Pustak Shop

Pustak Shop

Share

साहित्यातील ज्ञात-अज्ञात, नवोदित लेख?

29/07/2025
29/07/2025

'संघर्षगाथा: बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास' या पुस्तकात 30 मुलींनी त्यांचा शैक्षणिक जीवनप्रवास शब्दबद्ध केला आहे. यात एकविसाव्या शतकातील दलित-बहुजनांच्या मुलींचा शैक्षणिक संघर्ष दिसून येतो. जातिव्यवस्था, समाजरचना, कुटुंबपद्धती, सामाजिक पार्श्वभूमी, सांस्कृतिक व धार्मिक जीवन व्यक्तिमत्त्वाच्या विकासात अडथळा ठरतात, याचे दर्शन या ग्रंथात होते. या ग्रंथाच्या निर्मितीचे नेमके काय महत्व आहे हे सांगणारी संपादक अनिल जायभाये यांची भूमिका…
#हरिती_वाचन_चळवळ #पुस्तक

29/07/2025

📚📚 पुस्तक परिचयमाला : पुस्तक १

📚 पुस्तकाचे नाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर : साताऱ्याच्या भूमीतील विचार व कार्य
📚 लेखक : बाळासाहेब कांबळे
📚 प्रकाशक : द युनिक फाउंडेशन,पुणे
📚 परिचयकर्ता : विवेक घोटाळे ( नागदे )
—–
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत की, ‌" जो इतिहास जाणत नाही, तो इतिहास निर्माण करू शकत नाही." लेखक-कवी बाळासाहेब कांबळे यांनी जुन्या सातारा जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीवर प्रकाश टाकून जुना इतिहास नव्याने समोर आणण्याचे काम या पुस्तकातून केले आहे. ‌‘भिनवाडा' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आणि प्रयोगशील-सर्जनशील शिक्षक बाळासाहेब कांबळे यांचे प्रस्तुत पुस्तक जुन्या सातारा जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहवासातील व्यक्तींच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देण्याचे काम करते. देशातील किंवा महाराष्ट्रातील कोणतेही ठिकाण असो, ज्या ठिकाणी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केले किंवा भेटी दिल्या, अशी ठिकाणे केवळ ऐतिहासिक ठरत नाहीत तर ती ठिकाणे, तेथील वास्तव्य, तेथील सभा, सहवासातील व्यक्ती ह्या नव्या पिढीच्या विचारांची व कार्याची प्रेरणाच ठरतात. बालभिवाचा छ. प्रतापसिंह हायस्कूलमधील प्रवेश, त्यांना लहान वयात आलेले अस्पृश्यतेचे अनुभव, त्यांना मिळालेले 'आंबेडकर ' हे आडनाव, त्यांचे आई-वडिल इत्यादी संदर्भात लेखकाने चांगल्या प्रकारे मांडणी केली आहे.
सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर सुभेदार रामजी आपल्या कुटुंबासह १८९६ साली सातारा जिल्ह्यात आले.खटाव तालुक्यातील गोरेगावला ते दुष्काळी कामावर कोशपाल म्हणून नोकरी करत होते.बाल भीमासह कुटुंब सातार्यात होते.
बाबासाहेबांना लहान वयात सैन्याच्या छावणीत अस्पृश्यतेचे अनुभव आले नाहीत पण शाळेत अस्पृश्यतेला सामोरे जावे लागले.सातारा हायस्कूलमध्ये बाल भिवा वर्गमिञांमध्ये गुणवत्तेनुरूप बसू शकत नव्हते.त्यांना एका कोपर्यात एकटे बसावे लागत होते.ते नळाला स्पर्श करू शकत नव्हते,कोण्या स्पृश्य माणसाने नळ भिवासाठी उघडला तरच पाणी पिता येत असे. छ.प्रतापसिंह हायस्कूलमध्ये बाल भिवांनी १९०० ते १९०४ पर्यत इंग्रजी माध्यमातून चौथीपर्यतचे शिक्षण घेतले.आजही त्या शाळेत तेव्हाचे रजिस्टर उपलब्ध आहे.

