Swaroop Seva
In the’80s, a few college students, keeping in mind their obligation towards the society took a vow of social work. Thisobsession gave birth to Swaroopseva.
01/02/2024
मधुरांगण लेख
10/11/2023
10/11/2023
मधुरांगण दीपावली २०२३
एक पणती लावू...
अवघे आसमंत उजळवु...
सस्नेह नमस्कार, 🙏
यंदाची दिवाळी स्वरुपसेवा संस्थेने वेगळ्या प्रकारे साजरी करायची ठरवली आहे. *बारामती तालुक्यातल्या दुर्गम गावातील एका आश्रम शाळेत शिकणारी ४५ अनाथ मुले दि.११ ते १५ नोव्हेंबर २०२३ (शनिवार ते बुधवार) रोजी दिवाळीच्या सणानिमित्त पाच दिवस त्यांच्या बालपणातील एक अत्यंत अविस्मरणीय दीपावली साजरी करण्यासाठी मधुरांगण प्रकल्पात येणार आहेत.
या दीपावलीच्या पाच दिवसांमध्ये ही अनाथ मुले मोठ्या उत्साहात दिपवली साजरी करतील. किल्ला बनवतील, मधुरांगण सजवतील, आकाश कंदील, लाईटच्या माळा लावतील, नवीन कपडे घालतील, पहाटे उटण्याने अभ्यंग स्नान करतील, वसुबारसेला गाईची पूजा करतील, त्यांच्यासाठी गाण्यांचे, बालनाट्याचे, जादूचे प्रयोग आयोजित केले जातील आणि सर्वांच्या आवडीचा दिवाळीचा फराळ फस्त करतील.
या विशेष पाहुण्यांना जीवनात सर्व सामान्यांसारखीच दिवाळी साजरी व्हावी यासाठी आम्ही आपल्या सहकार्याने प्रयत्न करतो आहोत. या सामाजिक कार्यात आपल्या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. आपण कोणत्याही स्वरूपात मदत करू इच्छित असल्यास खालील क्रमांकावर अवश्य फोन करावा ही नम्र विनंती.
आपल्या सहयोगानेच मधुरांगणमध्ये समाजातील विविध वंचित घटकांना आनंदाचे चार क्षण देण्याचे सत्कार्य घडत आले आहे. संस्थेवरील विश्वास व आपली अमुल्य सोबत कायम राहील अशी आशा आहे.
धन्यवाद,
उमेश झिरपे - 9890620490
संस्थापक सदस्य, स्वरुपसेवा
अजित पटेल - 9850093302
अध्यक्ष, स्वरुपसेवा
सुयश मोकाशी - 8087941399
समन्वयक, स्वरुपसेवा
23/07/2023
The smile says everything...🤗
23/07/2023
प्रा-फौंडेशन, आंबेगाव, पुणे येथील १० ते ३० वयोगटातील ४५ मुलं, मुली मनोरुग्ण पाहुणे आणि त्यांचे केअरटेकर्स आणि स्वयंसेवक दिनांक १५ व १६ जुलै रोजी मधुरांगण येथे दोन दिवसांच्या सहलीला येऊन गेले. मनोरुग्ण पाहुण्यांची ही सहल त्यांना भरपूर मनोरंजन, आनंद, सकारात्मक ऊर्जा देणारी ठरली. या विशेष पाहुण्यांचे आनंदी चेहरे कार्यक्रमाच्या यशस्वीतेची पावती देत होते.
या खास पाहुण्यांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण आणण्याकरिता सर्वप्रकारे योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
23/07/2023
परिवर्तन संस्था, शाखा सातारा* येथील १८ ते ६० वयोगटातील ३० महिला व पुरुष मनोरुग्ण पाहुणे आणि त्यांचे केअरटेकर्स आणि मानसमित्र स्वयंसेवक दिनांक १ व २ जुलै रोजी मधुरांगण येथे दोन दिवसांच्या सहलीला येऊन गेले. मनोरुग्ण पाहुण्यांची ही सहल त्यांना भरपूर मनोरंजन, आनंद, सकारात्मक ऊर्जा देणारी ठरली. या विशेष पाहुण्यांचे समाधानी, आनंदी चेहरे कार्यक्रमाच्या यशस्वीतेची पावती देत होते.
