_de.ha
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from _de.ha, Artist, Pune.
17/08/2025
बाप्पा-२०२५
“देवा तूंचि गणेशु ।सकलार्थमतिप्रकाशु ।म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥
हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥”
श्री गणरायाच्या रुपाचं त्यांना व परिणामी संप्रदायालाही अभिप्रेत असं वर्णन माऊली श्री ज्ञाननाथांनी आपल्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीत करुन ठेवले आहे .
त्याच वर्णनाचा संदर्भ घेत गेल्या वर्षापासून षण्णव अशा श्री गणेशरुपाची निर्मिती करीत आहे.
त्याच संदर्भाला अनुसरून हे यावर्षीचं रुप साकारलं आहे .
घरीच हाताने शाडू मातीची मूर्ती बनवण्याचं हे माझं दहावं वर्ष…
-हरिष राजेंद्र देशमुख
07/05/2025
गोष्ट अंमळनेरच्या मंदिर उभारणीची…
वैशाख शुद्ध एकादशी,अक्षय तृतीयेला स्तंभपुजन करुन सुरु झालेल्या उत्सवाच्या मध्यवर्ती टप्प्यातला आणि मुख्य असा, उत्सवमुर्ती श्री लालजींचा रथोत्सव आज संपन्न होईल.या उत्सवाची खरी सुरुवात झाली ती १८१७ ला मंदिराच्या बांधकाम पुर्ततेसह मुर्तींची प्राणप्रतिष्ठा करताना.पण या मंदिर बांधकामाच्या मागे एक गोष्ट आहे जी श्री सखाराम महाराजांचे चरित्रातही येते.सखाराम महाराज यांना रामानुज संप्रदायातील श्री उद्धव महाराज मुल्हेरकर यांचे शिष्य परंपरेतील श्रीनिवास महाराज अडावदकर यांचा अनुग्रह लाभला नि गुरुआज्ञेने सखाराम महाराज अंमळनेरीच मुक्कामी राहिले.त्यांचे १७८० पासुन अंमळनेरच्या नदीकाठच्या भुईकोट किल्ल्यानजीकच वास्तव्य
होते.हळूहळू स्थानिक लोकांत त्यांचा प्रभाव वाढू लागला.यातुन स्थानिक वतनदार,इनामदार मंडळींही सुटली नाहीत.दरवर्षी पंढरपूर पायी वारीसाठी निघताना आपली झोपडी जाळून टाकावी नि चातुर्मास संपवून आल्यावर पुन्हा स्वतः बांधून त्यात रहावं,ना कशाची मागणी ना काही केवळ भगवंताच्या भक्तीची नामस्मरणाची ओढ, हेच महाराजांचे निर्लोभी व्यक्तिमत्व त्यांचेकडे लोकांना आकर्षित करीत असे.पेशवा दप्तरातील कागद तपासताना महाराजांचे नावे संस्थानचे उल्लेख अनेक कागदांत येतात.महाराजांचे बरोबरीचे सेवेकऱ्यांना इनामे माधवराव राजेबहाद्दर (सरदार नारोशंकर राजेबहाद्दर यांचे नातू) हे देत असत.संस्थानचे उल्लेख असले तरी मंदिर वा मठाचे वा वास्तव्याच्या ठरावीक ठिकाणाचे उल्लेख मिळत नाहीत.
अशीच किर्ती दिगंत पसरत राहिली नी ती पुढे पुण्यात दुसऱ्या बाजीरावांपर्यंतही पोहोचली.पंढरपुरी महाराजांना वास्तव्यासाठी व किर्तनासाठी मंडप असावा म्हणून रावबाजींनी मुख्य मंदिरात दक्षिण द्वाराजवळ ओवरी बांधुन दिल्याचे उल्लेख आहेत.तसेच रावबाजी महाराजांच्या परतवारी वेळी त्यांना तुळशीबागेतील राममंदिरात किर्तनासाठी बोलावत असे,विविध दागदागिने,इनामांची उधळण महाराजांचे पायाशी करत असे मात्र महाराज ते सर्व नाकारत असत.पुढे बहुतेक १७१३ च्या आषाढ वारीसाठी महाराज निघाले असताना त्यांचे बरोबर अंमळनेरचे तत्कालीन मुख्य वतनदार आबाजी तथा आनंदराव देशमुख यांचा मुलगा खुशाल, त्यांचे बंधू हणमंतराव यांचा मुलगा जयराम आणि त्यांचेसोबतचा त्यांचा नोकरगडी पांडोबा हेसुद्धा महाराजांचे सोबत पुण्यापर्यंत आले.पुणे मुक्कामी थांबून महाराज पुढे गेले व ही मुले राजेबहाद्दरांचे वाड्यात काही दिवस थांबली.याच काळात पेशव्यांचे सरदार व कारभारी त्रिंबकजी डेंगळे यांनी त्यांना कैद केले…(continued in pinned comments)
08/09/2024
माझा बाप्पा - २०२४
कैवल्य साम्राज्या चक्रवर्ती श्री माऊली ज्ञाननाथ आपल्या श्रीमत् ज्ञानदेवीच्या पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीस श्री गजाननाच्या रुपाचं वर्णन २० ओव्यांत करतात.त्यातीलच
“देखा षड्दर्शने म्हणिपती | तेचि भुजांची आकृती ||
म्हणऊनि विसंवादे धरिती | आयुधे हाती || “
अशा ओव्यांचा आधार घेत यावर्षीचा बाप्पा साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
या विचाराची सुरुवात माझ्या नुकत्याच झालेल्या पंढरपुर दर्शनावेळी श्रीगुरु चैतन्य महाराज देगलुरकर यांचं श्री ज्ञानेदवीतील
“तरी तर्कु तोचि परशु | नीतिभेदु अंकुशु |
वेदांतु तो महारसु | मोदकु मिरवितसे || ”
या ओवीवरील प्रवचन ऐकताना झाली.
त्यामुळे श्रींनीच ही सेवा या देहाकडुन करवुन घेतली हीच भावना मनात आहे….
त्याच पद्धतीनं श्रींच्या पगडीसाठी मराठ्यांच्या इतिहासातील दैदिप्यमान कारकिर्द गाजवणाऱ्या नागपुरकर राजे भोसले यांच्या शाही पगडीचा संदर्भ घेत पगडी बनवली आहे.
-हरिष राजेंद्र देशमुख
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Culinary Team
Attire
Website
Address
Pune