DCN Marathi
Your City, Your News. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा. +91 7066522178
The Daily City News (DCN) is an Indian news portal based in the Peshwa City with a readership that transcends borders and timelines. DCN presents the readers around the world with an immediate access of the 360 degrees daily news offerings of Pune, state, country and the world at large.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन झाले. या आंदोलनात अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध मुद्द्यांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कॉक्रो जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी तरुणांना हिंदू मुस्लिम राजकारणाचा भाग न बनण्याचे आवाहन केले.
Cockroach Janata Party, SPPU Protest, Abhijeet Dipke, Student protest, Hindu Muslim Politics
Copyright Disclaimer: This post includes copyrighted material used under Fair Dealing (Section 52, Copyright Act, 1957) for the purpose of news reporting, criticism, review and public awareness. All rights belong to the respective owners.
11/06/2026
पुणे : रावेत येथील ‘अर्बन स्कायलाईन फेज २’ या निवासी प्रकल्पातील फ्लॅटचा ताबा वेळेत न दिल्याप्रकरणी महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (महारेरा) घरखरेदीदाराच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. महारेराने प्रकल्प विकसक अर्बन स्पेस क्रिएटर्स यांना विलंबित ताब्याबद्दल खरेदीदाराला व्याज देण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात ओंकार मिलिंद कुलकर्णी यांनी तक्रार दाखल केली होती. कुलकर्णी यांनी मार्च २०२२ मध्ये प्रकल्पातील फ्लॅट क्रमांक ६०५ खरेदीसाठी नोंदणीकृत करार केला होता. फ्लॅटची किंमत ७८ लाख रुपये असून त्यांनी जीएसटी व्यतिरिक्त ४६.८ लाख रुपयांहून अधिक रक्कम विकसकाला अदा केली होती.
विक्री करारानुसार फ्लॅटचा ताबा ३० एप्रिल २०२५ पर्यंत देणे अपेक्षित होते. मात्र, विकसकाला अद्याप भोगवटा प्रमाणपत्र (Occupancy Certificate) मिळवता आले नाही आणि ठरलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबाही देण्यात आला नाही.
यामुळे कुलकर्णी यांनी महारेराकडे धाव घेत विलंबाबद्दल व्याज, फ्लॅटचा ताबा आणि कर्जाचे हप्ते भरावे लागत असल्याने झालेल्या आर्थिक नुकसानीबद्दल भरपाईची मागणी केली होती.
सुनावणीदरम्यान विकसकाने कोविडनंतरच्या अडचणी, कामगारांची कमतरता, पर्यावरणीय मंजुरीतील विलंब, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कामबंदी आदेश, वाहतूक संप आणि खाणकामाशी संबंधित पुरवठा अडचणी यामुळे प्रकल्प उशिरा झाल्याचा दावा केला. तसेच महारेराने प्रकल्पाची मुदत ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत वाढवून दिल्याचेही नमूद केले.
मात्र, महारेराने हे युक्तिवाद फेटाळून लावत स्पष्ट केले की, प्रकल्पाला दिलेली मुदतवाढ ही घरखरेदीदारांच्या रेरा कायद्यातील हक्कांवर परिणाम करू शकत नाही. विक्री करारात नमूद केलेल्या तारखेपर्यंत ताबा न देणे आणि भोगवटा प्रमाणपत्र न मिळवणे ही विकसकाची करारभंगाची बाब असल्याचे प्राधिकरणाने नमूद केले.
त्यामुळे महारेराने विकसकाला १ मे २०२५ पासून प्रत्यक्ष ताबा आणि भोगवटा प्रमाणपत्र मिळेपर्यंत खरेदीदाराने भरलेल्या रकमेवर व्याज अदा करण्याचे आदेश दिले आहेत.
