ACE EQAL
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ACE EQAL, Non-Governmental Organization (NGO), Deccan, Pune.
Assessment and Capability Building for Excellence: Entrant-Qualifier-Aspirant-Leader (ACE-EQAL) is an initiative of Vivek Vyaspeeth, working with grassroots organizations to deliver long-term sustainable impact.
सामाजिक संस्था सक्षमीकरण ऊपक्रम
25/05/2026
Proposal Writing म्हणजे फक्त निधीसाठी अर्ज लिहिणे नाही, तर संस्थेची दृष्टी (Vision), कामाचा प्रभाव (Impact) आणि समुदायाची खरी गरज प्रभावीपणे मांडण्याची प्रक्रिया आहे. एक मजबूत proposal संस्थेला funding, CSR भागीदारी आणि दीर्घकालीन सहकार्याच्या नव्या संधी उपलब्ध करून देऊ शकते.
🔹 Proposal Writing का महत्त्वाचे?
✔️ संस्थेचे काम व्यावसायिक पद्धतीने मांडता येते
✔️ प्रकल्पाची गरज, उद्दिष्टे आणि अपेक्षित परिणाम स्पष्ट करता येतात
✔️ Donors आणि CSR भागीदारांचा विश्वास वाढतो
✔️ Funding मिळण्याची शक्यता अधिक वाढते
✔️ संस्था अधिक structured आणि impact-oriented बनते
🔹 एका चांगल्या Proposal मध्ये काय असते?
✨ Problem Statement – नेमकी समस्या काय आहे?
✨ Need Assessment – समुदायाला कोणती गरज आहे?
✨ Objectives & Outcomes – प्रकल्पातून काय बदल अपेक्षित आहेत?
✨ Budget & Timeline – निधीचा वापर कसा होणार?
✨ Impact Measurement – परिणाम कसे मोजणार?
📌 ACE EQAL अंतर्गत विशेष सत्रांमधून:
✨ Proposal drafting आणि proposal structure वर practical मार्गदर्शन
✨ Need Assessment, budgeting आणि impact presentation समजून घेण्यासाठी support
✨ CSR आणि donor expectations समजून घेण्यास मदत
✨ संस्थेला donor-ready आणि funding-ready बनवण्यावर भर
संस्था सक्षमीकरण प्रकल्पाच्या तिसऱ्या बॅचसाठी नोंदणी सुरू आहे.
पुढील बॅचमध्ये सामील व्हा आणि तुमच्या सामाजिक कार्याचा प्रभाव वाढवा!
आजच अर्ज करा: https://forms.gle/Ep3kFGmfYH7WSeJa6
संपर्क: पंकज गव्हाने 7798860036
नेहा धाडवे 9325269887
📣 Strong Proposal = Strong Opportunities for Change!
CSR Fund Raising संदर्भात अनेक संस्थांकडून विचारणा होत असल्यामुळे काही महत्त्वाच्या सूचना आणि मार्गदर्शक मुद्दे पाठवत आहे. योग्य तयारी आणि योग्य approach असल्यास CSR funding मिळण्याची शक्यता वाढते.
1️⃣ संस्था Vision व Mission स्पष्ट असावेत
संस्था नेमकी कोणत्या विषयावर काम करते?
कोणत्या समाजघटकासाठी काम करते?
संस्थेचा दीर्घकालीन उद्देश काय आहे?
संस्थेचे काम कंपनीच्या CSR focus areas शी जुळते का?
यामुळे योग्य कंपन्या ओळखणे आणि संपर्काचा वेळ वाचतो.
2️⃣ Target companies योग्य निवडा
कंपनीचे CSR themes व मागील projects तपासा.
कंपनी कुठल्या geographical area मध्ये काम करते हे जाणून घ्या.
तुमच्या क्षेत्राशी (Education, Livelihood, Women Empowerment, Health, Environment इ.) जुळणाऱ्या कंपन्यांना प्राधान्य द्या.
उदा.: Women empowerment वर काम करणारी संस्था त्या क्षेत्रात CSR करणाऱ्या कंपन्यांना approach करेल.