या खास पाहुण्यांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण आणण्याकरिता सर्वप्रकारे योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
23/07/2023
परिवर्तन संस्था, शाखा पुणे येथील 18 ते 60 वयोगटातील 45 महिला व पुरुष मनोरुग्ण पाहुणे आणि त्यांचे केअरटेकर्स, तेथील स्वयंसेवक दिनांक 24 व 25 जून रोजी मधुरांगण येथे दोन दिवसांच्या सहलीला येऊन गेले. पाहुण्यांच्या आगमना बरोबरच दिर्घ काळ प्रतीक्षा कराव्या लागलेल्या मान्सूनच्या पावसाचेही पुणे परिसरात आगमन झाले व मधुरांगण मधील वातावरण एकदम आल्हाददायक झाले. या विशेष पाहुण्यांनी मधुरांगण येथे भरपूर मजा केली व तेथील प्रसन्न वातावरणाचा आनंद लुटला. आपल्या स्वयंसेवकांनी या मनोरुग्ण पाहुण्यांच्यासाठी अनेक मनोरंजक खेळांचे आयोजन केले होते. प्रत्येक खेळानंतर बक्षिसांचं वाटप होत होतं. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या गप्पा, दुसरे दिवशी पुन्हा विविध खेळ, कृतार्थ व गौतमीताईंनी सादर केलेले नाट्य, सर्पांच्या विषयी दिलेली माहिती व मानसमित्रांचे अंधश्रद्धा निर्मूलना बाबतचे सादरीकरण यांमध्ये दिवस कसा गेला हे समजले नाही. मधुरांगणच्या परिसरातील भटकंती, तेथील रम्य नजारा, संगीत खुर्ची, डान्स आणि रविवारी पहाटे परिसरातील केलेला छोटा ट्रेक यांचा आनंद पाहुण्यांनी मनसोक्त लुटला. मधुरांगण मधील सहलीचा पुरेपूर आनंद घेत असताना या मनोरुग्ण पाहुण्यांनी आपल्या स्वयंसेवकांबरोबर मनमोकळा संवाद साधला. दोन्ही दिवस आवडीचे भोजन असल्यामुळे या आनंदाची गोडी द्विगुणित झाली. 25 तारखेला संध्याकाळी परतीच्या वेळी मधुरांगण मधील स्वयंसेवक व परिवर्तन संस्थेतील विशेष पाहुणे मंडळींनी एकमेकांचा भावपूर्ण निरोप घेतला.
या खास पाहुण्यांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण आणण्याकरिता योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
23/07/2023
महिला सेवा मंडळ, पुणे या संस्थेतील 30 अनाथ व मनोरुग्ण महिला व तेथील स्वयंसेवक दिनांक 17 जून रोजी मधुरांगण येथे सहलीला येऊन गेले. या महिलांनी मधुरांगण येथे भरपूर मजा केली व तेथील प्रसन्न वातावरणाचा आनंद लुटला. आपल्या स्वयंसेवकांनी या महिलांच्यासाठी अनेक मनोरंजक खेळाचे आयोजन केले होते. मधुरांगणच्या परिसरातील भटकंती, तेथील टॉवर वरून दिसणारा रम्य नजारा, संगीत खुर्ची, डान्स आणि सायंकाळी परिसरातील टेकडीवर छोटा ट्रेक यांचा आनंद लुटला. मधुरांगण मधील सहलीचा पुरेपूर आनंद घेत असताना या मनोरुग्ण व अनाथ महिलांनी आपल्या स्वयंसेवकांबरोबर मनमोकळा संवाद साधला. दुपारी आवडीचे भोजन असल्यामुळे या आनंदाची गोडी द्विगुणित झाली. संध्याकाळी परतीच्या वेळी मधुरांगण मधील स्वयंसेवक व संपर्क महिला सेवा मंडळ संस्थेतील महिलांनी एकमेकांचा भावपूर्ण निरोप घेतला.