Omkar Milind Kulkarni, Urban Space Creators, Urban Skyline Phase 2, MahaRERA Order, Ravet Pune, Delayed Possession Case, Homebuyer Rights India
Copyright Disclaimer: This post includes copyrighted material used under Fair Dealing (Section 52, Copyright Act, 1957) for the purpose of news reporting, criticism, review and public awareness. All rights belong to the respective owners.
11/06/2026
पुणे : शहरातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने कठोर पावले उचलली असून बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय खासगी तसेच सार्वजनिक स्विमिंग पूल आणि उद्यानांसाठीही पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
महापालिकेने १५ जूनपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. धरणांतील घटलेला जलसाठा आणि यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या आदेशानुसार कोणत्याही बांधकाम प्रकल्पासाठी पिण्याचे पाणी वापरता येणार नाही. त्याऐवजी एसटीपीमधून प्रक्रिया केलेले पाणी, बोअरवेल किंवा विहिरीचे पाणी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वाहन धुणे, अंगण किंवा पदपथ स्वच्छ करणे यासाठीही महापालिकेच्या पाण्याचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
याशिवाय खासगी आणि सार्वजनिक स्विमिंग पूल, तसेच महापालिका आणि खासगी उद्यानांसाठी पिण्याचे पाणी वापरणे तातडीने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नागरिकांनी घरातील गळती तात्काळ दुरुस्त करावी, आवश्यक तेवढेच पाणी साठवावे आणि पाणी बचतीच्या उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महापालिकेने अनधिकृत नळजोडींवरही कठोर कारवाईचा इशारा दिला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पुणेकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केले आहे.
Naval Kishore Ram, Pune Municipal Corporation, Pune Water Cut, Alternate Day Water Supply, Water Scarcity Pune, Water Conservation, Pune Civic News
Copyright Disclaimer: This post includes copyrighted material used under Fair Dealing (Section 52, Copyright Act, 1957) for the purpose of news reporting, criticism, review and public awareness. All rights belong to the respective owners.
पुण्यातील नवले ब्रिज परिसरात गुरुवारी (11 जून) अनेक मालवाहतूक करणाऱ्या एका ट्रकला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे महामार्गावर मोठा वाहतूक अडथळा निर्माण झाला. मिळालेल्या माहितीनुसार, वाहनाला आग अचानक लागली. काही मिनिटांतच ती तीव्र झाली. त्यामुळे संपूर्ण वाहन आगीच्या विळख्यात सापडले. यावेळी आकाशात धुराचे लोट पसरले होते. या घटनेमुळे प्रवासी आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
Navale Bridge, Pune Truck Fire, Cargo Truck, Highway Traffic Jam, Fire Accident Pune, Emergency Services Pune, Smoke Incident Pune
Copyright Disclaimer: This post includes copyrighted material used under Fair Dealing (Section 52, Copyright Act, 1957) for the purpose of news reporting, criticism, review and public awareness. All rights belong to the respective owners.
11/06/2026
पुणे: ऑनलाईन शॉपिंग ॲपवरून मागवलेल्या वस्तूंचे पैसे रिफंड (परत) मिळवण्याच्या नादात बालेवाडी येथील एका २६ वर्षीय नोकरदार तरुणीची तब्बल ७ लाख ३१ हजार ८१२ रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली आहे. सायबर चोरट्यांनी नामांकित 'टिरा ब्युटी' ॲपचे कस्टमर केअर प्रतिनिधी व मॅनेजर असल्याची बनावट ओळख सांगून ही ऑनलाईन हातसफाई केली. याप्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या बाणेर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका २६ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यावरून आयुशी गुप्ता, मॅनेजर संजीव कुमार, वेगवेगळ्या बँक खात्यांचे धारक आणि युपीआय आयडी वापरकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tira Beauty, Ayushi Gupta, Sanjeev Kumar, Pune Cyber Crime, Baner Police Station, Online Shopping Scam, Cyber Fraud Case
Copyright Disclaimer: This post includes copyrighted material used under Fair Dealing (Section 52, Copyright Act, 1957) for the purpose of news reporting, criticism, review and public awareness. All rights belong to the respective owners.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनात अनेक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध मुद्द्यांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि आपल्या भावना मांडल्या.