3️⃣ Proposal नेहमी तयार ठेवा
Professional Proposal किंवा Concept Note तयार ठेवा. आवश्यक घटक:
✅ संस्था माहिती, Vision/Mission, Registration details
✅ 12A, 80G, CSR‑1 आणि इतर compliance दस्तऐवज
✅ प्रकल्पाची समस्या व गरज, Objectives, Beneficiaries, Activities
✅ Expected outcomes, Budget, Timeline
✅ Monitoring & Reporting system, Previous work/photos/case studies
4️⃣ Company website व CSR section नीट वाचा
पाठवण्यापूर्वी कंपनीच्या अधिकृत website वरील CSR Policy, Focus Areas, Contact details, Application process आणि CSR reports तपासा. अनेक कंपन्यांकडे proposal submission form असतात.
5️⃣ योग्य माध्यमातून संपर्क ठेवा
Random emails टाळा.
Official CSR email, Company website contact form, LinkedIn, Professional networking, CSR events/conferences, Social media.
LinkedIn वर professional connect तयार करणे उपयुक्त ठरते.
6️⃣ Documentation व compliance अपडेट ठेवा
कंपन्या संस्थेची credibility तपासत असतात; म्हणून खालील कागदपत्रे ready ठेवा:
📌 Registration certificate, PAN, 12A/80G, CSR‑1, Audit reports, Annual reports, FCRA (जर लागू असेल), Board details, NGO Darpan
7️⃣ Impact दाखवा
Companies फक्त activities नव्हे तर outcomes आणि impact पाहतात. म्हणून Before–After stories, Case studies, Beneficiary testimonials, Photos/Videos, Data & numbers, Success stories तयार ठेवा
8️⃣ Professional follow‑up करा
Proposal पाठवल्यानंतर professional पद्धतीने follow‑up करा:
Reminder mail, LinkedIn follow‑up, Updated reports share करा.
पण spam टाळा.
9️⃣ Funding कधी मिळेल हे सुनिश्चित नाही — वेळ लागू शकतो
CSR funding ही long‑term relationship building process आहे. त्यामुळे:
Patience ठेवा, Relationship build करा, Regular communication ठेवा, Transparency maintain करा.
🔟 Fraud पासून सावध रहा ⚠️
“100% grant guarantee” किंवा “आधी processing fees भरा” असे आश्वासन देणाऱ्यांकडून सावधगिरी बाळगा.
❌ कोणालाही advance payment करू नका.
❌ कोणत्याही आश्वासनावर blind trust करू नका.
❌ कंपनीची तपासणी करा, official communication शिवाय व्यवहार करू नका.
CSR Fund Raising म्हणजे फक्त निधी उभा करणे नाही; ते संस्थेच्या vision वर विश्वास निर्माण करण्याचा प्रवास आहे. Consistency, transparency आणि मजबूत impact हाच यशाचा आधार आहे.
धन्यवाद 🙏
Team ACE EQAL
07/05/2026
📌 सामाजिक संस्थेसाठी स्वयंसेवक जोडणी (Volunteer Engagement) चे महत्त्व.
सामाजिक संस्थांसाठी स्वयंसेवक हे फक्त मदतनीस नसतात, तर संस्थेच्या उद्दिष्टांना गती देणारी महत्त्वाची शक्ती असतात. योग्य स्वयंसेवक जोडणी मुळे संस्था अधिक प्रभावी, लोकाभिमुख आणि मजबूत बनते.
🔹 महत्त्वाचे फायदे:
✔️ समुदायाशी मजबूत नाते निर्माण होते
✔️ नवीन कल्पना, कौशल्ये आणि ऊर्जा मिळते
✔️ संस्थेचा सामाजिक प्रभाव (impact) वाढतो
📌 ACE EQAL अंतर्गत विशेष सत्रांमधून:
✨ Volunteer management आणि engagement strategies वर मार्गदर्शन
✨ Volunteer roles, communication आणि retention systems विकसित करण्यास मदत
✨ संस्थेला अधिक participatory आणि community-driven बनवण्यावर भर
📣 Strong Volunteers = Strong NGO!
