Infinitely Digital Software Solutions

Infinitely Digital Software Solutions

Share

You will always get a "Generation Next" design with attractive UI.

Following the latest trends, your website will always be having up to date functionality with efficiency in not just eye candy but also page load and navigation speed.

14/01/2024

प्रसन्न सकाळी तुझीच चाहूल
हळूवार टाकत एकेक पाऊल
लयबद्ध तुझे ते शांत चालणे
आनंददायी होते तुझे ते असणे.

न चुकविला कधी तू एकही दिन
न उगविला सूर्यही कधी तुजवीन
नित्याने ते चालणे,तुझे न चुकणे
आनंददायी होते तुझे ते असणे.

मुखी तुझ्या सदा रामकृष्ण हरी
पुसुनी हळुवार मज स्वच्छ करी
बसूनी धप्पकन,हळूच तुझे टेकणे
आनंददायी होते तुझे ते असणे

सरले दिस आता सरले मास
लागली पहा मना तुझीच आस भेटशील एकदा, पुरे आता रूसणे
वेदनामय आहे रे जगी तुझे आता नसणे.
अतुल मोरे.

06/01/2024

उगवला सूर्य,येतील फिरस्ते
करी कुणी हॅलो, कुणी नमस्ते
कुणी घालून हळुवार फुंकर
उडवी धूळ जी जमली मजवर

नित्याचेच असती माझे मैतर शाळेची मुले तर कुणी वयस्कर
वृद्धांना वाटे एकमेकांचा आधार
बसल्यावर मानती माझे आभार

गुलुगुलु गप्पा तरुण तरुणींच्या
रंगवि स्वप्ने उज्ज्वल भविष्यांच्या
मिठीत एकमेकांच्या बेधुंद होई
विसरून आजूबाजूचे सर्व काही.

मोत्या तर येथे नेहमीच येतो
पाय पसरून निवांत झोपतो
आळोखे पिळोखे देऊन उठतो
झटकून अंग मग निघुनी जातो.

ऊन असो वा पाऊस असो
सभोवती कुणी असो वा नसो
सेवेत तुमच्या सदा तत्पर असे
थकता पाय मज ओलांडून जाल कसे?
अतुल मोरे.

31/12/2023

जीवन हे वळणावळणाचे
कधी चढण,कधी उताराचे
अगम्य असे वळण मार्गाचे
चालत राहायचे मज सदाचे

वाट चालतो मी धुक्याची
वाट चालतो मी अनंताची
निघालो मी हा प्रकाशाकडे
निघालो मी हा आनंदाकडे

विरले धुके हे कधीतरी
भेदेल तिरीप ते दाट जरी
दिसेल मज मग सूर्यबिंब ते
करेल उर्जेने चराचर चिंब ते
अतुल मोरे

24/12/2023

*हिरवाई*
हिरवी झाली अवघी सृष्टी
पाचूंचीच झाली जणू वृष्टी
तरूण झाले मन अन् दृष्टी
हिरवे उमटे चित्र धरेच्या पृष्ठी

हिरवी पाने, आणि राने हिरवी
प्रतिबिंबेही जलाशयात हिरवी
आकाश सारे व्यापले हिरवाईने
नटली सारी सृष्टीच तरूणाईने

परीसस्पर्श जणू हा हिरवाईचा
होई ऋतु हा कोवळ्या कोंबांचा
फुटे नवी पालवी जुन्या खोडांना
करी तरुण पुन्हा साऱ्या ज्येष्ठांना
अतुल मोरे.

17/12/2023

कित्येक वर्षे ती सरली आता
अर्धांगिनी मज सोडून जाता
पाझरले होते डोळे निरोप घेता
हुंदकाच आला पाहुनी तुज आता.

हट्टच धरीला भेटण्याचा तुजला
वेडाच ठरविती सुना मुले मजला
काय त्या पडक्या घरात आजला
झटकून हात,उडवून मान सांगी मजला

चाहूल लागता भुंकणे वाघ्याचे
देता चारा हंबरणे ते कपिलेचे
अन् खुरांनी उकरणे माती सर्जाचे
आठवती मज मैत्र जीवाभावाचे

होती ना ती मुमताज माझी
नव्हतो मीही शहाजहान तिचा
दुर्लक्षित हा ताजमहाल माझा
बांधून दिला होता सखेस माझ्या

दिसणार कसे अदृष्य बंध हे स्नेहाचे
ऐकणार कसे झंकार हृदय सतारीचे
कसे सांगू मी माझ्या लेकरांना अंतरीचे
दु:ख दाटले किती मनी आपल्या विरहाचे
अतुल मोरे.

26/11/2023

वाळवंट ओले पाठीशी
सागर अथांग हा समोर
क्षितीजरेषाही पुसटशी
मज दिसेना माझी चंद्रकोर

उसळणाऱ्या लाटाही पहा
झाल्या वाट पाहूनीया शांत
सैरभैर वाहणारा वाराही
झाला खेळूनीया निवांत

झाला सूर्यास्त हा पहा
रात्र उभी उंबरठ्यावर
वाट तुझी पहात सखी
अधीर मी किनाऱ्यावर

आठवणींच्या पुस्तकात
ठेवली मी आणखी एक
सुकलेल्या त्या फुलासम
संध्याकाळ उदास एक.
अतुल मोरे.

03/09/2023

उंच डोंगरावरून,हिरव्या झाडीतून
वहात धबधबा हा येतो
नाही गंगा, नाही हा यमुना
तरी पापे धर्तीवरची हा धुतो.

भिजवीतो राने,भिजवी खडकांना
भेदभाव हा कधी न करतो
संथ वाहतो,कधी दरीत कोसळता खळखळून हा हसतो

थांबणे माहीत नसे तयाला
वळसा घालून पुढे हा निघतो
ध्येय्याप्रती द्दुढ निश्चयाचा तो
होऊन नदी सागरास मिळतो.
अतुल मोरे.

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Pune
411029