Deepak Chavan
Agriculturist
22/11/2025
Avee Broilersचा जागतिक विस्तार : इक्वेटोरियल गिनीमध्ये नवा करार
चांदवड (नाशिक) येथील Avee Broilers, ही पोल्ट्री ब्रीडींग व इंटिग्रेशन क्षेत्रातील भारतातील नामवंत कंपनी, आंतरराष्ट्रीय विस्ताराच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहे. कंपनीने नुकताच Martínez Hermanos 1927 या प्रतिष्ठित गटासोबत सामंजस्य करार (MoU) केला असून, या कराराअंतर्गत Parent Stock Joint Venture इक्वेटोरियल गिनीमध्ये उभारण्यात येणार आहे. इक्वेटोरियल गिनी हा मध्य आफ्रिकेतील देश असून अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेला आहे.आफ्रिकेत स्पॅनिश ही अधिकृत भाषा असलेला हा मोजक्या देशांपैकी एक आहे
कंपनीचे चेअरमन श्रीकृष्ण गांगुर्डे म्हणाले, “हा करार आमच्या वाढीचा नवा अध्याय आहे. आम्ही भारताबाहेर विस्तार करत आहोत. आम्ही आमच्या उच्च दर्जाच्या chicken breeds नवीन बाजारांमध्ये पोहोचवत आहोत. इक्वेटोरियल गिनी हा संधीचा प्रदेश आहे. Martínez Hermanos हा विश्वासार्ह समूह आहे.”
या करारामुळे आफ्रिकन बाजारपेठेत भारतीय पोल्ट्री उद्योगाला नवे दालन खुले होणार असून, स्थानिक उत्पादन क्षमता वाढवण्यासोबतच रोजगारनिर्मिती व तंत्रज्ञान हस्तांतरणालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सोर्स - AVEE BROILER PVT LTD
अनुवाद : Microsoft Copilot संकलन - दीपक चव्हाण, ता. २२ नोव्हेंबर २०२५
शेतकरी मित्रांसाठी गुगल नोटबूक एलम हे आणखी एक उपयुक्त साधन आहे. अवघडातील अवघड विषय आपण तिथे इनपूटमध्ये पोस्ट केला, तर सोप्या मराठीत, स्टोरी टेलिंगच्या शैलीत आपण तो ऐकू शकतो. जरूर प्रयत्न करा... लिंक पहिल्या कमेंटमध्ये.
27/10/2025
अनुभवी शेतकऱ्यांनी रूपचंद शिंदे यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे ही विनंती
अॅलर्ट - फेक अकाऊंट... .https://www.facebook.com/raaj.kashiyap.2025 माझा फोटो व नाव वापरून हा व्यक्ती मेसेंजरद्वारे मोबाईल नंबर मागतोय. फ्रॉड आहे. कृपया फ्रेंड रिक्वेस्ट घेवू नये आणि फेक प्रोफाईल असे रिपोर्ट करावे.
फेक अकाऊंट... .https://www.facebook.com/raaj.kashiyap.2025 माझा फोटो व नाव वापरून हा व्यक्ती मेसेंजरद्वारे मोबाईल नंबर मागतोय. फ्रॉड आहे. कृपया फ्रेंड रिक्वेस्ट घेवू नये आणि फेक प्रोफाईल असे रिपोर्ट करावे.
13/09/2025
फेक अकाऊंट..https://www.facebook.com/raaj.kashiyap.2025 इथे दिलेल्या लिंकचे फेसबुक अकाऊंट माझे नाही. कुणीतरी नाव व फोटो वापरून फेक अकाऊंट तयार केले आहे. कृपया फ्रेंड रिक्वेस्ट घेवू नये आणि फेक प्रोफाईल असे रिपोर्ट करावे.
08/09/2025
नोंदी
'निढळ : ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न'
एखादं पुस्तक वाचून काहीतरी रचनात्मक काम करण्याची प्रेरणा मिळावी, तसेच कामाचा आराखडाही मिळावा – अशा थोड्याच पुस्तकांपैकी 'निढळ : ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न' हे एक पुस्तक आहे. सातारा जिल्ह्यातील निढळ (ता. खटाव) गावात गेल्या चार दशकांत मानवी प्रयत्नांतून घडलेली ग्रामविकासाची यशकथा ज्येष्ठ पत्रकार सुनील चव्हाण यांनी शब्दबद्ध केली आहे.
निवृत्त आयएएस अधिकारी चंद्रकांत दळवी सरांनी ४१ वर्षांपूर्वी निढळ नोकरवर्ग व व्यावसायिक संघटना स्थापन केली. निढळ सोडून परगावी स्थायिक झालेल्या गावकऱ्यांची ही संघटना होती. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना दळवी सरांनी त्यांच्या निढळ गावावर संशोधनात्मक प्रबंध लिहिला आणि त्यातून ग्रामविकासाची संकल्पना आकारास आली.
लोकसहभागातून जल व मृदसंवर्धन, पाणलोट विकासाला प्राधान्य देण्यात आले आणि दुष्काळी निढळ जलसमृद्ध बनले. त्याचबरोबर शैक्षणिक गुणवत्ता, ग्रामस्वच्छता, सूक्ष्मसिंचन, तंटामुक्ती अशा विधायक कामांची सुरुवात झाली. विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी नियोजनबद्ध रीत्या होत गेली. या मागे दळवी सरांचं नेतृत्व आणि त्यांनी घडवलेल्या संघटकांचे अथक प्रयत्न आहेत.
निढळची प्रगती एका दिवसात घडलेली नाही. चाळीस वर्षांच्या कालावधीत, पिढ्यान्पिढ्या गावकीभावकी, राजकारण, भेदाभेद यापलिकडे जाऊन अभ्यासू व कृतीशील कार्यकर्त्यांचा उदय झाला. आज निढळकडे देशभरात ग्रामविकासाचं आदर्श मॉडेल म्हणून पाहिलं जात आहे. ग्रामविकासाचा ध्यास असलेल्या कुठल्याही कार्यकर्त्याला निढळला भेट न देता पुढे जाता येणार नाही.
– दीपक चव्हाण
ता. ८ सप्टेंबर २०२५
---
पुणेस्थित सत्व फाउंडेशनकडे पुस्तक खरेदीसाठी संपर्क साधावा.
मो. नंबर - 9881098180
हळद निर्यातीत महाराष्ट्राचे स्थान:
केंद्रीय मसाला बोर्डाकडील माहितीनुसार मागील आर्थिक वर्षांत देशाने १.७६ लाख टन हळद निर्यात केली, ज्याचे मूल्य ३४१ दशलक्ष डॉलर्स होते. त्यात महाराष्ट्राचा वाटा १५५ दशलक्ष डॉलर्स (४५ टक्के) इतका होता.
२०२४ मधील एकूण जागतिक हळद निर्यातीत भारताचा वाटा ६६ टक्के होता.
- दीपक चव्हाण, ता. १३ ऑगस्ट २०२५
'कृषल' या डेअरी क्षेत्रातील स्टार्टअपचे तज्ज्ञ आणि डेअरी फार्मर्समध्ये चांगला संवाद घडला. सहभागी झालेले सर्व शेतकरी आणि टीम कृषलचे आभार.
Click here to claim your Sponsored Listing.