आता पुढच्या बॅचसाठी नोंदणी सुरू आहे.
पुढील बॅचमध्ये सामील व्हा आणि तुमच्या सामाजिक कार्याचा प्रभाव वाढवा! आजच अर्ज करा: https://forms.gle/Ep3kFGmfYH7WSeJa6
संपर्क: पंकज गव्हाने 7798860036
नेहा धाडवे 7769004400
22/04/2026
📌 NGOs साठी Need Assessment (गरज मूल्यांकन) का महत्त्वाचे?
'Need Assessment' चा मराठीत अर्थ ‘गरज मूल्यांकन’ किंवा ‘गरजांचे विश्लेषण’ असा होतो. याचा अर्थ सध्याची स्थिती आणि अपेक्षित स्थिती यांमधील अंतर शोधून नेमक्या गरजा ओळखणे(उदा. प्रशिक्षण, संसाधने किंवा सुधारणा).
सामाजिक संस्थांसाठी Need Assessment म्हणजे फक्त माहिती गोळा करणे नाही, तर समुदायाच्या खऱ्या गरजा समजून घेऊन योग्य आणि परिणामकारक हस्तक्षेप (interventions) डिझाइन करण्याची प्रक्रिया आहे.
🔹 महत्त्वाचे फायदे:
✔️ योग्य समस्या ओळखता येते:
समुदायाच्या वास्तविक गरजा समजल्यामुळे काम अधिक relevant आणि प्रभावी होते.
✔️ संसाधनांचा योग्य वापर:
डेटा-आधारित नियोजनामुळे वेळ, पैसा आणि मनुष्यबळ योग्य दिशेने वापरले जाते.
✔️ Impact वाढतो:
गरजांवर आधारित प्रकल्पांमुळे परिणाम अधिक स्पष्ट आणि मोजता येण्याजोगा होतो.
📌 ACE EQAL अंतर्गत विशेष सत्रांमधून:
✨ Need assessment tools आणि survey methods वर practical मार्गदर्शन
✨ Data collection, analysis आणि interpretation समजून घेण्यासाठी support
✨ प्रकल्प अधिक targeted आणि impact-driven बनवण्यावर भर
आता पुढच्या बॅचसाठी नोंदणी सुरू आहे.
पुढील बॅचमध्ये सामील व्हा आणि तुमच्या सामाजिक कार्याचा प्रभाव वाढवा! आजच अर्ज करा: https://forms.gle/Ep3kFGmfYH7WSeJa6
संपर्क: पंकज गव्हाने 7798860036
नेहा धाडवे 7769004400
20/04/2026
📌 सामाजिक संस्थांसाठी (NGOs) संस्थेची संरचना, धोरणे & प्रशासन का महत्त्वाचे?
सामाजिक संस्थांसाठी स्पष्ट संस्थेची संरचना , मजबूत धोरण आणि प्रभावी प्रशासन हे फक्त औपचारिक घटक नाहीत, तर संस्थेच्या स्थिरता, जबाबदारी आणि वाढीचा पाया आहेत.
🔹 महत्त्वाचे फायदे:
✔️ भूमिका आणि जबाबदाऱ्या स्पष्ट होतात:
टीममधील प्रत्येकाची भूमिका निश्चित झाल्याने कामात गोंधळ कमी होतो आणि कार्यक्षमता वाढते.
✔️ पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढते:
धोरणे आणि governance systems मुळे निर्णय प्रक्रिया स्पष्ट होते आणि संस्थेवर विश्वास वाढतो.
✔️ दीर्घकालीन स्थिरता मिळते:
मजबूत रचना आणि नियमांमुळे संस्था सातत्याने आणि शाश्वत पद्धतीने वाढते.
📌 ACE EQAL अंतर्गत विशेष सत्रांमधून:
✨ संस्थेची संरचना, प्रशासन पद्धती आणि प्रकार समजून घेण्यासाठी मार्गदर्शन
✨ HR policies, SOPs आणि internal systems तयार करण्यास मदत
✨ संस्थेला अधिक structured, accountable आणि growth-ready बनवण्यावर भर
👉आता पुढच्या बॅचसाठी नोंदणी सुरू आहे.