डॉ. बाबासाहेबांच्या सहवासातील काही व्यक्तींचे कार्य आणि प्रत्यक्ष सहवास लाभला नसला तरी डॉ. बाबासाहेबांच्या विचारांच्या व कार्याच्या प्रभावातून कार्य करणाऱ्या काही व्यक्तिमत्त्वांवरही लेखकाने प्रकाश टाकला आहे. यातील काही व्यक्ती महाराष्ट्राला परिचित असल्या तरी काही व्यक्ती सातारा जिल्ह्याबाहेर माहिती नव्हत्या. या पुस्तकाच्या निमित्ताने या व्यक्ती राज्याला माहिती होणार आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील,चरिञकार चांगदेव खैरमोडे,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे,डॉ.शंकरराव खरात,बंधू माधव,राजा ढाले,शांताबाई कांबळे,ज्योतीबा झोडगे,द्वारकाबाई खैरमोडे,शिवराम तीरमारे ( दुधोंडी ), पाली भाषा अभ्यासक बाबा भारती,आर.डी.भंडारे,बेबीताई कांबळे,शंकरराव फणसे इत्यादींची माहिती लेखक करून देतात.याशिवाय जुन्या सातारा जिल्ह्यातील बहिष्कृत भारतमधील नोंदी लेखकांनी एकञित केल्या आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचे लेख,पञाचा संग्रह,त्याकाळातील सभा व परिषदांतील भाषणाचे संकलन लेखकांनी पुस्तकात केले आहे.

लेखकाचे गाव मायणी आणि मायणीत डॉ.बाबासाहेब आल्याने लेखक प्रेरित आहेत.प्रस्तुत पुस्तकाचे प्रकाशन आज कला व वाणिज्य महाविद्यालय, मायणी ( सातारा ) येथे होत आहे. संस्थेच्या वतीने लेखकाचे अभिनंदन करून आम्ही त्यांचे आभार मानतो.
---------
समीक्षक प्रा.रणधीर शिंदे आपल्या प्रस्तावनेत म्हणतात,

" बाळासाहेब कांबळे यांनी या छोटेखानी ग्रंथात सातारा जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बालपणीचा वास्तव्यकाळ, पुढे आंबेडकरांचा या जिल्ह्याशी आलेला संबंध आणि आंबेडकरी चळवळीला या जिल्ह्यात मिळालेल्या प्रतिसादाचे चित्रण केले आहे. तसेच या अभ्यासात सातारा जिल्ह्यातील डॉ. आंबेडकरी विचारधारा परंपरेचा धांडोळा घेण्यात आला आहे. 1925 नंतरच्या काळातील महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीची दिशा, सामाजिक हस्तक्षेपाची जाणीव, राजकीय निवडणुकांमधील सहभाग व आंबेडकरांची विचारभूमिका हे घटक जाणून घेण्यासाठी असे लेखन महत्त्वाचे ठरते. तसेच या लेखनात चळवळी, समाज यातील अंतर्गत संघर्ष व टकरावाच्या नोंदी देखील आहेत. एखाद्या महापुरुषांच्या कर्तृत्वाची सावली एखाद्या भौगोलिक प्रदेशावर कशी पडते, त्याचा प्रभाव आणि परिणाम समजून घेण्यास असे ग्रंथ महत्त्वाचे ठरतात. तसेच त्या-त्या प्रदेशाचा पूर्वजवारसा, अभिमान जाणून घेण्यासाठी अशी अभ्यासदिशा महत्त्वाची ठरते. याशिवाय गतइतिहासातील सामाजिक संदर्भांची पाहणीदेखील तितकीच महत्त्वाची ठरते."

----------------
जुन्या सातारा जिल्ह्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास, डॉ.बाबासाहेबांच्या समकालीन व्यक्ती आणि विचार जाणून व समजून घेण्यासाठी हे पुस्तक आवश्यक वाचावे.कोणत्याही चळवळीचा स्मृतिइतिहास हा नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरतो.जुना सातारा जिल्हा आणि डॉ.बाबासाहेबांचा , चळवळीतील व्यक्तींचा इतिहास सूञबध्द पध्दतीने व ओघवत्या भाषेत लेखकांनी मांडल्याने तो नवीन पिढीला उपयुक्त ठरणार आहे.