28/06/2023
संपर्क बालग्राम संस्था, मु.पो.शेल पिंपळगाव, जिल्हा पुणे या संस्थेतील 45 अनाथ मुले व तेथील प्रशिक्षक, स्वयंसेवक दिनांक 3 व 4 जून रोजी मधुरांगण येथे सहलीला येऊन गेले. या मुलांनी मधुरांगण मधील वास्तव्यात भरपूर मजा केली व तेथील प्रसन्न वातावरणाचा आनंद लुटला. आपल्या स्वयंसेवकांनी या मुलांसाठी अनेक मनोरंजक खेळाचे आयोजन केले होते. मधुरांगणच्या परिसरातील भटकंती, तेथील टॉवर वरून दिसणारा रम्य नजारा, क्रिकेट, संगीत खुर्ची, डान्स आणि सायंकाळी मधुरांगण मधील गणपतीची आरती, रात्री सिनेमा या सर्व गोष्टींत मुलांनी भरभरुन सहभाग घेतला. ही मुलं, आश्रमातील आम्ही सर्व मुलं भावंडं आहोत हे अगदी सहजपणे सांगतात त्यावेळी त्यांचा आपसातील जिव्हाळा, प्रेम पाहून आम्ही सर्व खूपच भारावून गेलो. दुसऱ्या दिवशी पहाटे प्रसन्न वातावरणात मुलं परिसरातील टेकडीवर छोट्या ट्रेकला गेली होती. दुपारी आमच्या कॉलेज मधील मित्रांनी या मुलांबरोबर मनमोकळा संवाद साधला. तेथील शिक्षकांनी या मुलांवर केलेले संस्कार पाहून आम्ही सारेंच खूप भारावून गेलो. या मुलांनी मधुरांगण मधील वास्तव्याचा पुरेपूर आनंद घेतला. यासोबतच आवडीचे भोजन असल्यामुळे तो आनंद द्विगुणित झाला. संध्याकाळी परतीच्या वेळी मधुरांगण मधील स्वयंसेवक व संपर्क बालग्राम संस्थेतील मुलांनी एकमेकांचा भावपूर्ण निरोप घेतला. मधुरांगणचा परिसर तात्पुरता सुनासुना झाला असला तरी, पुढील काही दिवसांनी पुन्हा अशाच पाहुण्यांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज होतो आहोत. आपली साथ अशीच राहो.
या खास पाहुण्यांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण आणण्याकरिता योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
28/05/2023
दि. २९ जानेवारी २०२३ रोजी अभिनव विकास फाऊंडेशन, कोथरूड, जि. पुणे येथील ३५ मुले आणि संस्थेतील शिक्षक एक दिवसाच्या सहलीसाठी मधुरांगण मध्ये आले होते. या मुलांपैकी काही मुले मागील वर्षी अशीच मधुरांगण मध्ये येऊन गेली होती. वर्षभरातच या मुलांनी पुन्हा मधुरांगण मध्ये येण्याची इच्छा दर्शवली.
मुलांनी दिवसभर मधुरांगण मध्ये मनसोक्त आनंद लुटला. संध्याकाळी लाठी काठीचे काही डाव सर्वांसमोर सादर केले.
28/05/2023
नवक्षितिज संस्था, मु.पो.मारुंजी, जि. पुणे या संस्थेतील 30 मनोविकलांग मुले व तेथील स्वयंसेवक दिनांक 27 व 28 मे रोजी मधुरांगण येथे सहलीला येऊन गेले. या मुलांनी मधुरांगण मधील वास्तव्यात भरपूर मजा केली व तेथील प्रसन्न वातावरणाचा आनंद लुटला. स्वयंसेवकांनी या मुलांसाठी अनेक मनोरंजक खेळाचे आयोजन केले होते. मधुरांगणच्या बागेतील भटकंती, तेथील टॉवर वरून दिसणारा रम्य नजारा, क्रिकेट, संगीत खुर्ची, डान्स आणि सायंकाळी मधुरांगण मधील गणपतीची आरती या मुळे मुलं एका वेगळ्याच वातावरणात रमली. दुसऱ्या दिवशी पहाटे प्रसन्न वातावरणात मुलं परिसरातील टेकडीवर छोट्या ट्रेकला गेली होती. दुपारी शिवरायांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहून मुलं भारावलेल्या अवस्थेत होती. अशा प्रकारे मुलांनी मधुरांगण मधील वास्तव्याचा पुरेपूर आनंद घेतला. यासोबतच आवडीचे भोजन असल्यामुळे तो आनंद द्विगुणित झाला. संध्याकाळी परतीच्या वेळी मधुरांगण मधील स्वयंसेवक व नवंक्षितिज संस्थेतील मुलांनी एकमेकांचा भावपूर्ण निरोप घेतला. मधुरांगणचा परिसर तात्पुरता रिता झाला असला तरी, पुढील आठवड्यात पुन्हा अशाच पाहुण्यांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज होतो आहोत. आपली साथ अशीच राहो.
या खास पाहुण्यांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण आणण्याकरिता योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the organization
Telephone
Website
Address
Madhurangan, Mauje Khatpewadi, Bhukum, Tal. Mulshi
Pune