पुढील बॅचमध्ये सामील व्हा आणि तुमच्या सामाजिक कार्याचा प्रभाव वाढवा! आजच अर्ज करा: https://forms.gle/Ep3kFGmfYH7WSeJa6
संपर्क: पंकज गव्हाने 7798860036
नेहा धाडवे 7769004400
10/04/2026
सामाजिक संस्थांसाठी आर्थिक व्यवस्थापन (Financial Management) म्हणजे फक्त हिशोब ठेवणे नाही, तर निधीचा योग्य वापर, पारदर्शकता आणि दीर्घकालीन टिकाव सुनिश्चित करण्याचा आधार आहे.
🔹 महत्त्वाचे फायदे:
✔️ पारदर्शकता वाढते:
योग्य accounting, budgeting आणि वेळेवर financial reporting मुळे donors आणि CSR भागीदारांचा विश्वास वाढतो.
✔️ निधीचा प्रभावी वापर:
योग्य नियोजनामुळे प्रत्येक रुपयाचा जास्तीत जास्त सामाजिक परिणाम (impact) साध्य करता येतो.
✔️ निर्णय घेणे सोपे होते:
स्पष्ट financial data मुळे संस्थेला योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतात.
📌 ACE EQAL अंतर्गत विशेष सत्रांमधून:
✨ Budgeting, accounting आणि financial planning वर तज्ञांचे मार्गदर्शन
✨ Financial systems आणि tracking processes विकसित करण्यास मदत
✨ संस्थेला अधिक accountable आणि sustainable बनवण्यावर भर
आता पुढच्या बॅचसाठी नोंदणी सुरू आहे.
पुढील बॅचमध्ये सामील व्हा आणि तुमच्या सामाजिक कार्याचा प्रभाव वाढवा! आजच अर्ज करा: https://forms.gle/Ep3kFGmfYH7WSeJa6
संपर्क: पंकज गव्हाने 7798860036
नेहा धाडवे 7769004400
09/04/2026
सामाजिक संस्थांसाठी Legal Compliances हे फक्त कागदोपत्री काम नाही, तर विश्वासार्हता आणि पारदर्शकता याचा मजबूत आधार आहे.
🔹 महत्त्वाचे फायदे:
✔️ विश्वास वाढतो:
12A, 80G, FCRA नोंदणी आणि वेळेवर ITR, ऑडिट रिटर्न्समुळे देणगीदार आणि CSR भागीदारांचा विश्वास निर्माण होतो. नियमांचे पालन न केल्यास परवानग्या रद्द होण्याचा धोका असतो.
✔️ फंडिंग सोपी होते:
Compliant NGOs ला सरकारी योजना, CSR अनुदान आणि परदेशी देणग्या सहज मिळतात.
✔️ कायदेशीर सुरक्षितता:
GST, बोर्ड मीटिंग्ज आणि वार्षिक रिपोर्टिंगमुळे दंड आणि अडचणी टाळता येतात.
📌 ACE EQAL अंतर्गत सत्रांमधून:
✨ अनुपालन नूतनीकरण(12A, 80G, csr 1) आणि आवश्यक प्रक्रिया समजावून दिल्या जातात
✨ compliance systems तयार करण्यास मदत
✨ संस्थेला 100% compliant बनवण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन
आता पुढच्या बॅचसाठी नोंदणी सुरू आहे.
पुढील बॅचमध्ये सामील व्हा आणि तुमच्या सामाजिक कार्याचा प्रभाव वाढवा! आजच अर्ज करा: https://forms.gle/Ep3kFGmfYH7WSeJa6
संपर्क: पंकज गव्हाने 7798860036
नेहा धाडवे 7769004400
06/04/2026
ACE-EQAL संस्था सक्षमीकरण प्रकल्प – Proposal Writing कार्यशाळा! ✨
दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी, श्रीराम व्यायामशाळा, ठाणे येथे ACE-EQAL या संस्था सक्षमीकरण उपक्रमांतर्गत Proposal Writing कार्यशाळा उत्साहात पार पडली.