📚 डॉ.विवेक घोटाळे,द युनिक फाउंडेशन,पुणे.

#हरिती_वाचन_चळवळ #पुस्तक

07/07/2025

तुम्हाला महाराष्ट्राबद्दल खरचं माहिती आहे का?

🔸 गडचिरोलीचं जीवन मुंबईपेक्षा किती वेगळं आहे माहिती आहे का?
🔸 कोकणातल्या लोकांच्या सण-उत्सवांचं वेगळेपण कधी अनुभवलंय का?
🔸 नंदुरबारपासून ते सिंधुदुर्गपर्यंत भाषांची, चालीरीतींची रंगीत दुनिया माहिती आहे का?
🔸 मराठवाड्याच्या मातीतल्या प्रथा-परंपरांच्या कहाण्या ऐकल्या आहेत का?

जर उत्तर 'नाही' असेल, तर हे पुस्तक नक्की वाचा!

सर्व जिल्ह्यांचं रूपडं डोळ्यांसमोर उभं करणारं, प्रत्येक मराठी घरात असायलाच हवं असं पुस्तक म्हणजे महाराष्ट्र दर्शन!

पुस्तकाची मूळ किंमत ५०० रु.

संपर्क: 073855 21336

#पुस्तक

Photos from DrAyshwarya-writes 's post 01/07/2025
30/06/2025

#नवं_पुस्तक

हरिती प्रकाशनचे संघर्षगाथा हे पुस्तक नुकतच वाचकांसाठी उपलब्ध झालेले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन पूर्व 700 प्रति बुकिंग झालेला आहे. बुकिंग केलेल्या सर्व रसिक वाचकांचे आभार 🙏 पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला पुस्तक मिळेल. लातूर आणि परिसरातील वाचक मंडळी आजही पुस्तक घेऊन जाऊ शकता.

संघर्षगाथा: बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास
संपादन: अनिल जायभाये, पंचशील डावकर

अभिप्राय
१)
भारतातील कनिष्ठ जाती आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठीच्या संघर्षाकडे शिक्षणाच्या इतिहासकारांनी अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे. सबब, भारतीय शिक्षणाचे औपचारिक इतिहासलेखन पक्षपाती आहे. या पुस्तकाने बहुजन मुलींच्या सर्जनशील संघर्षाला शब्दबध्द करून या पक्षपातीपणास प्रश्नांकित केले आहे; तसेच प्रचलित ज्ञानव्यवहारात मूलगामी परिवर्तनाची आवश्यकता अधोरेखित केली आहे.
- प्रा. दिलीप चव्हाण,
इंग्रजी साहित्याचे अभ्यासक, नांदेड

२)
भारतीय समाजातील जात-पितृसत्तेच्या चौकटीत स्त्री-पुरुष संबंध आणि मानवी नातेसंबंधांची गुंतागुंत समजून घेण्यासाठी, वेगवेगळ्या जात-वर्गातील स्त्रियांच्या जीवनप्रवासांचा अभ्यास आवश्यक आहे. स्त्री प्रश्नाचे एकजिनसी आकलन टाळत, त्यातील जात-वर्गीय पदर उलगडण्याच्या दृष्टिकोनातून संघर्षगाथा: बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास यासारखे दस्तावेजीकरण महत्त्वाचे ठरते.
- मयुरी सामंत,
स्त्री अभ्यास व समाजशास्त्राच्या अभ्यासक, पुणे

३)
या पुस्तकात ३० मुलींनी प्रांजळ आत्मकथन लिहिले आहेत. त्यांचे जीवनप्रवास वेगळ्या जगाचं दर्शन घडवतात. जाती-धर्माच्या चौकटी मोडत या मुली बिनधास्तपणे व्यक्त झाल्या आहेत, हे या पुस्तकाचे महत्वपूर्ण यश आहे. समाजशास्त्र, भाषाशास्त्र व ग्रामीण साहित्य या अनुषंगाने हे पुस्तक मौलिक आहे.
- डॉ. अशोक नारनवरे, लातूर,
फुले-आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक, लातूर

पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क :- 073855 21336

#पुस्तक #संघर्षगाथा Hariti Prakashan

Want your business to be the top-listed Shop in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Pune