Savitribai Phule Pune University, Cockroach Janata Party, SPPU Protest, Pune University Protest, Student Movement, Pune Students, University Campus News
Copyright Disclaimer: This post includes copyrighted material used under Fair Dealing (Section 52, Copyright Act, 1957) for the purpose of news reporting, criticism, review and public awareness. All rights belong to the respective owners..
पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील पार्किंगमध्ये मद्यपान करणाऱ्या काही व्यक्तींनी पेटती सिगारेट थर्माकोल व ज्वलनशील कचऱ्यावर टाकल्याने भीषण आग लागली. आगीने वेगाने रौद्ररूप धारण करत जवळ उभी असलेली तीन वाहने जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर पार्किंग परिसरात सुरू असलेल्या मद्यपान व इतर अवैध प्रकारांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
Market Yard Pune, Market Yard Fire, Pune Fire Incident, Pune Vehicle Fire, Market Yard Parking, Pune Safety News, Fire Due To Cigarette Smoking
Copyright Disclaimer: This post includes copyrighted material used under Fair Dealing (Section 52, Copyright Act, 1957) for the purpose of news reporting, criticism, review and public awareness. All rights belong to the respective owners.
पुणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे-मुंबई महामार्गावरील पाषाण येथील सुतारवाडी परिसरात कारवाई करत ‘रॉयल सिलेक्ट डिलक्स व्हिस्की’ ब्रँडचे सुमारे १० हजार ३६८ लिटर बनावट विदेशी मद्य जप्त केले. या कारवाईत मद्यसाठा, वाहन आणि इतर साहित्य असा एकूण १ कोटी ३५ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कंटेनर चालक पप्पूलाल मिठाराम बिष्णोई याला अटक करण्यात आली असून, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Royal Select Deluxe Whisky, Pappulal Mitharam Bishnoi, Pune Excise Department, Fake Foreign Liquor, Pune Mumbai Expressway, Liquor Seizure, Maharashtra Prohibition Act
Copyright Disclaimer: This post includes copyrighted material used under Fair Dealing (Section 52, Copyright Act, 1957) for the purpose of news reporting, criticism, review and public awareness. All rights belong to the respective owners.
पुणे: २१ मे रोजी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार तसेच आयएलएस लॉ कॉलेज प्रशासनाला नोटीस बजावली असल्याची माहिती ओंकार झुंबर लोखंडे या विद्यार्थ्याने दिली. तसेच, पोलीस आयुक्तांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा आरोपही विद्यार्थ्याने केला आहे.
Omkar Zhumbar Lokhande, National Commission for Scheduled Castes, Pune Police Commissioner, ILS Law College, SC Commission Notice, Pune News, Student Complain
Copyright Disclaimer: This post includes copyrighted material used under Fair Dealing (Section 52, Copyright Act, 1957) for the purpose of news reporting, criticism, review and public awareness. All rights belong to the respective owners.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाबाबत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी माहिती दिली आहे. आंदोलन शांततेत आणि लोकशाही मार्गाने पार पडणार असल्याचे दिपके यांनी यांनी सांगितले. गुरुवारी दुपारी ४ वाजता पुणे विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ हे आंदोलन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Abhijit Dipke, Vishwambhar Chaudhari, Asim Sarode, Savitribai Phule Pune University, Cockroach Janata Party, Pune Protest, Student Movement
Copyright Disclaimer: This post includes copyrighted material used under Fair Dealing (Section 52, Copyright Act, 1957) for the purpose of news reporting, criticism, review and public awareness. All rights belong to the respective owners.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
No. 14, 3, Drive Babasaheb Ambedkar Road, Camp
Pune
411001