या एकदिवसीय कार्यशाळेस विंदा बाळ यांनी मार्गदर्शन केले असून, एकूण ५५ संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक देव देश प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष डॉ. वैभव देवगीरकर यांनी केले, तर सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्ट चे शिक्षण आयाम प्रमुख धनंजय जठार यांनी आभार प्रदर्शन केले.
या प्रसंगी सेवा भारती चे संघटन मंत्री सुरेंद्र शर्मा यांनी उपस्थित संस्था प्रतिनिधींशी संवाद साधत मार्गदर्शन केले. तसेच संजय माळकर आणि डॉ. वैभव देवगीरकर यांनी विंदा बाळ मॅडम यांना छोटेखानी भेट देऊन त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
ACE-EQAL हा संस्था सक्षमीकरण प्रकल्प ठाणे येथे देव देश प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने आणि मुंबई येथे सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्ट यांच्या सहकार्याने Vivek SPARC Foundation द्वारे राबविण्यात येत आहे.
31/03/2026
सामाजिक संस्थेचे Vision आणि Mission
कोणत्याही यशस्वी संस्थेचा पाया हा तिच्या 'Vision ' आणि 'Mission 'वर अवलंबून असतो. हे केवळ शब्द नसून संस्थेच्या सामाजिक कार्याचे दिशादर्शक असतात.
Vision: हे सामाजिक संस्थेचे भविष्यातील मोठे स्वप्न आहे. "तुम्हाला कोणता बदल घडवायचा आहे?" किंवा "तुमच्या साठी आदर्श समाज म्हणजे काय किंवा कसा असेल?" याचे उत्तर म्हणजे Vision . हे भविष्यातील एक प्रेरणादायी चित्र असते.
Mission: त्या मोठ्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी आज आपण करत असलेल्या ठोस कृती म्हणजे ध्येय. यात आपले उपक्रम, कार्यपद्धती आणि आपण कोणासाठी काम करता, याचा समावेश होतो.
हे का महत्त्वाचे आहे?
स्पष्ट Vision आणि Mission असल्यामुळे संस्थेला खालील फायदे होतात:
1. योग्य दिशा: संस्थेचा मार्ग भरकटत नाही आणि प्रत्येक पाऊल उद्दिष्टाकडे पडते.
2. सुलभ निर्णयप्रक्रिया: भविष्यातील योजना आखताना किंवा कठीण प्रसंगी निर्णय घेणे सोपे होते.
3. एकजूट: कर्मचारी, स्वयंसेवक आणि देणगीदारांना एकाच सूत्रात बांधले जातात; सर्वांना आपण नेमके कशासाठी काम करत आहोत, याची जाणीव असते.
प्रभावाचे मोजमाप: कामाचा खरा परिणाम (Impact) मोजणे आणि त्यात सतत सुधारणा करणे शक्य होते.
ACE EQAL या संस्था सक्षमीकरण उपक्रमात तज्ञाच्या मार्गदर्शनात संस्थेच्या Vision आणि Mission वर आधुनिक काळाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन विस्तृत चर्चा केली जाते.
अनुभवी मार्गदर्शकांद्वारे आयोजित सत्रांमुळे संस्थेच्या कार्यात अधिक स्पष्टता आणि व्यावसायिकता येते.
आता पुढच्या बॅचसाठी नोंदणी सुरू आहे.
पुढील बॅचमध्ये सामील व्हा आणि तुमच्या सामाजिक कार्याचा प्रभाव वाढवा!
आजच नोंदणी करा: https://forms.gle/Ep3kFGmfYH7WSeJa6
संपर्क: पंकज गव्हाने 7798860036
नेहा धाडवे 7769004400
Click here to claim your Sponsored Listing.
Website
Address
Deccan
Pune
411004
Opening Hours
| Monday | 10am - 6pm |
| Tuesday | 10am - 6pm |
| Wednesday | 10am - 6pm |
| Thursday | 10am - 6pm |
| Friday | 10am - 6pm |
| Saturday | 10am - 6pm |