psyched_with_mugdha
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from psyched_with_mugdha, Psychologist, Pune.
१. विचारपूस करा, पण टोचू नका.
कधी कधी “कधी गोड बातमी?” असं विचारणं प्रेमातून होतं, पण त्या मागे असलेली व्यक्ती भावनिक संघर्षात असू शकते. शब्दांमध्ये ऊब असू दे, उत्सुकता नाही तर सहानुभूती असू दे. 🌸
२. प्रत्येकाचं आयुष्याचं टायमिंग वेगळं असतं.
कोणी लवकर पालक बनतं, कोणी उशिरा, तर कोणी नाही.ही तुलना नाही, प्रवास आहे.
३. बोलण्यापेक्षा ऐकणं जास्त महत्त्वाचं.
कधी कधी एखादं ऐकून घेणं, हजार सल्ल्यांपेक्षा जास्त उपचार देतं. 💬
४. दया नाही, आधार द्या.
कोणाला वाईट वाटतंय म्हणून त्याच्यावर दया दाखवू नका.
त्याऐवजी, “मी आहे ना तुझ्यासोबत” एवढं म्हणणं पुरेसं असतं. 🤝
प्रेमाने बोला, संवेदनशीलतेने वागा,
आणि विचारपूस करा-पण टोचणी नाही… ❤️
#मनधागाधागा
(Emotional Healing, Motherhood Journey, Sensitive Topics, Unspoken Pain, Mental Health Awareness, Empathy Matters, Kindness In Words, Heartfelt Talks, Emotional Podcast, Marathi Content, Women Support, Emotional Growth, Hope And Healing, Real Feelings, Life Reflections, Emotional Wellness, Mindful Conversations, Respect Boundaries, Motherhood Emotions, Empathy First, Healing Vibes, Positive Mindset, Authentic Stories, Emotional Awareness, Be Kind Always, Real Life Talks, Healing Journey, Inner Peace, Marathi Podcast, Emotional Intelligence)
ही फक्त तिची नव्हे, दोघांची प्रवासकथा आहे.
थोडं समजून घ्या, थोडं ऐका, थोडं जवळ राहा…
असं केलंत की मिरॅकल घडल्याशिवाय राहणार नाही! 💫
✨साधे सोपे उपाय:
• तिच्या भावना समजून घ्या, दोष देऊ नका.
• “कधी होणार?” विचारण्याऐवजी, “कशी आहेस?” असं विचारा.
• छोट्या कृतीतूनच मोठं आधार निर्माण होतं.
• भावनिक उपचार हेच खऱ्या मिरॅकलचं बीज असतं.
#मनधागाधागा
(fertility journey, emotional healing, infertility support, couple counselling, relationship growth, marriage therapy, women support, hope and faith, mental health awareness, miracle happens, psychological support, mindful relationships, REBT therapy, inner strength)
आपले विचार, चिंता, ताण हे सगळं शरीरावर परिणाम करतं. म्हणूनच शरीरासोबत मनाची काळजी घेणं, स्वतःशी बोलणं आणि भावना मोकळ्या करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
जेव्हा प्रयत्न असूनही आतून थकवा, भीती, किंवा अपराधीपणा वाढतो : तेव्हा थोडं थांबा, स्वतःला ऐका. कारण कधी कधी उत्तर तपासणीत नसतं… ते समजून घेण्यात असतं. 🌷
थोडं मन मोकळं करणं, आपल्या भावना बोलू देणं, हाच कधी सर्वात सुंदर उपचार ठरतो. ✨
मन धागा धागा च्या आजच्या एपिसोड मधे बघुयात ह्यावर काय करता येईल..
#मनधागाधागा
सतत रडणं ही फक्त त्रासदायक सिच्युएशन नसते – तो एक सिग्नल असतो. भूक, थकवा, भीती, किंवा फक्त “माझं ऐकून घ्या!” असं सांगायचं असतं त्यांना.पालक म्हणून रडण्यामागचं खरं कारण समजणं, हेच पहिलं पाऊल असतं समजूतदार संगोपनाचं. 💛👶
(Child crying, parenting, child development, emotional parenting, behavior issues, RECBT, child psychology, understanding child behavior, mindful parenting, tantrums, parent-child bonding)
#मराठीपालक
पण सून म्हणून नेहमी हसतं राहणं, सहभागी होणं- हेच का योग्य? आजचं reel त्याच guilt वर आहे, आणि त्यातून बाहेर पडण्याच्या ३ सोप्या पायऱ्या. ♥️
(burnt out daughter-in-law, emotional load, saas bahu expectations, marathi relationship reel, quiet daughter-in-law, guilt in relationships, self-care in joint family, unseen effort, emotional exhaustion, healthy boundaries in marriage)
कधी तुमच्या मनात असं आलंय का दुसऱ्या कपल्सना बघून, आपल्याच नात्यात कमतरता जाणवते?
या reel मध्ये मी सांगितलंय.. कशी ही तुलना आली,
की तीन साध्या गोष्टी लक्षात ठेवा, ज्यातून guilt नाही, closeness तयार होते.
