीक आहे.
•विनाशातूनच नवीन निर्मिती होते, हा सृष्टीचा नियम नैऋत्य देवता दर्शवतात.
#नैऋत्यदिशा #वास्तुशास्त्र #मराठाशैलीचित्र

09/03/2026

दक्षिण दिशेचे अधिपती, न्याय आणि धर्माचे प्रतीक - "भगवान यमराज."
वास्तूशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमराज यांची मानली जाते. या दिशेला त्यांचे हे सुंदर रूप लावल्याने शिस्त आणि स्थैर्य लाभते.
बारकावे आणि भाव यांनी नटलेली ही कलाकृती विक्रीसाठी उपलब्ध आहे.
आजच ऑर्डर करा!

06/03/2026

"महाराज"
Shart / kurta Beaches
Size 2 in x 2in

Want your business to be the top-listed Home Improvement Business in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Pune