(couple comparison, navra bayko, relationship guilt, therapy for couples, mental health in marriage, emotional disconnect, Marathi therapy, jealousy in couples, real marriage issues, self-worth in relationships)
आपण काम करतो, देतो… पण ‘आपली किंमत’ बोलायला थांबतो.
मौन सोडा… कारण आपला आवाज हीच तुमची ओळख आहे.
1. भीती = कमजोरी नाही, ती न बोलल्याची सवय आहे.
“पगार मागायचा म्हणजे लोभीपणा” — हा विचार चुकीचा आहे.
हक्क मागणं म्हणजे ‘स्वार्थ’ नाही, ती आत्मसन्मानाची सुरुवात आहे.
2. तुमचं काम तुमची ओळख आहे… पण आवाज तुमची किंमत ठरवतो.
“Boss समोर बोलायला घाबरते” असं मन म्हणतं…
पण लक्षात ठेवा, मौन हे कौशल्य नाही.
3. बोलायचं ठरतं… पण मनातच विषय बदलतो.
आपण इतरांसाठी धाडस करतो, मग स्वतःसाठी का नाही?
तुमचं ‘होईल का?’ हे ‘होईलच’ मध्ये बदला.
4. सुरुवात करा… साध्या एका वाक्याने.
“सर, मला थोडं बोलायचं होतं…” — एवढं म्हणा.
हळूहळू आत्मविश्वास वाढेल, आणि भीती कमी होईल.
तुमच्या शांततेच्या मागे तुमची किंमत हरवू देऊ नका.
(salary conversation, workplace fear, boss dynamics, self-worth, employee silence, communication courage, assertiveness, work anxiety, performance pressure, CBT therapy, RECBT, आत्मसन्मान, office life, self-doubt, fear of asking, working women, job stress, emotional awareness)
वाद होऊ शकतो, पण नातं संपू नये.
मन: धागा धागा – भांडणांनंतरचं अंतर कमी करायला. ❤️
Husband and wife, couple goals, marathi couple, mr and mrs, married couple, fights, conversation, healthy relationship
कधी boundaries ठेवल्यावर guilt येते …
कधी closeness मध्ये suffocation वाटते .
“मी distance ठेवत नाहीये… मी माझी space तयार करतेय… 🌼”
Because healthy relationships need clarity, not confusion. And boundaries aren’t rejection, they are protection. 🌼
(boundaries, guilt, emotional maturity, love, space, over-involvement, clarity, healthy relationships, respect, communication, protection, psychologist, mental health, husband and wife)
चुका करा, हसा… आणि शिका.
मौन सोडा… कारण तुमचं मन खूप काही सांगू पाहतंय.
1. चुका = मूळ नाही, चुकून शिकणं = योग्य वाट
“मी इंग्रजी चुकलो म्हणजे मी मूर्ख आहे” असा विचार बाजूला ठेवा.
खरी शिकवण ही चुकांमधूनच मिळते. चुकणं हे अपयश नाही – ते प्रगतीचं पहिलं पाऊल आहे.
2. भाषा हे तुमचं “value” नाही – ती एक tool आहे.
“इंग्रजी बोलत नाही म्हणून मी कमी आहे” – हा गैरसमज आहे.
तुमची कळकळ, विचार, आणि प्रयत्न… हेच तुमचं खरे महत्व.
3. लोक काही वेळ हसतील… पण तुमचं भविष्य तुमच्या सरावावर अवलंबून आहे.
“लोक काय म्हणतील?” या विचाराने मन थांबतं.
पण लोकांचं मत = तुमची ओळख नाही.
4. सुरुवात करा… छोटी, पण दररोज.
दररोज आरशासमोर ५ वाक्य इंग्रजीत बोला. Ted Talk download करा.
मित्राशी साध्या वाक्यातून संवाद साधा.
जिथं तुमचं मन थांबतं, तिथंच तुमचं पुढचं पाऊल आहे.
(इंग्रजी बोलणं, English fear, आत्मविश्वास, confidence building, गावातून शहरात, small town students, accent, communication skills, mental health, मनोबल, लाज वाटते, public speaking, language anxiety, CBT therapy, self-doubt, shy to speak, urban life, कॉलेज struggles, fear of judgment, RECBT)
कधी लाज, कधी जुने अनुभव,
तर कधी एक अज्ञात अंतर…
हे सगळं त्या एका शब्दामागे असतं.
पण सासू आणि सूनमधली दूरता कमी करता येते,
जर आपण दोघंही थोडं पुढे आलो तर…
🌱 दूर अंतर कमी करण्यासाठी ४ उपाय –
1. संवाद जपणं – रोज एक साधा, प्रेमळ संवाद सुरू ठेवा.
2. अपेक्षा न लादणं – शब्दाऐवजी वागणूक लक्षात घ्या.
3. आदर टिकवणं – दोघींनाही सन्मान आणि मोकळीक हवी असते.
4. थोडा वेळ देणं – नातं हळूहळू रुजतं… जबरदस्तीने नाही.
‘आई’ हा शब्द नाही आला, तरी मन जवळ आलं, तर खूप आहे.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune